✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उचलता वजन हे - Lifting Technique

व
वेल्लाभट यांनी
Wed, 03/25/2015 - 13:02  ·  लेख
लेख
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात. पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते. त्याकडे नीट लक्ष दिलं नाही, कुठेतरी कसकसतं आणि मग त्या आयोडेक्स च्या जाहिरातीसारखा पाठीकडे हात जातो. तर, यासाठी लिफ्टिंग टेकनिक व्यवस्थित असलं पाहिजे. काही रॉकेट सायन्स नाही आहे; फक्त स्वतःला.सवय लावण्याची गरज आहे. कुठलीही गोष्ट उचलताना १) पाठ सरळ्/ताठ असावी. २) कमरेतून पुढे न वाकता, गुढघ्यातून खाली वाकावे. ३) टाचा (हील्स) वर जोर देऊन वर उठावे. उठतानाही पाठ सरळ असावी. ४) वजन उचलून नेताना शरीराचा भार पुढे नसावा. ५) वजन शरीरालगत असावं. ६) वळताना पायातून वळावे, कमरेतून नव्हे. ट्विस्ट करू नये. ७) वजन खूप असल्यास मदत घ्यावी किंवा सोयीच्या उपकरणाचा आधार घ्यावा. बाकी समजायला खालील चित्रे आंतरजालावरून देत आहे. a 2 पाठीची काळजी घ्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती

प्रतिक्रिया द्या
14712 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 03/25/2015 - 14:36 नवीन
स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात व्यायाम असो का काम शक्यतो डेडलिफ्ट्स टाळावेत डेडलिफ्ट्स मुळे लोवर बॅक चा चुराडा होऊ शकतो (एक्सीडेंट मुळे अनुभवाचे कुबड़ आलेला) बाप्या
  • Log in or register to post comments

काय नाय होत

स्पा
Wed, 03/25/2015 - 15:02 नवीन
काय नाय होत मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स मजा येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

झायरात!!

सूड
Wed, 03/25/2015 - 15:06 नवीन
झायरात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अर्रे तुझे वजन किती तु उचलणार

टवाळ कार्टा
Wed, 03/25/2015 - 15:14 नवीन
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार किती...बाकी झैरात आहेच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

या एकदा यायाम करायला

स्पा
Wed, 03/25/2015 - 15:20 नवीन
या एकदा यायाम करायला :) बाकी तुमचे स्वतचे वजनही तुम्हाला पेलवत नाही अशी अवस्था आहे तिकडे बघा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टक्या, जो खुद पुल अप्स के चार

सूड
Wed, 03/25/2015 - 15:40 नवीन
टक्या, जो खुद पुल अप्स के चार रीपीटेशन्स का एक सेट मारके ढेर हो जाते है वो बीस-बीस रिपीटेशन्स के तीन-तीन सेट मारनेवालो को डिवचा नही करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तेच म्हणत होतो तुझा "दोस्ताना

टवाळ कार्टा
Wed, 03/25/2015 - 16:23 नवीन
तेच म्हणत होतो तुझा "दोस्ताना" अजून कसा चाळवला नै गेला :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आँ अच्च जालं तल!!

सूड
Wed, 03/25/2015 - 16:47 नवीन
आँ अच्च जालं तल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अर्रे तुझे वजन किती तु उचलणार

टवाळ कार्टा
Wed, 03/25/2015 - 15:14 नवीन
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार किती...बाकी झैरात आहेच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ऑ.... अच्चं कलतोश का तू......

वेल्लाभट
Wed, 03/25/2015 - 15:14 नवीन
ऑ.... अच्चं कलतोश का तू........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मी बी आधी असेच म्हणयचो स्पा,

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 03/25/2015 - 16:43 नवीन
मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, अश्याच एका रगेल मस्ती च्या क्षणी बिना वेस्ट बेल्ट चा ६५ कीग्रॅ चा डेड लिफ्ट घेतला!! पाठीतुन अक्षरशः कड़कड़ण्याचा आवाज आला होता !! तीन मिनट्स उताणा पडलो होतो पुढची पंधरा मिनिटे सेंसेस परत यायला गेली!!! जिम सुटली !! पाषास्ट किलो ची ढेरी घेऊन फिरतोय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हे वाचून वाईट वाटलं.

वेल्लाभट
Wed, 03/25/2015 - 16:57 नवीन
हे वाचून वाईट वाटलं. पण काहीतरी नक्कीच चुकलं तिथे. बेल्ट लावला नाहीत हे सांगितलंतच तुम्ही. फॉर्मही अत्यंत महत्वाचा ठरतो. असो. धिस वॉज बॅड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अर्र!!

सूड
Wed, 03/25/2015 - 17:04 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापु

स्पा
Wed, 03/25/2015 - 17:09 नवीन
सोन्याबापु
लय बेक्कार झालं राव पण पुढे डॉक्टर काय म्हणाले , हळू हळू योग करून पोश्चर सुधारता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हो वेल्लाभट् वेळच चुकीची होती

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 03/25/2015 - 18:56 नवीन
हो वेल्लाभट् वेळच चुकीची होती साली बहुतेक स्पा , त्यानंतर ताबडतोब ट्रैक्शन लावले होते ३ दिवस नंतर फिजियोथेरेपी अन व्यायाम करुन आता पोस्चर करेक्शन बर्यापैकी झाले आहे पण त्या सहा महिन्यात जी वाकुन चालयची सवय जडली ती जडलीच!!! असो!! सद्ध्या फ़क्त फ्रीहैण्ड अन बॉडीवेट ची परमिशन आहे!!! देवादयेने नोकरी ला गरजेचे ट्रेनिंग अन परेड करू शकलो हेच भरपूर झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बापरे.

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 03/25/2015 - 17:18 नवीन
नशीब जास्त त्रास नाही झाला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ढेरी

कपिलमुनी
Wed, 03/25/2015 - 18:03 नवीन
पाषास्ट किलो ची ढेरी ? फक्त ढेरीचेच वजन पासष्ट किलो आहे का ? की एकूण ६५ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

फ़क्त ढेरी!!! हाता पायाच्या

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 03/25/2015 - 18:49 नवीन
फ़क्त ढेरी!!! हाता पायाच्या काड्या धरून मुंडके धरून ८२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बापरे!!!!!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 15:01 नवीन
बापरे!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लई भाली ले... पण अच्च कच्चं?

मोहनराव
Wed, 03/25/2015 - 19:20 नवीन
लई भाली ले... पण अच्च कच्चं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अहो चेष्टेत लिवले हाय ते

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 03/25/2015 - 19:32 नवीन
अहो चेष्टेत लिवले हाय ते मोहनराव!!!! अशी का ढेरी हात पाय (माणसाचे!!) वेगळे कापुन वजन करता येते काय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

तुमाला नाय वो.. महाराष्ट्र

मोहनराव
Wed, 03/25/2015 - 20:42 नवीन
तुमाला नाय वो.. महाराष्ट्र केसरी स्पावड्याला प्रतिसाद हाय त्यो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सॉरी!! _/\_

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 03/25/2015 - 20:55 नवीन
सॉरी!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

उत्तम लेख

टवाळ कार्टा
Wed, 03/25/2015 - 14:54 नवीन
उत्तम लेख
  • Log in or register to post comments

उपयुक्त!

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/25/2015 - 15:06 नवीन
उपयुक्त!
  • Log in or register to post comments

साधारण ५० किलोपर्यंत वजन

बॅटमॅन
Wed, 03/25/2015 - 15:17 नवीन
साधारण ५० किलोपर्यंत वजन तुलनेने "कमी" श्रमात उचलता येण्यासारख्या फिटनेसकरिता ट्रेनिंग रेजिमेन कुणी सांगू शकेल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लग्नाची तयारी का?

अनुप ढेरे
Wed, 03/25/2015 - 15:20 नवीन
लग्नाची तयारी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ळॉळ

वेल्लाभट
Wed, 03/25/2015 - 15:22 नवीन
ळॉळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

त्या तयारीत रोजरोज वजन उचलणं

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 15:01 नवीन
=)) त्या तयारीत रोजरोज वजन उचलणं अंतर्भूत नसतं बहुधा, नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

लग्नानंतर शॉपिंगच्या ब्यागा

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/26/2015 - 15:48 नवीन
लग्नानंतर शॉपिंगच्या ब्यागा उचलायला ताकद लागते मिष्टर, काय समजलांसं!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हो पण तेही रोजरोज नसावं-

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 16:00 नवीन
हो पण तेही रोजरोज नसावं- होपफुली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डिपेंड्स ऑन नशिब....!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/26/2015 - 16:02 नवीन
डिपेंड्स ऑन नशिब....!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वर स्पा' ने आपली झैरात

वेल्लाभट
Wed, 03/25/2015 - 15:21 नवीन
वर स्पा' ने आपली झैरात केलेलीच आहे. तो नक्की सांगेल. हे भस्साभस डेडलिफ्ट करा म्हणेल भौदा... हाय काय नाय काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत

कहर
Wed, 03/25/2015 - 16:02 नवीन
इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत नाही गं … ' च्या धर्तीवर 'अजूनही उचलत नाही गं … ' म्हणावेसे वाटतय *dance4* *DANCE* :dance: बादवे कुठेतरी जोक वाचला होता. १४ किलोचे सिलेंडर न उचलू शकणाऱ्याला ५०-५५ किलोची मुलगी आरामात उचलता येते ( इथे सिलेंडर 'गरज असताना' आणि मुलगी 'गरज नसतानाही' असा संदर्भ धरावा ) *help* *HELP*
  • Log in or register to post comments

पोरगी गळ्यात हात टाकते हो..

टवाळ कार्टा
Wed, 03/25/2015 - 16:14 नवीन
पोरगी गळ्यात हात टाकते हो...बाकी जरा भविष्यातला विचार केल्यास काय जास्त फायद्याचे हे तुम्हीच ठरवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट

कहर
Wed, 03/25/2015 - 16:46 नवीन
गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट वजन कमी होते का ? भौतिकी भाषेत याला उर्ध्वबल (upthrust) म्हणतात पण ते द्रव किंवा वायू पदार्थांमुळे होते असे शिकवले गेलेले (मास्तर मुलगी या पदार्थाबद्दल इसरला कि जाणून बुजून बोल्ला नाय काय ठाऊक )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

द्याट इज वेरी

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 03/25/2015 - 17:07 नवीन
… वेरी पेशल केस ऑफ रिलेटीवीटी! भौतिकशास्त्राचे नियम मोडतात तिथे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

अणुभवाचे बोल

कपिलमुनी
Wed, 03/25/2015 - 18:10 नवीन
अणुभवाचे बोल दिसात आहेत कार्ट्याचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/25/2015 - 17:53 नवीन
सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या जीवनात उपयोगी लेख. ====== काय नाय होत मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स मजा येते हे कोणी, कोणत्या पूर्वतयारीने, किती वजन उचलायचे आहे त्यावर अवलंबून आहे. तरीही सावधगिरीच्या सूचना... १. खूप ताकदवान माणसानेही चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्याची "मजा" कधी "सजा" बनेल हे सांगता येत नाही. तेव्हा ते न केलेले केव्हाही चांगले. २. चुकीच्या पद्धतीने आणि / अथवा प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलल्याने व्यावसायिक वेटलिफ्टर्समध्येही पाठीच्या तक्रारी निर्माण होणे विरळ नाही. ३. जिला आपण सर्वसामान्य भाषेत पाठ म्हणतो ती एक मोठ्या संख्येने असलेली हाडे, सांधे, स्नायू, संधिबंधने (लिगामेंट्स), इ ची गुंतागुंतीची संरचना आहे. या संरचनेमध्ये मज्जारज्जू सुरक्षित ठेवलेला असतो व त्यापासून निघालेले मज्जातंतू त्या संरचनेमध्ये असलेल्या अरुंद छेदांतून बाहेर पडतात. अर्थातच, या संरचनेला मध्यम ते मोठा धोका पोहोचला तर ती पूर्णपणे (स्ट्रक्चरली अँड फंक्शनली) मूळस्थितीत आणणे बहुतेक वेळा अशक्य असते. ४. पाठ शरीररचनेच्या केंद्रभागी असल्याने तिचा मानवाच्या बहुतेक सर्व महत्वाच्या हालचालीत सहभाग असतो. त्यामुळे, पाठीला झालेली अगदी छोटी पण कायमस्वरूपी इजा माणसाला लहानसहान कृतीतही त्याने उत्साहाच्या (काहीजण याला जास्त कडक आणि जास्त योग्य शब्द वापरतात) भरात केलेल्या चुकीची सतत जन्मभर आठवण देत राहते. वर उधृत केलेला प्रतिसाद वाचून गैरसमज झाल्याने कोणाचे नुकसान होऊ नये, केवळ याच कारणासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर स्वतःचे निर्णय घेण्यास मोकळा आहेच.
  • Log in or register to post comments

