Skip to main content

गोवंशहत्या बंदी

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 03/03/2015 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ... एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ... दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ... तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती" चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता .. त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ... आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो ...विचार करकरून एक शीण येतो :D

वाचने 45210
प्रतिक्रिया 262

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

डुक्कर निषिद्ध मानणारे इतराना तुम्हीही खाऊ नका असे सांगत नाहीत. गाय न खाणारे स्वतः खात नाहीत... पण आम्हाला गाय पूज्य आहे म्हणुन बाकीही कुणी गाय खायचीच नाही अशी इतरांवर सक्ती करतात व याला ते देशप्रेम म्हणतात.

In reply to by hitesh

पाकिस्तान किंवा तत्सम देशात पोर्क मिळते का हो ? आणि तिथेही ते आम्ही खात नै पण तुम्ही खा ..अगदी पोटभर खा असे सांगतात का ??

In reply to by संदीप डांगे

डुक्कर निषिद्ध मानणारे इतराना तुम्हीही खाऊ नका हे इतरांना सांगणे
...हे कुठे तर जिथे हे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही तिथे ...पण जिथे शक्य आहे उदा पाकिस्तान तिथे काय परिस्थिती आहे ?

In reply to by अत्रन्गि पाउस

कळाले नाही. पाकिस्तान हे फेलड स्टेट आहे. तिथे काय शक्य आहे?

In reply to by खंडेराव

फेल्ड स्टेट म्हणून विषयाला बगल देऊ पहाता का? त्यांना डुक्कर निषिद्ध आहे. मग म्हणून तिथे 'इतरांना' ते मिळतं का कापायला खायला? सांगा!

In reply to by संदीप डांगे

इथे कुठेच नाही आला. तो भारताच्या शेजारी येतो. काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात वगैरे राज्यांना लागुन. थोडे गुगलुन बघितले तर नकाशा मिळेल.

In reply to by hitesh

काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु देखील कोणाला गाय खाऊ नका म्हणुन नाही सांगत. पण मला हे समजुन घ्यायला नक्कीच आवडेल की पाकिस्तान आणि सौदीत डुक्करे मारुन खायला परवानगी आहे का? नाही तिथली सरकारे मुस्लिम सरकारे आहेत म्हणजे कायदे मुस्लिमच करतात म्हणुन विचारले.

In reply to by मृत्युन्जय

आपले सरकार हिंदु सरकार आहे का? दुबई, जे सगळ्यात प्रगत आहे आहे सौदीत, तिथे पोर्क मिळते. Israel मधे मिळते. ज्यु धर्मात पोर्क खाल्ले जात नाही.

In reply to by खंडेराव

सौदी आणि दुबई एकच? मी दुबईत बायकांना सर्रास मिनिस्कर्ट घातलेले बघितले आहे. स्विमसुटही (रस्त्यावर नाही हा). सौदी मध्ये बुरखा काढला तरी फटके बसतात म्हणे. हे म्हणजे सोमालिया आणि सोमनाथ एकच म्हटल्यासारखे आहे. चालु द्यात.

In reply to by खंडेराव

ओक्के ... हेच विचारायचे होते ..धन्यवाद बाकी सौदी / पाकिस्तान बाबत (कुणा कडूनही) उत्तराच्या अपेक्षेत

In reply to by अत्रन्गि पाउस

कतार मधे पोर्क मिळते. २०११ च्या आधी पुर्णपणे बंदी होती. आताही कतार डीस्ट्रीब्युशन कंपनी या एकाच कंपनी मार्फत मिळते. तेच लोक फक्त घरच्या घरीच प्राशनासाठी अल्कोहोलही विकतात. एक परमिट घ्यावे लागते अल्कोहोल खरेदीसाठी. पोर्क फक्त एक्स्पॅट कम्युनिटिलाच विकत घेता येते, कतार्‍यांना नाही. घरच्या घरीच प्राशनासाठी याचा अर्थ ईथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशनास बंदी आहे. मद्य विकत घ्यायचे आणि डायरेक घरीच जायचे. अलोहोलबाबत शुन्य सहनशक्ती आहे. मधेच कोणीतरी बीचवर बिकीनी काढली होती...तर हो, हो, हो...त्रिवार हो. बीचवर बिकीनी आणि मॉलमधे मिनी घातलेली चालते. बिचवर सुर्यस्नानही करतात लोक. सौदी अरेबियात काही बदल घडण्याची शक्यता नाही. तरिही तिथे अमेरिकन बेसवर सगळी मज्जानू लाईफ आहे. पोर्क काय..दारु काय..ज्ये पायजे ते!!

In reply to by खंडेराव

तेच तर म्हणतो ना. आपले सरकार हिंदु नाही. त्यामुळेच या कायद्याला धार्मिक रंग द्यायचा आणि हे सगळे हिंदुंनी केले म्हणुन उर बडवायचा यात काय हशील?

In reply to by मृत्युन्जय

भारत हा धर्मनिरपक्ष देश आहे. इथे प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे खाण्यापिण्याचा हक्क ज्याला त्याला आहे. कायदा काय म्हणतो आहे आणि तुम्ही त्याला धार्मिक रंग का देत आहात? तुम्हाला मुस्लिम राष्ट्रांचा आदर्श ठेवायचा आहे का? बाकी हे बरे असते हो लोकांचे, सोयिस्करपणे कधी अमेरिका, युरोपकडे बघा म्हणतात तर कधी अरब राष्ट्रांकडे बघा म्हणतात. आपला आपण स्वयंभू विचार कधी करणार आहेत देव जाणे.

In reply to by संदीप डांगे

१ डुक्कर खाणारे इतरांना तुम्ही डुक्कर खाऊ नका असे म्हणत नाहीत ह्या विधानावर प्रश्न आहे कि २ सौदी / पाकिस्तान मध्ये डुक्कर मारून खाने चालते का ? २ चे उत्तर होय असेल तर १ चे विधान खरे आहे ... २ चे उत्तर नाही असेल तर १ विधान (अप्रत्यक्ष रित्या) खोटे ठरते डुक्कर न खाणार्या लोकांनी इंग्लंड अमेरिका युरोपात लोकांना "तुम्ही डुक्कर खाऊ नका हे सांगणेच त्यांना शक्य नाही"

In reply to by अत्रन्गि पाउस

तुमच्या या प्रतिसादाचा एकूण गोवंशहत्याबंदी आणि भारतदेशातल्या नागरिकांच्या खाण्यापिण्याचे मूलभूत स्वातंत्र्य यांचा काय संबंध आहे जरा इस्कटून सांगता काय? विषयाशी थेट संबंध नसलेली कोडी सोडवण्यात आमची बुद्धी काम करत नाही. क्षमस्व.

In reply to by मृत्युन्जय

धार्मिक रंग सिले़क्टीवली हितेशने दिला आहे का? धन्यवाद. इतर सर्वजण गायींचे निर्णयस्वातंत्र्य आणि माणुसकी यावरच चर्चा करत आहेत तर. त्यामुळेच कदाचित याच धाग्यावर मी जे दहा प्रश्न दिले आहेत त्यावर अजूनही काही उत्तर नाही आले जाणकारांकडून. गवि, कपिलमुनि, बॅटमॅन, प्रसाद यांच्या सडेतोड प्रतिसादावर तुमच्याकडे काही उत्तर नाही. का? सोयीस्करपणे डुक्कर हेच मांसाहाराचे प्रतिक बनवत आहेत असे का? गायींच्या कत्तलीबद्दल दांभिक पुळका येणार्‍यांना इतर प्राणी हेही गायींप्रमाणे सजिव आहेत त्यांच्या कत्तलीबाबत काही वाटत नाही, असे का? गोवंशहत्याबंदी कायद्याने आता मुसलमानांना बिफ खायला मिळणार नाही, त्यांची कशी गोची केली असा आणि फक्त एवढाच आसुरी आनंद मिळवू पाहणार्‍यांच्या मनात खरंच गायीबद्दल प्रेम आहे? बादवे, तसे असेल तर या सोकॉल्ड हिंदूंनी सर्वप्रथम गायीचे दूध पिणे बंद केले तर गायींवर जिवंतपणी होणारे अत्याचार ताबडतोब बंद होतील. दूधासाठी गायी कुणी पाळणारच नाही, त्यामुळे त्या भाकड होण्याचा संबंध नाही, खाटकाकडे जाण्याचाही. गायींबाबत हिंदूंचे प्रेम तेवढेच बेगडी आणि खोटे आहे जेवढे पिंजर्‍यांमधे पक्षी पाळणार्‍या पक्षीमित्राचे, कुत्र्यांना गळ्यात पट्टा घालून फिरवणार्‍या श्वानप्रेमींचे. तसेच, गंगाधर मुंटेंच्या कवितेलाही अजून कुणा हिंदूपरंपराभिमानीने उत्तर दिलेले नाही.

In reply to by संदीप डांगे

धार्मिक रंग सिले़क्टीवली हितेशने दिला आहे का? धन्यवाद. हो. धन्यवाद इतर सर्वजण गायींचे निर्णयस्वातंत्र्य आणि माणुसकी यावरच चर्चा करत आहेत तर. त्यामुळेच कदाचित याच धाग्यावर मी जे दहा प्रश्न दिले आहेत त्यावर अजूनही काही उत्तर नाही आले जाणकारांकडून. मी प्रत्येकाच्या प्रतिसादाला प्रतिवाद करायला बांधील नाही. दांभिक आणि ढोंगी लोकांचा बुरखा फाडायची संधी मिळाली. त्यामुळे प्रतिसाद दिला. अजुन बाकीच्या मुद्द्यांवर मी काहीच प्रतिवाद केलेला नाही. तसे असताना तुम्ही या विषयावर माझ्यावर नसते आरोप / प्रतिसाद अपेक्षा का करत आहात? गवि, कपिलमुनि, बॅटमॅन, प्रसाद यांच्या सडेतोड प्रतिसादावर तुमच्याकडे काही उत्तर नाही. का? त्यांच्या प्रतिसादाशी मी सहमत / असहमत आहे असे कुठलेही विधान अजुन केलेले नाही. ते आपल्या प्रतिसादांशी प्रामाणिक असतात. त्यांचे प्रतिसाद हिंदु विरुद्ध उर बडवणारे नव्हते. त्यांचे प्रतिसाद धार्मिक रंग देणारे नव्हते. मी कुठल्या प्रतिसादांना प्रतिवाद केला आहे ते तर बघा आधी. तुम्ही सिलेक्टिव्ह रित्या ऊर बडवुन घेत आहात. माझा नाईलाज आहे. सोयीस्करपणे डुक्कर हेच मांसाहाराचे प्रतिक बनवत आहेत असे का? गायींच्या कत्तलीबद्दल दांभिक पुळका येणार्‍यांना इतर प्राणी हेही गायींप्रमाणे सजिव आहेत त्यांच्या कत्तलीबाबत काही वाटत नाही, असे का? मी शुद्ध शाकाहारी आहे. माझ्याच्याने कुठल्याही प्राण्याला मारवणार नाही (त्याच्यामुळे मला अपाय होणार नसेल तर) गोवंशहत्याबंदी कायद्याने आता मुसलमानांना बिफ खायला मिळणार नाही, त्यांची कशी गोची केली असा आणि फक्त एवढाच आसुरी आनंद मिळवू पाहणार्‍यांच्या मनात खरंच गायीबद्दल प्रेम आहे? असा आनंद ज्यांना झालेला आहे त्यांना हा प्रश्न विचारा. माझ्या मुद्द्यांवर तुमच्याकडे आणी हितेश चिच्चांकडे प्रतिवास नसल्याने तुम्ही भलतेच मुद्दे घुसडता आहात. माझ्या प्रतिसादावार तेवढ्याच मुद्द्यांवर प्रतिवाद करावा. बाकी मुद्यांसाठी वेगळी गल्ली शोधावी ही नम्र विनंती. बादवे, तसे असेल तर या सोकॉल्ड हिंदूंनी सर्वप्रथम गायीचे दूध पिणे बंद केले तर गायींवर जिवंतपणी होणारे अत्याचार ताबडतोब बंद होतील. दूधासाठी गायी कुणी पाळणारच नाही, त्यामुळे त्या भाकड होण्याचा संबंध नाही, खाटकाकडे जाण्याचाही. वरीलप्रमाणे गायींबाबत हिंदूंचे प्रेम तेवढेच बेगडी आणि खोटे आहे जेवढे पिंजर्‍यांमधे पक्षी पाळणार्‍या पक्षीमित्राचे, कुत्र्यांना गळ्यात पट्टा घालून फिरवणार्‍या श्वानप्रेमींचे. वरीलप्रमाणे तसेच, गंगाधर मुंटेंच्या कवितेलाही अजून कुणा हिंदूपरंपराभिमानीने उत्तर दिलेले नाही. वरीलप्रमाणे

In reply to by मृत्युन्जय

मृत्युंजयजी, वेगवेगळ्या प्रतिसादांच्या गोंधळात काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझ्या प्रतिसादावर अत्रंगी यांनी प्रतिसाद दिला त्यावर त्यांना मी उपप्रतिसाद दिला, त्या उपप्रतिसादावर वर तुमचा हितेशचाचा वाला प्रतिसाद आला, त्यावर मी प्रतिसाद दिला तर तुमचे हे उत्तर. लोच्या है भै... जरा नीट वाचले पाहिजे नेमका गोंधळ कुठे झाला ते...

In reply to by बॅटमॅन

द्विशतक निमीत्त धागाकरते आणी समस्त मिपाकरांचा सत्कार एक -एक प्लेट करंभ,परिवाप आणी पुरोडाश देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम वैदिक कार्यकर्ते

In reply to by संदीप डांगे

तेच तर म्हणतो ना. आपले सरकार हिंदु नाही. त्यामुळेच या कायद्याला धार्मिक रंग द्यायचा आणि हे सगळे हिंदुंनी केले म्हणुन उर बडवायचा यात काय हशील? मी फक्त इतकाच मुद्दा मांडला आहे. तुमचा हा प्रतिसाद कोणाच्या प्रतिसादाला होता हे न कळाल्यामुळे परत तोच प्रतिसाद दिला आहे.

In reply to by मृत्युन्जय

मी दुबईमध्ये राहतो. इथे पोर्क मिळते. पोर्क मिळणारा भाग सुपर मार्केटमध्ये वेगळा असतो आणि तिथे 'For Non-Muslims only' अशी पाटी असते.

In reply to by मृत्युन्जय

गाय व डुक्कर यात फरक आहे. डुक्कर खाऊ नका असा सरसकट आदेश काढला तरी कुणाला फरक पडत नाही. लोक डुक्कर पाळणारही नाहीत व कुणी खाणारही नाहीत. पण हिंदु धार्मिक लोक गाय खात नाहीत. पण त्याना दूध मात्र हवे असते. कुणीतरी गाय पाळायची , याना दूधही द्यायचे व ती भाकड झाली तरी त्या बिचार्‍याने स्वखर्चाने पाळही बसायची . शिवाय नवी दुभती गाय आणुन यांची पुन्हा सोयही करायची. धर्मांधता कुणाची व भुर्दंड कुणाला ! हा मुख्य मुद्दा आहे. गाय पवित्र मानणार्‍यानी भाकड गायी पाळायला सुरु कराव्यात

In reply to by hitesh

कुणी खाणारही नाहीत.
हे कसे काय हो ? कळाले ही नाही. म्हणजे पोर्क खातातच की लोकं. सॉसेज खातात. झालंच तर बर्‍याच भटक्या जमाती अजून ही डुक्कर पकडून मारून खातात की. बाकी शक्य असेल तर थोडे तटस्थ होऊन लिहा की राव. नाय तर तुमचे ते परखड मत आणि इतरांची ती अस्मिता हे काय पटत नाय. असो.

In reply to by हाडक्या

अहो ते पाकिस्तानातील डुक्करबंदी व इथली गोबंदी यासंदर्भात आहे.. वर कुणीतरी विचारले होते की की पाकिस्तानात सरसकट डुक्करबंदी आहे का ? त्याबाबत मी लिहिले आहे... तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर फरक पडत नाही. पण गाय ही दुधाच्या हेतूने शेतकरी पाळतो.. ती गाय भाकड झाल्यावर त्यालाच पाळावी लागेल. गोप्रेमी लोक त्याला मदत करतील का ? या संदर्भात ते लिहिले आहे. आपल्याकडे बरेच लोक डुक्कर खातात . मला कल्पना आहे.

In reply to by hitesh

तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर फरक पडत नाही.
फरक पडतो. मी दारु पिणार नसेन तरीही सरसकट दारुबंदीच्या विरोधातच असेन. तशीच ही पण गोष्ट आहे. कोणाला खायचा असेल डुक्कर, तर बंदी करणारे कोण ? आणि तुम्ही त्याने फरक पडत नाही म्हणण्याचा काय संबंध ? अशी सरसकट बंदी चूकच (आणि चूक ला चूक म्हणा की स्पष्ट). तुमचा दांभिकपणा उघड पडतोय इथे.

In reply to by hitesh

संकलित करण्याची जरुरी आहे ...

या विषयावर जास्त विचार केलात तर डोक्याचा भुगा होईल. तात्विक दृष्टीकोनातून विचार करा - गाय बैल आपल्याकडे शेतीच्या कामासाठी वापरले जातात. आता आयुष्यभर त्यांच्याकडून काम करून घेणे आणि नंतर खाटकाला नेउन विकणे चूक. पण कर्जात बुडालेला शेतकरी करणार काय? मुंबईत कबुतरे वाढली तर रोगराई वाढली, उद्या गायी वाढल्या आणि रस्त्यात बसून त्यांनी वाहतुकीची कोंडी केली, एखादी रुग्णवाहिका वेळेवर इस्पितळात नाही पोहोचली तर जीव जाइल ना कोणाचा तरी. आणि डोईजड झालेल्या गायी रोज मरत असतात. प्लास्टिक च्या पिशव्या खाउन! ३०-३५ किलो प्लास्टिक निघते पोटातून. नाहीतर भुकेने व्याकुळ होऊन मरतात. शेवटी दुर्दैवी मरण त्यांच्यासाठी ठरलेले आहे. या नाहीतर त्या बाजूने. पशुप्रेमी म्हणून एखादी व्यक्ती ३-४ भाकड गायी सांभाळू शकतो पण इथे हजारो गायींचा प्रश्न आहे! सरकारने कायदा करून चालणार नाही, त्या हजारो गायींचे काय करायचे, हे सुद्धा सांगावे.

In reply to by सुचिकांत

उद्या गायी वाढल्या आणि रस्त्यात बसून त्यांनी वाहतुकीची कोंडी केली, एखादी रुग्णवाहिका वेळेवर इस्पितळात नाही पोहोचली तर जीव जाइल ना कोणाचा तरी. हे जरा अति खेचलेले वाटत नाही का ? रुग्णवाहिकेला अडवायला आपले रिक्षावाले, बाईक वाले , कारवाले सगळेच किती तत्पर असतात ... एखाद्या गाईने रुग्णवाहिकेला अद्व्ल्याचे ऐकिवात /पाहण्यात नाही ...किंबहुना हॉर्न वाजवल्यावर गाय चट्कन बाजूला होते ...

In reply to by अत्रन्गि पाउस

यावर एकच उपाय आहे. देशातल्या मंदिरांनी गोशाळा उभ्या कराव्यात आणि सर्व भाकड गायींना सांभाळावे, नाहीतर प्रत्येकाने आपल्या पगारातून गो संवर्धनासाठी ठराविक रक्कम बाजूला काढून द्यावी

In reply to by निनाद जोशी

सरसकट म्हशीचे दूध पीत असूनही म्हशीला प्रोटेक्शन न देणे, गायींना मारू नये म्हणून ज्या गौ सेवा संस्था काढल्या आहेत तिथे गायींची कंडिशन इतकी वाईट असते की मरण हाच त्यांच्या सुटकेचा एकमेव मार्ग असतो कैक वेळेस-तरी तिकडे दुर्लक्ष करणे, सावरकरांच्या विचारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे, वैदिक धर्मातील आहाराकडे दुर्लक्ष करणे, आणि एकूणच बिनडोकपणे बोंबा मारणे, इ.इ. सध्याच्या जगात नॉनव्हेजचे प्रमाण अ‍ॅज़ अ होल कमी झाले तर ते पर्यावरणाच्या फायद्याचे आहे. चिकनमटन सगळेच कमी खाऊ लागले तर ठीक, पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून जे मांस बहुसंख्य हिंदू लोक सध्या खातच नाहीत त्याच्याच नावाने बोंबा मारणे हे खास बिनडोक गोभक्तांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशी नानाविध बाष्कळ मुक्ताफळे "हा आमचा देश आहे" वगैरे (१६ मे नंतर या प्रवृत्ती जास्त माजल्यात) छापाची उधळणे हे यांचे पेटंट कसब आहे. लय मज्जा येते निरर्थक बिनबुडाच्या गैरसमजुती ऐकायला, अजून चालूद्यात.

In reply to by बॅटमॅन

मगाशी हि मला उत्तर मिळाले नाही.... सावरकरांनी असे कुठे म्हंटले आहे ते मला जरा कृपया सांगाल का.....

In reply to by बॅटमॅन

विन्ग्रजीत आहे, अनुवादित माहिती. Cow is worthy of protection so long as this serves humanitarian and national interests Animals such as the cow and buffalo and trees such as banyan and peepal are useful to man, hence we are fond of them; to that extent we might even consider them worthy of worship; their protection, sustenance and well-being is our duty, in that sense alone it is also our dharma! Does it not follow then that when under certain circumstances, that animal or tree becomes a source of trouble to mankind, it ceases to be worthy of sustenance or protection and as such its destruction is in humanitarian or national interests and becomes a human or national dharma? (Samaj Chitre or portraits of society, Samagra Savarkar vangmaya, Vol. 2, p.678) …When humanitarian interests are not served and in fact harmed by the cow and when humanism is shamed, self-defeating extreme cow protection should be rejected…(Samagra Savarkar vangmaya, Vol. 3, p.341) …A substance is edible to the extent that it is beneficial to man. Attributing religious qualities to it gives it a godly status. Such a superstitious mindset destroys the nation’s intellect. The cow is but a milch symbol of the Hindu nation. By no means should it be considered its emblem

In reply to by निनाद जोशी

http://mayurkhape.blogspot.in/2010/06/blog-post_9744.html समग्र सावरकर, खंड ८. सरसकट गोमांसभक्षणाचा पुरस्कार नसला तरी आंधळ्या गोभक्तीला विरोध केलेला आहे. गोभक्तांना ते समजेल अशी आशा करणे व्यर्थ आहे.

In reply to by बॅटमॅन

ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा राष्ट्र संरक्षण ह्यासाठी गोहत्या मान्य केली आहे आणि ती मान्य करण्यासारखीच आहे परंतु त्यांनी भक्षणासाठी गोहत्या सांगितली नाही आहे. गाय हि हिंदू धर्माचं प्रतिक नसली तरी पूज्य आहे हे त्यांनी हि मान्य केले आहे. त्यामुळे सांभाळणे जड झाले म्हणून तिला विकणे ह्याचे त्यांनी कोठेही समर्थन केलेले नाही अथवा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तिला मारावे ह्याचेही समर्थन केलेले नाही. त्यामुळे ह्या मुद्यावर सावरकरांचे मत हे व्यर्थ गोहत्येच्या बाजूने आहे असे मानता येउच शकत नाही.....

In reply to by निनाद जोशी

savarkar.org काही मराठीत हे पशु पहा ! मनुष्यांच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धिमान, वाळवंटातील ते मनुष्याचे तारू - म्हणून काटे खाऊन पाण्यावाचून महिनोगणती चालण्याची युक्ति त्या उंटाला शिकविली. तो घोडा किती चपल ! त्याच्यावर स्वारी भरणार्‍या मनुष्यास भर रणांगणाताही सांभाळून वहाण्याइतकी नि मनुष्याशी अत्यंत प्रामाणिकपणे वागण्याइतकी बुद्धि त्याला देवाने दिली. पण मनुष्यावरच स्वारी भरण्याइतकी बुद्धिमात्र दिली नाही! ही गाय पहा. एका बाजूला सुके गवत ढकलावे नि दुसर्‍या बाजूला त्याचे बनलेले त्याचे ताजे जीवनप्रद दूध चरव्या भरभरून काढीत बसावे ! असे ते आश्चर्यकारक रासायनिक यंत्र ज्या देवाने घडविले तो खरोखरच किती दयाळू असला पाहिजे! आणि पुन्हा प्रत्येक वेळी जुने यंत्र मोडताच नवे घडण्याचे श्रमसुद्धा मनुष्याला पडू नयेत अशी सोय त्यातच केलेली; पाहिल्या यंत्रातच गवताचे दूध करून देता देताच तसलीच नवीन अजब यंत्रे बनविण्याचीही व्यवस्था केलेली !

In reply to by निनाद जोशी

ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा राष्ट्र संरक्षण ह्यासाठी गोहत्या मान्य केली आहे आणि ती मान्य करण्यासारखीच आहे परंतु त्यांनी भक्षणासाठी गोहत्या......... ..... स्वसंरक्षणासाठी गोहत्या ! म्हणजे गाय अंगावर आली तर मारुन टाकावी की काय ?

A1 versus A2 Milk Posts from Keith Woodford The Desi Cow – Almost Extinct Indian Cow Milk Benefits Indian Cow and it`s benefits ( Scientific Facts ) आणि ज्याला कोणाला भाकड गाय पोसता येत नाही त्याने ती समाजसेवी संस्थांच्या हवाली करावी. यात जैन व मारवाडी लोकांच्या संस्था अग्रणी आहेत. ही लोक आपल्या उत्पन्नाचा एक भाग वेगळा काढून ह्या गायी पोसण्यासाठी वापरतात.

In reply to by आयुर्हित

धन्यवाद. हा कायदा देशी गायीपुरता मर्यादीत नाही. ४०% ह्य जर्सी आणि इत्सम आहेत. त्यान्चे बैल हि शेतीकामाचे नसतात. ते काय करायचे? कोणी संभाळायचे? वरच्या संस्था १० कोट जनावरे संभाळतील? १९६० मधे या कायद्याला विरोध झाला तो अर्थिक कारनामुळे. डेरी धंदा पुढे न्यायचा असेल तर निरुपयोगी जनावरे काढलीच पाहिजेत.

In reply to by खंडेराव

तो एक गायीसारखा प्राणी आहे असे कुणीतरी अलीकडेच सांगत होता .... देशी गाय हा वेगळा प्राणी आहे आणि ब्राझील का आणखीन कुठल्या तरी देशात त्याचे शुध्द वाण मोठ्या प्रमाणात जोपासले जात आहे अशीही माहिती होती....

गायींना पोसण्यापेक्षा अनाथांना , माणसांना पोसण्यात हे पैसे सत्कारणी लागतील. बाकी हिंदू धर्मात गायीला पवित्र मानायचा खूळ केव्हापासून घुसले हे कळाले तर जास्त आवडेल.

आता मत्स्य, कूर्म, वराह वगैरेंची हत्याबंदी व्हावी असं वाटतं !!! कुत्रा दत्ताच्या आजूबाजूला असतो (आणि वाघ्यापण बरं का) .. त्यालाही मारण्यावर बंदी यावी .. अगदी पिसाळलेले असेल तरी.. त्यांची नसबंदी वगैरे अन्यायही दूर व्हावेत.. सर्व महापालिकेतील उंदीर मारण्याचे विभाग बंद करावेत.. आमच्या बाप्पाचे वाहन आहे ते... आणखी पुराणकथा वगैरे वाचून संरक्षणासाठी प्राणी सुचवावेत.. आमचा पाठींबा आहे.. यासाठी सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून हे कायदे ताबडतोब मंजूर करून घ्यावेत

In reply to by बाळ सप्रे

अगदी अगदी. झालंच तर कुठल्याही प्रकारची जीवहत्या बॅन करून टाकावी. जुलमी परकीय म्लेंच्छ लोकांमुळे शिरलेला हा अनाचार लौकरच धर्मरक्षकांनी समूळ नष्ट करून टाकावा आणि इतःपर झाडांप्रमाणे फक्त प्रकाशसंश्लेषणाद्वारेच अन्नग्रहणाला परवानगी असावी. एक बॅक्टेरिया मारल्यास एक वर्षे तुरुंगवास असा शिक्षेचा रेट असावा.

In reply to by बॅटमॅन

प्रतिक्रियेच्या बटणावर क्लिक करताना आणि ही प्रतिक्रिया लिहिताना मी किमान ८८,५७० बॅक्टेरिया मारल्याचं सबळ पुराव्याने सिद्ध झालेलं आहे. कारावासाची शिक्षा झाल्याने आपल्या प्रतिसादांवर उपप्रतिसाद देणे ह्या जन्मात शक्य होणार नाही. पुढचा जन्म बॅक्टेरियाचा मि़ळाला तर बॅटमोबाईलच्या किमान आरश्यावर बसायला जागा मिळावी ही विनंती. धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पुढचा जन्म बॅक्टेरियाचा मि़ळाला तर बॅटमोबाईलच्या किमान आरश्यावर बसायला जागा मिळावी ही विनंती. धन्यवाद.
तुमच्यासाटी कायपन! ब्याक्ट्रिया मार्ले तरीपन!