✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"चैत्र"

म
मुक्तसुनीत यांनी
गुरुवार, 11/20/2008 - 01:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32416 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 09:09 नवीन

आपण काय

आपण काय लिहिलं होतंत हेदेखील मी पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी ते उडवण्याचा प्रश्नच येत नाही.. इतर कुणा संपादकाने उडवलं असेल तर ते मला माहीत नाही.. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी की बिरुटेसाहेब स्वत:ही एक मिपाचे जबाबदार संपादक आहेत तेव्हा अन्य कुणा संपादकाने त्यांचं लेखन काढून टाकल्यास निदान त्यामागचं कारण तरी त्यांना कळवायला हवं होतं असं वाटतं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चित्रा गुरुवार, 11/20/2008 - 07:57 नवीन

छान

बघायला हवा चैत्र.
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 11/20/2008 - 11:24 नवीन

सुरेख ओळख...

इथे कुठे मिळेल? की क्रांतीलाच विचारावे वशिला लावून? ;) - मनिष
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/20/2008 - 12:15 नवीन

श्रीमंती-ग

श्रीमंती-गरीबी, मान-अपमान, वगैरे वगैरे सानेगुरुजी टाईप कथा.. गेल्या चैत्रात मधुच्या आईला आपल्या घरात हळदीकुंकू मिळालं नाही म्हणून कदाचित आपला पती वारला असं त्या नाईकबाईला वाटू नये म्हणून मधुच्या आईचे न्हाणीघरात लपणे व मधुच्या हस्ते घरी आलेल्या बाईस कुंकवाचा करंडा देणे वगैरे वगैरे.. सगळं ठीकच वाटलं बुवा! हळदीकुंकवासारख्या फुटकळ प्रसंगाची मोठ्या प्रमाणात शोबाजी करण्याकरता दागिन्यांसारखा स्त्रीधन असलेला, अत्यंत महत्वाचा ऍसेट विकायच्या ७० वर्षांपूर्वीच्या आंधश्राद्धिक मानसिकतेचे चित्रंण करणार्‍या चित्रपटाचे आजच्या काळातले प्रयोजन समजले नाही.. यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " ह्यात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे नक्की काय, हे कळले नाही.. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " ?? स्वत:च्या खिशात/नवर्‍याकडे दमड्या नसताना घरातले दागिने विकून हळदीकुंकू समारंभ पार पाडणे या कृतीतून आईला स्वत:च्या मुलाला नक्की काय दाखवून द्यायचे आहे ते कळले नाही... असो, मुक्तरावांचे परिक्षण वाचून हा चित्रपट का आणि कश्याकरता पाहायचा हा प्रश्न मला पडला आहे, तरीही एकदा पाहीन म्हणतो.. सोनाली कुलकर्णी ही नटी गुणी आहे याबद्दल वाद नाही परंतु त्या आईच्या भूमिकेकरता तिची निवड कितपत योग्य आहे हे चित्रपट पाहूनच कळेल... असो, हा चित्रपट नक्की बघेन परंतु मुक्तरावांनी लिहिलेलं सदर चित्रपटाचं एकंदरीत कथानक/परिक्षण वाचता, या चित्रपटापेक्षा ५०-७० वर्षांपूर्वीच्याच काळातलं चित्रण करणारे स्मृतीचित्र, वास्तुपुरुष, किंवा ध्यासपर्व हे चित्रपट कितीतरी अधिक सरस आणि वास्तववादी आहेत असे वाटते.. आपला, (चित्रपटप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/20/2008 - 12:21 नवीन

