ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं.
दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता.
राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले.
पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए…
वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके…
एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ"
त्याचा फोन वाजतो.
"हं बोला सर"
इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.
"बारक्या, उद्यासाठी मैदा आणायला सांगितला होता तुला, आणला ना?"
"अहो पण असा काय करता आपलं ३००० रुपये स्क्क़ेअर फूट ठरला होता ना…"
"हा बे, आणलाय तुझा मैदा… "
"हो पण… आपलं ठरलं होतं ना … मग असं कसं तुम्ही … "
न दिखाओ चलते चलते यूँ कदम कदम पे शोंखी,
कोई क़त्ल हो रहा है, सर-ए-आम चुपके चुपके…
"अहो मला काही माहित नाही, हे बघा मी आता हे वरचे पैसे कुठून द्यायचे तुम्हाला… हलो? हलोssss?"
"बारक्या आज बाकी धंदा एकदम झकास झाला राव, अबे २००-३०० चा गल्ला जमला असेल आरामात!"
दुचाकीवाला माईल्ड पेटवतो…
राक्या निघायच्या तयारीत…
मागून एक भिकाऱ्यांचा घोळका येतोय…
कभी शोखियाँ दिखाना कभी उन का मुस्कुराना
त्यात एक ७-८ वर्षांची मुलगी…
माईल्ड ओढणाऱ्या दुचाकी वाल्या जवळ ती पैसे मागते, तो तिच्या कडे न बघताच नकारार्थी हात करतो…
तिला वाईट वाटत नाही, बहुदा तिचा आजचा कोटा पूर्ण झाला असावा…
भिकारीण पुढे जाते…
यह अदाएं कर न डाले मेरा काम चुपके चुपके!
दुचाकी वाला तिच्याकडे पाहतोय, थोड्या तिरसट पनेच.… पण तिला आपण काही दिले नाही याचा थोडा पश्चाताप जाणवतोय …
ती नेहमीच्या सहजतेने राक्या समोर हात धरते… राक्या हसून तिच्या हातावर मुद्दाम बाजूला काढून ठेवलेली जलेबीची पुडी ठेवतो…
भिकारीण निघते, थोडं पुढे चालणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला जलेबीची पुडी देते… दोघे आनंदाने खातात…!
तिकडे सातासमुद्रपार काही अर्थतज्ञ "ग्लोबल ह्यापिनेस ईंडेक्स" बद्दल चर्चा करत असतात… !
इकडे नुसरत आपली चीज संपवतो,
"ये जो हिचकियाँ मुसलसल मुझे आ रही है आलम,
कोई ले रहा है शायद ...कोई ले रहा है शायद
मेरा नाम चुपके चुपके !!"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बाकी कथा आवडली, फक्त भिकारी
धन्यवाद!!
आवडली.
धन्यवाद!!
मस्त!
धन्यवाद!!
चांगलंय... डोळ्यासमोर घडतंय
धन्यवाद!!
छान!
धन्यवाद!!
खूपच छान!
धन्यवाद!!
खुप छान.
धन्यवाद!!
classik
.....धन्यवाद !!!
विजयकुमारजी विसरले असे वाटले
अ चूक जागी लागुन गोळी..
शाळेत असं बघितलं होतं. दंगा
हाहा!!
आमच्या वडिलांना ओळखता
धन्यवाद नि आभार विभक्ती फरक.