महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला. मोदींच्या बाबतीत बोलताना ते म्हणतात
एक म्हणजे हे मत आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला आहे असे त्यांनी
मानले.
दुसरे वाक्य
याचे कारण देशात बहुसंख्येने वाढलेल्या तरुण मतदारांना हिंदुत्व, निधर्मीवाद या थोतांडी वादांमध्ये काडीचाही रस नाही. त्यातही प्रचंड संख्येने शहरात साचलेला हा नवा मतदार वृत्तीने मनापासून धर्मनिरपेक्ष आहे. ती धर्मनिरपेक्षता तो जगतो आहे. आपला सहकारी, जेवणाचा डबा पुरवणारा वगैरे कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे हे पाहण्याची गरजही त्याला वाटत नाही
अनेक पत्रकारांचे हे प्रातिनिधिक मत असू शकते त्यामुळे यावर गांभीर्याने विचार झाला पाहीजे आणि म्हणूनच पुन्हा एकदा मनात विचार आला की खरोखर तरुण मतदारांनी मोदींना मत का दिले.
विकास की राजनिती चालत असेल तर मग राज ठाकरेंची विकासाची ब्लू प्रिंट आणि उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत दाखवतात तो टॅब का चालला नाही. धर्म वजा करून केलेला विकास आमच्या देशात स्वीकारला जातो का ! १६ मेपूर्वीचे वातावरण काय होते आठवून पहा. देशात २६/११ सारखे हल्ले होत होते. १३/०२ सारखे पुण्यात स्फोट होत होते. या हल्ल्यांमागे धर्माचे तत्त्वज्ञान
होतेच. शिक्षणासाठी धर्माच्या आधारावर स्कॉलरशिप, लोनची सुविधा. याच्या जाहीराती टिव्हीवर झळकत होत्या.
या देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क .... त्या वेळच्या पंतप्रधानांचे हे वाक्य जनता विसरली नव्हती.
बाँबस्फोट झाल्यावर सत्ताधारी नेते अथवा त्यांचे सहकारी दहशतवाद्याच्या घरी जावून त्याच्या माता पित्याचे सांत्वन करीत. काही मदतही जाहीर करीत. जनतेच्या मनात त्यामुळे असुरक्षितता होती. या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. ही गोष्ट जनता विसरली नव्हती.
कुठलाही विकास हा एका बाँबस्फोटाने ठप्प होतो. जम्मू-काश्मीरमधील हिंदूंना देखील आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले. तेव्हाचे सरकारही त्यांना वाचवू शकले नाही. हे जनता पाहत होती.
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो. रेल्वे स्टेशन्स, एस टी स्टँड् तसेच निरनिराळ्या पुलाच्या कडेला आणि पुलाखाली उभ्या राहीलेल्या अभारतीय वास्तू पहा. त्यांचा विस्तार वाढतो आहे. तिथे सर्व भारतीयांना आत जायला परवानगी आहे का ! सगळंच भीतीदायक आहे.
त्यामुळे अशा भितीदायक वातावरणात हिंदूत्त्व न टिकवता जर कोणी विकासाच्या गप्पा मारत असेल तर त्यावर जनता विश्वास कसा ठेवणार !
त्यामुळे दहशतवाद्यांना बाँबस्फोट करू द्या आपण आपला विकास करुया असे म्हणण्यातला फोलपणा जनता जाणते.
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही.
म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.
वाचने
13376
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकसत्तेतला लेख जास्त
असे लेख मोदींनी वाचले तर
+१ .. हे तर ते आधीच म्हणत
In reply to असे लेख मोदींनी वाचले तर by डॉ सुहास म्हात्रे
+१... अन तेही दिवसातून दोन
In reply to +१ .. हे तर ते आधीच म्हणत by हाडक्या
...
In reply to असे लेख मोदींनी वाचले तर by डॉ सुहास म्हात्रे
http://www.misalpav.com
हिंदु संघटित झाला कि कोणाच्याहि बापाचे ऐकत नाहि
ज्यांनी मत दिले त्यांनी आपण
खटासि खट, तू बावला हो गया
In reply to ज्यांनी मत दिले त्यांनी आपण by खटासि खट
@ वरचे दोन्ही,
In reply to खटासि खट, तू बावला हो गया by खटासि खट
याला म्हनत्यात...
In reply to @ वरचे दोन्ही, by खटासि खट
...
In reply to @ वरचे दोन्ही, by खटासि खट
प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष
...
In reply to प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष by निनाद मुक्काम …
प्रभारी नेतृत्वासका प्रभावी !अहो, तुम्हाला काहीच माहीती
In reply to प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष by निनाद मुक्काम …
...
In reply to अहो, तुम्हाला काहीच माहीती by खटासि खट