कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे.
जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल.
पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.
जीएंच्या , प्रसंगी लघुकादंबर्यांइतक्या मोठ्या आकाराच्या आणि खोलीच्या कथांच्या मानाने ही कथा खूपच छोटी आहे. आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा. आयुष्यभर आपल्या लिखाणातून जी एंनी आपल्या आयुष्याबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल , माणूस म्हणून जगताना भोगाव्या लागलेल्या दु:ख-वेदनांबद्दल लिहीले. लेखक म्हणून सुरवातीच्या काही वर्षांनंतर त्यांच्या कथांचे स्वरूप गुंतागुंतीचे होत गेले, त्यातील दु:खाच्या छटा जास्त जास्त गडद होत गेल्या. आणि , नियती म्हणा , भागधेय म्हणा, त्याच्या वरवंट्याखाली पिचतानाही आपला अभिमान , आपले सत्त्व न हरवणारी माणसे त्यांनी रंगवली. प्रस्तुत कथेतील कथानक हे , त्यांच्या पुढील प्रवासाच्या पाऊलखुणा दाखविणारेच आहे.
कथेचा निवेदक आहे एक साताठ वर्षांचा , गावातल्या एका गरीब (बहुदा ब्राह्मणी) कुटुंबात वाढणारा एका मुलगा. काळ : बहुदा आजपासून सत्तरेक वर्षांपूर्वीचा. कुटुंबात माणसे तीनच. आई-वडील आणि हा छोटा मधू. कथा सुरु होते तेव्हा चैत्र महिना चालू आहे आणि घराघरांमधून हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत. रोज कुठे ना कुठे कार्यक्रम असतो. या छोट्याशा गावातलीच एक बाई घराघरांमधे जाऊन "आजचे हळदीकुंकू कुलकर्ण्यांकडे , आजचे हळदीकुंकू नाईकांच्या वाड्यावर" अशी दवंडी पिटत जाते. रोज संध्याकाळी सवाष्णी एकमेकांच्या घरी आपापल्या पोरांना घेऊन जातात.
छोटा मधूही नाईकांच्या वाड्यावर आईबरोबर जातो. हा भला थोरला वाडा. मोठी मोठी जाजमे, हंड्या-झुंबरे , अत्तरांचा आणि वेण्यांचा घमघमाट. इतर बायकांबरोबर मधुची आई ओटी भरवून घ्यायला बसते. थोरामोठ्यांकडचा मोठा समारंभ. गर्दी. या गर्दीत इतर पोरांबरोबर खेळतानाही मधूचे लक्ष आईकडे आहे. नाईकबाई एका नोकराणीबरोबर फिरत सगळ्यांची ओटी भरतात. मधूच्या आईची ओटी भरायची वेळ आल्यावर त्यांना वगळून पुढे जातात. मधूची आई वाटा पाहाते आणि शेवटी मालकीण बाईंकडे जाते नि त्याना आठवण करून देते. मालकीण बाईंचा समज झालेला असतो की यांची ओटी भरलेली असतानाही , थोडे आणखी धान्य मिळण्याकरता ही बाई परत पदर पसरून बसली. ती मधूच्या आईचा अपमान करते. एक अवाक्षर न बोलता आई इतकेच म्हणते , की ओटी म्हणजे सवाष्णीचा मान आहे. तो राखण्याकरता तरी ओटी भरा - वाटले तर एक दाणा टाका. न राहवून नाईकबाईची सासूही तसे करायला आपल्या सुनेला विनविते. पण शेवटी मधू आणि आई रिक्तहस्ते घरी परततात.
घरी आल्यावर रात्री एकही शब्द न बोलता आई मधू आणि त्याच्या वडिलांना जेवायला घालते. दुसर्या दिवशी ती आपले काही दागिने काढून मधुच्या वडिलांना देते आणि त्याचे पैसे करून एका मोठ्या हळदी कुंकवाची तयारी करायला सांगते. वडील काहीही न विचारता हो म्हणतात. आई त्यांना विचारतेही : "तुम्हाला का असा प्रश्न नाही पडला ?" वडील शांतपणे म्हणतात : "स्वतःकरता कधीही काहीही न मागणारी तू काहीतरी करायला सांगते आहेस. त्यामागे नक्की काहीतरी आहे. मी कशाला विचारू ? उद्या तू म्हणालीस की निखार्यावरून चालत जा तर तेही करेन." हे सारे मधू पहातो , नोंदवतो.
दुसर्या दिवशी मधूकडे आजवर झाले नसेल इतके मोठे हळदीकुंकू. गावभर दवंडी गेलेली असते - नाईकांकडेही. समारंभ खूप वेळ चालतो. एरवी घराचे मालक असणारे मधूचे बाबा त्या संध्याकाळपुरते घराबाहेर. मधूची आई सगळ्यांची रितीने ओटी भरते , विचारपूस करते. सगळ्या बायकांच्या नजरेत तिच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. आईची एक नजर अर्थातच दाराकडे. सगळ्या येऊन गेल्या ; पण नाईक बाई नाहीत. शेवटी खूप उशीरा सासू नि सून आपल्या बग्गीतून हजर होतात. मधूच्या छोट्याशा घरातल्या सजावटीने , आदबशीर , घरंदाज आतिथ्याने भारल्यासारख्या होऊन जातात. भरपूर मोठी ओटी भरून घेताना नाईक सूनबाई इतकेच म्हणते "तुमच्याकडे होते होय हळदीकुंकू ? मला कल्पना नव्हती." दोघी निघतातच.
बग्गीत सून बसलेली असताना सासू क्षणभर आईपाशी येते नि म्हणते : बाई, मनात तळपट धरू नकोस. आता माझं राज्य नाही घरात. नवीन माणसं आली. मी झाल्या प्रकाराने लाजलेले आहे. जमेल तेव्हा याची भरपाई करेन.
यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " दूर अंधारात मधू हे सर्व पहातो. बग्गी हलते.
वर्ष उलटते. पुन्हा चैत्र येतो. मधूच्या घरासमोर एके दुपारी बग्गीचा आवाज आल्यावर आई पटकन आत जायला वळते. मधूला सांगते : "नाईकबाई येतील. त्यांना सांग मी न्हाणीघरात आहे. जे सांगतील ते फक्त ऐक. जाताना फक्त करंडा दे कुंकवाचा त्यांना. " मिनिटाभरात सासूबाई दारात येतातच. मधू त्यांना ठरल्याप्रमाणे सांगतो. त्या आलेल्या असतात हळदीकुंकवाचे निमंत्रण द्यायला - जातीने , सर्वात पहिल्या घराचा मान द्यायला. निरोप देतात , कुंकू लावून निघून जातात.
मधू आत येतो. आई त्याला म्हणते : "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " मधूला काही उमगत नाही. माजघराच्या अंधारात उभ्या आईला म्हणतो : "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" आणि इतका वेळ आपल्या गंभीर , ताठ चेहर्याने वावरणार्या आईला हुंदका येतो.
कथानक भाग संपूर्ण
हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे क्रांती कानडे यांनी. आईची भूमिका केली आहे सोनाली कुलकर्णी यांनी. नाईक सासूचे काम लालन सारंग यांचे.
संपूर्ण चित्रपटाची हाताळणी मूळ कथेशी इमान राखणारी , त्या कथेच्या घरंदाजपणाशी इमान राखणारी झाली आहे. कुठेच भडक, बटबटीतपणा नाही. झालेला अपमान , त्याची केलेली भरपाई , साताठ वर्षाच्या मुलावर नकळत घडलेले संस्कार या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने टिपल्यात. आई वडीलांमधील शालीन , घरंदाज स्नेहाचे चित्रण , कोसळलेल्या संकटाला धीराने सामना देताना इतरांवर आणि स्वतःवर "चिखल उडू न देण्याची " घेतलेली काळजी आणि हे यच्च्यावत टिपणारे एक बालमन. सत्तर वर्षांपूर्वीच्या ब्राम्हणी घरातले वातावरण , पेहराव , हंड्या-झुंबरे. एकही सैल , अनावश्यक संवाद नाही. मी कानडे यांना सलाम करतो. पालेकरांनी त्यांच्याकडून खूप शिकावे अशातली गत. सोनाली कुलकर्णी यांच्याबद्दल मला थोडी शंका होती. बट शी हॅज नेल्ड द रोल.