एक्का साहेबांच्या उत्तम

सुबोध खरे
गुरुवार, 03/26/2015 - 18:58 नवीन
एक्का साहेबांच्या उत्तम प्रतिसादाला एक पुरवणी माझे असे वैयक्तिक मत आहे कि व्यायाम या प्रकारासाठी जमिनीवरून वजन उचलुच नये. ५० % तरी तरुणांना ( < ३० वर्षे) या व्यायामानी पाठदुखी होते. आणि चाळीशीनंतर तर नाहीच नाही. त्याला पर्यायी असे सर्व व्यायाम प्रकार वापरावेत. बाकी सिलिंडर उचलायचे प्रसंग ३० च्या आत येऊ नयेत. (आणी मुलगी उचलायचे तिशी नंतर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पाठीच्या मणक्याशी खेळु नये हे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/25/2015 - 18:58 नवीन
पाठीच्या मणक्याशी खेळु नये हे स्वानुभवानी सांगतो. मणक्याला तीन फ्रॅक्चर्स झालेली टी-१२ ला. अजुन किमान ५ पहिने व्यायाम करता येणार नाही. पुर्वीएवढा व्यायाम आता परत कधी करता येईल का हीच शंका वाटते. :'(
  • Log in or register to post comments

अतिशय उपयुक्त माहिती पुरवल्याबद्दल

आयुर्हित
Wed, 03/25/2015 - 20:59 नवीन
वेल्लाभट व इए सर, दोघांचेही मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चांगली माहिती दिली आहे. अजून

पॉइंट ब्लँक
Wed, 03/25/2015 - 23:02 नवीन
चांगली माहिती दिली आहे. अजून एक. दुचाकी वरून फार लांबचे प्रवास वारंवार करू नका.
  • Log in or register to post comments

दुचाकी वरून फार लांबचे प्रवास

आयुर्हित
गुरुवार, 03/26/2015 - 07:01 नवीन
दुचाकी वरून फार लांबचे प्रवास करतांना सुरक्षितता महत्त्वाची आहेच, त्याशिवाय बसण्याची पध्दत/आसन (posture) बरोबर हवे. अन्यथा थोड्याशा प्रवासानेही त्रास होवू शकतो. किंवा काहीच प्रवास न करणाऱ्या व कार्यालयात/घरात काम करणाऱ्या व्यक्तीलाही पाठीचा त्रास होवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

छान माहिती दिली आहे.

अभिजीत अवलिया
गुरुवार, 03/26/2015 - 03:36 नवीन
छान माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. एकदा मुद्दाम उचलून

वेल्लाभट
गुरुवार, 03/26/2015 - 19:19 नवीन
धन्यवाद. एकदा मुद्दाम उचलून बघा एखादी गोष्ट अशी; फरक लगेच कळतो.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा