रूसली ही पोर ..
लेखनविषय:
काव्यरस
ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी ..
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेला नांव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
- संध्या
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेला नांव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
- संध्या
वाचने
3075
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पोर = कविता. बाकी हरवलेल्या
सुंदर कविता
Class !!!!!!!!!!!!!!!
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by प्रचेतस
आनंदकंद नाही. अष्टाक्षरी आहे.
(No subject)
वाहवा!
आवडली... मस्त...
एक असाही प्रतिसाद ....
In reply to एक असाही प्रतिसाद .... by चौकटराजा
व्हॉट डू यू मीन ? भुंगे ऑन
सुंदर कविता
'आठवांची सांज होई
चांगलीये
सर्वांचे मनापासून आभार.