हा , केवळ ३० मिनिटांचा चित्रपट दृष्ट लागण्यासारखा झाला आहे.
वाचने
32712
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
चैत्र या
तपशीलातील चूक
In reply to चैत्र या by लिखाळ
थोडा धूसरपणा
In reply to तपशीलातील चूक by आजानुकर्ण
शक्य आहे.
In reply to थोडा धूसरपणा by मुक्तसुनीत
मित्रा अजानुकर्णा !
In reply to शक्य आहे. by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to मित्रा अजानुकर्णा ! by मुक्तसुनीत
सीक्वेल
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
बरोबर
In reply to सीक्वेल by मुक्तसुनीत
बरोबर!
In reply to बरोबर by आजानुकर्ण
हो.
In reply to बरोबर! by कोलबेर
ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग
In reply to शक्य आहे. by आजानुकर्ण
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
शॅलो पीपल
In reply to ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग by नंदन
अगदी हेच ते.
In reply to ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग by नंदन
'सोनपाऊले'सोनपावले मध्ये शेवटी जीएंच्या समग्र साहित्याचा कालखंड दिला आहे. त्यात चैत्र बाबत काय म्हटले आहे? आपला, (सनावळी) आजानुकर्ण सोनपावले की सोनपाऊले? माझ्या मते सोनपावले.वरील यादीत
In reply to शक्य आहे. by आजानुकर्ण
कालक्रम
In reply to वरील यादीत by आजानुकर्ण
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद/खांडेकर
In reply to कालक्रम by नंदन
डिवीडी
डीवीडी माध्यमातील दिवाळी अंकात
In reply to डिवीडी by मुक्तसुनीत
चैत्र...
In reply to डिवीडी by मुक्तसुनीत
असेच म्हणतो
In reply to चैत्र... by बिपिन कार्यकर्ते
उपलब्ध
In reply to चैत्र... by बिपिन कार्यकर्ते
आभार
पहायला हवा
कुसुमगुंजातील
In reply to पहायला हवा by सुवर्णमयी
सुरेख!
कैरी
In reply to सुरेख! by कोलबेर
फालतू
In reply to कैरी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मला
In reply to फालतू by आजानुकर्ण
नसता बनवला
In reply to मला by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कृपया
In reply to नसता बनवला by आजानुकर्ण
सहमत
In reply to कृपया by आजानुकर्ण
चैत्र, फेड आणि आणखी एक
In reply to सुरेख! by कोलबेर
ही कथा
दुवा
In reply to ही कथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मी जी.ए.वाचलेले नाहीत.
एका मराठी मालिकेत बघीतली होती ही कथा
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तम..
In reply to उत्तम by नंदन
>>गोट्या
In reply to उत्तम.. by स्वाती दिनेश
मुक्तसुनीत
हेच म्हणते..
In reply to मुक्तसुनीत by रामदास
स्सही !!!
वि चि त्र!
रोचक अभिप्राय
In reply to वि चि त्र! by सहज
धन्यवाद
In reply to रोचक अभिप्राय by मुक्तसुनीत
आवर्तन डिव्हीडी
व्वा
अरेच्या!!