कथेचा सारांश

तात्या, कथेचा सारांश खालीलप्रमाणे लिहिला तर तुम्हाला कदाचित अधिक आवडेल. (काहीही झालं तरी आपल्या माणसांनी लिहिलेलं अधिक आवडतं, नाही का ?) 'चैत्र' ही मला आवडलेली अशीच एक कथा. कथानायक परत एक छोटासा मुलगा. लहानशा खेड्यात रहाणारे त्याचे कुटुंब. घरी आई आणि बाबा. आर्थिक परिस्थिती बेताचीच. या खेड्यातल्या ज्येष्ठ इनामदारीणबाई त्यांच्या वाड्यावर चैत्राचं हळदीकुंकू ठेवतात. सगळ्या गावातल्या सवाष्णींना आमंत्रण जाते. इनामदार बाईंची नवी सून तिच्या दृष्टीने हलक्यासलक्या या अशा बायकांना बोलवायला नाखूशच असते. हा छोटा मुलगा आणि त्याची आई पन्हं-कोशिंबीर घ्यायला उभे असताना चारचौघात ती सून त्यांना म्हणते "हे काय, मगाशी येऊन गेलात ना तुम्ही? पन्ह्यासाठी किती हावरटपणा करायचा बाई माणसानं?" या मुलाची आई शांतपणे देवापुढचं हळदीकुंकू उचलते आणि मुलाच्या हाताला धरून घरी येते. ती फारसे बोलत काहीच नाही, पण तिचे मन अगदी विस्कटून गेलेले असते. दुसरे वर्ष येते. आई आपले सगळे दागिने, घरातले किडूकमिडूक काढून बाबांसमोर ठेवते. म्हणते "हे सगळं विकावं लागलं तरी चालेल, पण मला सगळ्या गावाला हळदीकुंकवाला बोलवायचं आहे". त्याप्रमाणे तसे ती करतेही. इनामदार बाई आणि त्यांची सून दोघीही आलेल्या असतात. इनामदार बाई त्यांचा कापरा हात आईच्या पाठीवर ठेवतात "हे बघ, माझे आता फार दिवस राहिले नाहीत. माझ्यासाठी म्हणून काही काही मनात ठेवू नकोस". आई त्यांना समाधानाने वाकून नमस्कार करते. त्याही पुढचा चैत्र येतो. इनामदार बाई स्वतः हळदीकुंकवाचं बोलावणं करायला येतात. त्यांची चाहूल लागताच आई न्हाणीघरात आंघोळीला जाते. "नक्की यायचं बरं का..." असं सांगून इनामदार बाई देवासमोर हळदीकुंकू ठेवून निघून जातात. आई बाहेर येते. "बिचाऱ्या इतक्या प्रेमानं इथपर्यंत आल्या, म्हटलं मुद्दाम कशाला त्यांच्यासमोर यावं?" ती मुलाला जवळ घेऊन म्हणते." आणि आज ना उद्या त्यांना कळणारच.." आणि मग अर्धवट अजाण, अर्धवट जाणता असा तो मुलगा कावराबावरा होऊन विचारतो "म्हणजे गेल्या वर्षी बाबा वारले, हे त्यांना सांगायचं नव्हतं होय?" -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/20/2008 - 12:38 नवीन

हम्म! ही

हम्म! ही ष्टोरी थोऽऽऽडी बरी वाटली.. अर्थात, दोन्ही ष्टोर्‍यात अजून एक महत्वाचा फॉल्ट शिल्लक राहतोच... मुक्तराव म्हणतो त्याप्रमाणे कथा ५०-७० वर्षांपूर्वीची आहे.. शिवाय एका गावातली आहे... आमची आई सांगते त्याप्रमाणे ५०-७० वर्षांपूर्वी ठाण्यासारख्या गावातलीदेखील बरीचशी माणसं एकमेकांना ओळखत असत त्यामुळे या बाईचा नवरा खपला आहे, (हळदीकु़कवकरता दागिने विकण्याची बायकोची दिवाळखोरी पाहून बिचारा खपेल नायतर काय! ;) ) हे त्या बड्या घरच्या बाईला कळलंच नाही, हे थोडं भाबडं वाटतं! बरं धरून चालू की कळलं नसेल, तरीही जेव्हा प्रत्यक्षात ती बड्या घरची बाई हळदीकुंकवाचं बोलावणं करायला ऍक्च्युअल येते तेव्हातरी तिला नक्की कुणीतरी आधी गाठून यांच्या घरच्या मयताची बातमी द्यायला हवी होती तीही कुणी दिलेली दिसत नाही! ५०-७० वर्षांपूर्वी एखाद्या गावात त्या बड्या बाईला, अगदी मयताच्या घरात पाऊल टाकेस्तोवर हे कळूच नये हे थोडं आश्चर्यकारक वाटत! असो, आपला, (तपशीलात शिरणारा चोखंदळ चित्रसमिक्षक!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/20/2008 - 12:40 नवीन

गूळ आवडतो का ?

