मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत

वेल्लाभट · · भटकंती
नमस्कार! भाईयों और बहनो..... (सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... ) हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी. एक सहज प्लॅन डोक्यात आलाय. खूप आधी होत असेल ही पोस्ट पण आधीच तारीख ठरली की बरं पडतं बाकी कार्यक्रम काही असेल नसेल तर त्या दृष्टीने म्हणून आत्ताच धागा टाकतोय. साधारण पणे सगळ्यांना जमेल असा, छोटासा, पण निसर्गरम्य असा `पेठ चा किल्ला किंवा कोथळीगड' हा कर्जत जवळ आहे. तिथे मिपाकरांसोबत जावं असा विचार मनात आला. तसा प्रस्ताव इथं मांडतोय. जून चा तृतीय किंवा चतुर्थ शनिवार. पेठ चा किल्ला एका दिवसात अगदीच्च आरामात बघून होतो, म्हणून शनिवार; म्हणजे रविवार मोकळा सगळ्यांना. या कल्पनेबाबत, किल्ल्याबाबत, तारखेबाबत, किंवा इतरही कुठल्या बाबीसंदर्भात अनुभवी मिपाकरांचे विचार, सल्ले, कल्पना, त्यांनी द्याव्यात अशी विनंती. मी नवखा असल्याने अनुभवींच्या मताची, सहभागाची गरज आहे. आता उकाडा झालाय फार.... आणि अब की बार... :)

वाचने 21167 वाचनखूण प्रतिक्रिया 86

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 00:14
एक तर तुला भेटण्याची संधी हुकलीच आहे. निदान ह्या वेल्लाभटां बरोबर तरी जावू दे. मी यानबूतून जेमतेम १४ दिवसांसाठी येणार, त्यात बायकोच्या नकळत कट्ट्याला जाणार.(तिच्या नकळतच पळायला लागणार आहे."मिपा" ही तिची सवत आहे.त्यामुळे ती हा प्रतिसाद नक्कीच वाचणार नाही.)आणि ऐन वेळी तू काडी सारणार. तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला. ओ वेल्लाभट, मी आधीच ५ जुलै सांगीतले आहे हां.वाटल्यास २८ जून करा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Sun, 05/18/2014 - 10:28
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
वाव्वा मूवी, बालपण जागे करणारा प्रतिसाद.

In reply to by मुक्त विहारि

पिवळा डांबिस Mon, 05/19/2014 - 10:31
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
हे टवाळ -> डामरट -> डँबीस हे बघून ड्वाळे पानावले!!! मिपावर आल्याचे सार्थक झाले!!!! *yahoo* धन्यवाद मुविकाका!! बाकी गडाच्या ट्रेकला हार्दिक शुभेच्छा! (आमी फक्त भुईकोट किल्ले किंवा जलदुर्गच बघतो!!!)

In reply to by पिवळा डांबिस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 15:19
टवाळ कार्टा असल्याने, असे लिहीले. एखादे भारद्स्त व्यक्तीमत्व असते, तर थोडी वाक्य रचना बदलली असती.. ================================= "प्रिय अबक, आपण नेहमीच आमच्यावर प्रेम करता.तशी तुमची आणि माझी वैयक्तिक ओळख नाही.ह्यावेळी नेमके तुम्ही आमच्या गावांत आणि आम्ही पोटा-पाण्याच्या उद्योगाला बाहेर.त्यामुळे तो चान्स हुकला. असो, ह्यावेळी निदान वेल्लाभटांबरोबर जायचे ठरवत आहे आणि सुदैवाने आमची सूट्टी पण त्याच सुमारास आहे.बायकोच्या त्रासातून सुटण्यासाठी (निदान एक दिवस तरी) आम्ही बेत मांडावा आणि तुम्ही तो उधळावा, ह्यासारखे मानसीक दू:ख नाही. आम्ही , तुम्हाला भेटलो नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला असेल.तसाच त्रास वेल्लाभटांना होवू द्यावा, असे तुम्हाला मनांतून नक्कीच वाटत असेल.पण आंतरजालावर तसे मनांतले प्रत्येक विचार मांडता येत नाहीत्,ह्याची तुम्हाला कल्पना आहेच. म्हणून तुम्ही वेगळी वाक्य रचना केलीत."ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी" हे मात्र आपण विसरलांत. जावू दे, तुमचे आमच्यावरचे प्रेम आम्हालाच काय पण समस्त मिपाकरांना माहीत आहे.त्यावर आज शिक्का मोर्तब झाले." @ वेल्लाभट, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, हे आपण आधीच लिहायला हवे होते.पण आपण ते न लिहील्याने हा असा गोंधळ झाला.आपण पुढच्या धाग्याच्या वेळीस योग्य ती काळजी घ्याल अशी आशा. @ संपादक मंडळ, क्रुपया अशा गोष्टींसाठी एखादा छापील फॉर्म ठेवावा आणि मग तो परत एकदा चेक करावा.म्हणजे मग असे सभासदांना एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा चान्स मिळणार नाही, आणि मिपाची बँडविड का बँडविथ, जे काय असेल ते बॅडवाले ते वाचेल. ================================