In reply to व्वा by आजानुकर्ण
हम्म :(
In reply to अरेच्या!! by कोलबेर
जीएंचे एक्सपर्ट...आणि मिपाचे संपादक :)
In reply to व्वा by आजानुकर्ण
अवांतर : जीए आणि जीएंच्या कथेंवर एक्सपर्ट लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
असा लिहिलेला माझा प्रतिसाद संपादकांनी उडवला. अर्थात हे विषयांतर असेल तर विषयाच्याच निमित्ताने याच चर्चेत इतर प्रतिसादात भरपूर विषयांतर आहे.सदरील प्रतिसाद ज्या संपादकांनी उडवला त्या संपादकांना माझाही जरासा खूलासा. :)
जीएंच्या बद्दल आणि जीएंच्या कथांवर मराठी संकेतस्थळांवर भरभरुन बोलणारे मोजकी मंडळी आहेत त्यांना उद्देशून माझा प्रतिसाद होता. त्यांनी काही लिहावे याच उद्देशाने तसे लिहिले होते. यात लपवण्यासारखे काही नाही, पण यात उडवण्यासारखे काय होते हे मला अजूनही कळले नाही.
संस्काराच्या निमित्ताने असे वाटले होते की, जीएंबद्दल असे म्हटल्या जाते की, 'अश्रद्धा' हा त्यांच्या जीवनाचा मूलाधार होता.याला काही लोक चिकित्सकपणाही म्हणतात. जीएंच्या कथांमधले वातावरण, पात्रांचे जीवन, जीवन जगण्याच्या माणसाच्या वेगवेगळा तर्हा, त्यांचे संघर्ष आणि त्यातून मानवी जीवनाचा एक अर्थ असे चित्र बर्याचदा जीएंच्या कथा वाचतांना दिसतो आणि जीएंना त्याच गोष्टीचे आकर्षण होते. आपल्या जे वाट्याला आले आहे, त्याला नियती जवाबदार आहे त्यापासून सूटका नाही त्या दृष्टीने मी 'मधूच्या आईकडे' पाहतो. "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" माणूस गेल्यानंतर गावातल्या लोकांना कळू नये, वगैरे, हे आपले वाचकांचे तर्क आहेत. लेखकाला ओढ आहे ती नियतीवादाची. नियतीपुढे मानव शरण जातो. आपल्या नशिबातले चुकत नाही. असा काहीसा बोध त्यांच्या कथा वाचतांना होत असतो, समाजविषयक चिंतन हा त्यांचा विषय कधीच नव्हता असा जीएंच्या एक फुटकळ वाचक (उपरोधाने लिहित नाही) म्हणून मला वाटते.
म्हणून जीएंबद्दलच्या एक्सपर्ट वाचकांची काही वेगवेगळी मते यानिमित्ताने यावे, असे वाटले होते. यात उडवण्यासारखे काय होते. असो, मिपाचालकांनी कोणत्याही संपादकाच्या लेखन/प्रतिसादाबद्दल कोणत्याच कार्यात कधीच कोणताच हस्तक्षेप केला नाही. एक संपादक म्हणूनही मीही काही विचारणार नाही. पण एक मिपाचा सदस्य म्हणून विचाराल तर त्यात उडवण्यासारखे काहीच नव्हते त्याबाबतीत लिहिण्या-बोलण्याचे 'सदस्य' म्हणून माझे स्वातंत्र्य आबाधित आहे.आपण काय
In reply to जीएंचे एक्सपर्ट...आणि मिपाचे संपादक :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान
सुरेख ओळख...
श्रीमंती-ग
कथेचा सारांश
In reply to श्रीमंती-ग by विसोबा खेचर
हम्म! ही
In reply to कथेचा सारांश by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गूळ आवडतो का ?
In reply to हम्म! ही by विसोबा खेचर
गूळ आवडत
In reply to गूळ आवडतो का ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्किट इथे लक्ष द्या
In reply to गूळ आवडतो का ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to सर्किट इथे लक्ष द्या by कपिल काळे
इथे
In reply to +१ by मुक्तसुनीत
अरे कपिल,
In reply to सर्किट इथे लक्ष द्या by कपिल काळे
धन्यवाद
सिनेमा
सोनाली
In reply to सिनेमा by मेघना भुस्कुटे
अभिनय
In reply to सोनाली by विसोबा खेचर
सहमत आहे
In reply to अभिनय by मेघना भुस्कुटे
छान
जीए आणि
In reply to छान by राघव
हेच
In reply to जीए आणि by लिखाळ