तात्या, जरा खाजगी प्रश्न विचारतो. तुला गूळ आवडतो का ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/20/2008 - 12:52 नवीन

गूळ आवडत

गूळ आवडत नाही, तरीही स्मृतिचित्र, ध्यासपर्व यांसारख्या उत्तम चित्रपटांची चव मला नक्की माहीत आहे! :) असो, मुक्तरावाच्या परिक्षणावर आणि आपल्या सुधारीत कथेवर मी माझं मत मांडलं आहे, त्याबाबत प्रश्नार्थक अथवा कोडं घातल्यासारखे प्रतिसाद न देता सरळ साध्या शब्दात काही टिप्पणी कराल तर माझ्याकडून हा संवाद सुरू ठेवणं मला शक्य होईल.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 19:44 नवीन

सर्किट इथे लक्ष द्या

समोरच्याने आपला मुद्दा व्यवस्थित मांडला असता, त्याला गूळ आवडतो का हे विचारणं म्हणजे युक्तिवादात हरत आलेल्या वकिलाने भरकोर्टात समोरच्या वकिलाच्या अंगावर धाउन जाण्यासारखे आहे. असे बिलो द बेल्ट वार करण्यापेक्षा लिहूच नका. ही कथा मी खूप वर्षांपूर्वी वाचली होती तेव्हा मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. की ७० वर्षांपूर्वीच्या एका गावात, एक माणूस मयत झालेला दुसरयांना समजत कसा नाही. तात्यांचे बाकीचे म्हणणेसुद्धा पटण्यासारखे आहे, की ह्या चित्रपटातून आताच्या काळात काय सांगायचं आहे? त्या कथेचा ह्या कालात काय रिलेव्हन्स आहे? नानाची कविता म्हणजे लिहिण्यासाठी लिहिलेली आणि काव्याच्या दॄष्टीने कचरा, तात्यांनी वस्तुनिष्ठ आणि योग्य शंका काढली की ते गूळाची चव न समजणारे प्राणी. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही, आवडली नाही की आपण जसे प्रतिसाद देतो तसे आपल्यालाही मिळतीलच. ते सुद्धा सहन करावे लागतील हे म्हणजे मॄदंग मुखलेपोभ्य करोति मधुरं ध्वनी अशे दुतोंडी मानसिकता झाली. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मुक्तसुनीत गुरुवार, 11/20/2008 - 19:50 नवीन

+१

कपिल यांच्याशी याबाबतीत मी सहमत आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र अशा भावना असतील (मग त्या आपुलकीच्या असोत की विरोधाच्या) त्याच्या विरुद्ध प्रकाराचे मत कुणी मांडले - आणि विशेषतः योग्य रीतीने , व्यक्तिगत पातळीवर न घसरता मांडले - तर त्यावर पेजोरेटीव्ह टर्म्स मधे (मराठी शब्द ?) प्रतिवाद करणे अयोग्य आहे. सर्कीट यांच्यासारख्या माहीतगार , उत्तम विनोद करणार्‍या नि समजणार्‍या ज्येष्ठ सभासदाने , याबाबत नक्की विचार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कोलबेर Sat, 11/22/2008 - 03:05 नवीन

इथे

इथे मुक्तसुनित ह्यांना एक +२ म्हणून प्रतिसाद दिला होता. त्यात उडवण्या सारखे होते? कृपया कळावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 01:08 नवीन

अरे कपिल,

अरे कपिल, जाऊ दे रे बाबा, तू का वाद घालतो आहेस माझ्याकरता? माझ्या प्रतिसादानंतर सर्किटने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याचे खालील पैकी एखादे कारण असू शकते.. १) माझा मुद्दा त्याला पटला असावा आणि तो गप बसला असावा.. २) माझा मुद्दा त्याला पटला नसावा परंतु त्याला हा विषय पुढे वाढवायचा नसावा किंवा पुढे काही लिहिण्यास वेळ मिळाला नसावा.. ३) इत्यादी इत्यादी...! असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
व
विजुभाऊ गुरुवार, 11/20/2008 - 12:52 नवीन

धन्यवाद

एका उत्तम रसग्रहणा बद्दल मुक्तसुनित्भौना धन्यवाद झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 11/20/2008 - 14:29 नवीन

सिनेमा

सिनेमा पाहिलेला नाही. पाहायलाच हवा. मुक्तसुनीत यांचे परीक्षणाबद्दल आभार. सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/20/2008 - 17:33 नवीन

सोनाली

सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे. माझ्या मते आपला मतलब फक्त तिच्या अभिनयाशी असावा, आपली जी काही टिकाटिप्पणी असेल ती तिच्या अभिनयाबदल असावी, कारण आपली-तिची ओळख फक्त एक अभिनेत्री म्हणूनच तिच्याशी आहे..! अभिनयाव्यतिरिक्त तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही टिप्पणी करणे हे रेषेवरच्या अक्षरांना धरून होणार नाही..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 11/20/2008 - 21:04 नवीन

अभिनय

अभिनय सोडून सार्वजनिक ठिकाणी तिचे लाडे लाडे बोलणे, ठिकठिकाणी 'आपण म्हणजे निरागसपणाचा मानदंडच' या प्रकारे वावरणे, नृत्याच्या कार्यक्रमात आपल्या भावनांचे जाहीर प्रदर्शन करणे - हे पाहून माझ्या मस्तकात तिडीक जाते. हे अभिनयात अंतर्भूत नसले, तरी सार्वजनिक ठिकाणी होते, तेव्हा त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. खेरीज वरच्या प्रतिक्रियेत हा भाग अवांतर असल्यामुळे मी तो निराळ्या फिक्या रंगातही लिहिला आहे. त्याबद्दल तात्या, तुम्हांला नक्की काय आक्षेप आहे? शिवाय 'रेषेवरच्या अक्षरांना' धरून होणार नाही, म्हणजे नक्की कशाला धरून होणार नाही, तेही कळले नाही. 'रेषेवरची अक्षरे' म्हणजे काही संस्थळांवर कशा प्रतिक्रिया लिहाव्यात हे सांगणारी मार्गदर्शक पुस्तिका नाही. समजा, ती तशी आहे असे क्षणभर गृहित धरले तरी, ती मला बंधनकारक कशी काय ठरू शकते? संपादक म्हणून एखाद्या माणसाचे अधिकार आणि इतर ठिकाणी त्याने व्यक्त केलेली मते, यांच्यात भूमिकेचा काही फरक असतो की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आनंदयात्री Fri, 11/21/2008 - 09:11 नवीन

सहमत आहे

सहमत आहे. असेच म्हणतो. बाकी जीएंच्या कथांबद्दल छान गप्पाटप्पा झाल्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
र
राघव गुरुवार, 11/20/2008 - 15:26 नवीन

छान

छान लिहिलेत दादा :) जीए आणि वपु मला स्वत:ला खरे तर वाचवत नाहीत. म्हणजे ते लिहितात इतके जबरा की आपण तटस्थपणे वाचूच शकत नाही. डोके पार भणाणून जाते. त्यांच्या २-३ कथा सलग वाचल्या आहेत असे कधी मला जमलेच नाही. पण जीएंची एक कथा मला फार आवडते. अश्वत्थाम्याची. अगदी क्लास लिहिलेली आहे. नाव माहीत नाही कथेचे. पण सांजशकुन या त्यांच्या संग्रहात ही कथा होती. वपुंचीही एक ठाव घेणारी कथा आहे, नाव आठवत नाही तिचेही :( पण जबरा अन् सुंदर! थेटरातले नाटकासाठीचे पडदे रंगवण्याचे काम करणार्‍या आजोबांचीही कथा आहे. असो. धन्यवाद, मुमुक्षु
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 11/20/2008 - 16:13 नवीन

जीए आणि

जीए आणि वपु यांची नावे सोबत पाहून मला अंमळ मजा वाटली. हे माझे वैयक्तिक मत. जीए प्रेमीला सुखावण्यासाठी अथवा वपु प्रेमीला दुखावण्यासाठी नव्हे. -- लिखाळ. दारातल्या तोरणारा आंब्याची पाने आणि बेगड लावलेला चकचकित नारळ असतो. कुणाला काय आकर्षक दिसते हे व्यक्तिसापेक्ष आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
अ
अभिज्ञ गुरुवार, 11/20/2008 - 16:19 नवीन

हेच

हेच म्हणतो. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
र
राघव गुरुवार, 11/20/2008 - 16:19 नवीन

हाहाहा.. मी

हाहाहा.. मी अगदी सहज लिहून गेलो हो... :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नीधप Fri, 11/21/2008 - 11:09 नवीन

अरे बापरे!!

जीएंचा एवढा मोठा अपमान कोणी केला नसेल.. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/20/2008 - 19:06 नवीन

अप्रतिम !

अप्रतिम ! अतिशय सुंदर अशा कथेवरील तेव्ह्डाच सुंदर चित्रपट ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/21/2008 - 01:19 नवीन

चैत्र

चैत्र कथेवर बनवलेल्या चित्रपटाची करुन दिलेली ओळख आणि कथानक अतिशय आवडले, धन्यवाद. "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " +१
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Fri, 11/21/2008 - 07:07 नवीन

"चैत्र"

मुक्तसुनीत, नेहमीप्रमाणेच आपले लेखन (व याबाबतीत परीक्षण / रसग्रहण) नेमके व रसपूर्ण झाले आहे. आपले परीक्षण वाचून 'चैत्र' नक्कीच पहावा अशी खूणगाठ बांधून ठेवली आहे - बघू केव्हा आणि कसे जमते ते. सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे. सोनाली कुलकर्णीच्या वैयक्तिक / व्यक्तिगत आयुष्याशी मला काहीही देणे-घेणे नाही. ती जेव्हा चित्रपटांत काम करु लागली, तेव्हा प्रथम मी सुद्धा तिच्याबद्दल थोडासा साशंकच होतो, पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. माझ्या मते ती एक अत्यंत सशक्त व संवेदनशील अभिनेत्री आहे ... तिची अभिनयाची समज फार वरच्या पातळीची आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 11/21/2008 - 11:13 नवीन

>>पण नंतर

>>पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. << काहीतरी गफलत होतेय का? घाशीराम मधे सोनाली? आणि घाशीरामची दुसरी बायको? तपशीलात जबरदस्त गोंधळ होतोय. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी
म
मुक्तसुनीत Fri, 11/21/2008 - 11:16 नवीन

कदाचित

त्यांना सखाराम म्हणायचे असावे . (मी सोनालीबाईंचे कुठलेच नाटक पाहिले नाही. हा माझा केवळ अंदाज आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
द
दिपोटी Fri, 11/21/2008 - 14:04 नवीन

माफी असावी !

अज्जुका, तपशीलात चांगलाच घोळ झालेला आहे. अर्थातच मला 'सखाराम बाइंडर' म्हणायचे होते. दिलगीर आहोत ! DVD आवृत्तीसाठी 'सखाराम'चा जो प्रयोग झाला होता (ज्यात सयाजी शिंदे यांनी सखारामची भूमिका साकार केली होती) त्यात लक्ष्मीच्या भूमिकेतील सोनालीचा सहजसुंदर अभिनय लक्षात ठेवण्याजोगा होता. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
न
नीधप Fri, 11/21/2008 - 14:45 नवीन

दिलगीर कशाला?

होतात असे गोंधळ.. मला आपलं वाटलं मलाच माहित नाही की काय... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी
न
नीधप Fri, 11/21/2008 - 11:22 नवीन

अचानक?

अचानक इतक्या जुन्या चित्रपटाबद्दल एवढी मोठी चर्चा आणि चिखलफेकीचा खेळ बघून आश्चर्य वाटले. 'चैत्र' क्रांतीची डिप्लोमा फिल्म होती. फिल्म इन्स्टिट्युट मधील शिक्षण संपवून बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांना एक अर्ध्या तासाची शॉर्ट करायची असते. त्याला डिप्लोमा फिल्म म्हणतात. ही फिल्म माझ्या माहितीप्रमाणे क्रांतिनी २००० मधे केली होती आणि त्यानंतर ती बर्‍याच फेस्टिव्हल्समधे गेली होती. बर्‍याच ठिकाणी नावाजलीही गेली होती. असो. आता मला ती पाहून खूप वर्ष झाली. पण फिल्म म्हणून खूपच चांगली होती. पण इथली तपशीलाबद्दलची चर्चा मात्र जाम विनोदी आहे. कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत असं म्हणणं जामच गमतीशीर. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 18:49 नवीन

कथा न

कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत कथा न वाचता वा फिल्म न बघता 'वाईट' हा शब्द निदान मी तरी वापरलेला नाही! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप Fri, 11/21/2008 - 21:05 नवीन

माझ्या

माझ्या पोस्टमधे तुमचं नाव मला तरी कुठे दिसत नाही. किंवा कुणाचंच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चित्रा Fri, 11/21/2008 - 20:19 नवीन

स्पष्टीकरणे

सहज यांचा एक प्रतिसाद आणि त्याला धरून आलेले काही प्रतिसाद हे मी नुकतेच काढले आहेत. याआधीचे जे प्रतिसाद उडले आहेत असे काही प्रतिसादांवरून कळते आहे ते मी काढलेले नाहीत एवढे मात्र स्पष्ट करते. सर्व सदस्यांना सल्ला : व्यक्तींची नावे न घेता लेखणीने केलेले वारही टोचतच असतात. काही प्रतिसाद व्यक्तीगत रोख स्पष्ट होत नसल्याने काढलेले नाहीत. पण व्यक्तीगत रोख म्हणजे काय मानावे यासंबंधीच्या सीमारेषा धुसर आहेत याची सर्व सदस्यांनी जाणीव ठेवावी आणि वातावरण गढूळ करू नये ही विनंती. धन्यवाद, चित्रा
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 11/21/2008 - 20:33 नवीन

धन्यवाद !

दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद ! माझा थोडा गोंधळ उडालेला होता ; अचानक प्रतिसादांची संख्या कमीकमी कशी होत जाते आहे हे पाहून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ल
लिखाळ Fri, 11/21/2008 - 20:38 नवीन

खरंच आहे..

खरंच आहे.. दिलेल्या प्रतिसादांची संख्या कमी होताना पाहून मला वाटले की नुकतीच आलेली बोधकथा वाचून, न स्विकारलेले प्रतिसाद लोक परत घेत आहेत की काय ! :) -- (बुद्धाचा शिष्य) लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अथांग सागर गुरुवार, 02/26/2009 - 08:17 नवीन

'चैत्र' येथे पहावयास मिळेल

'चैत्र' येथे पहावयास मिळेल... --अथांग सागर
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 02/26/2009 - 22:50 नवीन

बघायला हवा

मला सोनाली कुलकर्णी अभिनेत्री म्हणून खूप आवडते. ही चित्रपट बघायलाच हवा ... माहितीबद्दल धन्स.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Fri, 04/28/2017 - 01:13 नवीन

कालच हा लघुपट अचानक तुनळी वर

कालच हा लघुपट अचानक तुनळी वर दिसला आणि पहिला गेला. थोडी उत्सुकता लागून होती कि या वर काही लिहिले आहे का किंवा याची मुळ गोष्ट कुठे वायाचायला मिळाली तर बघू या. अस शोधात असताना हा लेख मिळाला. हा लघुपट इथे देत आहे: या चित्रपटात काही प्रश्न अनुत्तरीत राहतात किंवा मुद्दामून सोडले आहेत असे. असा उगीच फक्त सोनाली (म्हणजे तिने साकारलेल पात्र) चाच अपमान करण्याचा काय हेतू. म्हणजे तिचा आणि या नवीन नाईक वाड्यातल्या सूनेच काहीतरी पूर्वीच भांडण आहे कि काय अशी शंका आली पण त्या बद्दल पुढे चित्रपट काहीच सांगत नाही. आणि शेवटी अचानक नवरा गेलेला आहे एव्हढंच दाखवलं आहे. कुठतरी तो जातो त्याचा काही या वरच्या घटनेशी संबंध दाखवायचा होता कि काय असं वाटून जात. किंवा ही काहीशी बोधकथा म्हणून फक्त बघायची आहे का? म्हणजे तुमच कोणी कितीही वाकड केल तरी त्याच्यावर शक्यतो काही संकट येईल असं आपण वागू नये असा काहीसा संदेश देणारी.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 04/29/2017 - 14:11 नवीन

श्री . आत्माराम भेंडे यांनी

श्री . आत्माराम भेंडे यांनी जी . ए. यांच्या कथांवर आधारीत एक सुंदर मालिका बनवली होती . "चैत्र" या कथेच्या भागामधे मानसी मागीकर यांनी मधुच्या आईची भुमिका केली होती .
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 04/30/2017 - 08:33 नवीन

चैत्र चित्रफित उपलब्ध आहे.

चैत्र चित्रफित उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 07/05/2023 - 20:46 नवीन

दुवा उघडत नसल्याने हा धागा वर आणत आहे

कर्नल तपस्वी यांच्या जीए जन्मशताब्दीच्या धाग्यात दिलेला मुक्तसुनीत यांच्या 'चैत्र' धाग्याचा दुवा उघडत नसल्याने सदर धागा हुडकून वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 07/05/2023 - 20:52 नवीन

'चैत्र' लघुपटाचा दुवा

'चैत्र' लघुपटाचा दुवा https://www.youtube.com/watch?v=6HARYeqw5I8
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा