Skip to main content

टेंडर (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 17/03/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्यान साहेब खुशीत होते. फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं. सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले. ''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई. तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे. त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची. सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''. *** महिना निघून गेला रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच! सायबानं घेतलंन सगळ्याना . रामा तसा धीट हाय . बोल्ला '' सायेब मशिनी आणल्या -पर ट्रेनिंग कुटं झालं! शिवाय शिड्या, एक्स्टेशन बोर्डबी लागतील ! '' '' म्हनतोस तेबी बरोबरच हाय - सगळ्याबर्बर ट्रेनिंगचंबी टेंडर मार्गी लावतो आजच!''
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4059
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

खाजगी, कार्पोरेट अन् येमेन्शीत बी हेच असतं. रोज बगतोय आम्च्या येमेनशीत.

एकदम नेमक्या भाषेत मांडलय.

लक्ष्यभेदी शतशब्दकथा आवडली.

मस्त!

शेवटी एकदम पंच जोरदार आहे . बर्याच ऑफिस मध्ये शिपाई लोकांना पूर्ण प्रोसेस आणि त्यातल्या खाचाखोचा माहित असतात .