Skip to main content

कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 16/05/2014 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! भाईयों और बहनो..... (सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... ) हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी. एक सहज प्लॅन डोक्यात आलाय. खूप आधी होत असेल ही पोस्ट पण आधीच तारीख ठरली की बरं पडतं बाकी कार्यक्रम काही असेल नसेल तर त्या दृष्टीने म्हणून आत्ताच धागा टाकतोय. साधारण पणे सगळ्यांना जमेल असा, छोटासा, पण निसर्गरम्य असा `पेठ चा किल्ला किंवा कोथळीगड' हा कर्जत जवळ आहे. तिथे मिपाकरांसोबत जावं असा विचार मनात आला. तसा प्रस्ताव इथं मांडतोय. जून चा तृतीय किंवा चतुर्थ शनिवार. पेठ चा किल्ला एका दिवसात अगदीच्च आरामात बघून होतो, म्हणून शनिवार; म्हणजे रविवार मोकळा सगळ्यांना. या कल्पनेबाबत, किल्ल्याबाबत, तारखेबाबत, किंवा इतरही कुठल्या बाबीसंदर्भात अनुभवी मिपाकरांचे विचार, सल्ले, कल्पना, त्यांनी द्याव्यात अशी विनंती. मी नवखा असल्याने अनुभवींच्या मताची, सहभागाची गरज आहे. आता उकाडा झालाय फार.... आणि अब की बार... :)

वाचने 21214
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

मग एका दिवसात भाजे कार्ला केव्ह्ज करु ... जरा पाऊस वगैरे पडला तर मग राजमाची किंव्वा लोहगड करता येइल का? आणि बाकी कोणीच इन्टरेस्टेड नाहीये का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. राजमाचीला एक मुक्काम लागतो. लोहगड कधीही करता येईल पण पावसात केल्यास अधिक सुंदर. भाजेला जायचे तर जाऊ परत. ६.४५ च्या लोकलने निघायचे. १२.३० पर्यंत घरी परत.

ट्रेकसाठी एखादे असे ठिकाण ठरवा जिथे सर्वाना सोईस्कर होईल. मावळात 'तिकोणा',; लोणावळ्यात 'राजमाची पॉईंट', लोहगड, कोरीगड, तुंग, असे पर्याय आहेत. 'सूड' यांनी सुचवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगड देखील मस्त पर्याय आहे पण पावसाळ्यानंतरच. 'मुक्त विहारि' यांच्या म्हणण्याशी सहमत. एखादा 'फॉर्म' तयार केला पाहिजे ज्यावर ट्रेक बद्दल सर्व माहिती असेल. ट्रेकसाठी लागणारे साहित्य, आणि ट्रेक कितीपत अवघड आहे याची माहीती आधीच समजली तर अजुन छान. जेणेकरून ट्रेकला गेल्यावर काही अडचण भासणार नाही.

In reply to by हुकुमीएक्का

ट्रेकसाठी " एखादा" फॉर्म ठेवा . असहमत. त्यापेक्षा स्वता:चा फॉर्म चांगला ठेवा . ( आम्ही फॉर्मात असताना ट्रेक केले नाहीत. आता बुवा म्हणतात आम्ही म्हातारे झालो ) .

हा अख्खा विकेन्ड निव्वळ झोपा काढण्यात गेला ... पुढच्या वेकेन्डचा काहीतरी प्लॅन करु राव ... जवळच्या जवळ तिकोना / लोहगड / विसापुर / राजमाची / सिंहगड / पुरंधर .... काहीतरी ट्रेक करुया राव ... नाहीतर मी आपला अजिंक्यतारा सज्जनगडचा ट्रेक करुन येईन म्हणतो *biggrin*

नवीन कॅमेरा घेतल्यापासून सज्जनगड ला जायचा प्लॅन चालू आहे. पण अजून वेळच जुळून येत नाहीये. कोणी ठरवला सज्जनगड चा ट्रेक तर नक्की सांगा. जरूर येईन

कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो . कामशेत ते जांभिवली बस आहे .जांभिवली गावापासून एक किमीवर चालत कोंडेश्वर आहे .मागचा ओढा खतरनाक आहे .[हा ओलांडला तर खाली कोकणात ढाक -खांडपे-कर्जत वाट आहे] .

१५ तारखेला तोरणा आणि बेडसे लेणीला जाऊन आलो. तोरणाला पोट भरून जांभळे , करवंदे नि रायवळ आंबे खाल्ले. असे उदर भरणाचेट्रेक सुचवा जरा …;)

माफ करा तिकोना ला गेलेलो… चुकून तोरणा टंकले गेले…. गडाखाली पोटभर फळे फुकटात उपलब्ध आहेत…

In reply to by सूड

ह्या भागातील बहुतेक किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एखाद दुसरे बांधकाम असावे असा अंदाज. मीही ह्याभागात जास्त फिरलेलो नाही. श्रीदत्त राऊत सोबत आहेत म्हणून इथे माहिती दिली :)