✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दिगंबर - फसलेला संन्याशी अन थकलेला संसारी

श
शिव कन्या यांनी
Fri, 03/06/2015 - 22:24  ·  लेख
लेख
'स्वामी दया करा. आता या वयात हे करायला सांगू नकात. कळत नव्हतं, तेव्हापासून तुमच्या पंखाखाली घेतलंत मला! चार चांगल्या गोष्टी शिकवल्या! ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत. येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत. चार घरी अनवाणी पायांनी भिक्षा मागायला शिकवलीत. प्रसंगी, स्वतः रांधून एकटच जेवायला शिकवलंत. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत, पण आता हे करायला सांगू नकात! तुम्ही युगांडात म्हणालात, मी युगांडात गेलो. तुम्ही रवांडात म्हणालात, मी रवांडात गेलो. तुम्ही टांझानियात म्हणालात, मी तिथेही गेलो. तुम्ही पोरांना शिकव म्हणालात, मी शिकवलं. तुम्ही आजार्यांची सेवा कर म्हणालात, मी केली. तुम्ही 'जगन्मिथ्या' म्हणालात, सभोवती जग दिसत असूनही, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही 'ब्रह्म सत्य' म्हणालात, मला कधीही अनुभव आला नाही, परंतु तुमच्या चरणांकडे पाहून, विश्वास ठेवला. स्वामी, आत्ताही, तुमच्या मागे अरण्यात धावायला तयार आहे. काट्यांवरून चालायला तयार आहे. निखारे गिळायला तयार आहे. पण, आधीसारखाच तुमच्या वळचणीला पडू द्या. स्वामी, द्या करा. हे एवढं करायला सांगू नकात. स्वामी, तुम्हीच शिकवलंत , 'स्त्री नरकाचे द्वार आहे, मोक्षप्राप्तीतील धोंड आहे!' आईच्या आठवणीने डोळ्यात पाणी यायचे, तरीही तुमची शिकवण प्रमाण मानली. हरेक स्त्रीला माताच मानले. विनम्रपणे तिच्या चरणांवर लोटांगण घातले. तुम्ही सांगितलेत, काम आवर! आवरत नसताना , आवरला स्वामी! आता, हे असलं काही करायला सांगू नकात स्वामी! या शाळकरी पोरीबरोबर लग्न करायला सांगू नकात. ऐका स्वामी, ऐका. मला प्रेम माहित नाही, संसार माहित नाही. माझ्या जवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही. मला बाहेरची दुनिया माहित नाही. तुमच्या शिवाय मला दुसरे जग ठावूक नाही. मी काय काम करू? मी धन कसे मेळवू? मी कुटुंब कसे सांभाळू? हे प्रश्न आहेतच! पण स्वामी, आता मला कशातच रुची वाटत नाही! तुमच्याच कृपेने निम्मा भवसागर तरून आलोय. मध्यावरती गरगरणाऱ्या भोवऱ्यात असं लोटू नकात. दया स्वामी दया! ती मुलगी अनाथ आहे, मान्य आहे. तुमचे इतके श्रीमंत भक्त आहेत, तिचा सांभाळ कुणीही करील. तिचं सुयोग्य वराशी लग्न लावून देतील, तुमच्या शब्दाबाहेर कुणीही नाही!' गुहेतून गंभीर शब्द उमटले, 'दिगंबरा, तूच का मग आमचा शब्द ओलांडतोयस? संसारही तपश्चर्याच आहे! जा. ईश्वर तुला मार्ग दाखवेल. कल्याणमस्तु!' इकडे अंधारी गुहा, तिकडे न बांधलेले घर! करड्या दाढीचा दिगंबर कमरेची लंगोट उद्वेगाने भिरकावत ओरडला, 'का मला असे जन्मास घातले देवा! का मला असे नागवे करून मोडीत काढले देवा!?'
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
6218 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

काहीच संदर्भ लागला नाही. पण

एस
Fri, 03/06/2015 - 22:28 नवीन
काहीच संदर्भ लागला नाही. पण एकंदरीत छान लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

+१

पॉइंट ब्लँक
Fri, 03/06/2015 - 22:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+1

चुकलामाकला
Sun, 03/08/2015 - 22:40 नवीन
नमनाला घडाभर तेल घेतलेत. थोडक्यात लिहिले असते तर जास्त चांगले झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

विषय वेगळा आहे, मांडणी सुंदर,

सौन्दर्य
Fri, 03/06/2015 - 22:39 नवीन
विषय वेगळा आहे, मांडणी सुंदर, आणि मंथनही चांगले केलेत. पण सुरवातीचा 'द्या करा' खूप वेळ कळलाच नाही, नंतर कळले कि तो शब्द 'दया करा' असा आहे. 'शाळकरी पोर' म्हणजे वयाने लहान असणार आणि तुम्ही निदान तीशिकडे झुकलेले (असं गृहीत धरतो) असं असता गुरूने असे लग्न करायला भाग पाडणे चुकीचेच.
  • Log in or register to post comments

होय... ते दया करा असे हवे होते, प्रकाशित झाल्यावर लक्षात आले.

शिव कन्या
Fri, 03/06/2015 - 22:50 नवीन
होय... ते दया करा असे हवे होते, प्रकाशित झाल्यावर लक्षात आले. दुरुस्तीची सोय असेल तर करून घेते. इतक्या बारकाईने वाचून प्रतिसाद दिलात, धन्यवाद! माझा तिशीकडे झुकण्याचा आणि यातल्या गुरूचा काही संबंध नाही. इथला गुरु साहित्यातले पात्र आहे. हा गुरु किवा यातला दिगंबर माझे व्यक्तिगत प्रतिनिधित्व करीत नाही. कृपया, हि त्रयस्थपणे केलेली निर्मिती आहे, हे लक्षात घ्यावे.
  • Log in or register to post comments

हे एक रूपक आहे हे वाचल्यावर

सौन्दर्य
Fri, 03/06/2015 - 23:08 नवीन
हे एक रूपक आहे हे वाचल्यावर लगेच कळले होते. त्यातील सन्यासी म्हणजे व्यक्तिगत तुम्ही नाही हे देखील कळले होते, फक्त एखाद्या गुरूने आपल्या शिष्याला असा सल्ला देणे चुकीचे आहे असे मला वाटले इतकेच.
  • Log in or register to post comments

सौंदर्य...... होय. धन्यवाद.

शिव कन्या
Fri, 03/06/2015 - 23:11 नवीन
होय, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान आहे. पण मला रूपक समजलं

आदूबाळ
Fri, 03/06/2015 - 23:47 नवीन
छान आहे. पण मला रूपक समजलं नाही.
  • Log in or register to post comments

मला समजलं !

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/07/2015 - 01:16 नवीन
मला समजलं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मंग सांगाना स्वामी, दया करा!

संदीप डांगे
Sat, 03/07/2015 - 01:59 नवीन
मंग सांगाना स्वामी, दया करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा..

नाखु
Sat, 03/07/2015 - 09:16 नवीन
दयाका दरवाजा तोड दो !!! अखिल शीआय्डी प्रेक्षक संघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

:):):)

चुकलामाकला
Sun, 03/08/2015 - 22:41 नवीन
:):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

@ मंग सांगाना स्वामी,>> मी

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/07/2015 - 11:25 नवीन
@ मंग सांगाना स्वामी,>> मी नै ज्जा! =)) ते आध्या त्म आहे. त्यामुळे ते आधी आत्म्या'ला(च्च! :-D ) समजावं लागतं! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मलापण समजलं रूपक पण मी नाही

कंजूस
Sat, 03/07/2015 - 08:06 नवीन
मलापण समजलं रूपक पण मी नाही सांगणार. हा हा हा !
  • Log in or register to post comments

रूपकाचे सार - स्वामींच्या

विशाखा पाटील
Sat, 03/07/2015 - 09:58 नवीन
रूपकाचे सार - स्वामींच्या नादाला लागू नका :)
  • Log in or register to post comments

एक खरी श्टोरी आहे पण ती

कंजूस
Sat, 03/07/2015 - 10:46 नवीन
एक खरी श्टोरी आहे पण ती कट्टयाला सांगणार .आता इकडे नाही.
  • Log in or register to post comments

थकलेला संसारी कवितेत दिसलेला

विवेकपटाईत
Sat, 03/07/2015 - 12:28 नवीन
थकलेला संसारी कवितेत दिसलेला नाही.
  • Log in or register to post comments

प्रश्न :सन्याशाला संसारी का

कंजूस
Sun, 03/08/2015 - 16:33 नवीन
प्रश्न :सन्याशाला संसारी का व्हायचे नसते ? उत्तर :घरची भांडी घासण्याचे कुण्णालाही कौतुक नसते .
  • Log in or register to post comments

=))

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/08/2015 - 16:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आवरत नसताना , आवरला स्वामी!

