Skip to main content

गोवंशहत्या बंदी

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 03/03/2015 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ... एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ... दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ... तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती" चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता .. त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ... आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो ...विचार करकरून एक शीण येतो :D

वाचने 45210
प्रतिक्रिया 262

प्रतिक्रिया

दीनदयाळ उपाध्याय आणि पत्रकारिता या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, ""हा नव्या पिढीचा जमाना आहे. चिंतन नव्या संदर्भात मांडले पाहिजे. मला कोणी सांगितले की गायीला नमस्कार करा, त्यात 33 कोटी देवता आहेत, तर मी म्हणेन दाखवा कोठे आहेत त्या देवता?'' गडकरी यांचे जुने स्टेटमेंट.

विचार करकरून येणारा शीण घालवायचा असेल तर फक्कडपैकी दम बिर्यानी चापा अन निवांत झोपून टाका.

गोमांसभक्षण केले आहे, कदाचित यापुढेही करीन. परंतु, आजतागायत भारतात केलेले नाही. तेव्हा सदर निर्णयाचा वैयक्तिकबाबतीत फार फरक पडू नये. मात्र भाकड गाईंबाबत कायद्यात काय तरतूदी आहेत, ते पाहणे उद्बोधक ठरावे!

उठताबसता सावरकरांचे नाव घेणाऱ्या आणि अंदमान-सेल्युलर जेल-मणीशंकर अय्यर वगैरे विषयांवरुन अनेक वर्षे आगपाखड करणाऱ्या पक्षांच्या सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेऊन सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे... या शब्दात या निर्णयाचे या ठिकाणी या माध्यमातून अभिणंदण करण्यात येताय!

In reply to by आजानुकर्ण

यानिमित्ताने मणिशंकर अय्यर बद्दल तुमचे काय मत आहे ते जाणुन घ्यायला आव्डेल (विशेषतः सावरकरांच्या अनुषंगाने). धाग्याचा तो विषय नाही हे जाणुन आहे पण संदर्भ तुम्हीच आणलेत.

In reply to by आजानुकर्ण

तो हे सर्वनाम मणीशंकरसाठी आहे सावरकरांसाठी नाही. उगीच नसत्या शंका काढण्यापूर्वी स्पष्टीकरण दिलेले बरे.

In reply to by मृत्युन्जय

मूर्खच काय देशद्रोही म्हंटल तरी चालेल..... काल ह्याच माणसाने अफझल गुरूला निरर्थक फाशी दिली गेली असे म्हंटले आहे...... ******..... आणि गोवंशहत्या बंदी बद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात गाय हि पूजनीयच आहे. त्यामुळे महाराष्ट्रापुरती हि बंदी ठेवण्यास काहीच हरकत नाही. शिवाजी महाराजांचा दाखला आपण सर्वत्र देतो तेव्हा त्यांचा हा विचारही अंमलात आणल्यास काहीच हरकत नाही......

मला स्वतःला गाय धार्मिक वगैरे काही वाटत नाही. त्या मुळे असल्या फालतू कायद्याची काहीही गरज नव्हती. भाकड गायींना कापल्यान असा काय फरक पडतो ? बाकी भूतदया म्हणून मासे, कोंबडी , बोकड यांना पण दयेचा हक्क आहे. पण एवढ्या पशुधनाचा करायचा काय ? अवांतर : आता या पापामुळे मी नरकात जाणार आणि बरेचसे मिपाकर्स तिथेच भेटणार ;)

महाराष्ट्रात गोहत्याबंदी १९७६ पासूनच आहे. त्यात आता फक्त बैल आणि वळू (गोवंश) पण आले आहेत असे दिसतयं. मला स्वतःला बिफ खावेसे कधी वाटले नाही त्यामुळे खाल्ले नाही. बाजूचा कोणी खात असेल तर मला काही फरक पडत नाही. या कायद्याचे एक संस्कृती आणि मला वाटती एकंदरीत १९४७ पासूनच घटनेनुसार गोहत्याबंदी करण्याची पावले उचलणे हा उद्देश मान्य केल्यावर एक प्रश्न पडतो... याची नक्की तातडीने गरज होती का? त्या व्यतिरीक्त राज्य सरकारने नक्की काय काय निर्णय घेतले आहेत. (मला खात्री/आशा आहे, व्यावहारीक निर्णय देखील घेतले असणार पण ते माध्यमात इतके प्रकाशात येणार नाहीत..)

In reply to by विकास

महाराष्ट्रात गोहत्याबंदी १९७६ पासूनच आहे
जरा कुठे होतकरु मंडळींचं थोडं पुरोगामी पुराण सुरु झालं कि हे आलेच मागचा-पुढचा विदा घेऊन :P छान सावरकरी संदर्भ आलाय. काहि वेळात गांधीजीपण आपली सीट पकडतील. मग शिमगा करायला हिंदुत्व, मुस्लीम धर्मांधता, आयुर्वेदाचार्य-काळा पैसा भंजक श्री श्री बाबा रामदेव प्राणायामकर इ. घटक आपापल्या घटना घेऊन सरसावतील. तेव्हढीच होळी निमीत्त करमणुक झाली असती. पण कसचं काय...छे !!

In reply to by विकास

महाराष्ट्रात गोहत्याबंदी १९७६ पासूनच आहे.
मुंबई-ठाण्यात 'बड्या'चे मटन काही भागात सर्रास मिळते. तेव्हा १९७६ पासूनच्या गोहत्याबंदीच्या अंमलबजावणीविषयी शंका येते आहे. आता त्यात वळूंची भर पडली इतकेच काय तर! थोडक्यात, सदर कायद्यानंतरही, काहींची मने समाधानाने, काहींचे खिसे पैशाने तर काहींचे पोटे 'बड्या'ने भरणार, असेच दिसते!

In reply to by विकास

विकीवरील माहिती जर बरोबर असेल तर जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब देखील ऑलमोस्ट असाच कायदा आहे.. काश्मीर मधे तर १० वर्षाचा तुरूंगवास आहे. केरळ, पूर्वांचल प्रदेश आणि तिथली राज्ये सोडली तर प्रत्येक राज्यात किमान "हत्या करण्यासाठी योग्य" म्हणजे "गाय हा उपयुक्त पशू" उरला नाही असे सर्टीफिकेट तरी लागते.

In reply to by प्रचेतस

आता महाराष्ट्रातील तमाम बैल आणि वळूंना संरक्षण मिळालेले आहे! ;)

In reply to by विकास

आता माझे पिताश्री मला पाहिजे तेव्हा बडवू शकणार नाहीत का?

In reply to by अत्रुप्त आत्मा

हो कि नै गाइज...!? नो, नो, नो. लिंगभेदभाव टाळण्यासाठी ते "हो कि नै गाइज अँड बैलाज...!?" असं असायला हवं, नै का ?

नियमीतपणे "मिपा" वाचत आहे याचा हा ढळढळीत पुरावा ! *pardon* *dance4* गोवंशाला अभय दिले गेले. जय मिपा जय मिपाकर जयहिंद जय महाराष्ट्र जय ओसाडवाडी

राज्यात सध्या ६१% चारा कमतरता आहे. भाकड जनावरे पोसन्यासाठी २०००/ महिना खर्च येतो. माय बाप सरकारने कायदा केला आहे, तर ही जबाबदारी घ्यावी. नाहितर शेतकर्याचे पुन्हा मरण.

स्वातन्त्र्याच्या वेळी भारतात ९० कोटी गाई-बैल होते आणि लोकसंख्या ३३ कोटी आज लोकसंख्या १३० कोटी असताना गाई-गुरांची संख्या २ कोटी आहे. असे का झाले? जरूर विचार व्हावा... एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुपालन-आधारित शेतीची आज अशी अवस्था का व्हावी? गोमांस भक्षकांची काळजी नको, तशी काळजी घेण्यास पाकिस्तान-अरबस्थान समर्थ आहेत . ज्याना बीफशिवाय राहवत नाही त्यानी तिकडे जाउन खावे! जय गौमाता ! जय हिन्द ! वन्दे मातरम !

In reply to by मंदार कात्रे

आजही १३० कोटी वजा काही उद्योगपती आणि राजकारणी सोडुन उरलेली गुरंढोरचं आहेत. असो. ९० कोटी नसाव्यात आणि आजही २ कोटीहुन बर्‍याचं जास्तं असाव्यात. फक्त २ कोटी गाईगुरं धरली आणि त्यातल्या निम्म्या गाईम्हशी धरल्या तर त्यांच दुध महाराष्ट्राला तरी पुरेल का?

In reply to by मंदार कात्रे

माफ करा, आकडे पुर्ण चुकिचे आहेत. आज जवळपास २० कोटी हुन जास्त फक्त गाई म्हशी आहेत. एकुन बघितले तर ५० कोटी हुन जास्त. दुवा पहावा. http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=109280 जय हिंद

In reply to by खंडेराव

तुम्ही त्यांच्या आकडेवारीवर संशय घेताय ??? देशद्रोही कुठले .. त्यांनी जय गौमाता ! जय हिन्द ! वन्दे मातरम ! हे लिहिलेले वाचले नाहीत काय.? या सगळ्यांची शप्पथ घेवून ते सांगू शकतील की ते नेहमी खर्राच विदा देतात आणि त्यांनी दिलेला विदा हा खर्राच असतो. या वेळेस माफ, पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा हो.. बादवे, कात्रेसहेब, फक्त महिष-वंशाची हत्या केली तर चालेल काय ? (कुक्कुट-वंश आणि इतर मरण्यासाठीच आहेत त्यांना तुम्ही मोजले पण नसेल तसे पण) नै म्हंजे अजून पण काय काय चालेल अन काय काय चालणार नै ते पण एकदा एका लेखात टाका राव.

अनेक देशात त्या त्या देशाच्या प्रमुख धर्माप्रमाणे, प्रथांप्रमाणे, इतिहासाप्रमाणे कायदे आहेत. त्यानुसार अनेक देशात अनेक होष्टींप्वर बंदी आहे. हा आमचा देश आहे. आम्ही गायीचं मटण निषिद्ध मानतो. त्यामुळे आमच्या देशात गायींच्या हत्येवर बंदी आहे. जिथे नाही तिथे जाऊन खावं ज्यांना हवं त्यांनी. आम्ही जगभर तर बंदी नाही ना आणली अजून?!

In reply to by वेल्लाभट

जिथे नाही तिथे जाऊन खावं ज्यांना हवं त्यांनी.
त्या पेक्षा ज्यांना खायचे नाही त्यांनी खाऊ नये असे वाक्य असते तर बरे झाले असते. आणि प्राणीजगतात एकाच प्राण्याला विशेष स्थान दिलेले अजिबात पसंत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

अहो सरकारला काही गोष्टींवर बंदी घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. उद्या काही लोक असं हि म्हणतील आम्ही ड्रग्स घेतो आणि घेणार ज्यांना नाही घ्यायचे त्यांनी घेऊ नये. ह्या विधानालाही तुम्ही समर्थन द्याल का??? महाराष्ट्रात गाय हि पूजनीय होती आणि आहे हे निर्विवाद सत्य आहे . त्यासाठीच वसुबारस नावाचा एक खास दिवस मराठी दिवसांमध्ये आहे ज्यात बायका गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतात. असे असताना तिच्या हत्येवर बंदी घातली तर काय चुकीचे केले??? गुजरात गांधीजींचे मुख्य कर्मराज्य असल्यामुळे तिथेही दारू बंदी आहेच कि......

In reply to by प्रसाद१९७१

Medicinal values of Cow urine Uses Urea : Product of protein metabolism. Strong antimicrobial agent. Uric Acid : Anti microbail activity helps to control cancer. Nitrogen : Diuretic, stimulates kidney Sulphur : Purifies blood, increases intestinal peristalsis Copper : Controls fat deposition Iron : Production of RBC in blood Sodium : Purifies blood, checks hyperacidity Potassium : Appetizer, eliminates muscles fatigue Other salts : Antibacterial, prevents comma and ketoacids Carbolic Acid : Antibacterial, prevents gas gangrenes Ammonia : Integrity of body tissue and blood Sugar-Lactose : Heart, thirst, giddiness Creatinine : Antibacterial Swarna Kshar : Antibacterial, improves immunity (aurum hydroxide) acts as antidote Enzyme-urokinase : Dissolve blood clot, improves heart disease, blood circulation Colony stimulating factor : Effective for cell division and multiplication Erythropoietin stimulating factor : Production of RBCs Gonadotropin : Promotes menstrual cycle, sperm production Kallikrein : Releases Kallidin which expands peripheral veins and reduces blood pressure. Allantoin : Heals wounds and tumors Anticancer substances : Prevents multiplication of carcinogenic cells Phenols : Bactericidal, antifungal गायीचे दूध - हे सर्वश्रेष्ठ आहार मानले गेले आहे. आईच्या दुधाला पर्याय फक्त गायीचे दूधच आहे. गायीच्या दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅरोटीन नावाचे तत्त्व असते, ज्याचे पुढे व्हिटॅमीन ‘ए’ मध्ये रूपांतरण होते. अन्य दुधामध्ये कॅरोटीन खूप कमी आढळते. गायीच्या दूधामुळे मेंदूच्या शक्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते. अन्य दुधांच्या तुलनेत फॅट व कोलेस्टेरॉलचे प्रमाणसुद्धा गायीच्या दुधात खूप कमी असते. शेण- एकाचा कचरा दुसऱ्याचे पोषक द्रव्य, या नियमाप्रमाणे खत म्हणून याचा उपयोग होतो. शेण अथवा राखेमुळे किरणोत्सर्गापासून संरक्षण होते म्हणून शेणाने घर किंवा भिंती सारवतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार शेणाइतके चांगले जंतुनाशक असू शकत नाही. शेण जाळल्यावर होणाऱ्या धुरामुळे विषारी जंतू नष्ट होतात व वातावरणाची शुद्धी होते. शेणामध्ये नायट्रोजन, स्फुरद व पोटॅश असते. शेण व गोमूत्र यापासून निर्माण होणाऱ्या खत व औषधामुळे जमिनीचा पोत सुधारतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्वात मोठा फायदा शेणामुळे बायोगॅस चालतो व बायोगॅसमधून ६७ टक्के मिथेन वायू मिळतो. वरील माहिती 'आ. जा' वरून साभार, अंधश्रद्धा असू नये, पण श्रद्धा असायला हरकत नसावी, आणि थोडे अवांतर ज्या जीवांनी (आपले आई वडील पण आले) त्यांच्या उमेदीच्या काळात आपल्याला, आपल्या कुटुंबाला मदत केली त्यांना कमी उपयोगाचे किवा निरुपयोगी झाल्यावर बाजूला सारणे कितपत योग्य ?

In reply to by आकाश कंदील

शेण अथवा राखेमुळे किरणोत्सर्गापासून संरक्षण होते
वरील माहिती 'आ. जा' वरून साभार, आंजावर लिहिलेले सारेच खरे (सत्य) असते असा तुमचा समज आहे का??

In reply to by आकाश कंदील

Uses Urea : Product of protein metabolism. Strong antimicrobial agent. Uric Acid : Anti microbail activity helps to control cancer. Nitrogen : Diuretic, stimulates kidney Sulphur : Purifies blood, increases intestinal peristalsis Copper : Controls fat deposition Iron : Production of RBC in blood Sodium : Purifies blood, checks hyperacidity Potassium : Appetizer, eliminates muscles fatigue Other salts : Antibacterial, prevents comma and ketoacids Carbolic Acid : Antibacterial, prevents gas gangrenes Ammonia : Integrity of body tissue and blood Sugar-Lactose : Heart, thirst, giddiness Creatinine : Antibacterial Swarna Kshar : Antibacterial, improves immunity (aurum hydroxide) acts as antidote Enzyme-urokinase : Dissolve blood clot, improves heart disease, blood circulation Colony stimulating factor : Effective for cell division and multiplication Erythropoietin stimulating factor : Production of RBCs Gonadotropin : Promotes menstrual cycle, sperm production Kallikrein : Releases Kallidin which expands peripheral veins and reduces blood pressure. Allantoin : Heals wounds and tumors Anticancer substances : Prevents multiplication of carcinogenic cells Phenols : Bactericidal, antifungal>> हेच सगळे पदार्थं शेळ्या मेंढ्यांपासून माणसांपर्यंत प्रत्येक सस्तन प्राण्याच्या मूत्रात असतात. गाईत काय ब्वॉ विश्शेष?

In reply to by वेल्लाभट

:-) काय सांगताय! कधी केरळात जाउन या. आणि नॉर्थ ईस्ट ला सुध्दा. खुप लोक आहेत या देशात. तुम्हि, महाराश्ट्र देश तर म्हनत नाही आहात ना? बाकी, रस्त्यावर फिरणार्या गाईचेही काही करा.

In reply to by खंडेराव

पूर्वी तर ह्या देशाची जनता ( ब्राह्मण धरुन ) खायचे म्हणे गोमास. ह्यात तथ्य असेल तर कुठल्या परंपरे विषयी चर्चा चालू आहे?

गोवंशहत्या बंदी बद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात गाय हि पूजनीयच आहे. त्यामुळे महाराष्ट्रापुरती हि बंदी ठेवण्यास काहीच हरकत नाही. शिवाजी महाराजांचा दाखला आपण सर्वत्र देतो तेव्हा त्यांचा हा विचारही अंमलात आणल्यास काहीच हरकत नाही......

.. कांदा लसूण पोर्क मद्य ..या गोष्टींवर ठराविक धर्माला /पंथाला निषिद्ध म्हणून सरसकट बंदी आल्यास काय मत असेल? सर्वांना आहे प्रश्न. आणि अशी मागणी झाल्यास कोणत्या न्यायाने नाकारायची?

In reply to by गवि

गाय आमच्यासाठी पूज्य आहे म्हणून तिला मारणे त्याज्य करण्याला आम्ही समर्थन करतो. बाकी तुम्ही ज्या गोष्टी बोललात त्या एखाद्या धर्मात वा पंथात पूज्य नाहीत.... तुम्ही एखाद्या गोष्टीवर अथवा जीवावर प्रेम करता त्याला हानी झालेली तुम्हाला नक्कीच पटणार नाही......

In reply to by गवि

कांदा लसूण पोर्क मद्य या गोष्टींवर ठराविक धर्माला /पंथाला निषिद्ध म्हणून सरसकट बंदी आल्यास काय मत असेल? सजीव आणि निर्जीव यात थोडे अंतर करावे, थोडे अवांतर ज्या जीवांनी (आपले आई वडील पण आले) त्यांच्या उमेदीच्या काळात आपल्याला, आपल्या कुटुंबाला मदत केली त्यांना कमी उपयोगाचे किवा निरुपयोगी झाल्यावर बाजूला सारणे कितपत योग्य ?

मला तर बै तो पीके आठवला. गाईवर देवाचा शिक्का म्हणुन गाय मारायची नाही. पण गाय मारुन खाणारे आता इतर प्राणी खातील ! माणसांची गोमाता आता इतर प्राण्यांच्या मृत्युला कारणीभुत ठरेल. धन्य तो धर्म अन धन्य ती गोमाता ! काल पाउस पडला तो पाउसच होता की सावरकरांचे अश्रू ?

In reply to by hitesh

मला सावरकरांनी असे कुठे म्हटले आहे हे वाचायची वा ऐकायची फार इच्छा झाली आहे जरा सांगता का कुठे आहे ते ????

In reply to by निनाद जोशी

ह्या पुस्तकात श्री पु गोखले ह्यांनी उल्लेख केला आहे असे वाटते ... भारताला अन्नधान्याची कमी असली तरी एक नैसर्गिक शेत १२ महिने उपलब्ध आहे ते म्हणजे आपला सागर किनारा ... लोकांनी भरपूर मासे खाल्ले तर आपली अन्नधान्याची चणचण कमी होईल अशा अर्थाचे संवाद आहेत ... त्यातच पुढे गाय हा एक उपयुक्त पशू आहे असाही उल्लेख असावा असे वाटते (निश्चित करण्यासाठी पुन:परिशीलन करावे लागेल)

In reply to by अत्रन्गि पाउस

हा उल्लेख गायीकडून मिळणारे दुध ह्या संदर्भातही असू शकतो. ते हि अन्नधान्यास पूरकच आहे. ह्याचा अर्थ थेट गोमांसाशी जोडला जाऊ शकत नाही....

In reply to by hitesh

धर्मांतरचं कुठपर्यन्त आलयं ?

In reply to by इरसाल

कुठून कुठल्या धर्मांतराविषयी आहे त्यावर आहे उत्तर :)

In reply to by hitesh

माणसांची गोमाता आता इतर प्राण्यांच्या मृत्युला कारणीभुत ठरेल. धन्य तो धर्म अन धन्य ती गोमाता ! काही धर्मातले लोक डुक्कर निषिद्ध मानतात आणि त्यामुळे खात नाहित. त्यामुळे माणसे इतर प्राणी खातात. या धर्मांच्या माणसांमुळे आणि डुक्करांमुळे इतर प्राणी मारतात. धन्य ते धर्म आणि धन्य ती डुक्करे. दरवर्षी पडणारा पाऊस हा पाऊसच असतो की प्रेषिताचे अश्रु?