नमस्कार!
भाईयों और बहनो.....
(सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... )
हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी.
एक सहज प्लॅन डोक्यात आलाय. खूप आधी होत असेल ही पोस्ट पण आधीच तारीख ठरली की बरं पडतं बाकी कार्यक्रम काही असेल नसेल तर त्या दृष्टीने म्हणून आत्ताच धागा टाकतोय. साधारण पणे सगळ्यांना जमेल असा, छोटासा, पण निसर्गरम्य असा `पेठ चा किल्ला किंवा कोथळीगड' हा कर्जत जवळ आहे. तिथे मिपाकरांसोबत जावं असा विचार मनात आला. तसा प्रस्ताव इथं मांडतोय. जून चा तृतीय किंवा चतुर्थ शनिवार. पेठ चा किल्ला एका दिवसात अगदीच्च आरामात बघून होतो, म्हणून शनिवार; म्हणजे रविवार मोकळा सगळ्यांना.
या कल्पनेबाबत, किल्ल्याबाबत, तारखेबाबत, किंवा इतरही कुठल्या बाबीसंदर्भात अनुभवी मिपाकरांचे विचार, सल्ले, कल्पना, त्यांनी द्याव्यात अशी विनंती. मी नवखा असल्याने अनुभवींच्या मताची, सहभागाची गरज आहे.
आता उकाडा झालाय फार.... आणि अब की बार... :)
वाचने
21214
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
उद्या हापिस आहे बे.
In reply to ? by प्रसाद गोडबोले
ह्म्म
In reply to उद्या हापिस आहे बे. by प्रचेतस
भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
अहो...
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
ट्रेकसाठी
ट्रेकसाठी
In reply to ट्रेकसाठी by हुकुमीएक्का
नो कॉमेंट्स.
In reply to ट्रेकसाठी by चौकटराजा
४ नंबर चा विडिओ जबरा आहे राव
अं हं
सज्जनगड तर एकदम मस्त
कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो .
१५ तारखेला तोरणा आणि बेडसे
माफ करा तिकोना ला गेलेलो…
येणार का? :) :)
दोन दिवसात सगळे किल्ले
In reply to येणार का? :) :) by सुहास झेले
ह्या भागातील बहुतेक किल्ले
In reply to दोन दिवसात सगळे किल्ले by सूड