डिस्क्लेमर : प्रत्येकाने आपल्या प्लास्टिक सर्जरीचं आत्मचिंतन करावं
णमस्कार लोक्स .. पुन्हा आली शनिवार संध्याकाळ .. आज विषय प्लास्टिक सर्जरी. आजच्या आयुष्यात प्रत्येक अन प्रत्येक कुठे न कुठे माणूस प्लास्टिक सर्जरी करून वागत आहे. ज्याने प्लास्टिक सर्जरी आज्जीबात केली नाही अशा महापुरूषाला आमचा साष्टांग दंडवत. उमगलं का मी काय म्हणतोय ते ? प्लास्टिक सर्जरी म्हणजे आपला (खरं तर विद्रुप, जे आपल्याला झाकायचंय) खरा चेहरा झाकणे आणि त्यावर शस्त्रक्रिया करून एक खोटा( खरं तर सुंदर, जो समाजाला चांगला वाटतो) चेहरा बनवून घेणे. थोडक्यात काय ? आपल्या मनात असतं एक , पण आपण कैक कारणांमुळे मनातलं बाहेर येउ न देता एक प्लास्टिकचा नकली आणि गोड चेहरा दुसर्या समोर ठेवतो. सतत हसरा, सतत टवटवीत ,कधीही न त्रासलेला, आणि महत्वाचं म्हणजे समोरच्याला खुष ठेवणारा.. हा आता त्यामागील कारणं व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीजन्य असू शकतात. परंतू ९९.९९९९% लोकं प्लास्टिक सर्जरी करतात हे नक्की.
आज शनिवार, नाममात्र बँक उघडी असते म्हणून लोकालाजे ऑफिसला जात असतो. माझी कंपनी तशी शनि-रविवार बंद. त्यामुळे बॉसने आज आलार्मचं काम केलं नाही. ते त्याच्या साठीच उत्तम आहे(नाहीतर मला झोपेत शिव्या द्यायची सवय आहे,उगाच स्वप्न परमोच्च बिंदूवर असताना फोन वाजुन झोपमोड होणे कोणाला आवडेल ? असो ) तर आज काही बॉसने सकाळी फोन केला नाही. ऑफिसातुन थोडं मिपा-मिपा आणि थोडं युट्युब आणि उरलेल्या वेळात थोडं काम ... असा आर्धा दिवस निघुन गेला, दोन वाजता घरी आलो,येतानाच हाटिलात रूम डिलेव्हरीसाठी जेवण ऑर्डर करून आलो,सकाळी नाष्ता पण केला नव्हता.. म्हणून कावळे सुरात गात होते. मस्त मिपा खोललं...खरडाखरडी केली... जेवण आलं .. आता यथेच्छ ताव मारू म्हंटलं ..ताट तयार केलं, कोंबडीची 'फोड' नाइफने कापली आणि फोर्कमधे घरून तोंडात पहिला घास घालणार... "माझं चालनं..माझं बोलणं.. माझं वागणं .. तुम्ही म्हणाल तसं .. होहो .. तुम्ही म्हणाल तसं "... मोबाईल भणभणायला लागला .. स्क्रिन वर "फोकलीचा कॉलींग" दिसलं आणि तळपायाची आग मस्तकात गेली .. (आम्ही बॉसचा नंबर 'फोकलीचा' असा सेव्ह केलाय के कुठे बोलू नका हो.. माझा बॉस बिहारी आहे, त्यामुळे ते नाव देण्यास अजुन एक कारण आहे) .. चमचा जोरात प्लेट वर आपटला.. चिकन पिस खाली पडला.. मला फिकीर नव्हती... थोडी केसं उपटली.. दोन सुवचने हासडली .. आणि पटकन प्लास्टिक सर्जरी घातली ....
प्लास्टिक सर्जरी : "येस सर, आय वॉज वेटींग फॉर युवर कॉल ओन्ली.. "
फोकलीचा: "या प्रसांत (बरोबर लिहीलय, यावरून समजदारांना ऍक्सेंट कळेलच), व्हॉटस गोइंग ऑन, व्हाट्स प्रोग्रेस टूडे ?"
(स्व: चोच्या, आख्खा डिएसआर[डेली स्टेटस रिपोर्ट] पाठवला ना, उघडून बघायचे कष्ट घेना)
प्लास्टिक सर्जरी : "सर ऍक्चुअली नो प्रोग्रेस टूडे, वॉज वेटींग फॉर द फिक्सेस, माय इश्श्यूज आर पेंडिंग सिंन्स लाँग, डिड यु आस्क पी.डी.जी.टीम (प्रोडक्ट डेव्हलपमेंट ग्रुप) ? "
फोकलीचा : "या आय स्पोक टू अठावले... ही सेड इट वील बी डन ऑन प्रायॉरिटी,बाय ट्युसडे ..."
