✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्लास्टिक सर्जरी

ट
टारझन यांनी
Sat, 11/15/2008 - 19:55  ·  लेख
लेख

Book traversal links for प्लास्टिक सर्जरी

  • ‹ डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...१
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15566 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

क
कपिल काळे Sat, 11/15/2008 - 20:49 नवीन

मस्त

मस्त टारया अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली. <<फोकलीचा: "या प्रसांत (बरोबर लिहीलय, यावरून समजदारांना ऍक्सेंट कळेलच), व्हॉटस गोइंग ऑन, व्हाट्स प्रोग्रेस टूडे ?">> वा वा म्हणजे तू पण आता लिखाणातून ऍक्सेंट दाखवायला लागलास तर. बघू कुणा कुणाला वाचता येतो. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 11/15/2008 - 21:03 नवीन

मस्त

जबरी लिहिलंय टारू. एकदम पटेश....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 11/15/2008 - 22:02 नवीन

पटेश

जबरी लिहिलंय टारू. एकदम पटेश....
असंच म्हणतो .. फूल टू पटेश -(मुखवट्या आडचा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अभिज्ञ Sat, 11/15/2008 - 21:30 नवीन

छान.

छान लिहिले आहेस. विशेषत: शेवटचा परिच्छेद जास्त भावला. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/15/2008 - 21:53 नवीन

छान लिहिले आहेस.

असा वैचारिक लेख, सहजपणे उतरला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 11/15/2008 - 23:04 नवीन

चांगला झालाय रे!

साध्या भाषेत असल्याने वाचताना गप्पा मारतोय असे वाटले. ही प्रतिक्रीया प्लास्टीक सर्जरी नव्हे. रेवती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 11/15/2008 - 23:10 नवीन

वाह वाह

ही प्रतिक्रीया प्लास्टीक सर्जरी नव्हे.
हा हा हा , झबरदस्त , आपण चलाख वाचक आहात यात वादच नाही आता. (मन के साथ बाता : क्या सही पकडेला टारू तेरे को ...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/15/2008 - 23:30 नवीन

छान प्रकटन...

टार्स, एका चांगल्या वैचारिक प्रकटनाबद्दल प्रथम अभिनंदन. (तुझ्या भाषेत हाबिणंदण :) ) तू ज्याला प्लॅस्टिक सर्जरी म्हणतोस त्याला मुखवटे असंही म्हणतात. आणि, मित्रा, विश्वास ठेव, हा मुखवटा कूणालाही चुकला नाही. कोणी २४ तासापैकी २३ तास हा मुखवटा लावून वावरतो तर कोणी २३ तास बिनामुखवट्याचा असतो एवढाच फरक. थोरांपासून पोरांपर्यंत सगळेच मुखवटा वापरतात. वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात तर हा सार्वजनिक आयुष्यापेक्षा जास्त उपयुक्त ठरतो. या मुखवट्याचं सोप्पं डेफिनिशन द्यायचं तर असं देता येईल, "आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा" आणि हा मुखवटा कधी कसा वापरायचा हे माणसाला अगदी उपजतच कळत असतं. लहानपणी कधी फिरायला गेलो की आई घरूनच बजावून न्यायची की रस्त्यात हट्ट करायचा नाही, हे माग -ते माग असं करायचं नाही. सवयीने असं लक्षात आलं की आईच्या सांगण्याप्रमाणे वागलं की नंतर बिनबोभाट फायदा होतो काहितरी, त्या मुळे बर्‍याच वेळा आईस्क्रीमच्या दुकानासमोरून जाताना शहाण्यासारखं वागायचो. :) कॉलेजमधे असताना, कधी मित्रांच्या घोळक्यात तोंडात शिव्या येतील पण घरी कधीच नाही, अगदी पहाटे पहाटे आई / ताई साखरझोपेतून अभ्यास करायला उठवायची तेव्हा पण नाही. पण हे सगळं आपोआप होतं आणि वैयक्तिक संबंधातल्या आपुलकी, आदर, धाक किंवा प्रेमामुळे होतं. पण जेव्हा नोकरी करायला लागतो तेव्हा हे भान राहणं आणि तो मुखवटा नीट वापरता येणं हे कर्मकठिण. ज्याला जमलं तोच शिडी चढू शकतो. कारण जगातले यच्चयावत 'बॉस' हे मूर्ख असतात आणि आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं हे एक फार मोठं शल्य प्रत्येकाच्या मनात असतं. तर अशा परिस्थितीत स्वतःचा इगो सांभाळून त्याला मान देणं लै लै लै कठिण. तुझ्या एकंदरीत लिखाणावरून तू ते मस्तच जमवतो आहेस असं वाटतंय. तस्मात् भविष्यकाळ उज्ज्वल आहे वत्सा. बाकी तू जे तिसर्‍या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 11/15/2008 - 23:45 नवीन

