Skip to main content

रूसली ही पोर ..

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 07/03/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी .. कविता कुठूनी उतार नाही कुठूनी चढाव नाही रूसली ही पोर तिच्या भावनांना वाव नाही तोच तोच दिवस रोज विसाव्याची बात नाही गंधाळिल्या मोग-याची पुन्हा तशी रात नाही साचलेल्या पाण्याला या कुठूनी प्रवाह नाही रूसली ही पोर तिच्या भावनांना वाव नाही उन्हाने जो गेला पारा आरशाला भाव नाही आठवांची सांज होई आसवांचा ठाव नाही खुलले ना शेर अता गझलेला दाद नाही हरविले शब्द तिचे तिची तिला याद नाही याद नाही दाद नाही कवितेला नांव नाही रूसली ही पोर तिच्या भावनांना वाव नाही - संध्या
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3087
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

खुलले ना शेर अता गझलेला दाद नाही हरविले शब्द तिचे तिची तिला याद नाही मस्त

कविता आवडली. 'याद' सारखा हिंदी शब्द खटकला. बाकी वृत्त 'आनंदकंद' का?

:)

जबरदस्त भाव आणि गेयता आहे. सहज चालीत गुणगुणून पाहिले, गोड वाटले.

कवितेच्या उदगमाने गेल्या दिसांची सय ग आली मधुकरांच्या गुंजारवाने आसमंता लय ग आली

'आठवांची सांज होई आसवांचा ठाव नाही' शब्दांचा खेळ एकदम मस्त. कविता आणि चित्र दोन्हीही सुंदर.

कविता. ब-याच दिवसांनी लिहीलंत? खरंच पोर रूसली होती की काय?

सर्वांचे मनापासून आभार. @चाणक्य - ही पोर सगळं रूटीनमधे चालू असेल तर रूसते, जगावेगळं आहे सगळं हिचं..