स्पार्टाकस Sat, 05/17/2014 - 02:20
एक दिवसाचा ट्रेक करत आहात की दोन किंवा जास्त ? सोपा ट्रेक करायचा आहे का थोडा मिडीयम ग्रेड ? मुख्य म्हणजे ट्रेक करायचा आहे का पिकनिक ?

In reply to by स्पार्टाकस

वेल्लाभट Sat, 05/17/2014 - 07:55
वरील (धाग्यातील) प्रस्तावाच्या अनुषंगाने उत्तरं १. एका २. सोपा. जेणेकरून जास्त जणांना येणं शक्य होईल ३. करायचा ट्रेकच; झालीच पिकनिक तर इलाज नाही. वरील सोडून इतर कुठला पर्याय असेल तर वेगळी गोष्ट आहे.

कंजूस Sat, 05/17/2014 - 09:34
तिथे जवळच एक {दिवसाच्या}कट्टयासाठी चांगली जागा आहे .कोणालाही येता येण्यासारखी .मुविँकडे सूत्रे सोपवा आणि तारीख ठरवा फक्त .जून महिना फार दूर नाही .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 09:42
ट्रेकिंगचे आयोजकत्व स्वीकारायचा अनुभव नाही, आणि सध्या हे शिकायला अजिबात वेळ नाही. "कंजूस" साहेब तुम्हीच का नाही ठरवत? आपली मागची ट्रिप पण मस्त झाली होती. कमीत कमी पैशांत आणि वेळ वाचवत, ट्रिप करण्यात मजा आहे.

मागल्या वर्षीचा अख्खा पावसाळा सौदीत गेलाय रखरखीत वाळवंटात... एकांतात :( यंदाचा पावसाळा अख्खा पावसाळा मनसोक्त जगायचाय.... जंगलात रानावनात कोसळत्या पावसात हिरव्यागार गवतात धबाधबा धबधब्यांखाली दोंगरातल्या गुहेत डोंगराच्या कठड्यावर चिंब चिंब भिजत मग कुडकुडत थंडी वाजत मित्रांसोबत बीयर पीत मैत्रीणिंसोबत गंमत करीत .... छतावर पावसाचा आवाज ऐकीत , खिडकीत उभे राहुन चहा पीत शांत शात्रीय संगीत ऐकीत... अन पुन्हा नवीन ट्रेक्स्चे प्लॅन करीत ... यंदाचा पावसाळा जगायचा :) अवांतर : मी टेन्ट घेतलाय , आता स्लीपींग बॅग घेतो , एक ट्रेक कॅलेन्डर करुयात आणि मग धमाल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

दिपक.कुवेत Wed, 05/21/2014 - 11:45
"मैत्रीणिंसोबत गंमत करीत ...." नेमकि कशी गंमत करता हो तुम्हि सार्वजनीक ठिकाणी जरा आम्हाला पण सांगाल का? (ह. घ्या). कोणतीहि तारीख ठरली तरी मला जमेल असे वाटत नाहि. तेव्हा ट्रेक करीता भरपुर शुभेच्छा.

भाते Sat, 05/17/2014 - 11:16
कॉलिंग 'भ ट क्या खे ड वा ला' या ट्रेकिंग किंगच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा नक्कीच फायदा होईल. अर्थात बाकीचे मिपाकरही आहेतच सल्ला द्यायला आणि मदतीला आपल्याबरोबर.

In reply to by भाते

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 14:37
आजच मनाली वरून आले आहेत. फोन करा की रात्री.... हे कंजूस आणि भटक्या खेडवाला जिथे नेतील तिथे जा. भटक्या खेडवालांबरोबर २ ट्रेक (एक तर फार जबरदस्त होता.) केले आहेत आणि कंजुस बरोबर एक सहल केली आहे. कमीत कमी खर्च आणि वेळ वाचवत नेतात आणि आणतात.

स्पार्टाकस Sat, 05/17/2014 - 14:11
मी सध्या भारताबाहेर आहे. पण भारतात असताना अनेकदा ट्रेक अ‍ॅरेंज करत असे. मुंबई / पुण्याजवळ एक दिवसाचे बरेच ऑप्शन्स आहेत. मुंबईहून / पुण्याहून मधोमध :- लोहगड विसापूर राजमाची ( २ दिवस ) उंबरखिंड पुण्याहून १ दिवसाचे ट्रेक - पुरंदर हडसर चावंड मुंबईहून १ दिवसाचे ट्रेक :- माहुली अशेरी सागरगड कलावंतीण प्रबळगड हरिहर ( नाशीक हून जवळ ) २ दिवस सवडीने वेळ असेल तर पहिली पसंती अर्थातच हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा

कंजूस Sun, 05/18/2014 - 06:51
१)शनिवार ठीक आहे . २)पुण्याकडून बरेचजण असतील तर लोहगड ठीक आहे .त्यात मुंबईचेही (इंद्रायणी गाडीने )येऊ शकतात .इकडे साडे आठ ते पाच इतका वेळ हाताशी मिळतो . ३)मुंबईकडून असतील तर पनवेल -माथेरान -नेरळ आहे . ४)रात्री मुकाम करण्याचे ट्रेकबद्दल पावसाळयातील शनि /रवि ची खात्री देता येत नाही .गर्दी होते .

शशिकांत ओक Sun, 05/18/2014 - 12:40
वेलाभट, ट्रेकिंग मधे काय समाविष्ट आहे?... लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे? काही बरोबर काय सामान असावे?, स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय? मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना? वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू, पोटापाण्याची सोय, मिनी मेडिकल सोय?...

In reply to by शशिकांत ओक

ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी...
हल्ली ठरवून करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. प्रार्थमिक माहितीसाठी व्यनि करावा. चारचौघात विचारु नये.
लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे?
पायथ्यापर्यंत कसे पोहोचावे हे पूर्वानुभवाने समजायला अडचण नसावी.
काही बरोबर काय सामान असावे?,
सामान शक्यतो स्वतःचे असावे. मंडळ सामानाची जवाबदारी घेत नाही.
स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय?
स्थूल आकाराच्या लोकांनी एकादमात चढू नये. केंव्हा, कसे आणि कुठे थांबावे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे.
मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना?
उत्तेजक द्रव्ये, किंवा वस्त्रे, अथवा संभाषण यावर मंडळाचे निरिक्षण नसेल
वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू,
वास्तू ऐतिहासिक वाटली आणि प्रदर्शनीय नसली तर... शस्त्रसंधी करावा.
पोटापाण्याची सोय
पाण्यात उतरल्यावर पोट जाणवणार नाही.
मिनी मेडिकल सोय
योग्य वेळी गोळ्या (किंवा सवयी प्रमाणे, रेनकोट) घेणे (शक्यतो घरुन निघतांना), म्हणजे ऐनवेळी मेडिकल शोध (किंवा नंतरचा त्रास) वाचेल.

युथ होस्टेल अंबरनाथ दर वर्षी पेठ किल्ला ट्रेक जून च्या २/३ रविवारी आयोजित करते. या वर्षी १५ जून ला हा ट्रेक आहे. या ट्रेक ला येण्यासाठी YHAI चे सभासद असण्याची गरज नाही. मात्र खालील नियम पाळणे आवश्यक आहे. ड्रेस कोड : फूल प्यांट, फूल शर्ट, बूट. दुपारच्या जेवणाचा डबा. / २ लिटर पाणी. नो लिकर / नो तंबाखू /नो सिगारेट . सकाळी ०७ वाजता नेरळ स्थानकात जमायचं. टम टम रिक्षेने श्री. गोपाळ सावंत यांच्या हॉटेलात पोहोचायचं. तेथे नाश्ता,चहा करून चालायला सुरवात करायची. पेठ किल्ला येथे २/३ तासात फोचायचं.ज्यांना शक्य असेल त्यांनी वर बाले किल्ल्यात जायचं, ज्यांना शक्य असेल त्यांनी किल्य्याला प्रदक्षिणा घालायची. जेवण करून खाली यायचं. ज्यांना भिजायचं असेल त्यांनी सूख्या कपड्यांचा एक सेट आणावा. हे कपडे बरोबर बाळगण्याची गरज नाही . सावंतांच्या घरी ठेऊ शकतो. कपडे बदलण्याची योग्य व्यवस्था आहे. खर्च अंदाजे १०० ते १५०. (रिक्षा आणि नाश्ता चहा ) YHAI अंबरनाथ युनिट चे एक संस्थापक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दर वर्षी हा ट्रेक केला जातो. गेली काही वर्षे या ट्रेक ला १०० च्या वर उपस्थिती असते. जर मि पा कराना यायचे असेल तर ९९६००९६४३५ वर संपर्क साधावा. संख्या समजली कि त्या प्रमाणे रिक्ष्या/नाश्ता सांगता येतात. साधारण ५/६ वाजे पर्यंत नेरळ ला परत येतो.

कंजूस Sun, 05/18/2014 - 20:22
मुवि ,आपण हीच लेणी पाहून येताना हाच किल्ला {दुरून}पाहिला होता. वल्ली ,लेणी म्हणजे चोवीस खोल्या असलेला पन्नास फुटी चौरस विहार नदीकाठी आहे .पहिल्या शतकातला आहे .आत्मुबुवांचा ओम ॐ इथे चांगला घुमतो . इथेच ट्रेकला न जाऊ शकणाऱ्यांसाठी कट्टा करायला आदर्श जागा (वर्षभर)आहे याची नोंद घ्यावी .अधिक माहितीसाठी "ओवर टू मुवि "कारण माझी धाव ताकापुरतीच आहे .स्ट्रॉंग अथवा वीक फिल्डींग मधले काही कळत नाही .

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 22:30
ते नेमके जागेचे नांव विसरलो बघा,तसे लिहून ठेवले आहे, पण आमची कागदपत्रे डोंबोलीतच राहीली. लेणी बघीतली, तीर्थ प्राशन केले आणि आनंदात घरी आलो. पक्षी-तीर्था सकट भटकंती करायला एकदम योग्य जागा.इथे ट्रेकिंग हा शब्द जाणीवपुर्वक टाळला आहे. (आम्हाला वक्ती आणि वल्लीं बरोबर भटकण्यांतच जास्त इंटरेस्ट.सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो.)

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 23:37
सॉरी हां, हे कट्टे किंवा मिपाकरांबरोबर भटकंती म्हटले ना? की आम्हाला फक्त गप्पा आणि खाणे, इतकेच आठवते. मागच्या वेळी त्या रामदासांबरोबर भटक भटक भटकलो... पण लक्षांत काय राहीले तर, पारश्या कडचे बकरी आयटेम आणि एके ठिकाणी प्यायलेलो रस्सम (जेमतेम १० मिनीटे आधी बायकोच्या हातची इडली आणि मग राहवलेच नाही म्हणून मिसळ पाव खाल्ला होता.खरे तर त्यावेळी मला अजून रस्सम हवा होता, पण बायकोच्या डोळ्यातील भांव तिच्या कडे न बघताच ओळखले, आणि मनावर काबू ठेवला.) जावू द्या हो, आम्ही हे असेच बघा, घराबाहेर पडलो की आमचा पार शंकर्‍या होतो. @ कंजूस, दादा, ह्या वल्लींना जरा त्या गावाचे नाव सांगून टाका.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 23:39
ह्या बकरी आयटेमचे बेकरी आयटेम, असे कुणी करेल काय? तसे त्या पारश्याकडे "बकरी आयटेम" पण होते. पण आम्ही बेकरी आयटेमच खाल्ले.

कंजूस Mon, 05/19/2014 - 06:42
पेठचे फोटो टाकल्याने छान वातावरण निर्मिती केलीत भटक्याखेडवाला . वल्ली ,बरोबर .किल्याच्या सुळक्यात एक मोठे लेणं आहे .परंतु हे गड चढून जाणाऱ्यांसाठी आहे .दुसरे आंबिवली गावापुढे एक दीड किमीवर रस्त्याकडे आहे . थोडे अवांतर . वल्ली ,तुम्ही बदामि ऐहोळेला (अधिक हम्पि)जायलाच पाहिजे .मी दोनदा गेलो होतो . त्यातले काही फोटो इथे आहेत http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/

In reply to by कंजूस

प्रचेतस Mon, 05/19/2014 - 08:51
धन्यवाद कंजूसराव. बदामी, हंपी, ऐहोळेला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जायचा विचार आहे. मिपाकरांबरोबर भ्रमंती आखण्यास नक्कीच आवडेल.

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 09:28
१८ ऑक्टोबर पासून २८ ऑक्टोबर पर्यंत भारतात आहे.... त्याच वेळेत असेल तर आपण नक्की येणार... त्यातून ह्या ट्रिपला वल्ली साहेब, असतील तर हमखास.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस Mon, 05/19/2014 - 14:15
सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र दसरा आणि १८ ऑक्टो ते २८ दिवाळीमुळे कर्नाटकाची रेल्वेची तिकीटे मिळणे अंमळ कठीणच .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 15:02
मेलो...ठार मेलो... बायको लुटणार आणि आम्ही मिपाकरांच्या बरोबर सहलीला पण मुकणार.. (ऐन दिवाळीत घराबाहेर ते पण डोंबोलीत असतांना, अशक्य..कुछ तो तोड़गा निकालनाच पडेंगा.)

इरसाल Mon, 05/19/2014 - 10:01
तुम्हाला कोणत्या संस्थेबरोबर जायचे नसेल तर कर्जत रेल्वे स्थानका वर उतरा, दगड्याकडचे वडे चेपा नंतर कर्जत-आंबिवली एस्टी पकडुन थेट आंबिवली. तिथुन पेठचा किल्ला चढायचा पेठ गावात पुर्वी छान कलाकंद व पनीर सदृश्य पदार्थ मिळायचा सध्याचे माहित नाही. किल्ला परत उतरल्या नंतर जोर शिल्लक असेल तर मग आंबिवली गावाच्य जरासेच पुढे असणार्‍या बौद्ध कालीन लेण्या बघुन यायचे.पुन्हा आंबिवली-कर्जत मग कर्जत वरुन इकडे-तिकडे जायला लोकल हैतच.

पेठच्या किल्ल्यावर गेलात तर वरच्या पेठवाडी मध्ये (किल्ल्याच्या पायथ्याच्या) उत्कृष्ट खवा मिळतो.. जरूर आणावा.. ही पेठवाडी भेसळविरहीत आणी टिकाऊ खव्यासाठी प्रसिद्ध आहे आणी इथला खवा पुर्वी कल्याण/मुंबईला विकावयास यायचा...अगदी न चुकवण्यासारखी गोष्ट..

In reply to by स्वच्छंदी_मनोज

मुक्त विहारि Tue, 05/20/2014 - 22:15
मनोज भाऊ, तुमचे-आमचे जमणार बघा.हा अस्सा इतकुसा डोंगर चढायचा आणि खवा आणायचा.आम्ही पण असेच कुठेतरी जातो आणि काय बघीतले, ह्या पेक्षा काय खाल्ले, तेच लक्षांत राहते. बादवे, हा खवा, गुलाबजाम साठी की पेढ्यांसाठी? वरील प्रश्र्नाचा आणि "वडगांव, म्हणजे पुणे जिल्ह्यातील की नगर?" ह्याचा काही संबंध नाही.

दिपक.कुवेत Wed, 05/21/2014 - 11:55
पावसाळा होईस्त हे असले धागे काढु तर नयेच शीवाय जाउन आल्यावर त्याचे रसभरीत वर्णन पण ईथे प्रकाशीत करु नये. ईथे उन्हाने जीव कासावीस होतोय!!! च्या मारी तुम्हि पावसात येथेच्छ भीजणार आणि आम्हि ईथे उन्हात.....ये नॉ चॉलबे! आणि ट्रेक केलेच तर त्या मुविंना अजीबात नेउ नका. ईतकं रसभरीत वर्णन करतात कि जीवाचं पाणी पाणी होतं.

In reply to by दिपक.कुवेत

भाते गुरुवार, 05/29/2014 - 12:05
आता समजलं ना कसा त्रास होतो ते. सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये बसुन तुमच्यासारख्या बल्लव आणि सुगरिणींच्या सचित्र पाकृ वाचताना आम्हाला सुध्दा असाच त्रास होतो. म्हणुनच तर मी सारखा पाकृचे धागे विकांताला टाकत जा म्हणुन बोंबलत असतो.

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 19:44
तुम बसो बोंबलत... हमरा ट्रेक नक्की हो गयेला हय. हम जायेंगा और खायेंगा-पियेंगा. तुम वो सुकट घाल के वांगी की भाजी बनावता हय, तो हमको भी ऐसाच होता हय. तुम्हारे इस जलजल पर, मोगँबो खूष हुवा.

सुहास झेले गुरुवार, 05/29/2014 - 00:42
हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, माहुली, सुधागड विकांतात नकोसे असतात... प्रचंड प्रमाणात गर्दी असते. काही वेगळे पर्याय बघा. वसई/नाशिक रेंजसुद्धा मस्त आहे. काही पर्याय सुचवतो.. १. सरसगड (पाली) . २. कामण दुर्ग (वसई) - प्रचंड पायपीट, हमखास चकवा लागणारी... टेहळणी किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या टाक्याच आहेत गडावर, पण फुलांची रास पसरलेले तीन डोंगर चढून मग उतरून पोचावे लागते ;-) . ==== . ==== . ३. सागरगड (पेण - अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून ७ किमी. अलीकडे खंडाळे गावातून गडावर जायला सोपी वाट आहे... फारसा इतिहास ज्ञात नसला तरी पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. गडाच्या माथ्यावरून समुद्रातील हालचाली स्पष्ट दिसत असल्याने गडाला नक्कीच बरेच महत्व) . ४. अवचितगड (रोहा) - साक्षात रायगड परिसरातील सुरक्षाभिंत म्हणून ओळखला जाणारा किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी पिंगळसई, मेढा किंवा पेंडसे गावातून मार्ग आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोह्याला उतरून पिंगळसई किंवा मेढासाठी एसटी किंवा रिक्षा मिळते. चढाई एकदम सोप्पी. ५. रतनगड (रतनवाडी) - इथेही गर्दी असतेच विकांतात, पण प्रचंड घनदाट जंगल आणि भरपावसात कितीही वेळा करायला आवडेल असा ट्रेक (रोप आवश्यक) . ६. किल्ले असावा… - बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. तिथून पुढे किल्ल्याला जाणारी वाट आहे. . ७. किल्ले कोहोज - पालघरपासून एसटीने ३० मिनिटांचा प्रवास. हया गडावर जाण्याचे तीन मार्ग आहे, एक नाणे गावातुन दुसरा अंबीत गावातुन तर तिसरा वाघोटे फाट्याजवळून . ८. किल्ले तांदुळवाडी - सफाळेहून तांदूळवाडी बेस व्हिलेज . ९. अशेरीगड - पालघरहून महामार्गाने १० किमी अंतरावर खोडकोना गाव (बेस व्हिलेज) . १०. किल्ले सिंदोळा - कल्याणहून अहमदनगरला जाणारी बस पकडून खुबी फाट्याला उतरावे. तिथे मारुती मंदिराच्या बाजूने ट्रेक रूट सुरु. इथून हरिश्चंद्रगडावरपण जाता येते.. . तूर्तास इतकेच ;-) वसई परिसरात श्रीदत्त राऊत यांच्या सोबत काही ट्रेक्स ठरवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अनेक लहान-मोठे अपरिचित किल्ले दोन अडीच दिवसात बघता येतील. सांगेनच ठरल्यावर :)

In reply to by सुहास झेले

शिद Fri, 05/30/2014 - 17:59
बोईसर-पालघर हा माझ्या गावचा परीसर पण तुम्ही वरील दिलेल्या बर्‍यांच ठीकाणी कधी जाणं झालं नाही. धन्यवाद, तुमच्यामुळे नविन ठीकाणांची माहीती कळली.

In reply to by शिद

सुहास झेले Fri, 05/30/2014 - 23:18
वसई ते बोईसर परिसरात जवळजवळ १४०-१४५ लहान मोठे किल्ले आहेत, ज्यातल्या ४८-४९ची नोंद पुरातत्व खात्याकडे आहे आणि त्यातील फक्त दोन किल्ले ते सांभाळतात. :-| तुमचा ईमेल आयडी व्यनि करून ठेवा. अडीच दिवसांची मोहीम ठरतेय, सांगेन ठरल्यावर...

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 08:20
सुहास झेले ,दहा ट्रेकची माहिती आवडली . माझा प्लान असा आहे :- १)दरवर्षी एकदा /दोनदा नियमित पावसाळयात /हिवाळ्यात भिमाशंकर करणे . २)मुबईकडचे कर्जत-खांडस मार्गे वर येतील .पुण्याकडचे राजगुरूनगर कडून गुप्त भिमाशंकर मार्गे येतील . ३)पुण्याकडचे फारसे चालू न शकणारे बसने अकरा वाजता येतील आणि वरती सोपा गुप्त भिमाशंकर अथवा हनुमानतळे करतील .परत बसने जातील . बसप्रवासामुळे सर्व साधनसामग्री आणणे सोपे जाते .कोणीही येऊ शकतो .न आवडल्यास परत त्याच दिवशी तीन आणि पाच वाजताची बस आहे . ४)एक दिवस मुकाम डबेवाले धर्मशाळा ,हॉल ,खोल्या आणि टॉइलट आहे .माझा अनुभव चांगला आहे . ५)पुण्याकडून बस तिकिट ,राहाणे ,नाश्ता २दा,चहा ,जेवण १दा धरून रुपये साडेचारशे पर्यँत खर्च होतो . ६)कर्जतकडून रुपये तिनशे . कसे वाटते अभिप्राय द्या

In reply to by कंजूस

सुहास झेले गुरुवार, 05/29/2014 - 09:46
भीमाशंकर जबरीच आहे, पण गर्दी असली की तिथे जायचा कंटाळा येतो. पण एकदा तरी शिडीच्या वाटेने करायचा आहे... तीच एक वाट राहिली आहे. तिथून गर्दी कमी असते, पण रोपची गरज लागते काही ठिकाणी.... :)

सुधीर जी गुरुवार, 05/29/2014 - 10:58
पण रोपची गरज लागते काही ठिका>> नाहि आता भिमाशंकर शिडि घाटाने जाताना रोप चि गरज लागत नाहि. अवगड जागि लोखंडि शिडि लावलेलि आहे. मि गेलि ५ वष भिमाशंकर करतो आहे जुले महिना एकदम बेस्ट आहे भिमाशंकर ट्रकिंग साठि

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 11:17
मुवि एक दिवसात होते की भिमाशंकर पण कर्जत टरेकिंग नाही .पुण्याहून बसने गेल्यास आणि पुण्याला परत असे केल्यास अकरा ते पाच इतका वेळ वरती हाताशी मिळतो .कार केल्यास आणखी दोन तास मिळतात . सुहास ,मी कधी शनी रवी जात नाही त्यामुळे त्रास होत नाही .आठ दहावेळा भि० ला गेलो आहे पण एकदाही शिडीच्या वाटेने मला गाववाल्यांनी जाऊ दिले नाही .तसा एक तासाचाच फरक पडतो आणि तिकडे पक्षी दिसत नाहीत . यावर्षी १२जुलै ते २५ ऑगस्ट गर्दी असेल . मी बहुतेक बुध ४ जूनला जाणार आह .

स्पार्टाकस Sat, 05/31/2014 - 12:06
बाराही महीने करण्याजोगा एक भन्नाट ट्रेक म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळचा हरिहर. याला असलेली उभीच्या उभी दगडी शिडी खाचेत हात घालून चढून जाणं, विशेषतः पावसाळ्यात हा एक थरारक अनुभव असतो. मुंबई / नाशीकहून एक दिवसात होणारा ट्रेक आहे हा. H01

ह्या वीकेन्डला (८ जुन २०१४) मस्त टेल्को लेक पी-एम-आआयाणि पी-सी-एम-सी ग्रूपसोबतभ्रमंती आणि पक्षी निरिक्षण झाले ... संध्याकाळी मिपाकरांसोबत मस्त खादाडी ( काय पराठे होते राव ! लय भारी !!) आता पुढच्या वीकेन्डचा १४-१५ जुन चा काय प्लॅन ? पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? की वेरुळला जाऊन यायचे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Mon, 06/09/2014 - 17:07
>>पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? हरिश्चंद्रगड पाऊस उलटून गेल्यानंतर मस्त ऑप्शन वाटला मला. पण बघा कसं काय ते!!

In reply to by प्रचेतस

मग एका दिवसात भाजे कार्ला केव्ह्ज करु ... जरा पाऊस वगैरे पडला तर मग राजमाची किंव्वा लोहगड करता येइल का? आणि बाकी कोणीच इन्टरेस्टेड नाहीये का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Fri, 06/13/2014 - 12:30
भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. राजमाचीला एक मुक्काम लागतो. लोहगड कधीही करता येईल पण पावसात केल्यास अधिक सुंदर. भाजेला जायचे तर जाऊ परत. ६.४५ च्या लोकलने निघायचे. १२.३० पर्यंत घरी परत.

हुकुमीएक्का Wed, 06/11/2014 - 22:27
ट्रेकसाठी एखादे असे ठिकाण ठरवा जिथे सर्वाना सोईस्कर होईल. मावळात 'तिकोणा',; लोणावळ्यात 'राजमाची पॉईंट', लोहगड, कोरीगड, तुंग, असे पर्याय आहेत. 'सूड' यांनी सुचवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगड देखील मस्त पर्याय आहे पण पावसाळ्यानंतरच. 'मुक्त विहारि' यांच्या म्हणण्याशी सहमत. एखादा 'फॉर्म' तयार केला पाहिजे ज्यावर ट्रेक बद्दल सर्व माहिती असेल. ट्रेकसाठी लागणारे साहित्य, आणि ट्रेक कितीपत अवघड आहे याची माहीती आधीच समजली तर अजुन छान. जेणेकरून ट्रेकला गेल्यावर काही अडचण भासणार नाही.

In reply to by हुकुमीएक्का

चौकटराजा Sun, 06/15/2014 - 07:31
ट्रेकसाठी " एखादा" फॉर्म ठेवा . असहमत. त्यापेक्षा स्वता:चा फॉर्म चांगला ठेवा . ( आम्ही फॉर्मात असताना ट्रेक केले नाहीत. आता बुवा म्हणतात आम्ही म्हातारे झालो ) .

हा अख्खा विकेन्ड निव्वळ झोपा काढण्यात गेला ... पुढच्या वेकेन्डचा काहीतरी प्लॅन करु राव ... जवळच्या जवळ तिकोना / लोहगड / विसापुर / राजमाची / सिंहगड / पुरंधर .... काहीतरी ट्रेक करुया राव ... नाहीतर मी आपला अजिंक्यतारा सज्जनगडचा ट्रेक करुन येईन म्हणतो *biggrin*

हुकुमीएक्का गुरुवार, 06/19/2014 - 01:57
नवीन कॅमेरा घेतल्यापासून सज्जनगड ला जायचा प्लॅन चालू आहे. पण अजून वेळच जुळून येत नाहीये. कोणी ठरवला सज्जनगड चा ट्रेक तर नक्की सांगा. जरूर येईन

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 03:07
कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो . कामशेत ते जांभिवली बस आहे .जांभिवली गावापासून एक किमीवर चालत कोंडेश्वर आहे .मागचा ओढा खतरनाक आहे .[हा ओलांडला तर खाली कोकणात ढाक -खांडपे-कर्जत वाट आहे] .

विअर्ड विक्स गुरुवार, 06/19/2014 - 11:33
१५ तारखेला तोरणा आणि बेडसे लेणीला जाऊन आलो. तोरणाला पोट भरून जांभळे , करवंदे नि रायवळ आंबे खाल्ले. असे उदर भरणाचेट्रेक सुचवा जरा …;)

In reply to by सूड

सुहास झेले Mon, 03/09/2015 - 15:35
ह्या भागातील बहुतेक किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एखाद दुसरे बांधकाम असावे असा अंदाज. मीही ह्याभागात जास्त फिरलेलो नाही. श्रीदत्त राऊत सोबत आहेत म्हणून इथे माहिती दिली :)