(स्वः साला मलाच गोळ्या देतोय .. डुकराला तिकडून इश्शू सॉल्व नाही करता येत ? क्लायंट बोंबा मारतो तेंव्हा गप ? मी देऊ का हे उत्तर क्लायंटला ? )
प्लास्टिक सर्जरी: " सर द लिस्ट आय सेंट हॅज आयडीज् वीथ प्रायॉरिटी, प्लिज टेक अप"
( सुमारे ५१ मिनीटं बॉसने विनाकारण तासलं .. मनातुन तळतळाट परंतू प्लास्टिक सर्जरीतुन गोड गोड बोलत येस सर .. या सर बोलत वेळ कटवला .... याइथे माझं जेवण पुर्ण गार झालं , माझा कोंबडीवरचा रागही गेला, आणि मी जेवण तसंच ट्रॅश बीन मधे टाकून दिलं ... मग सुरू झालं विचार चक्र ... अरे आपण हे असं काय करतो ? तिकडे जेंव्हा इशू हॉट होतो, तेंव्हा ब्लेम गेम सुरू होतो, आणि दर वेळी खालचा दबतो म्हणून आपल्याला सगळं कळत असुनही फक्त गोडच बोलावं लागतं .. तर का ? तर त्यालाच हल्ली प्रोफेशनल म्हणतात म्हणे, राग गिळणे म्हणजे एक युजफूल स्किल आहे , आणि ते आलंच पाहिजे नाही तर तुमची प्रगती नाही... कितीही दबाव असला तरी आपला हाताळायचा , लोकांना तोंड देताना मात्र प्लास्टिक सर्जरी हवीच .. नाही तर तुमचं खरं नाही ... किंवा प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे तुम्हाला त्याचा त्रास हा भोगावाच लागणार , हल्ली फाटक्या तोंडाचा तोंडावर पडतो.
माझ्या बर्थ डे च्या दिवशी शनिवार होता, पुण्यातलं ऑफिस बंद , इथं प्रसिद्ध गोट रेस होती, माझ्या क्लायंट बँकेनेही त्यात भाग घेतला होता, मला बँड मिळाला,ज्याने त्याठिकाणी प्रवेश मिळू शकत होता, आणि अ ते ज्ञ पर्यंत सगळ्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी फुकट होत्या, त्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झालेला, आदल्या दिवशी मरिनाला (बॅ़केतली कलिग, होय तीच ती ६'३" भव्यदिव्य , अतिशय चांगल्या स्वभावाची अन मोठ्या मनाची ) सकाळी दहा वाजता कार घेउन ये म्हणालो , पावने नऊ ला फोन खनानला, हा दुसरा बॉस, ह्याचा दुसरा प्रोजेक्ट , दुसरी बँक .. थोडी शंका मनाला चाटून गेली
बॉस २ : "अरे प्रशांत.. कसा आहेस ? "
(कामाचं बोल केळ्या .. मला उशीर होतोय )
प्लास्टिक सर्जरी : " सर .. मी ठिक "
बॉस २ : "अरे एक काम होतं , जरा एच.एफ.सी.यू. मधे जायचं होतं.. आज तुझ्या बँकेत सुटीच असेल ना... जरा तिकडे जा ना ... नितीनला (रिसोर्स २, असुन नसल्यासारखा) जरा हेल्प कर, ऑरॅकल आणि ओ.एस.चे पॅचेस टाकून झालेत , जाउन फक्त डि.बी. अप कर ... "
( आयुष्यात मी फारच कमीवेळा रागाची परिसीमा गाठली आहे, या आधी हा राग समोरच्या व्यक्तीवर अक्षरश: आडवा उभा निघाला होता.. पण यावेळी मी प्लास्टिक सर्जरी केलेली ना)
प्लास्टिक सर्जरी : " सर , आज एक फंक्शन आहे , गोट रेस ला चाललोय ... "
(वाक्य तोडत)
बॉस २: "अरे ३-४ तासांच काम आहे, त्या नंतर जाना... "
(माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं .. किती तरफडलो याची कल्पना नाही ..)
प्लास्टिक सर्जरी : "ओके सर, आय'ल गो ... बाय "
हे वाक्य मी प्रचंड ताकद लाउन नम्रतेनं बोललो , आत किती खदबदलो असेल त्याची कल्पनाच करा ..
बँकेत गेलो , परिस्थिती पाहिली .. ना युनिक्सचे पॅचेस लावलेले , ना ऑरॅकलचे... नितीन ने बॉसला काय अपडेट केलेलं काय माहित.. नितीनला मस्करीच्या नादात डोक्यात एक फटका बसला, नितीनला दिवसभर काही सुधरत नव्हतं हा भाग अलहिदा. ..
दहाला मरिनाने फोन केला, मी एच.एफ.सी.यू. मधे आहे हे कळल्यावर ती तिकडे आली. एक काळी चकाचक मर्सिडीज सी-क्लास,मॉडेल २००२ ... अर्रे वा .. मरिना उतरली ते एक अतिशय रिच सुंगंध पसतवत, काळ्याच कलरची मिडी ड्रेस तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत होता, सनग्लासेस मधे मरिना नेली किंवा ५० सेंट किंवा शॅगीच्या व्हिडिओची 'बेब' वाटत होती. उतरून तिने मला सहजच मला एक घट्ट आलिंगण दिलं आणि मी शहारलो,
मरिना माझ्यापेक्षाही उंच आहे, माझ्यापेक्षाही धिप्पाड
तिनं मला गाडीत बसायला सांगितलं आणि मला तिला नाही म्हणनं किती जिवावर आलेलं हे शब्दांत सांगणे शक्य नाही. तिने भरपूर आग्रह केला , पण "मै कानुन के हाथो मजबूर था " , जाताना पुन्हा आलिंगण आणि शहारे
त्यादिवशी युनिक्स वाला माकड माणूस दुपारी एकला आला , त्याने पॅच लावण्यात घोटाळा केला आणि त्या दिवशी अक्षरशः शुन्य काम झालं .. पुन्हा बॉस २ ला प्लास्टिक सर्जरीतला मेल केला.
हे तर झालं कामातलं .. पण प्लास्टिक सर्जरी फार फार कॉमन आहे. रोजच्या जिवनात आपण मुखवटे घालूनच हिंडत असतो.. लांब का जाता ? मिसळपाव वर वावरताना पहा.. आपल्याला बरेच मुखवटे दिसतील. केवळ मर्जी हाशिल करणे, एखाद्याच्या फेवर मधे रहाणे अशा कारणांनी अनेक मुखवटे वावरत असतात. सर्जरीमागिल कारण नेहमीच ते केलं नाही तर आपल्याला आर्थिक किंवा अन्य तोटा होइल असे नाही तर बर्याचदा फार साधी कारण .. कधी कधी त्याला वाईट नको वाटायला असा पुर्वग्रह करून देखिल सर्जरी केली जाते ....
तर प्लास्टिक सर्जरी हे कलियुगातील एक अत्यावश्यक स्किल आहे , आणि आपण त्याला कळत नकळत ऍडॅप्ट झालो आहोत. आज प्रामुख्याने फक्त दोनच प्रकारचे लोक आहेत. ज्याने ओळखू न येणारी प्लास्टिक सर्जरी आहे, तो आज यशस्वी आहे लोकप्रिय आहे, ज्याने प्लास्टिक सर्जरी केलीये पण ती तृतीय श्रेणीची आहे म्हणून कोणालाही ओळखून येते तो फार गोत्यात जातो , त्याचा समोरचे गोड बोलून काटा काढतात. तिसरा प्रकार म्हणजे ज्याने कोणतीही सर्जरी केलेली नाही, असा जर बिगशॉट असेल तर खपून जाते , पण जर कॉमन मॅन असेल तर त्याला समुहीक 'फाट्यावर मारले जाते'
----------------------------------------------------------------------------------------------
डॉ.टारझन (प्लास्टिक सर्जन)
१५-११-२००८
वाचने
15651
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मस्त
पटेश
In reply to मस्त by घाटावरचे भट
छान.
छान लिहिले आहेस.
चांगला झालाय रे!
वाह वाह
In reply to चांगला झालाय रे! by रेवती
छान प्रकटन...
अग्रीड टोटली
In reply to छान प्रकटन... by बिपिन कार्यकर्ते
>>"आजूबाजूच
In reply to छान प्रकटन... by बिपिन कार्यकर्ते
फिलॉसॉफर
हिंदुस्ता
In reply to फिलॉसॉफर by विनायक प्रभू
टारुशेट
सहमत !!
छान..
टार्या
सही रे !!!
का र भौ
अर लेका दे
In reply to का र भौ by अवलिया
चांगलं
होय ... विश्वास आहे
In reply to चांगलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःला
In reply to होय ... विश्वास आहे by टारझन
सहमत .. आणि मान्य आहे
In reply to स्वतःला by ३_१४ विक्षिप्त अदिती
करेक्ट
In reply to होय ... विश्वास आहे by टारझन
तीच ही प्लास्टिक सर्जरी.
मस्त!
असेच म्हणतो
In reply to मस्त! by मनस्वी
तिसरा प्रकार
'व्हॅल्युज' चा डंका
In reply to तिसरा प्रकार by मैत्र
नाय नाय ....इन्फी नसल ...
In reply to 'व्हॅल्युज' चा डंका by तात्या विंचू
नोकर्या
In reply to नाय नाय ....इन्फी नसल ... by कुंदन
प्लास्टिक सर्जरी फक्त लहान मुले
मस्त रे !
(कामाचं
आम्ही लै
लवलाट
खरा चेहेरा
सुरेख
महाभारत द्वापारयुगात घडलं!
सुरेख
सही लिहीले
मस्त लेख आणि
वा वा
छान वास्तववादी लेख...
मस्त आहे !
मुखवटा अनिवार्य झालाय....