Skip to main content

आय डी वरून वाक प्रचार व म्हणी

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 10/03/2012 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रानो, अन मैत्रिणीनो ही ! ( एक दोन होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आयुष्यात पहिले धाडस ) हसत खेळत , बोचकारे काढत . फुंकर घालत, आपण इथे व्यक्त होत असता. मी नमनाला काही घडाभर तेल न घालता आवाहन करतो की मिपावरील आय डी ला बेस धरून नव्या म्हणी व वाकप्रचार करा. चिमटे घ्या गौरव करा. एकूण काय आनंद घ्या ! उदा मी एक दोन म्हणी देतो - सुचतील तशा तुम्ही ही द्या रोज करी गाजावाजा . त्याच नांव चौकट राजा किल्याची किल्ली , वल्ली वल्ली वल्ली जे न देखे रवि ते देखे कवि , जे न देखे कवि तेही देखे गवि स्त्री जातीची महती....सांगे ३ १४ विक्शिप्त अदिति . आपका टाईम शुरू होता है अब ..................................

वाचने 25270
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by गोंधळी

मूळ म्हण अस्तित्वात आहे व तिला आय डी ची जोड अशी कल्पना आहे . उदा मीच माझ्यावर केलेला टाँट पहा - अंधेर नगरी चौकट राजा टकेशेर आजा ( येशूचा आजोबा ) टकेशेर मुंजा ( गजलनगरीतल्या पिंपळावरचा ) वरील मूळ म्हण अनागोंदी कारभाराचे वर्णन करणारी आहे . व वापरात आहे.

ओ राजे.. धागे काढा पण प्रतिसाद आवरा

या विषयावर मिपाकरांना बरीच कल्पकता दाखवता आली असती, तसे काही प्रयत्न वर झाले पण आहेत*. पण आताचे काही प्रतिसाद बघता इतरच काही सुरु आहे. सबब माझ्यापुरता धाग्यातील रस गेला आहे. काही मान्यवर सदस्यांनी क्वालिटी vs क्वांटीटी चा नियम एकदा उजळावा असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटत आहे. टीकेबद्दल राग नसावा. बाकी चालू द्या :-) * मला सर्वात आवडलेली म्हण "दिवट्यांच्या पंचांगात बारा महिने भाद्रपद - सूड" विमे

कसं जमतं हो..? समजा मी म्हणींची लिस्ट घेतली आणि मग त्यात बसतील तसे आयडी बसवले तर तो फाउल होइल का?

जीमोंच्या लिखाणात व्याकरणाची शिकरण!

रोचक विषय अन प्रतिसाद. हे पूर्वी नजरेतून सुटलं होतं. यावरून माझाच जुना धागा आठवला - मिपा म्हणी. बादवे हे बाफ कशाचे लघुरुप आहे?

एक तो रंगा,करी खफवर दंगा... *biggrin* फ्रस्टेट सूड ला ..वशाडीचा आधार.. *wink* संम तारी त्याला कोण मारी... मिपासंन्यासाची,प्रतिसादापासुन तयारी