डाॅक्टरांची फी
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे घ्या उदाहरण....
कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे
गोपाळराव,
खरंय तुमचं.
(No subject)
डॉक्टर साहेब - एकदा वेळ काढुन
मिपावरील खव वा संदेशांत
.....
इतके काय मनाला लावून घेता..
पार्टनरशिपमधे घेणार का? अजुन
करू की...कोण म्हणते मराठी
....
मग असे केले तर त्याला
मग असे केले तर त्याला
आमाला नाय वो माहित कंपूबाजी
कंपुबाजी हा मिपा अॅक्टान्वये
किंवा खास कक्षात इतर
काही वर्षे जुना असलेला
पण तिथे वशिल्याशिवाय एंट्री
हा धरून ३५० आहे
लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण
टाका हो
चिमणराव कधीपासून लाजायला
मी नै ज्जा!!!!!!
सत्कारासाठी काही वैद्यकीय
पॅकेज जाहिर करणं आमच्या
अलीकडे सर्जन पंचांग पाहून
दुर्दैवी आहे हे सगळे
गल्ली चुक्या क्या तुमारा भौ..
हेच चालू आहे ह्या धाग्यावर...
वरकरणी चुकली राव
तुम्ही बाहेर जावा इंग्लंड
थोडेफार ताप वगैरे आला कि दणकून मोठा डोस द्यायचा आणि मग असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी द्यायची. अहो प्रायव्हेट डॉक्टरांच्या फी मुळे आपल्या पोटात जळजळ होउ नये म्हणून अँटासीडची गोळी देतात डॉक्टर, सरकारी हॉस्पिटलचा डॉक्टर देतो का कधी मोठ्या डोसाबरोबर अँटासीडची गोळी? सिंपल लॉजीक आहे.
मिपावर सतत टाकल्या जाणार्या
+१ .. :(
४०० करायचे आहे नं
कुणीतरी मला सांगेल का की
कुणीच चुकीचं म्हणत नाही
अजूनही उजेड पडलेला दिसत
अब्यास = साडे ५ वर्ष
मला डॉक्टर व्हायला आवडलं असतं
महोदय, "आवडलं असतं" याला अर्थ
माजोरडेपणा तुम्ही अजून पाहिलाच नाहिये
हे बघा, तुम्ही अफेक्टेड
पहाड साहेबdon't argue with
शब्दा शब्दाशी सहमत
डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून
तसंच काहीसं आरोग्य व्यवस्थेचं आहे
एखाद्या नेत्यानं या सगळ्या
एखाद्या नेत्यानं या सगळ्या गोष्टींना युद्ध पातळीवर भिडायचं ठरवलं तर हे सगळे प्रश्न तो सध्याची सामाजिक चौकट धुडकावून लावून सोडवू शकतो.नक्कीच शक्य आहे. पण... असे काही करण्यापेक्षा "खाजगी मेडिकल कॉलेजची भेट देऊन स्वतःच्या आणि विरुद्ध पक्षातील महत्वाच्या व्यक्तींचा राजकीय पाठिंबा कमावणे" हा व्यवहार राजकारणात जास्त सोपा आहे. स्वहितापुढे जनतेच हित दुय्यम समजले जाते. मुख्य म्हणजे या प्रकारामुळे भरडली जाणारी जनतापण हा प्रकार मोठ्या कौतूकाने पाहते-सांगते. नेत्याने तसे आपोआप करायला जनतेच्या नशीबात ली क्वान यू सारखा नेता असावा लागतो. गेल्या दोन शतकात तरी जगभरात असे दोनच नि:स्वार्थी आणि लोकाभिमुख (बेनेव्हॉलंट) सर्वेसर्वा पाहण्यात आले आहेत.शब्दाशब्दाशी सहमत
पहाड साहेब