Skip to main content

डाॅक्टरांची फी

लेखक स्वधर्म यांनी बुधवार, 11/03/2015 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म

वाचने 82765
प्रतिक्रिया 429

प्रतिक्रिया

कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे मिळवण्यासाठी कोणते मार्ग वैध आणि कोणते मार्ग अवैध आहेत याची जाणीव हिपोक्रेटसची ओथ घेणाऱ्या डॉक्टरांना नसावी!
ही हिपोक्रेटसची ओथ नक्की काय असते, व ती आपल्या देशातले डॉक्टर लोक कधी व कशी 'घेतात' हे मला कुणी समजवून सांगेल का? ते समजले नंतर दर दोन मिनिटांनी 'हिपोक्रेटिक ओथ' म्हणून उर बडवणार्‍या हायपोक्राईट्सना पुढचं समजवून सांगता येईल.

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळराव, कशाला वितंडवाद घालताय? इंग्रजीमध्ये म्हण आहे. Don"t argue with a fool. First he will bring you down to his level and then beat you with experience

In reply to by सुबोध खरे

उचल्ला कळपाट की लागले बडवायला, असले पंडित आजकाल फार झालेत. त्यामुळे अनेकदा न राहवून लिहिलं जातं. शिवाय धडधडीत धंदेवाईकपणा करणारे वैदूही जेव्हा लोकांना इथे ज्ञानदान करू लागतात, अन लोकांच्या ते ध्यानी येत नाही, तेव्हा नाईलाजाने आपले कपाळ बडवायच्या ऐवजी काँप्युटरचा कळपाट बडवून थोडी (दु:)उत्तरं देतो ;) असो. मी आता कल्टी.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब - एकदा वेळ काढुन तुमची खरड वही बघा ना. एक प्रश्न विचारला आहे तुमच्या कडुन खरी माहीती मिळेल म्हणुन.

In reply to by प्रसाद१९७१

मिपावरील खव वा संदेशांत तुमच्याकडून आलेले काहीच दिसले नाही. कृपया पुनः पाठवणार का?

कसलेही कष्ट न घेता केवळ इतर प्रतिसादांच्या जोरावर लेखक जेव्हा असे त्रिशतकी धागे करतात, तेव्हा त्यांचे इनोमिश्रित कौतुक वाटते, व साले असले ज्वलंत विषय आपल्याला का सुचत नाही याची एक मिपाकर म्हणून लाज आहेच... :(

In reply to by ब़जरबट्टू

इतके काय मनाला लावून घेता...सुपारी देता का? दिवसाला १ रुपया/प्रतिसाद या प्रमाणे १०० दिवस धागा "तेवत" ठेवला जाईल...एका दिवसात जास्त प्रतिसाद हवे असल्यास टोटल दिवस कमी होतील (५ प्रतिसाद्/प्रतीदिवस...२० दिवसांसाठी सेम रेट) आज"च" रोख उधार कधीच नै ;)

In reply to by टवाळ कार्टा

हीच तर गोम आहे ना भाऊ, पैसे देऊन तर खुप काही तेवत ठेवता येते... इथे बघा कशी मान्यवर मंडळी साद आली का प्रतिसादाचा पाऊस पाडत्तात.. हे असले काहीतरी सांगा.. असा विषय सांगा, असा विषय सांगा की प्रतीसादांचा धो धो पाऊस पडला पाहिजे. निद्रिस्त, सन्यासी, संसारी सारे आडी कामाला लागले पाहिजे... :) मग बघू कमिशनचे.... :))

In reply to by टवाळ कार्टा

मग असे केले तर त्याला कंपूबाजी म्हणतात
टका, तुम्ही इथे नव्हता म्हणून तुम्हास सांगणे भाग पडतेय, कंपुबाजी वायली अन सांघिक कामगिरी वायली.
कंपुबाजी हा मिपा अ‍ॅक्टान्वये गुन्हा आहे. कंपुबाजी करताना रंगे हात सापडला की अवतारसमाप्तीची शिक्षा होते.
आमची सांघिक कामगिरी आहे असे सांगितले की संमंदेखील तुमचे कौतुक करते असे ऐकून आहे तेव्हा इथून पुढे लक्षात ठेवा हे (म्हणजे मिपा-कायद्याच्या कचाट्यात सापडणार नै तुम्ही). ;)

In reply to by ब़जरबट्टू

कंपुबाजी हा मिपा अ‍ॅक्टान्वये गुन्हा आहे. कंपुबाजी करताना रंगे हात सापडला की अवतारसमाप्तीची शिक्षा होते.

In reply to by बॅटमॅन

पण तिथे वशिल्याशिवाय एंट्री नै असं ऐकलयं. आणि तो कक्ष तिकडे सोडुन इकडेचं जास्त अ‍ॅक्टीव्ह असतो असं निदर्शनास आलेले आहे. =)) @पलाश, पोटदुखीवर इलाज करणारे डॉक्टर इथेचं आहेत की =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सत्कारासाठी काही वैद्यकीय पॅकेज वगैरे जाहीर करताय का ? बाकी आगामी चौशतकासाठी, आखिल भारतीय वाजवी फी आकारणार्‍या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे मोफत वैद्यकीय तपासणीचे पॅकेज देउन सत्कार...

In reply to by खटपट्या

पॅकेज जाहिर करणं आमच्या डिपार्टमेंटात येत नाही. =)) चौशतकानंतर काय करायचं ह्याविषयी जेपी, कार्यकर्ते आणि मंडळींमधे चर्चा चालु आहे. =)) व्यनि केलाय.

दुर्दैवी आहे हे सगळे. राखीव जागा हव्या होत्या पण आता अतिरेक झालाय. समाजाचे इतके तुकडे पडले आहेत कि तुम्ही काही सांगायला गेलात कि गेल्या ५००० वर्षांची भाषा चालू होते. आत्ताची आर्थिक सुस्थिती हि गेल्या ६० वर्षांची फळे आहेत. पण पुढले चित्र भीषण आहे. ह्याच अतिरेकामुळे इंग्रजी शाळांची मागणी वाढली कारण त्या विनानुदानित आहेत. पण तिथेही आनंदच आहे. पण खरी समस्या १२ नंतरची आहे. ज्या पद्धतीत निकृष्ट दर्जाची पिढीच्या पिढी बाहेर पडत आहे त्याचे परिणाम अजून १०-२० वर्षात दिसतील. फाजील आणि एकच एक घोषवाक्य अमक्या मुले आह्माला शिकायला मिळाले नाही वगैरे. मुदलात किती लोहारांनी महारांना त्यांचे द्यान दिले आणि किती कुम्भारणी बाकीच्यांना द्यान दिले? किती चाम्भारांनी बाकीच्यांना दिले. असो. सगळ्यात दुर्दैव म्हणजे आपले शासन. ह्यांच्या उलट सुलट निर्णयाने सगळ्या अनुदानित शाळांची वाट लावली. पूर्वी पुण्यात नुमवी, भावे वगैरे चांगल्या नावाजलेल्या शाळा आता त्यांची अवस्था बघवत नाही. दुसरीकडे मिशनरी शाळा अल्पसंख्याक लोकांच्या म्हणून त्यांना नियम नाहीत. मग ते आपले दर्जा टिकवून आहेत. एकेकाळी ह्या शाळांना कोणी भिक घालत नसे. काळाचा महिमा. पद्धतशीरपणे शासन शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडले. सगळ्या राजकारण्यांनी स्वताचे उखळ तेवढे पांढरे करून घेतले. काय ते भारती आणि डीवाय पाटील कॉलेजेस. पर्यायाच नाही मग चांगली मुले आली स्वतः अभ्यास वगैरे करून आता हे नावाजले पण बक्कल कमावून घेतले. तीच अवस्था विना अनुदानित शाळांची. आपण काय व्यवस्था करतोय ह्याचे भान नाहीये. सगळीकडे नुसते बजबजपुरी. संशोधन वगैरे गेला केरात. लाज वाटली पाहिजेल कि भारतीय मुले मोठ्या संखेने बाहेर शिकायला जातात. पण सध्या एका समाजाबद्दल इतका तिरस्कार निर्माण केलाय कि तुम्ही बोलूच शकत नाही. ह्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगायला लागतील तेंव्हा कदाचित कदचीत डोळे उघडतील पण सध्या तसे होणे अवघड आहे. कारण फक्त अह्मीच खरे अशी काहीशी वृत्ती फोफावली आहे.

In reply to by संदीप डांगे

हेच चालू आहे ह्या धाग्यावर.... वर ज्या लिंक दिल्या आहेत त्यात त्यांनी खाजगी मेडीकल कॉलेज बद्दल लिहिलं होतं. त्या सुतावरून हे आता इथपर्यंत आलेलं आहे.

In reply to by संदीप डांगे

वरकरणी चुकली राव पण जरा खोलात विचार करून बघा. शाषन आपला हात काढून घेताय आणि सगळी प्रायव्हेट वगैरे हि राजकारण्यांची आहेत. एकालाही समाजासाठी वगैरे काही कोलेज चालवायची इच्छा नाहीये तर बक्कल फी मिळते त्यासाठी आहे. पण जे काही आहे ते खरोखर चांगले आहे का? खरे म्हणजे वरती खरे साहेबांनी जे लिहिले आहे त्यावरून मी वरचे लिहिले. पण हे सगळे पार हल्ली वयाच्या २-३ वर्षापासून प्रायव्हेट कोलेजला जाने. भरमसाठ फी भरणे कारण सगळ्यांना चांगले शिक्षण मिळावे असे स्वतः शासनालाच वाटत नाहीये. नुसते कायदे करायचे पण धड एकही गोष्टीत अंमलबजावणी नाही. ह्याचे परिणाम आता अजून १०-२० वर्षात दिसून येतील बघा. आताही येताच आहेत. भरमसाठ डी. एड कॉलेजेस काढली आणि काय दर्जा आहे त्यातून शिक्षक बाहेर पडायचा. काय झाले त्याने. कुत्र हाल खात नीह्ये. तीच अवस्था आता इंजिनियर लोकांची पण झालीये. खरे तर आताचे इंजिनियर म्हणजे पूर्वी बीए वगैरे सारखे मुख्यत्वे शिक्षण प्रकार झालाय. डॉक्टर लोकांची काय वेगळी अवस्था आहे. माझ्यासमोर ३ केसेस आहेत. १) सवर्ण ज्याला शक्य असून बीजे वगैरे मध्ये पूर्वी मिळाली नाही. मग भरपूर फी भरून प्रायव्हेट मध्ये घेतली आणि आता कापतो आहे लोकांना. २) आमची कामवाली बोंब मारते त्यांच्याच जातीतला डॉक्टर पण गुण येत नाहीये नुसताच पास झाला. हि वाक्ये आहेत. ३) एक उत्तरेकडचा ओळखीचा आहे. कुठूनतरी कर्नाटकातून वगैरेहून डॉक्टर झालाय भरपूर डोनेशन भरून. आता खर्च वसुली साठी येत जाता कापतोये. माझ्या सध्या पाहण्यात आलाय कि जवळपास प्रत्येक घरात सीझर होतंय. खरोखर त्याची गरज आहे काय? हे बरेच वर्ष बघतोये. मला तरी चक्क फसवणूक वाटते. सगळ्याचेच कसे काय बुवा? अपवाद म्हून १-२ आहेत म्हणा पण ते खरोखर अपवाद आहे. तुम्ही बाहेर जावा इंग्लंड वा अमेरिकाला उगाचच तिथे होत नाहीत सीझर मग इथेच का? आमच्या भावाला तर डॉक्टर म्हणाला कि दिवाळीला पाडव्याला करू पत्रिका चांगली येईल. च्यायला अरे हे काय आहे? अर्थात असे करून घेणारे पण आहेत महाभाग. दुसरा प्रकार म्हणजे थोडेफार ताप वगैरे आला कि दणकून मोठा डोस द्यायचा आणि मग असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी द्यायची. च्यामारी हे काय? मला स्वतःला २ वेळा परदेशात ताप आला एकदा डॉक्टरणे काहीच न देता फक्त परासीटीमोल घे म्हणून घरी हाकलले आणि दुसर्यावेळी दिले अंतीबायोटिक्स पण उगाचच असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी वगैरे काही दिली नाही. आता बोला भाऊ. कायतरी चुकतंय का नाही? पण मुळात खोलात जायची कोणालाच इच्छा नाहीये. असो नेहमीप्रमाणे भरपूर अन्दाधुंदी माजली की मग कदाचित लोकांना जाग येईल तोपर्यंत इतकी लोकसंख्या आहे मेले २-४ काय फरक पडतोय. आत्ताच माझी मामी वारली. रस्त्यात चालताना पडली म्हणून डॉक्टरकडे गेलो तर त्याने फार काही चेकअप केलेच नाही. टाके घालून घरी आले सगळे. पण हा प्रश्न कोणालाच पडला नाही कि ती का पडली. निदान डॉक्टरणे तरी विचारावे. पुढे ७ दिवसात मोठा हृदयविकाराचा धक्का आला आणि गेली. तेंव्हा पुन्हा विचार चमकून गेला ज्या डॉक्टरकडे गेलो होतो त्याची खरोखर तितकी तयारी होती का? पण आपण काही डॉक्टर नाही आणि आता दुसरीकडून खात्री पण करून घेता येणार नाही.

In reply to by चैतन्य ईन्या

तुम्ही बाहेर जावा इंग्लंड वा अमेरिकाला उगाचच तिथे होत नाहीत सीझर मग इथेच का? इतके दूर कशाला जाता आपल्याकडील सरकारी हॉस्पिटलातही सिझेरचे प्रमाण फार कमी आहे.
    थोडेफार ताप वगैरे आला कि दणकून मोठा डोस द्यायचा आणि मग असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी द्यायची. अहो प्रायव्हेट डॉक्टरांच्या फी मुळे आपल्या पोटात जळजळ होउ नये म्हणून अँटासीडची गोळी देतात डॉक्टर, सरकारी हॉस्पिटलचा डॉक्टर देतो का कधी मोठ्या डोसाबरोबर अँटासीडची गोळी? सिंपल लॉजीक आहे.

In reply to by चैतन्य ईन्या

मिपावर सतत टाकल्या जाणार्‍या जातीयवादी प्रतिसादांचा आणि लेखनाचा तिटकारा आला आहे. मानवतावादी समानतेचा आग्रह धरणार्‍या माझ्यासारख्याला इथे जास्त काळ राहणं शक्य नाही. उद्वेगाचे मळभ साचले आहे.

कुणीतरी मला सांगेल का की खालील अपेक्षेत चूक काय आहे: सरकारने आणखी सरकारी मेडिकल कॉलेज काढावीत जेणेकरून स्पर्धा निर्माण होवून फीया कमी होतील. सध्याच्या डॉक्टर लोकान्वर फारच ताण पडत असल्यामुळे त्यांच्या फीया महाग आहेत. सध्याच्या दहा पट डॉक्टर तयार झाले की फी कमी होईलच ना.

In reply to by काळा पहाड

कुणीच चुकीचं म्हणत नाही याबद्दल. खरेसाहेबांनी सांगितलेली परिस्थिती बघता दहा पट डॉक्टर जरा कठीणच दिसतंय. तरी नामुम्किन अजिबात नाही. पण काय जन्ता जनार्दनाने तसा सरकारवर दबाव आणायला पाय्जेल. रोजच्या समस्यांसाठी जनताजनार्दनास भांडायला येळ न्हाय तो कदिमदी उपटणार्‍या वैद्यकिय समस्यांबद्दल आंदोलन उभारणे जरा कठिणच दिसतंय... आता लोकप्रतिनिधी नावाची जमात लोकांच्या समस्या मांडायला आणि सोडवायला नेमून दिलेली आहे पण ती स्वतःच्याच समस्या निर्माण करण्यात आणि सोडवण्यात व्यस्त आहे. २०-२५ वर्ष भांडल्यावर कुठे सरकारला समस्येची जाणिव होते मग समित्या बसतात, मग अहवाल येतात, धूळ खात पडतात. फास्टर फेणेला निवडून दिलंय ते बेणं आपल्या बोलवत्या धन्यांना आणिक धनदांडगं कसं करता येइल याच विचारात रातदिस एक करतंय. जनतेसाठी खरंच काम करणारं सरकार कधी प्रत्यक्षात येइल काय?

In reply to by काळा पहाड

अजूनही उजेड पडलेला दिसत नाहिये. अहो, ससूनला जा. तिथे १० रुपयांत ट्रीटमेंट होते. फी कमी हवी असेल तर तो एकच इलाज आहे तुमच्यासारख्यांसाठी. काँपिटिशन वाढून फी कमी होण्यासाठी, फुकटात डॉक्टरकी करायला पब्लि़क काय बिनडोक वाट्लं का तुम्हाला? तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कालेजात माझ्या खर्चाने अ‍ॅडमिशन घेऊन देतो. तुम्ही फक्त अभ्यास करून डिग्री घ्या, अन मग दुकान टाका. त्यानंतर बघू किती कमी फीमधे ट्रीटमेंट करता ते. येता का?

In reply to by आनंदी गोपाळ

अब्यास = साडे ५ वर्ष एम्बीबीएस, नंतर १ वर्ष सरकारी नोकरी, नंतर ३ वर्षं पीजी. म्हणजे आजपासून ८ वर्षे, तेही तुमच्या अभ्यासाने डायरेक्ट पास झालात तर. ठेसनं लागलीत तर किती वर्षे लागतील ते वेगळे. पहा बुवा, जमतंय का..

In reply to by आनंदी गोपाळ

मला डॉक्टर व्हायला आवडलं असतं (पण मला रक्त बघूनच कसं तरी होतं त्यामुळे ती शक्यताच नाही). तरी सुद्धा जर मी डॉक्टर झालो असतो, तर ती मी सेवा मानूनच केली असती. अर्थात फक्त डॉक्टरच एवढी वर्ष शिकत नाहीत. कित्येक संशोधक १२+३+२+पीएच्डी एवढा वेळ घेतातच. बाकी ठेसनं, दुकान.. तुम्ही विद्रोही वाले का हो?

In reply to by काळा पहाड

महोदय, "आवडलं असतं" याला अर्थ नाही. आध स्वतः डॉक्टर व्हा, मग इथे इतर डॉक्टरांना तत्वज्ञान शिकवा. तुमचा व्यवसाय कसा करावा हे शिकवायला मी (जागतीक गरीबांची कणव मनी आणून) येत नाही. दुकान मी नाही, तुमच्या सरकारी लोकांनी शॉप अ‍ॅक्ट लायसन दवाखान्यांच्या गळ्यात मारून तयार केलंय. :) मी पण 'सेवा मानूनच' करतो. फक्त त्यासाठी माझी वाजवी फी वाजवून घेतो. परवडत नसेल, तर ससून आहेच :) तुम्ही "सेवा मानून" तुमचा पोटापाण्याचा व्यवसाय करत जा, पगार घेत जाऊ नका. असे केलेत, तर जिथे तुम्ही उपचार घ्याल त्या-त्या सर्व सरकारी इस्पितळांतील तुमच्यावरील सर्व उपचारांचा खर्च मी उचलीन हे वचन देतो. माजोरडेपणा तुम्ही अजून पाहिलाच नाहिये. :)

In reply to by आनंदी गोपाळ

हे अजिबात ऐकून घेणार नाही सत्ता, अधिकार, पैसा, ज्ञान, शारीरिक ताकद ह्यातील एक किंवा अधिक जवळ बाळगून असलेले, समोरच्या अगतिक माणसाशी, ज्या गुर्मीत आणि मस्तीत वागतात बोलतात, हे रोज अनुभवास आले नाही तरी केव्हाही येईल, ह्याची खात्री असतेच ... अस्सल माजोरडा तर संधी मिळेल तिथे आपला माज दाखवतोच ... कारण केव्हा सव्वाशेर भेटेल आणि आपला माज उतरवेल ह्याची त्या माजोरड्यांना सतत भीती असतेच ...

In reply to by आनंदी गोपाळ

हे बघा, तुम्ही अफेक्टेड पार्टी आहात. तुम्ही असंच बोलणार. बाकीचे काय वर्षात डिग्री घेतात का? उगीच डॉक्टरच तेवढे प्रचंड हुशार असतात आणि ढोर मेहनत करतात आणि बाकीचे कमी अक्कल वाले असतात असं जे चित्र तुम्ही लोकांनी उभं केलंय त्याच्यात कितपत सत्यता आहे हे एकदा पडताळून पहा. डॉक्टर लोक इथे ज्या प्रकारे आणि ज्या विखारी पणे (don't argue with fool सारख्या कमेंट्स) उत्तरं देतायत ते बघून डॉक्टरांबद्दल भ्रमनिरास होत चाललाय. तुम्ही फुकट डॉक्टरकी करा असं कुणीच म्हटलेलं नाही. पण काँपिटिशन निर्माण करायला समाजाचं जर त्यात हित असेल तर काहीच प्रत्यवाय नसावा. तुम्हाला तुमचं बिझनेस मॉडेल बदलावं लागेल आणि ते कसं बदलायचं ते तुम्ही पहालच.
ससूनला जा. तिथे १० रुपयांत ट्रीटमेंट होते. फी कमी हवी असेल तर तो एकच इलाज आहे तुमच्यासारख्यांसाठी
सारख्या माजोरड्या कॉमेंटस जर तुम्ही लोक देत असाल तर हा प्रयोग करून पहायला सुद्धा काहीच हरकत नाही.
दुकान टाका
बाकी दुसरं काही नाही तर निदान स्वतःच्या पेशाबद्दल तरी निदान जरा आदर बाळगा. शी!

In reply to by काळा पहाड

पहाड साहेब don't argue with fool हा प्रतिसाद आयुर्हीत यांच्या "आधुनिक पण अयोग्य उपचारामुळे मरणारी माणसे ही ४ पट जास्त (4x) असतात," या बालबुद्धीच्या प्रतिसादाला होता.बिनबुडाचे बेफाट आरोप करणे आणि आधुनिक वैद्य्कावर टीका करून आपले उपचार कसे चांगले हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यात जाहिरातीचा बराचसा भाग हि आहे. तेंव्हा तो विषय सोडून द्या. राहिली गोष्ट "पण काँपिटिशन निर्माण करायला समाजाचं जर त्यात हित असेल तर काहीच प्रत्यवाय नसावा." एक एम बी बी एस डॉक्टर करण्यासाठी ५० खाटांचे रुग्णालय असावे लागते. म्हणजे जेजे किंवा के इ एम सारख्या ठिकाणी २०० विद्यार्थ्यांना २००० खाटांची रुग्णालये आहेत. नुसतीच तेवढी बांधून नव्हे तर ती चालवावी लागतात. त्यासाठी तिथे रुग्ण यावे लागतात. त्यांना फुकट औषधे द्यावी लागतात फुकट उपचार करावे लागतात. या गोष्टी करण्यासाठी प्रचंड भांडवलीच गुंतवणूक नव्हे तर चालू ठेवण्यासाठी अफाट खर्च करावा लागतो. यानंतर तेथे शिकवण्यासाठी तज्ञ डॉक्टर नोकरीवर "टिकवून" ठेवावे लागतात. तुमच्या साठी उदाहरण म्हणून मी ए एफ एम सी चे उदाहरण देत आहे. तेथे १२५ विद्यार्थ्यांसाठी कमांड रुग्णालय १२०० खाटा. MH CTC ४०० खाटा, MH खडकी ३०० खाटा अशा १९०० रुगणांसाठी खाता उपलब्ध आहेत. २००६ ला मी तेथून निवृत्त होण्याच्या वेळेस दर वर्षी च्या पाच एम डी च्या रुग्णांसाठी आम्ही तेरा सहाय्यक प्राध्यापक आणी प्राध्यापक शिकवण्यासाठी होतो. ( तीन वर्षाच्या पंधरा विद्यार्थ्यांसाठी तेरा डॉक्टर-- यातील दहा कमीत कमी १० वर्षे अनुभव असलेले आणी तीन डॉक्टर वीस वर्षे अनुभव असलेले). इतका कर्मचारी वर्ग "टिकवून" ठेवणे हि गोष्ट सोपी नाही. आज महाराष्ट्र शासनाच्या किंवा महापलिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात माझ्या विषयात चांगले शिक्षक मिळत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. कारण बढती मध्ये असलेल्या आरक्षणामुळे खुल्या वर्गातील डॉक्टर पेन्शन घेऊन सोडून गेले आहेत /जात आहेत .त्यांना खाजगी महाविद्यालये पूर्ण पगार देऊन आपल्या गळाला लावून घेतात. आरक्षित वर्गातील चांगले डॉक्टर बाहेर मिळणाऱ्या चांगल्या पगारामुळे सरकारी नोकरीत येत नाहीत. यामुळे आज रेडीयोलोजी या विषयात सरकारी महाविद्यालयात चांगले शिक्षक नाहीत हि वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने इतर सर्व विषयात आहे. अशा परिस्थितीत आपण म्हणता कि सरकारने भरपूर वैद्यकीय महाविद्यालये काढावीत. "सध्याच्या दहा पट डॉक्टर तयार झाले की फी कमी होईलच ना." याचा भांडवली खर्च करण्याचीच सरकारची ऐपत नाही मग ती चालवावीत कुणी? आणि कशी? हवेत मनोरे बांधणे सोपे आहे. खाजगी महाविद्यालये चालतात का तर सरकारी प्रयत्न अपुरे आहेत म्हणून.मग ५० लाख भरून होणारे डॉक्टर आपल्याला सरळच विचारतात कि आम्ही समाजसेवा का करायची? हि वस्तुस्थिती आहे. त्यात आपण म्हणता चायनीज डॉक्टर आणायचे. मुळात त्यान्चे चांगले डॉक्टर इकडे का येतीलइथल्या पेक्षा ५० ते ६० पट पैसे अमेरिकेत मिळतात तेथे जातील कि. मग इकडे येणारे बहुसंख्य चायनीज डॉक्टर टाकाऊच असतील त्यांचा दर्जा कुणी तपासायचा आणि त्यांच्या कडून उपचार आपण आपल्या नातेवाईकांसाठी घ्याल का? मग काय त्यांना सरकारी नोकरी द्यायची आणि गरिबांना गिनी पिग बनवायचे? इथल्या प्रतिसादांच्या दर्ज्याबद्दल काय म्हणावे? कोणी लुटारू वाटमारी करणारे म्हणतात. कोणी ड्रायव्हर बरोबर तुलना करतात. कुणाला लश्करातील लोकांनी बोनस मागावा असे वाटते. चारशेच्या जवळपास प्रतिसादांपैकी एकही प्रतिसाद हे म्हणत नाही कि डॉक्टरला किमान संगणक किंवा धुलाई यंत्र किंवा फ्रीज दुरुस्त करणाऱ्या माणसापेक्षा(३५० रुपये) किंचित का होईना जास्त दर लावता यावा.( होम व्हीजीटचे चारशे रुपये तरी ) यातील एकही माणूस रात्री दोन वाजता फोन घेतहि नाही मग घरी येणे तर दूरच राहिले. माझ्या दवाखान्यात सुताराने आपल्या अर्ध्या तासाच्या कामाचे बाराशे रुपये घेतले आणि प्लम्बर ने ८०० रुपये. वर जो उठतो तो डॉक्टरने समाजसेवा केली पाहिजे हा उपदेश देतो. तेंव्हा समाजाकडून माझी काहीच अपेक्षा नाही. त्यांनी मला आदर द्यावा( आदराचा काहीही उपयोग नाही. आयुष्याची अनमोल अशी २३ वर्षे देऊन लष्करातून बाहेर पडल्यावर या आदराची व्यवहारात काडीचीही किंमत नाही हे व्यवस्थितपणे समजून आलेले आहे) असेही मी म्हणत नाही. मला माझा व्यवसाय कोणताही उपदेश न देता स्वच्छपणे करू द्यावा. आपल प्रतिसाद अर्थातच अज्ञानातून आलेला आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे आपल्या बद्दल मला राग नाही.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून लाजवू नका. मी वयाने आणि अनुभवाने तुमच्यापेक्षा फारच छोटा आहे. मला जी काळजी वाटते ती समाजातल्या गरीब रुग्णांबद्दल वाटते आणि त्या दृष्टीने तुम्ही मला साम्यवादी म्हटलं तरी मला वाटतं मला वाईट वाटणार नाही. कुठलाही गरीब (पाकिस्तानी सोडून) उपचारांविना मरू नये आणि प्रत्येकाला त्याच्या किमान गरजांपुरतं अन्न वस्त्र आणि निवारा मिळावा या माझ्या (कदाचित भाबड्या पण प्रामाणिक) अपेक्षा आहेत. सरकार २०११ च्या आकड्यांनुसार जीडीपीच्या ८.०५% खर्च करत आहेच. तेव्हा सरकारसाठी हा प्रायॉरिटीचा मुद्दा आहेच. पण हा खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. वर्ल्ड बँकेच्या माहितीनुसार भारतात प्रत्येक १००० लोकांमागे फक्त ०.७ डॉक्टर्स आहेत. तेच अमेरिकेत २.५ डॉक्टर्स आणि ब्रिटन मध्ये २.८ डॉक्टर्स आहेत. आणि हे फक्त फिजिशियन आहेत. म्हणजे स्पेशलिस्ट पाहिले तर हा रेशो आणखीनच विकृत असणार हे उघड आहे. यामुळेच बहुधा भारताची बहुसंख्य लोकसंख्या आरोग्य सेवेच्या बाहेर आहे. तेव्हा ही सरकारची जबाबदारी ठरते की एवढ्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी तितकेच डॉक्टर हवेत आणि ते एकतर ट्रेन करावे लागतील किंवा बाहेरून आयात करावे लागतील (जसं ब्रिटन करतं). तुम्ही जे प्रॉब्लेम्स सांगताय (उदा: एक एम बी बी एस डॉक्टर करण्यासाठी ५० खाटांचे रुग्णालय असावे लागते) ते मी नाकारत नाही, पण ते लॉजिस्टिकल इश्श्यूज आहेत. एखाद्या नेत्यानं या सगळ्या गोष्टींना युद्ध पातळीवर भिडायचं ठरवलं तर हे सगळे प्रश्न तो सध्याची सामाजिक चौकट धुडकावून लावून सोडवू शकतो. आरोग्य प्रश्न येत्या दशकात (विशेषतः नवीन जीवनशैली मुळे तयार होणारे) ज्या प्रकारे उग्र रूप धारण करणार आहेत ते पहाता कुणीतरी याकडे गंभीर नजरेनं पाहील अशी आशा आहे. परवडत नाही म्हणून रोगाला सहन करणार्‍यांची संख्या सध्याच फार जास्त असावी आणि बरेच लोक त्यामुळे मृत्यूमुखी सुद्धा पडत असावेत. आणि एका मोठ्या समाजाला फार काळ आरोग्य व्यवस्थेच्या बाहेर ठेवून फक्त एका ठराविक आर्थिक प्राप्ती असणार्‍या समाजाला (फक्त उच्च 'च' प्रतीच्या) आरोग्य सुविधा विकण्याचा धंदा डिमांड सप्लायच्या नियमानुसार चालू असला तरी समाजाला आणि त्याच्या नेत्यांना त्यावर उत्तर शोधावंच लागेल. सध्या जसं बिल्डर फक्त लक्झुरियस २+ बीएचके चे फ्लॅटच बनवतात आणि ते न परवडणारी बहुसंख्य जनतात झोपडपट्टीत रहायला मजबूर आहे तसंच काहीसं आरोग्य व्यवस्थेचं आहे. पण इथे मामला जिवाचा आहे. आणि जीव वाचवण्यासाठी कोणताही गुन्हा क्षम्य असतो. तस्मात, समाज यावर उत्तर शोधेलच. जर इथली कॉलेजेस ५० लाख घेत असतील तर चायनातली कॉलेजेस त्याहून फारच कमी घेतात हे आपणाला माहीत असेलच. इथले बरेच विद्यार्थी चायनाच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकतायत. शेवटी समाजाला भले उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळणार नसेल तर साधारण दर्जाची मिळायला काय हरकत आहे?

In reply to by काळा पहाड

एखाद्या नेत्यानं या सगळ्या गोष्टींना युद्ध पातळीवर भिडायचं ठरवलं तर हे सगळे प्रश्न तो सध्याची सामाजिक चौकट धुडकावून लावून सोडवू शकतो. नक्कीच शक्य आहे. पण... असे काही करण्यापेक्षा "खाजगी मेडिकल कॉलेजची भेट देऊन स्वतःच्या आणि विरुद्ध पक्षातील महत्वाच्या व्यक्तींचा राजकीय पाठिंबा कमावणे" हा व्यवहार राजकारणात जास्त सोपा आहे. स्वहितापुढे जनतेच हित दुय्यम समजले जाते. मुख्य म्हणजे या प्रकारामुळे भरडली जाणारी जनतापण हा प्रकार मोठ्या कौतूकाने पाहते-सांगते. नेत्याने तसे आपोआप करायला जनतेच्या नशीबात ली क्वान यू सारखा नेता असावा लागतो. गेल्या दोन शतकात तरी जगभरात असे दोनच नि:स्वार्थी आणि लोकाभिमुख (बेनेव्हॉलंट) सर्वेसर्वा पाहण्यात आले आहेत.

In reply to by काळा पहाड

काळा पहाड साहेब,
आणि एका मोठ्या समाजाला फार काळ आरोग्य व्यवस्थेच्या बाहेर ठेवून फक्त एका ठराविक आर्थिक प्राप्ती असणार्‍या समाजाला (फक्त उच्च 'च' प्रतीच्या) आरोग्य सुविधा विकण्याचा धंदा डिमांड सप्लायच्या नियमानुसार चालू असला तरी समाजाला आणि त्याच्या नेत्यांना त्यावर उत्तर शोधावंच लागेल.
या वाक्याच्या शब्दाशब्दाशी सहमत. अारोग्य खर्चाबाबत तुंम्ही समाजाची बाजू फार म्हणजे फारच मुद्देसूद मांडली अाहे. डाॅक्टरांचीही काही बाजू अाहे, पण एकंदर डाॅक्टर म्हणजे कुणी समाजाचा अन्यायग्रस्त, दुर्बल घटक, साॅफ्ट टार्गेट वगैरे दृष्टीकोन खरंच वस्तुस्थितीला धरून नाहीत.

In reply to by काळा पहाड

पहाड साहेब आपण केलेली तुलना अगदी योग्य आहे. घर या (अन्न वस्त्र निवारा यापैकी एका) मुलभूत समस्येला जसे बिल्डर आणि राजकारणी यांचे साटे लोटे जबाबदार आहेत. तसेच आरोग्यसेवेत राजकारणी आणि शिक्षण सम्राट यांचे आहेत. पण बिल्डर आणि राजकारणी यांच्या साटे लोत्यात तुम्ही सिव्हिल इंजिनियरला दोषी ठरवत नाही. तो बिचारा केवळ एक टेक्निकल एक्स्पर्ट आहे. रस्ता खचला किंवा पूल पडला किंवा एखाद्याची आयुष्यभराची कमाई घरात घालून घर न मिळाल्याने तो रस्त्यावर आला. यात सिव्हिल इंजिनियरला दोषी ठरवत नाही.मुंब्रा येथे काही इमारती पडल्या आणि बरीच माणसे मेली तेंव्हाही प्रश्न जीवाचाच होता. तेथेही कंत्राटदार आणि विकासक काही दिवस "आत" गेले आणि आता बाहेर आहेत. लोकांनी काय केले? तशीच परिस्थिती इथे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या नाड्या या डॉक्टरांच्या हातात नाहीत कि ते यात काहीहि करू शकत नाहीत. त्यांना कितीही वाटत असले तरीही ते यात बदलही घडवू शकत नाहीत. परंतु एक्का साहेबांनी म्हटल्याप्रमाणे soft target असल्याने त्यांच्यावर हल्ला कुणीही करावा. आपले शिक्षण सम्राट ( ज्यांची मोठी मोठी खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत) मोठे मोठे राजकारणी आहेत. त्यातील एक तर आरोग्य मंत्री होते. त्यानी सार्वजनिक आरोग्य सेवेचा कसा पद्धतशीर खेळखंडोबा केला यावर दहा तरी लोक पी एच डी करू शकतील. के इ एम रुग्णालयातील CT स्कॅन मशीनच्या देखभालीचे कंत्राट न केल्यामुळे ते चार महिने बंद होते याला तेथील डॉक्टरनी कितीही कंठ शोष केला तरी काहीही होत नाही. रुग्णांना बाहेरून CT स्कॅन करावा लागला. यावर सर्वांनी तेथील डॉक्टरचे त्या CT स्कॅनवाल्यांशी साटे लोटे आहेत म्हणूनच असे झाले म्हणून शिव्याशाप हि खाउन झाले. अत्यवस्थ रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातून फक्त मार खाणे राहिले होते. अशा अनेक कथा आहेत. आज सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस कोणत्याही सार्वजनिक गोष्टीकडे संशयी नजरेनेच पाहत आहे.( प्रत्येक माणूस स्वच्छ आहे हे गृहीत धरून) यामुळेच गुरुतुल्य अशा डॉक्टर वि नि श्रीखंडे यांनी खेदाने म्हटले आहे कि डॉक्टरांच्या सेवाभावाची समाजाला किंमत उरलेली नाही. जाता जाता- चिनी वैद्यकीय महाविद्यालयात एका वर्षाची फी साडे तीन ते चार लाख आहे शिवाय राहण्याचा खर्च सव्वा ते पावणे दोन लाख. जेवण्याचा आणि जाण्या येण्याचा खर्च वेगळा. असा खर्च पाच वर्षे केल्यावर आपण एम बी बी एस होणार आणि परत आल्यावर विदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्हता मिळवण्यासाठी एम सी आय ची परीक्षा द्यावी लागते त्यात पास होणार्यांचे प्रमाण १०-१२ टक्के आहे. हे सर्व गृहीत धरून परत आलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती जण "सेवा"भावी असतील हा एक वेगळाच प्रश्न आहे.

In reply to by सुबोध खरे

अत्यवस्थ रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातून फक्त मार खाणे राहिले होते. अशा अनेक कथा आहेत.
रवी/सोमवारी पनवेलला होतो. अधिक काय लिहू?

जाँदेना बे. मला वाटायचं की निदान जापनीज तेल मालिशवाला असेल. च्यायला हे तर पोपट घेऊन फिरणारं हाय. नादाला लागू नका. (अधिक माहितीसाठी व्यनी करू नका. इथेच विचारा) ~~जनहितार्थ जारी~~

या धाग्यावरच्या गोंधळात मला अजून १ समजलेले नाही समजा १ व्यक्ती जीचे वार्षिक उत्पन्न साधारण २.५ लाख आहे...त्या व्यक्तीच्या पालकांपैकी कोणाला हार्ट संबंधीत उपचार घ्यावे लागले तर त्याच्यासमोर काय पर्याय असतील्/आहेत ज्यामुळे उपचार करणार्या डॉक्टरला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळेल परंतू त्या व्यक्तीवर आर्थिक बोजा पडणार नाही

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हा पर्याय अजून बहुसंख्य लोकांपर्यंत पोचलेला नाहीये..आणि डायबेटिस असेल तर पहिले ४ वर्षे काही आजार कव्हर होत नाहीत...अजून काही??

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वर्षाला २.५ लाखाचे उत्पन्न असलेल्याला कोणी गरिब नाही समजत...त्यामुळे चॅरिटीचे बरेच पर्याय बंद होत असावेत

In reply to by टवाळ कार्टा

नारायण हृदयालय कमी पैशात हृदयावरील उपचार करते. देवी शेट्टी ह्यांच्या ह्या हॉस्पिटल बद्दल बहुदा सत्यमेव जयते मध्ये ऐक्लं होतं. मुलाच्या वेळेसही हेच नाव सर्वात आधी सुचवल्या गेले. पण एकदा खात्री करुन घ्यावी.

In reply to by पिलीयन रायडर

जरूर चौकशी करा. डॉ देवींनी वैद्यकीय व्यवस्थापनात अनेक क्रांतीकारी बदल करून उपचारांच्या किंमती लक्षणियरित्या कमी केलेल्या आहेत. पाश्च्यात्य देशातही (काहींना यामुळे डॉ देवींच्या क्षमतेबद्दल खात्री वाटेल ;) ) त्यांच्या व्यवस्थापकीय प्रारुपाचे (मॉडेल) अध्ययन केले जात आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्काजी.. सहज सुचले म्हणून... दवाखान्यात किंवा विशेषतः वैद्यकीय शस्त्रक्रियेदरम्यान या थोरामोठ्यांनी तयार केलेल्या प्रारूपांबद्दल किंवा प्रोटोकॉल बद्दल (डॉ नीतू मांडके यांनी असे अनेक प्रोटोकॉल तयार केले असे वाचले आहे) आम्हाला समजेल अशा भाषेत कृपया एखादी लेखमालिका लिहा.. शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांनी वॉश घेणे, OT ची तयारी किंवा शस्त्रक्रियेदरम्यान पेशंटच्या नातेवाईकांना कोणत्या प्रकारे / पद्धतीने माहिती देणे अशा साध्या गोष्टींपासून सुरूवात केली तरी चालेल.

ट का शेट आरोग्य विमा हेच उत्तम साधन आहे. ४५ वर्षच्या दोन माणसांसाठी दर वर्षी ३ लाखाचा आरोग्यविमा ६-८००० /- इतका येतो आणि तोच जर मधुमेह असेल तर १० -१२ हजार पर्यंत जातो. जसे वय वाढत जाते तसा त्यावरील हप्ता वाढत जातो. तेंव्हा पंचवीशीच्या मुलाला आपल्या आईवडिलांसाठी दर महिना ५०० रुपये हा खर्च अवाढव्य नाही. परंतु आपल्याकडे याबद्दलची जागरुकताच नाही. त्यामुळे बहुसंख्य लोक आजारी पडेपर्यंत काहीच करीत नाहीत. प्रत्येक आईबाप आपल्या मुलांसाठी तोंडचा घास काढून देतात शिवाय आपल्या भविष्यासाठी हि तरतूदहि करतात परंतु आपल्या उमेदिच्या काळात आपल्या वाढत्या वयात येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची काहीही सोय करीत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. जर २५ वर्षाच्या मुलाने आपल्या चाळीशीच्या नंतर येणाऱ्या खर्चासाठी दर वर्षी १२०००/- रुपये (दर महीना रुपये १०००/-) ppf( भविष्य निर्वाह निधी) मध्ये ठेवले तर चाळीशीला ३ लाख ७४ हजार रुपये होतात. यानंतर हे पैसे तसेच व्याजावर ठेवले तर आयुष्यभर येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची बर्यापैकी सोय होऊ शकेल. शिवाय चाळीशी होण्याच्या अगोदर आपला आरोग्य विमा केला तर जवळ जवळ सर्व वैद्यकीय खर्च या दोन्ही तून निघू शकेल. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. कारण मला काय धाड भरलीये पासून होय हो करायचाय ( आळशीपणा) अशा विविध कारणामुळे ते होताना दिसत नाही.

In reply to by सुबोध खरे

अगदी सहमत...पण ज्यांना अजून"ही" हे समजलेले नाही ती सुध्धा माणसेच आहेत की जर २५ वर्षाच्या मुलाने आपल्या चाळीशीच्या नंतर येणाऱ्या खर्चासाठी दर वर्षी १२०००/- रुपये (दर महीना रुपये १०००/-) ppf( भविष्य निर्वाह निधी) मध्ये ठेवले तर चाळीशीला ३ लाख ७४ हजार रुपये होतात. यानंतर हे पैसे तसेच व्याजावर ठेवले तर आयुष्यभर येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची बर्यापैकी सोय होऊ शकेल. हे सहीच चाळीशी होण्याच्या अगोदर आपला आरोग्य विमा केला तर जवळ जवळ सर्व वैद्यकीय खर्च या दोन्ही तून निघू शकेल. हे समजले नाही....जरा आणखी माहिती मिळेल काय?

In reply to by टवाळ कार्टा

चाळीशीनंतर आपल्याला रोग होण्याची शक्यता वाढते आणि विमयाचा हप्ता चाळीशी नंतर वाढत जातो. म्हणून चाळीशीच्या एक वर्ष अगोदर विमा काढला तर हप्ता थोडा कमी असतो

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न. माझी अशी समजूत होती की विम्याचा हप्ता एक वर्षासाठी असतो (उदा: ८००० रुपये) आणि तो दर वर्षी वेगळा भरावा लागतो आणि तो विमा फक्त त्या वर्षासाठीच लागू असतो. असा एखादा विमा आहे का की ज्या साठी मी साठी पर्यंत दर वर्षी पैसे भरेन (उदा: दरवर्षी ८००० रुपये), त्यातून मला ६० वर्षांपर्यंत काही कव्हर मिळणार नाही पण त्यातून ६० वर्षांनंतर होणार्‍या रोगांवर मला कव्हर मिळेल? मला कव्हरची गरज तेव्हाच असणार असेल (बहुधा).

In reply to by काळा पहाड

विम्याचा विषय निघाल्यामुळे लिहितो. आरोग्यविमा हा गाडीच्या विम्यासारखा आहे. आहेे तीच पॉलिसी रिन्यू केली जात असली तरी तो दरवर्षी नवा काढावा लागतो. (काही कंपन्या सवलतीच्या दरात दोन वर्षाच्या कालावधीचे विमे विकतात). नवीन विमा काढताना तुमचे वय 35च्या आत असल्यास कुठलाच त्रास न होता सहज विमा मिळतो. पस्तिशी उलटल्यानंतर काही खाजगी विमाकंपन्या शारीरिक तपासणी करण्याची मागणी करतात. या तपासणीमध्ये एखादा आजार निघाला तर तो प्री-एक्झिस्टिंग डिसिज या कलमाखाली 3 वर्षापर्यंत उपचारासाठी अपात्र होतो. किंवा एखादा आजार विमाकंपनीसाठी प्रचंड खर्चिक आहे असे लक्षात आले (उदा. कॅन्सर) तर तो कायमचा अपात्र ठरवून विमा कंपनी कवरेज जेऊ शकते. सरकारी विमाकंपन्या 40 किंवा 45 नंतर विमा देण्यापूर्वी शारीरिक तपासणीची सक्ती करतात असे दिसते. केवळ याच कारणासाठी 35च्या आत विमा काढलेला बरा. बहुतेक सर्व कंपन्या लाईफलाँग रिन्यूअल देत असल्या - तरी सर्वच देत नाहीत. त्यामुळे विमा घेताना लाईफलाँग रिन्युअल उपलब्ध आहे याची काळजी घेतलेली बरी. 3 वर्षानंतर विमापॉलिसी दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करता येते. मात्र त्यातही साधारण एकाच प्रकारच्या पॉलिसीमध्ये ट्रान्सफर होते. जसजसे वय वाढत जाते तसतसा विम्याचा प्रीमियम वाढतो. 35 पूर्वी विमा काढल्यानंतर प्रीमियम कमी असतो हे त्या वयाच्या ब्रॅकेटपुरतेच खरे आहे. 35 पूर्वी विमा काढून तो 45 वयापर्यंत रिन्यू करत आल्यावर प्रीमियम वाढलेला असेल हे मी जितपत नियम वाचलेत त्यानुसार खरे आहे. (कोणी दहा-बारा वर्षापूर्वी 35च्या आत विमा काढून आता जुन्याच प्रीमियमवर 45त तो रिन्यू केला आहे असे प्रत्यक्ष उदाहरण पाहिल्याशिवाय या नियमाची सत्यासत्यता कळणार नाही). उपचाराचा जितका जास्तीतजास्त खर्च अपेक्षित आहे तितक्या कवरेजचा विमा घ्या. 3लाख रुपये विमा हा एका कुटुंबासाठी अत्यंत अपुरा आहे. हार्ट सर्जरीला एका व्यक्तीला अडीच लाख लागतात. जर एखादे कुटुंब अपघातग्रस्त झाले तर 3 लाख रुपयात नवरा बायको व मुलगी असा तिघांचा उपचार होणे अशक्य आहे. आजच्या दरानुसार प्रत्येक व्यक्तीला किमान पाच लाखाचा विमा संरक्षण असावे. त्यासाठी पन्नाशीच्या आत असाल तर फॅमिली फ्लोटरसारखे कवर घेतलेले चांगले. त्यात एकाच पॉलिसीवर कुटुंबाला संरक्षण मिळते. विमा घेताना कंजूषी न करता क्रिटिकल इलनेस वगैरे सर्व पर्याय उपलब्ध असलेला विमा घ्यावा. जसे वय वाढेल तसे विम्याचे संरक्षण तपासून पाहून त्यात बदल करावा. बेसिक इंडेम्निटी पॉलिसीसोबत टॉप अप किंवा सुपर टॉप अप पॉलिसीही घ्यावी. सुपरटॉपअप पॉलिस्यांमध्ये पहिली विवक्षित रक्कम रुग्णाने भरायची असते व उरलेला खर्च ती विमाकंपनी भरते. उदा. उपचाराचा खर्च 25 लाख रुपये होतोय असे उदाहरण घेतले तर पूर्ण 25 लाखाची इंडेम्निटी पॉलिसी खूपच महाग पडेल. (5 लाखासाठी 8 हजार प्रीमियम तर 25 लाखासाठी 40 हजार प्रीमियम) त्याऐवजी 5 लाखाची बेसिक इंडेम्निटी पॉलिसी घेऊन (8 हजार प्रीमियम) 25 लाखाची सुपर टॉप अप पॉलिसी घेतली (5 हजारापर्यंत प्रीमियम) तर 13-14 हजारात 30 लाखाचे कवरेज मिळते. सुपर टॉप अप पॉलिसीमध्ये सुरुवातीचे 3-4 लाख डिडक्टिबल हे तुम्ही तुमच्या बेसिक पॉलिसीतून भरु शकता. 5 लाखाचे कवरेज काढायचे असेल तर 3 लाखाचा विमा एका कंपनीकडून व 2 लाखाचा विमा दुसऱ्या कंपनीकडून असे काढले तर विम्याच्या कवरेजची खात्री होईल. (एखाद्या कंपनीने विशिष्ट आजाराचा विमा नाकारला तर दुसऱ्या कंपनीकडून तो मिळू शकतो). www.aisiakshare.com/node/2996 इथे थोडी आणखी चर्चा आहे.