अग्रीड टोटली

बेष्ट, तुम्ही माझ्या लेखाच्या ४ पावले अजुन मागे गेलात .. मी तर फक्त सामाजिक मुखवट्यांवर लक्ष केंद्रित केलेलं .. कारण इकडे पर्सनल लाईफ आहे कुठे. गेले ११ महिने झाले एकांतवास :), तुम्ही मात्र कौटूंबिक आणि वैयक्तिक मुखवट्यांवर प्रकाश टाकलात , तुमचंही हाबिणंदण. बाकी तू जे तिसर्‍या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे. होय महाराजा, तिसरा प्रकार नसतो असं माझंही मत आहे. पण काही फाटक्या तोंडाची लोकं असतात. मी म्हंटलोच होतो ९९.९९९९९% लोकं मुखवटे वापरतातच. कुठे सत्ययुगातले वंशज शिल्लक असू शकतात. म्हणून खबरदारी म्हणून तिसरा प्रकार त्याच्या परिणामांसह टाकलायच .. - (शिकाऊ सर्जन) टार्जन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ल
लिखाळ Mon, 11/17/2008 - 16:23 नवीन

>>"आजूबाजूच

>>"आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा" << :) छान ! टारझनशेठ, लेख छान आहे. आवडला... मी स्वतः असे मुखवटे कधी-कुठे-का चवढतो ते मला तपासावे लागेल :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक प्रभू Sun, 11/16/2008 - 07:41 नवीन

फिलॉसॉफर

टारझना फिलॉसॉफर झालास की रे. जास्त परमोच्च बिंदूची स्वप्ने बघू नकोस हो. स्वप्नदोष होतो. ह्.यु.एल. चा भाव वाढतो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/16/2008 - 10:27 नवीन

हिंदुस्ता

हिंदुस्तान लिव्हर वाचवनं आपल्याच हातात आहे मालक :) स्वप्नदोष ? =)) =)) =)) =)) नाही नाही. - प्रो.डॉ.टारझन चिरुटे (मास्टर ऑफ फिलॉसॉफी, केळकर युनिव्हर्शिटी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
भ
भास्कर केन्डे Tue, 11/18/2008 - 04:40 नवीन

टारुशेट

डॉ टारुशेट, मस्त सर्जरी केली आहे की! आवडली बॉ आपल्याला... खरच ही सर्जरी कुणालाच चुकलेली नाहीये. आपला, (सर्जन) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 11/16/2008 - 14:10 नवीन

सहमत !!

+१ टारूबाळ प्रगल्भ होत चाललाये..... (एम बी बी एस चा विद्यार्थी ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/16/2008 - 14:14 नवीन

छान..

टारु,लेख आवडला. साध्या भाषेत गप्पा मारल्यासारखे लिहिले आहेस ह्या रेवतीच्या म्हणण्याशी सहमत. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 11/16/2008 - 15:31 नवीन

टार्‍या

टार्‍या मरिना उतरली ते एक अतिशय रिच सुंगंध पसतवत, काळ्याच कलरची मिडी ड्रेस तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत होता, सनग्लासेस मधे मरिना नेली किंवा ५० सेंट किंवा शॅगीच्या व्हिडिओची 'बेब' वाटत होती. उतरून तिने मला सहजच मला एक घट्ट आलिंगण दिलं आणि मी शहारलो, लेका वपु काळेना कॉम्पिटीशन देतोस की ;) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/16/2008 - 15:35 नवीन

सही रे !!!

टार्‍या, लेख आवडला... प्लॅष्टीक सर्जरीचा संवादाच्या निमित्ताने माणसाच्या विविध प्रवृत्तींना सही पकडलं आहे. रोजच्या जीवनात प्रसंगानुरुप कितीतरी मुखवटे घालावे लागतात या आपल्या चिंतनाशी सहमत आहे. सुविचार : हाडबीडं, दातबीतं तोडणारे कधी-कधी सिरियस आणि सुंदर लिहितात यावर विश्वास ठेवला पाहिजे ;) -दिलीप बिरुटे (टारझन)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 11/16/2008 - 15:45 नवीन

का र भौ

का र भौ टा-या आर तुज पार भरित झाल की रे त्या नोकरीपायी... अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा च्यामारी असले फालतु मुखवटे नसतात तिथे... बाकी लेख मस्त. आवडला. हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे ;) नाना
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 11/17/2008 - 10:15 नवीन

अर लेका दे

अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा इचार कराय हवा नाना !! हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे म्हाईत हाय भौ !!! सर्व मनापासनं परतिसाद दिल्याल्यांचे आबार !! या येळी लै म्होट्या म्होट्या प्रतिक्रिया आल्या :) (वांग्यात) भरून पावलो - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/16/2008 - 16:08 नवीन

चांगलं

चांगलं लिहिलं आहेस. पण मलातरी प्लास्टिक सर्जरीचा अनुभव नाही, अजूनपर्यंत गरज पडली नाही, आणि नजीकच्या भविष्यात गरज पडेल असं वाटत नाही. (फटकळ, फाटक्या तोंडाची, "अल्पसंख्यांक") अदिती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/16/2008 - 16:22 नवीन

होय ... विश्वास आहे

मिपावर विषेश गरज नाही, पण सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे. तु सर्व आघाड्यांवर विना सर्जरी वावरत असशील असा विश्वास वाटतो. लेखात म्हंटल्याप्रमाने आपल्या सारख्या महापुरुषांना(महास्त्रिया असतं का ? ) आमच्या सारख्या सर्वसामान्याचा साष्टांग दंडवत. - कॉमन मॅन टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/16/2008 - 16:34 नवीन

स्वतःला

स्वतःला स्वतःवर प्लास्टीक सर्जरी करायची नसेल, विशेषतः व्यक्तिगत आयुष्यात तर एक तर दुसर्‍यावरही तशी वेळ आणली नाही पाहिजे, नाहीतर दुसर्‍या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातून संपूर्णपणे काढता आलं पाहिजे. उगाच खोटं-खोटं गोड बोलून खोटे संबंध ठेवण्यापेक्षा मी सरळ संबंध कमी करते / संपवते. आणि ज्यांच्याशी एकदा संबंध जोडलेले आहेत, जे लोकं मी आहे तशी मला मान्य करतात त्यांना ते 'आहेत तसे' मी मान्य करते; मग प्लास्टिक सर्जरीची वेळच येत नाही. लहानपणी जेव्हा स्पष्टपणे नाही म्हणायला शिकले नव्हते, स्वतः विचार करायला शिकले नव्हते तेवढ्यापुरती फक्त सर्जरी केली; आता गरज वाटत नाही आणि जमेल असं तर अजिबातच वाटत नाही. कामाच्या ठिकाणी माझ्या कामाचं स्वरुप वेगळं आहे त्यामुळे सर्जरीची गरज नाही. नशीबाने खूप लहानपणीच मला लक्षात आलं होतं की "रॅट रेस"मधे धावणं मला जमणार नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आज थोडातरी फायदा झालेला दिसतोय. (स्पष्ट आणि सरळ) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 11/16/2008 - 16:45 नवीन

सहमत .. आणि मान्य आहे

उगाच खोटं-खोटं गोड बोलून खोटे संबंध ठेवण्यापेक्षा मी सरळ संबंध कमी करते / संपवते.
अगदी मान्य, सर्वांनी हे तंत्र अंगिकारने आज काळाची गरज आहे.
आणि ज्यांच्याशी एकदा संबंध जोडलेले आहेत, जे लोकं मी आहे तशी मला मान्य करतात त्यांना ते 'आहेत तसे' मी मान्य करते; मग प्लास्टिक सर्जरीची वेळच येत नाही.
हो बरोबर, याचा अनुकरन आम्ही पण करतो , म्हणूनच ज्यांना आम्ही आहे तसे मान्य करतो त्यांची "*क ऑफ" किंवा तस्तम स्लॅग भाषा आम्ही कधी माईंडही करत नाही, ते आपलेच आहेत आणि त्यांनी तसं आपलाच आहे म्हणून असं म्हंटलं असेल असा आम्ही गोड समज करून घेतो. असा कोणी रोडवरचा बोलला तर लिटरली त्याची हाडं मोडून ठेवली असती हे सांगायला नकोच. -(विचारी) टारलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/16/2008 - 17:18 नवीन

करेक्ट

सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे. सहमत आहे !!! अहो, जग इतकं धावपळीचं झाले आहे की, कितीही ठरवले तरी मला असे वाटते की, अनेक मुखवट्यांना फेस करतांना नकळत आपणही एक मुखवटा धारण केलेला असतो/ धारण करावा लागतो. नसतो तो आपला मूळ स्वभाव, आणि बर्‍याचदा लक्षात येत नाही हे कसं झालं म्हणून. पण फायद्या तोट्याच्या गणितात त्याही मुखवट्याचं मग कौतुक वाटायला लागते. विना सर्जरी वागणारे लोक फार अपवाद असावेत त्यांना आपण फार मोठे म्हणतो मग ते महापुरुष याच सज्ञेत मोडतात. त्यामुळे अपवाद असलेल्या माणसांच्या समोर नक्कीच नतमस्तक झालं पाहिजे. जालावर आपण एकमेकांना ओळखतो तरी किती, (कोणालाही वयक्तिक उद्देशून नाही, तसे वाटल्यास क्षमा असावी )यातले व्यवहारात किती मुखवटे आणि किती सत्य हे ओळखणे अवघड आहे. अर्थात आम्ही काय कोणावरही अविश्वास दाखवत नाही. पण 'गमन' केल्यावर आपला खरा चेहरा कधीतरी वाचला पाहिजे असेही वाटते. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टवाळचिखलू Sun, 11/16/2008 - 18:03 नवीन

तीच ही प्लास्टिक सर्जरी.

सुधिर (आमच्यापैकीच एक प्राणी) मला नेहमी म्हणायचा तु जसा आहेस तसा वागत नाहीस. तीच ही प्लास्टिक सर्जरी. <<<अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली.>>>> सहमत. सकाळ झाली चिखलू उठला अन गावाचा ठोका चुकला.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 11/17/2008 - 11:03 नवीन

मस्त!

>नितीनला मस्करीच्या नादात डोक्यात एक फटका बसला, नितीनला दिवसभर काही सुधरत नव्हतं हा भाग अलहिदा. .. हे मस्त केलंस!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 12:27 नवीन

असेच म्हणतो

लिहले छान आहेस !! - आपलाच (हजारो मुखवटे वापरणारा) आंद्या बेलवलकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मैत्र Mon, 11/17/2008 - 12:32 नवीन

तिसरा प्रकार

टारू भाऊ ... शतश: आभार या लेखा बद्दल... मी बर्‍याच प्रमाणात तिसर्‍या प्रकारात मोडतो. आणि सध्या एका अतिशय त्रासदायक प्रकारातून जात आहे. गोट रेस ला न गेल्याने तुला राग येईल दु़:ख होइल पण तुझ्या आयुष्यात मोठा फरक पडणार नाही... 'व्हॅल्युज' चा डंका वाजवणार्‍या एका कंपनीत गेले २.५ वर्ष मी 'व्हॅल्युज' ची खुलेआम पायमल्ली बघतो ऐकतो आणि भांडत भांडत सहन करतो आहे. मला आत्तापर्यंत दोन तीन वेळा असा फीड बॅक मिळाला आहे की काही चुकीचं असेल ज्यामुळे तुला त्रास झाला - जसं खुप जास्त काम, रिवर्क, तुझ्या हातात नसलेलं काम किंवा आधी माहीत नसलेलं अचानक दिलेलं काम न होणे.. त्या कामाचं प्लॅनिंग आणि माणूस न शोधल्यामुळे ते तुला द्यावं लागलं त्याबद्द्ल जबाब दार असलेल्या मनुष्याला काहीच फरक न पडणे.. अवास्तव प्लॅन करून तो मान्य करण्यासाठी डोक्यावर बसणार्‍या मॅनेजर बरोबर वाद घालणे आणि तो प्लॅन कसा चुकीचा आहे हे सांगणे. पटत नसलेली गोष्ट शांतपणे सांगणे व कुठे आणि काय पटत नाही ते सांगणे... असं काहीही केलं तर तुमची मुद्दाम मारली जाइल. वानगी दाखल: १. ऑफर दिल्यावर जॉइन करायला घाई करणे आणि जॉइन केल्यावर काम नाही. दोन तीन महिने बेंच आहे. बदली घ्या सांगणे. ऑफर देताना लोकेशन प्रमाणे निगोशिएट करणे आणि बदली घ्यायला सांगणे ही फसवणूक एक प्रकारचं फ्रॉड आहे. २. काही ठराविक प्रॉडक्ट साठी नोकरी देणे, कामाबद्दल सांगणे आणि नंतर त्यात काम नाही कुठल्यातरी बंद होत आलेल्या प्रॉडक्ट वर सपोर्ट कामासाठी दबाव आणणे. - अजून एक फसवणूक. ३. काहीच प्रोजेक्ट नाहीत म्हणुन दुसरं काही शिकून ते कंपनीत मुळापासून बसवण्याच्या कामाला लावणे ज्यातून काहीही निष्पन्न होत नाही. ४. प्रोजेक्ट हवा असेल तर बदली घ्या. ५. प्रोजेक्ट मध्ये काहीच्या काही काम देणे. ६. एका कामावर जास्त दिवस न राहील्याने प्रॉडक्ट ची ही पुरेशी माहिती होत नाही. ७. दोन महिन्यात चार महिन्याचं काम करायला सांगणे - कारण आधी प्लॅन केलं नव्हतं. आता कस्टमर ला सांगता येत नाही की आधी झोपलो होतो. आता तुम्ही मरा आणि काम करा. येत नाही किंवा संबंध नाही याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला फक्त माणसाला माणूस - नगाला नग लावायचा आहे. पुढे तुझं काम आणि त्यात काही प्रॉब्लेम आला तर तुमची जबाबदारी. पुढच्या वेळी रिव्हिव्यु वर परिणाम होइल. ८. सहा महिने आहेत म्हणुन बायकोने ऑनसाईटला जॉब जॉइन केल्यावर १-२ महिन्यात परत जा सांगणे. सध्याचा कहरः तिथे दुसरा कुठलाही प्रोजेक्ट नाही परत जाण्यावाचून पर्याय नाही कळल्यावर सगळं आवरून परत आल्यावर दोन आठवडे दुसर्‍या प्रोजेक्ट साठी परत ऑनसाईट जा. बायकोच्या करिअर चं या बकवास प्लॅनिंग मुळे खोबरं झालं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. दिड वर्षात तीन वेळा लोकेशन आणि कामात बदल करून फॅमिलि लाइफ ची वाट लावली आहे. तरी ८-९ महिने परत जा कारण आम्ही येताना आधी सांगितलं नाही - कारण तेव्हा विचार केला नव्हता की दिड वर्ष अनुभव असलेला माणुस हे करू शकणार नाही आणि त्याला घेतलं. मित्रहो... असे असंख्य अनुभव आहेत. सध्या या नवीन भांडणाने वाट लागली आहे. काही सल्ला मिळाला तर फार आवश्यक आहे...
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Mon, 11/17/2008 - 14:11 नवीन

'व्हॅल्युज' चा डंका

'व्हॅल्युज' चा डंका वाजवणार्‍या एका कंपनीत......... म्हणजे इन्फी काय????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
क
कुंदन Mon, 11/17/2008 - 15:13 नवीन

नाय नाय ....इन्फी नसल ...

टेक एम ( यम ) असल .... मला अगदी अस्साच किंवा याहुन बी भीषण अनुभव आलाय तिथे .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या विंचू
म
महेश हतोळकर Mon, 11/17/2008 - 17:06 नवीन

नोकर्‍या

शेवटी सगळ्या नोकर्‍या आणि सगळ्या बायका सारख्याच. काय समजलास बेंबट्या! बाकी प्लास्टीक सर्जरी मस्त जमलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
च
चतुरंग Tue, 11/18/2008 - 01:29 नवीन

प्लास्टिक सर्जरी फक्त लहान मुले

सोडून बाकी सगळे करत असतात हेच खरे आहे! टारुबाळ तुझे अवलोकन फारच मार्मिक आहे आणि तुझ्या लिहिण्यातला सच्चेपणा भावला! एकदम चोक्कस! एका खुसखुशीत आणि कळीच्या विषयाला हात घालणार्‍या लेखाबद्दल अभिनंदन. काही वेळा सर्जरी आवश्यक असतेही पण ती कुठे गरजेची आहे आणि कुठे नाही ह्यातले तारतम्य आपण हरवून बसण्याची फार मोठी शक्यता असते! आपण ह्या गोष्टीकडे जागरुकतेने लक्ष देत नाही आणि मग हळूहळू तेच आपल्याला सोईचे वाटायला लागते. निदान आपल्या जवळच्या नात्यात उदा. नवरा-बायको, आई-बाप-मुले, अगदी घट्ट मित्र अशा जागी तरी मुखवटे नकोत/नसावेत कटु असलं तरी सत्य जे असेल ते सांगण्याची हिम्मत आणि तात्कालिक वाईटपणा घेऊन अंतिम चांगल्याकडे वाटचाल करण्याजोगे मानसिक धैर्य फार थोडे लोक दाखवू शकतात आणि जे दाखवतात ते नक्कीच मोठे होतात!! (चि.वि.जोश्यांची 'स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' ही गोष्ट आठवली! :) (अवांतर - प्रतिसाद कालच लिहायला घेतला होता, चिरंजीव मधेच येऊन खेळायचे म्हणाले मग 'मी कामात आहे, जा पाहू इथून' असा मुखवटा न चढवता त्याच्याशी खेळलो आणि आज प्रतिसाद पूर्ण केला. बघ बरं मी किती प्रामाणिक आहे! ;) (खुद के साथ बातां : चला रंगा, गेलास एकदाचा टारुच्या गुडबुक्समधे आता कधीमधी त्याला टांग मारलीस तरी तुझा संशय येणार नाही! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 11/18/2008 - 08:36 नवीन

मस्त रे !

टार्‍या, सर्जरी मस्त जमली आहे रे. :)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 11/19/2008 - 16:17 नवीन

(कामाचं

(कामाचं बोल केळ्या .. मला उशीर होतोय ) =)) =)) =) (स्व: चोच्या, आख्खा डिएसआर[डेली स्टेटस रिपोर्ट] पाठवला ना, उघडून बघायचे कष्ट घेना) जबरी रिऍक्शन! रे टोच्या....... मस्त आहे रे तुझी प्लॅस्टिक 'टर्जरी'!! एकूण काय, आफ्रिकेतली झंडूची फुलं मात्र तुझ्या वर जाम 'मरि(ना)त' असतात ! मिपावरच्या मुखवट्यांवर भाष्य ऐकून अंमळ बरे वाटले..... लास्ट पॅरिग्राफ मस्तच आहे...... धकाधकीच्या, मुखवट्यांच्या दुनियेची कैफियत हृदय हेलावून जाते... :) हे पण ""कीप इट अप!""
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 02:11 नवीन

आम्ही लै

आम्ही लै लेट वाचलं आणि लेट पर्तिक्रिया लिवतोय... एकदम मस्त झालाय हा लेख... बॉस २: "अरे ३-४ तासांच काम आहे, त्या नंतर जाना... " (माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं .. हे एकदम भारी... =)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/04/2010 - 09:11 नवीन

लवलाट

लवलाट लिहीलयंस टार्‍या. एक्दम परफेक्ट. पण मला वाटत की ही मनुष्य प्रवृत्ती आहे. पूर्वीसुद्धा असंच होत असणार.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 09:50 नवीन

खरा चेहेरा

छान लेख. असले लेख वाचले की मग डोक्यात विचार वगैरे येतात, ज्याची आम्हाला फारशी सवय नाही. प्रश्न असा येतो, की इतक्या वेळा इतकी वेगवेगळी प्लास्टीक सर्जरी करून आपण इतका वेळ जगतो... मग 'खरा चेहेरा' नक्की कधी, कुठे व कोणासमोर असतो? कारण स्वत:ला आपण आत्मप्रतिमेच्या आरशात बघतो तेव्हासुद्धा एक सर्जरी केलेला चेहेरा दाखवतोच की नाही?
  • Log in or register to post comments
स
साईली गुरुवार, 03/04/2010 - 10:42 नवीन

सुरेख

अहो टारझन सर्जन ... फारच सुरेख . मस्त आवड्ल. 'आयपीएलच्या अंतिम लढतीत सामनावीर किताब टारझन सर्जन याना द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे गुरुवार, 03/04/2010 - 12:26 नवीन

महाभारत द्वापारयुगात घडलं!

लेख झकास आहे. फक्त एक दुरुस्ती! ज्या काव्यात/गोष्टीत जास्तीत जास्त "मुखवटे" आहेत (महाभारत) ते सारं द्वापारयुगात घडलं. थोडक्यात काय तर ही प्लॅस्टिक सर्जरीची बीमारी कलियुगापेक्षा जुनी आहे! पण लेख छान उतरला आहे. वाचायला मजा आली! ------------------------ सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/04/2010 - 12:32 नवीन

सुरेख

२ बॉसेसची उदाहरणं मस्त रंगवली आहेत केळ्याची आणि फोकलीच्याची =)) लेख खूप आवडला. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 03/04/2010 - 13:24 नवीन

सही लिहीले

सही लिहीले आहेस्.खरंच आहे मुखवट्याशिवाय जगता येत नाही न आवडणारे नातेवाईक,कर्तव्य म्हणुन हजेरी लावावी लागणारे समारंभ,त्यात तेच नाटकी हास्य नको त्या विषयावरच्या चर्चा,सगळ कितीही नकोसं वाटलं तरी समोरच्याच्या मुड जाउ नये करावेच लागते हे सगळ.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 03/04/2010 - 20:12 नवीन

मस्त लेख आणि

जरा वेगळा विषय आहे ! >> माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं काय बरोब्बर लिहिलंयस मित्रा. कोडिंग करणार्‍या प्रत्येकाच्या मनातलं वाक्यं असावं हे :) बाकी मुखवटे वापरणं आपण इतक्या लहानपणापासूनच शिकतो की सम हाऊ इट बिकम्स सेकंड नेचर ! अगदी 'मी कुणाची भीड भाड ठेवत नाही' म्हणणाराही कुठे ना कुठे, कुठला ना कुठला मुखवटा वापरतोच. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 23:14 नवीन

वा वा

मजेदार आणि विचार करायला लावणारा लेख.
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Fri, 03/05/2010 - 06:29 नवीन

छान वास्तववादी लेख...

मुखवटा घातला तरच प्रगती नाहीतर तुम कीस झाड की पत्ती?? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
P
Pain Sun, 03/07/2010 - 05:29 नवीन

मस्त आहे !

मस्त आहे !
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 03/07/2010 - 12:16 नवीन

मुखवटा अनिवार्य झालाय....

नोकरी कर्णार्या सगळ्यांना हे करावचं लागत...... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा