उचलता वजन हे - Lifting Technique
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात.
पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते. त्याकडे नीट लक्ष दिलं नाही, कुठेतरी कसकसतं आणि मग त्या आयोडेक्स च्या जाहिरातीसारखा पाठीकडे हात जातो. तर, यासाठी लिफ्टिंग टेकनिक व्यवस्थित असलं पाहिजे. काही रॉकेट सायन्स नाही आहे; फक्त स्वतःला.सवय लावण्याची गरज आहे.
कुठलीही गोष्ट उचलताना
१) पाठ सरळ्/ताठ असावी.
२) कमरेतून पुढे न वाकता, गुढघ्यातून खाली वाकावे.
३) टाचा (हील्स) वर जोर देऊन वर उठावे. उठतानाही पाठ सरळ असावी.
४) वजन उचलून नेताना शरीराचा भार पुढे नसावा.
५) वजन शरीरालगत असावं.
६) वळताना पायातून वळावे, कमरेतून नव्हे. ट्विस्ट करू नये.
७) वजन खूप असल्यास मदत घ्यावी किंवा सोयीच्या उपकरणाचा आधार घ्यावा.
बाकी समजायला खालील चित्रे आंतरजालावरून देत आहे.
पाठीची काळजी घ्या.
पाठीची काळजी घ्या.वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात
काय नाय होत
झायरात!!
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार
या एकदा यायाम करायला
टक्या, जो खुद पुल अप्स के चार
तेच म्हणत होतो तुझा "दोस्ताना
आँ अच्च जालं तल!!
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार
ऑ.... अच्चं कलतोश का तू......
मी बी आधी असेच म्हणयचो स्पा,
हे वाचून वाईट वाटलं.
अर्र!!
सोन्याबापु
हो वेल्लाभट् वेळच चुकीची होती
बापरे.
ढेरी
फ़क्त ढेरी!!! हाता पायाच्या
बापरे!!!!!!!!
लई भाली ले... पण अच्च कच्चं?
अहो चेष्टेत लिवले हाय ते
तुमाला नाय वो.. महाराष्ट्र
सॉरी!! _/\_
उत्तम लेख
उपयुक्त!
साधारण ५० किलोपर्यंत वजन
लग्नाची तयारी का?
ळॉळ
त्या तयारीत रोजरोज वजन उचलणं
लग्नानंतर शॉपिंगच्या ब्यागा
हो पण तेही रोजरोज नसावं-
डिपेंड्स ऑन नशिब....!!!
वर स्पा' ने आपली झैरात
इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत
पोरगी गळ्यात हात टाकते हो..
गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट
द्याट इज वेरी
अणुभवाचे बोल
सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या
काय नाय होत मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स मजा येतेहे कोणी, कोणत्या पूर्वतयारीने, किती वजन उचलायचे आहे त्यावर अवलंबून आहे. तरीही सावधगिरीच्या सूचना... १. खूप ताकदवान माणसानेही चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्याची "मजा" कधी "सजा" बनेल हे सांगता येत नाही. तेव्हा ते न केलेले केव्हाही चांगले. २. चुकीच्या पद्धतीने आणि / अथवा प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलल्याने व्यावसायिक वेटलिफ्टर्समध्येही पाठीच्या तक्रारी निर्माण होणे विरळ नाही. ३. जिला आपण सर्वसामान्य भाषेत पाठ म्हणतो ती एक मोठ्या संख्येने असलेली हाडे, सांधे, स्नायू, संधिबंधने (लिगामेंट्स), इ ची गुंतागुंतीची संरचना आहे. या संरचनेमध्ये मज्जारज्जू सुरक्षित ठेवलेला असतो व त्यापासून निघालेले मज्जातंतू त्या संरचनेमध्ये असलेल्या अरुंद छेदांतून बाहेर पडतात. अर्थातच, या संरचनेला मध्यम ते मोठा धोका पोहोचला तर ती पूर्णपणे (स्ट्रक्चरली अँड फंक्शनली) मूळस्थितीत आणणे बहुतेक वेळा अशक्य असते. ४. पाठ शरीररचनेच्या केंद्रभागी असल्याने तिचा मानवाच्या बहुतेक सर्व महत्वाच्या हालचालीत सहभाग असतो. त्यामुळे, पाठीला झालेली अगदी छोटी पण कायमस्वरूपी इजा माणसाला लहानसहान कृतीतही त्याने उत्साहाच्या (काहीजण याला जास्त कडक आणि जास्त योग्य शब्द वापरतात) भरात केलेल्या चुकीची सतत जन्मभर आठवण देत राहते. वर उधृत केलेला प्रतिसाद वाचून गैरसमज झाल्याने कोणाचे नुकसान होऊ नये, केवळ याच कारणासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर स्वतःचे निर्णय घेण्यास मोकळा आहेच.एक्का साहेबांच्या उत्तम
पाठीच्या मणक्याशी खेळु नये हे
अतिशय उपयुक्त माहिती पुरवल्याबद्दल
चांगली माहिती दिली आहे. अजून
दुचाकी वरून फार लांबचे प्रवास
छान माहिती दिली आहे.
धन्यवाद. एकदा मुद्दाम उचलून