मदनबाण
Sun, 03/08/2015 - 17:42 नवीन
आवरत नसताना , आवरला स्वामी! खी.... खी. बाकी लेखन आवडले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }
  • Log in or register to post comments

कहिहि

भोला मिलिन्द
Sun, 03/08/2015 - 18:04 नवीन
ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत. येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत.--कोन्ता च स्वामि असे करित नाहि
  • Log in or register to post comments

.

hitesh
Sun, 03/08/2015 - 18:41 नवीन
सख्या गटणे .... बोळा अडकलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

भोला मिलिंद

शिव कन्या
Sun, 03/08/2015 - 21:10 नवीन
'कोन्ता च स्वामि असे करित नाहि'----- असं मुळीच नाही. स्वामी लोकांनी मांडलेला बाजार पाहिला तर आपल्या चेल्यांवर याहून खोलवर कृपा करणारे दिसतील.
  • Log in or register to post comments

विवेक पटाईत

शिव कन्या
Sun, 03/08/2015 - 21:13 नवीन
'थकलेला संसारी कवितेत दिसलेला नाही.'...... संसाराच्या नुसत्या विचारानेही तो गलितगात्र झालाय. अजून काय त्याची थकलेली मन:स्थिती दिसावी!
  • Log in or register to post comments

रूपक ........ आदूबाळ

शिव कन्या
Sun, 03/08/2015 - 21:26 नवीन
देवाधर्माच्या दलालांनी सामान्य माणसाची जी मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक भ्रांत केलेली आहे, त्याचे हे चित्रण आहे. जे आहे, त्याला नकार, जे नाही त्याचा स्वीकार करायला लावायचा. ऐहिक सुख म्हणजे अपराध वाटायला लावायचे. असे बुद्धी भेद झालेले चेले हाकायला सोप्पे पडतात. वेळ पडलीच, तर याच शिकवणुकीचे शस्त्र उलट वापरून, आपल्याला हवे तसे वागायला भाग पाडायचे. वरवर अत्यंत अध्यात्मिक वाटणारी हि सारी प्रक्रिया, प्रचंड मानसिक गुलामगिरी कडे घेऊन जाणारी असते, हे एखादा टोकाचा प्रसंग अल्याशिवाय कळतहि नाही. आणि जेव्हा कळू लागते, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. हे रूपक आहे, काढू तितके अर्थांचे पदर उलगडत जातील. पण आपण सगळे हे वाचून प्रतिक्रिया नोंदवत आहात, नवीन लिहिण्यास tonic मिळत आहे. धन्यावाद.
  • Log in or register to post comments

संन्यास वाचलं आणि मिपावरुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 03/08/2015 - 23:14 नवीन
संन्यास वाचलं आणि मिपावरुन सद्ध्या टेंपररी गायब असणार्‍या तीन थोर्र थोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र आयडींची आठवण झाली. टवाळकीच्या जंगलामधुन मुक्तपणे विहार करायचं सोडुन जेपीनी संन्यास का बरं घेतला असावा? :(
  • Log in or register to post comments

देव तर्री त्याल्ला कोण मार्री

कंजूस
Mon, 03/09/2015 - 06:13 नवीन
देव तर्री त्याल्ला कोण मार्री ? तुम्हाला जमतंय. अशीच दोनचार रूपकं लिहा.
  • Log in or register to post comments

फालतु

प्रसाद गोडबोले
Tue, 03/10/2015 - 18:19 नवीन
फणसातला फ , फ ला काना फा , लसणातला ल , तलवारीचा त , त ला उकार तु ...फालतु :-\
  • Log in or register to post comments

तीन अक्षरी प्रतिक्रियेसाठी

शिव कन्या
Tue, 03/10/2015 - 21:20 नवीन
तीन अक्षरी प्रतिक्रियेसाठी कश्शाला फालतू ओळ लिहित बसलात राव!
  • Log in or register to post comments

संत श्री ज्ञानेश्वर

सिरुसेरि
Wed, 03/11/2015 - 12:01 नवीन
संत श्री ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचा लहानपणी 'सन्याशाची पोरे' असा छळ झाला त्याची आठवण झाली .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा