Skip to main content

मातृभाषा दिवस साजरा करू-मातृभाषेत बोलू

मातृभाषा दिवस साजरा करू-मातृभाषेत बोलू

Published on 20/02/2015 - 21:28 प्रकाशित मुखपृष्ठ
फेब्रुवारी महिना तसा प्रेमाचाच असतो. या महिन्यात आपापली प्रेमं योग्य तिथे व्यक्त करून झालीच असतील सगळ्यांची. उद्याचा दिवस आपलं मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्याचा आहे. मिपाकरांचं भाषाप्रेम माहीत असल्यामुळे हा धागा काढत आहे. २१ फेब्रुवारी हा 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची थोडी पार्श्वभूमी अशी: फाळणीनंतर बांगलादेश 'धर्म' या एका मुद्द्यामुळे एक अख्खा देश पलीकडे असणार्‍या पाकिस्तानशी जोडला गेला होता. पण जेव्हा 'उर्दू' ही एकमेव राष्ट्रीय भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेथील बांग्ला भाषकांची भाषिक अस्मिता जागी झाली. बांग्ला भाषेलाही समान दर्जा मिळावा म्हणून आंदोलन उभे राहिले. आणि ते आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ४ विद्यार्थी आंदोलकांना गोळ्या घालून मारण्यात आले. या घटनेवरून मोठा जनक्षोभ उसळला आणि बराच काळ लढा दिल्यावर शेवटी १९५६ मधे हा दर्जा बांग्ला भाषेला देण्यात आला. पाकिस्तानपासून वेगळेपणाची बांगलादेशीय ओळख निर्माण होण्यात हा भाषिक लढा एक महत्वाचा मुद्दा मानला जातो. सन २००० साली युनेस्कोने मातृभाषेची ताकद दाखवून देणार्‍या या दिवसाची आठवण म्हणून या दिवशी 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' साजरा करायचे ठरवले. 'मातृभाषा' या शब्दालाच अनेक पदर आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या राज्यांच्या भाषिक वर्गीकरणामुळे आणि 'भाषा व बोली' यांच्या व्याख्येच्या गोंधळामुळे त्या त्या राज्याची प्रमुख भाषा ती मातृभाषा असा काहीसा गैरसमज असतो. 'मातृभाषेतील शिक्षण' म्हणजेसुद्धा राज्याच्या प्रमुख भाषेतील शिक्षण असा काहीतरी गोंधळ याबाबतीत चालू असतो. एका भाषेच्या नावात सामावल्या जाणार्‍या अनेक बोली (आणि कदाचित भाषाही) या शैक्षणिक माध्यमाच्या प्रमाणीकरणामुळे मागे पडत आहेत. प्रत्येक बोलीला तेवढीच मान्यता असावी असं कितीही वाटत असलं, तरी काही आर्थिक, सामाजिक, राजकीय अडचणींमुळे ते कदाचित शक्यही होणार नाही. पण आपली स्वतःची बोली, तिचा आपल्यास अभिमान असेल, तर आपल्यापुरती तरी टिकवणं सहज शक्य आहे. तर या मातृभाषा दिवसानिमित्त, आपण या धाग्यावर स्वतःच्या मातृभाषेत काही ना काही लिहूया. मातृभाषेची तुमची स्वतःची जी व्याख्या असेल, तिच्यात बसणार्‍या कोणत्याही बोलीत लिहिलंत तरी चालेल. शक्य असल्यास त्या बोलीचे नाव, कुठे बोलली जाते ही माहिती द्यावी. माहिती नसल्यास नुसतंच काहीतरी लिहू शकता. शक्यतो अर्थ देऊ नये. अगदीच न समजेपर्यंत, जेवढा अर्थ समजला त्यावरून आपल्या मातृभाषेत प्रतिसादकर्ता प्रतिसाद देईल. चला तर मग, मातृभाषेत बोलू.

याद्या 11079
प्रतिक्रिया 81

मातृभाषेची माझी व्याख्या अशी की आपण लहान असताना आपली आई आपल्याशी ज्या भाषेत बोलते ती आपली मातृभाषा. माझी मातृभाषा मराठीच! मात्र इंग्लिश, हिंदी, कोंकणी या तेवढ्याच प्रेमाने शिकले! संस्कृतही आवडते. हापिसातले सहकारी आणि बॅटमन यांच्याबरोबर कन्नडमधेही बोलायचा प्रयत्न केला. आता एकच भाषा माझी असे म्हणू शकणार नाही. माझा मराठाची बोलू कवतुके परि तो अमृतातेही पैजा जिंके| इतकी गोड माझी भाषा! तिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तिच्या किती उपभाषा आणि बोली. तशाच इतर भाषांच्याही सर्व बोलींचीही जपणूक झाली पाहिजे, नाहीतर त्या अस्तंगत होत जातील. कर्नाटकात गेलेल्या कोंकणी लोकांचे उदाहरण समोर ठेवले पाहिजे. कित्येक पिढ्या कर्नाटकात गेल्या, कोंकणीला स्वतःची अशी धड लिपीही नव्हती. तेव्हा त्यांनी फक्त आपसात बोलून त्यांच्या घरांतून कोंकणी जिवंत ठेवली. आजही हे लोक आपली मातृभाषा कोंकणी म्हणून अभिमानाने सांगतात. तशीच तंजावरला गेलेल्या मराठी लोकांनी मराठी जिवंत ठेवली. आजही हे लोक आपली मातृभाषा मराठी म्हणून अभिमानाने सांगतात. मग आपल्याला ज्या भाषेतून शिकायला मिळालं, बोलायला मिळालं तर ती बोलायची एरवी लाज का वाटावी?

In reply to by पैसा

@"मातृभाषेची माझी व्याख्या अशी की आपण लहान असताना आपली आई आपल्याशी ज्या भाषेत बोलते ती आपली मातृभाषा. " >>> ब्बास! खल्ल्लास! :HAPPY: अगदी मनातली व्याख्या.

In reply to by बॅटमॅन

तुमची मातृभाषा आमच्या मातृभाषेपेक्षा वेगळी असल्यास अजाबात हर्कत नाय... पण मराठीतले भाषांतर दिल्यास तुम्हाला काय म्हणायचे ते आम्हालापण समजेल :)

In reply to by सस्नेह

चम्हालातु चपलीझे चीकी चीओ चईता..चवढं चते चंचीचको चैवजीअ चणतीको चण्हालातम्ह चरत चरफा चरंब चटेलवा... =)) चकीबा अलिंगकॉ चवाळट चर्टाका =))...चंधळगो चलायलाघा चणीचको चहिना..चरबो चलझा...

In reply to by सस्नेह

चईलीस्मा चलटीउ चताकटा चतये चहिना... :(... चल्हापुरीको चकांनालो चम्हीआ चलेंजचॅ चरतकं चहिना...चपशेलस चघारमा...चकीचे चपाकरमि चणतीलहा चताआ =))

In reply to by सस्नेह

चर्वाप चहीना. चलात्या चपणआ चल्हापुरीको चर्शनव्ह चंव्हाकि चलिभाषाबो चणूम्ह. चकानाकाहा :)

आय कम्पलीटली अ‍ॅग्री विथ यू. वी ऑल मस्ट स्पीक इन अवर मदरटंग. धिस वील हेल्प टू प्रिझर्व मराठी इन ऑल इटस ग्लोरी. माय हार्टीएस्ट बेस्ट ऑफ लक फॉर धिस इनिशिएटीव्ह. जय हिंद. जय महाराष्ट्र.

In reply to by काळा पहाड

मिष्टर डार्क ष्टोण, आय कंप्लिटली अ‍ॅग्री विथ यु. यु नो व्हॉट, वी शुड टेक इनिशिएटिव्ह टु प्रिझर्व्ह अवर मदर टंग. ऑल मराठी पीपल शुड बी युनायटेड अंडर भगवा फ्लॅग. अल्सो वी शुड गेट रिड ऑफ एव्हरी हिप्पोक्रीट अटेंप्ट ऑन अवर लँग्वेज...व्हॉट से यु? लाँग लिव्ह मराठी...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वोक्के सार्र्र्र्र!!! आय अ‍ॅम व्हेरी सॉरी फॉर माय लाष्ट कॉमेंट मिष्टर ब्लॅक स्टोन. आय होप दॅट वॉझंट रेसिस्ट फॉर यु...!!! =)) आय रन, यु रन..बीफोर सिझरियन टीम कम्स अप विथ सिझर अँड सिझेस डाउन ऑल द कॉमेंट्स =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आय डाऊट दे विल हॅव टाईम ऑर एनर्जी टू रीड ऑल दीज कॉमेंट्स. इट इस व्हेरी कम्बरसम टू डू सो. बट आय अ‍ॅग्री दॅट धिस इझ व्हेरी फन्नी वे ऑफ रायटींग पोस्ट्स. बाय द वे, इट इझ नॉट ब्लॅक स्टोन, इट इझ ब्लॅक माऊंटन.

In reply to by काळा पहाड

सॉरी वन्स अगेन सार्र...हिअर ऑनवर्ड्स यु विल बी नोन अ‍ॅज (Ser) सार्र ब्लॅक माऊंटन. इफ ओन्ली मिष्टर बाबुराव अर्नाळकर रिड्ज धिस... =))

आंवशीक खावंक, ह्या पिश्या अबोलीक नाय कामधंदो! काय तरी नाय तिकडची खुळां काढतां! म्हणां, "स्वतःच्या मातृभाषेत काहीतरी लिहा!" कित्यांक? आमी आमच्या मातृभाषेत काय तरी लिहितलोंव. मिपाकरी मेंबरां तां र-ट-फ करत वाचतलीं. तेंका शिंदळीच्यांक त्यातले अर्धे म्हणी लागूचे नाय. मगे ह्याचो अर्थ काय आणि त्याचों अर्थ काय म्हणान विचारत येतली. बरां ता बरां पण अर्थ जाणून घेवंन गप्प बसूंची नाय, मेल्यांचा तोंड ह्या तिरफळाचा; सदैव उघडां!! उगीच तेंच्यावर चर्चा करत बसतंली इकाळ्या पावसाची!!! सांगितलो कोणी हो उद्योग? उगीच भिंतेक तुमड्यो लावंन बसूचे धंदे!!! तेंपेक्षा कढी-शित खावंन दोन तास नीज काढलेली काय वायट!!! (काय उतरलंय का आमच्या मातृभाषेचं वळण?) :)

In reply to by खटपट्या

आमी आमच्या मातृभाषेत काय तरी लिहितलोंव. मिपाकरी मेंबरां तां र-ट-फ करत वाचतलीं.
खयचा रें तू ??
प्रत्ययकारी लिखाण म्हणतंत ता असा! ;) ('चों'बडेपणाबद्दल दिलगीर आहे. कृ.ह.घे., खटपट्याजी)

In reply to by खटपट्या

तू गप रंव रे मेल्या!! कड्येचो सत्यानाश ज्या कोणी केलो होतो त्याचो रेफरन्स असां हयसर!!.. 'पुणेकार' बगितला का इले !! :P

In reply to by पिवळा डांबिस

कढी- शीत आणि वांगडा बांगडुल्यांचा हुमण नायतर तिसर्‍या, खुब्यांची भाजी तरी नको? आणि वालीची भाजी इसरलातशे?

போன்ற கடுமையான பொருள் பதில்கள் மிகவும் ஏமாற்றம் தான். இன்று நான் ஒரு மிபபகர் இருப்பது வெட்கமாக பூர்த்தி. பைய்ஜாரபுவா

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

ఈ రోజుల్లో తెలుగుని చాలా సులువుగా టైపు చెయ్యవచ్చు. అందుకు చాలా పరికరాలు, పద్ధతులు అందుబాటులో ఉన్నాయి. వాటన్నింటి సమాహారమే ఈ టపా.

In reply to by सस्नेह

वरच्या दोन्ही भाषा वाचायला यक्कदम्म सोप्या आहेत.... गुडुगुडू गुडुगुडू गुडूम् गुड्गुड् गुड्गुड् कुममुडू कूडुम् कुडुकूडू... इ इ इ +D

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पोण्ड्रु कडुमैयान पोरुळ् पदिल्गळ् मिगवुम् एमाट्रम् तान. इण्ड्रु नान ओरु मिपपगर इरुप्पदु वेट्कमाह पुर्त्ति. (म्हणजे काय ते इच्यारू नका. आम्ही फक्त वाचून दाखवलेय, तेवढेच येते =)) )

In reply to by बॅटमॅन

छ्या, बात काय जमी नाय ! खडे दाक्षिण्यात्य मडक्यात घालून हालवले किंवा देवनागरी मडक्यात घालून हालवले... आम्हाला तोच अनाकलनीय आवाज ऐकू येतो ;) कायतरी समजेल असा आवाज काढा :)

खानदेशात अहिराणी भाषा बोलली जाते. ती माझी मातृभाषा नसली, तरी लहानपणापासून ऐकत आल्यामुळे तिच्यातले शब्द कानावर पडले की बरे वाटते. ('सकाळ' वृत्तपत्राच्या जळगाव आवृत्तीत अधूनमधून तिच्यातले शब्द वाचायला मिळतात. कुठल्या गोंधळाची बातमी असली की त्यात हमखास 'दांगडो' असा शब्द वापरतात.) खानदेशात अहिराणीशिवाय इतरही अनेक बोली आहेत. सर्वच बोलींवर गुजराती, राजस्थानी, हिंदी आणि अर्थातच मराठीचा प्रभाव आहे. गुजरातला लागून असलेल्या भागात गुजराथीचा प्रभाव जास्त आहे, तर बऱ्हाणपूरकडच्या भागात हिंदीचा. बोलण्याचा सूरही त्याप्रमाणे बदलतो. शहादा, नंदुरबार या भागातलं बोलणं मला कानाला खडखडीत वाटतं, तेच रावेर, यावल या पट्ट्यात लांब सुरात बोललं जातं आणि कानाला गोड वाटतं. जळगाव, भुसावळ या भागात रोखठोकपणा जास्त असतो. अजयाने विचारलेला प्रश्न या भागात असा विचारला जाईल - तुम्ह्न येड लागेल शे का? / चगी गये का वो? हाझा कैफा! शुक्रान! :)

In reply to by विशाखा पाटील

मले बी हेच म्हन्न होत व !! तुन्ह एकदम नेम्बंदी सांगी दिलं पाय बैना...........त गोट आशी शे कि मन्ही माय काय अहिराणी नि बोले तरीबी आम्हाला थोडीफार इ जास बोल्याले ..पाय बैना पिशे ,तुले काही समजी राह्यला का नाही वं ??का आम्हाले बठे कामाले लाइसन मज पाहत ऱ्हास वं !!! *wink*

मिपा वर मातृभाषे वरून रचला गेला इतिहास. सर्वच मान्यवर लागले बोलू. संपादक करणार हस्तक्षेप. काहीतरी भाषिक षडयंत्र गेले रचले असण्याची आशंका

काल पिशीबरं गप्पा मारत होताव तवा तिनं मनलाल्ती की आज असं असं मातृभाषेत बोलायचं.. मी म्हणलं कामुन ? तर म्हणे असा असा दिवस साजरा करायचा ! मग मी म्हनलं कॉलेजमधी काय कर्लालाव आज? तर म्हने पोरं प्रेझेंटेश्नं कर्लालेत. मी पन मग कळचिट्यावानी कळ लावलेव. म्हनले अगं नुस्ती काय बोलाय्लीस? लिहून हुच्चपना कर की ! तिनं बी मन्ली का लिहिते. एकीकडं पोरं काय काय कर्लालेत. निस्ते पैशे उडूलालेत...बापायच्या कारी न सुझ्क्या उडुलालेत. लाहाच्चरपना उतू जाउ लालाय. आन बघावं तर ही बया अस्ले दिवस साजरे कर्लालीय. उगं आपलं देणं न घेणं न् फुक्कटचं कंदिल लावनं ! लोकं पन लैच्च शाणे ! मातृभाषा म्हनलं की जे चेव आल्यानि ! कवाचं बडबडलालेत एक शब्द कळना झालंय. जाऊ द्या ! ह्यांनी यायची वेळ झाली. कोरड्यास करते आता.

मन्ही आजी, मन्ही माय नी भाशा शे अहिराणी. आते अहिराणी बद्द्ल सांगाले येय नही, नहीते आठ्ठेच बठ्ठ लिखी टाकतु.पन कसं शे तेन्ह, वरते बठ्ठा तेस्नी तेस्नी भाशामा चालु पडी जायेल शेतस म्हन्त मन्ह्या बी चार दोन वयी टाकी दिसु. आखो कोनी शे कारे भो.

येक सांगा मला. मी हित्त जर अस्सल का काय म्हणत्यात त्ये कोल्लापुरी लिवल तर किती श्या द्याय लागतील मला येका वाक्यात?

In reply to by स्पंदना

=)) आजपर्यंत जेवढे कोल्हापुरकरं मित्रमैत्रिणी जोडलेत त्यातला एकही दोन विशेष शिव्या सोडल्या तरं बाकी देताना दिसलेला नाही. एक म्हणजे दोन अक्षरी आणि पुढे च्या/ ची आणि दुसरा म्हणजे तीन अक्षरी आणि त्याच्या पुढे च्या/ चे =))...कोल्लापुरी भल्तेचं जंटलमण/ जंटलवुमण =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्या दोन तीन शिव्याच कुठे पण वापरता येतात . खालचा दोन मित्रांचा संवाद बघा अ--काय पिंट्या कुटयस सध्या . ब--काय भावा निवांत हाय बघ.जरा पुन्याला गेल्तो रे . नवीन एक काम घेत्लोय त्याचीच जरा जुळना कारालतो . अ. आज काय लेवल करायची का रात्री . ब: करूया कि … पक्या रांXXने माझे ५००० द्यायचे आहेत त्याला बी बोलवूया . अ: पक्या लई बारा चा हाय . आन त्यो संज्या बी तसलाच रांXXचा ब : ठीकाय चौग तर भेटू . पण नक्की करा .आयत्या वेळी घोळ नको . पक्याच्या बा चा एक कोन तर एक ओळखीचा हाय त्याने नवीन हॉटेल चालू केल्या . तिथे जाऊ . भारी करताय म्हन जेवन रांXXचा

नमस्कार.कितां म्हणसा?आमी बरी सां सगळी.आमचे हे आयले. तेना खायवे हुन हुन भाकरी भाजनी देसां खापरावेल्ली. अणि मग येसां खबरी मारे. बरां ते.

रंजक इतिहास आहे दिवसाचा मातृभाषा दिवसाचा

माझी मातृभाषा मराठी-गोवन फ्लेवर वाली. पण माझ्या मातृभाषेसोबतच शिकलेल्या 'पद्ये' या गोव्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीत मी माझा प्रतिसाद देतेय. आज या दिवसानिमतान तुमी येथें आपापल्या मातृभाषेत बोलली ते मज बरें दिसलें. मराठीच्यान सुरु जाल्ल्या तुमच्या खबरी सारक्या कन्नड़ार पावल्या. मग इंग्लिशेत बी खबरी जाल्या त्या काय मज कळया नाय सारक्या.मालवणी रीतीन खाल्लल्या गाळ्यासुद्दा बर्या गोड दिसल्या. मिपाचेर इंग्लिश आणि जपानी अशा दोनय भाषांस मातृभाषा म्हणोवपि लोक हाय ते बघून मिपाचा अभिमान दिसला मज. आंजेस तेथे मराठी बलावया कोण मेळत नाय म्हणतकच बापड़ेस पुर्तुगेज बलावी पडली. जिलब्या कसल्या त्या काय मज कळ्या नाय. मग मज थोड़ीशिच कळटे ती अहिराणी आयकून बरें दिसले. माझी या धाग्याची प्रेरणा म्हणू येते अशी मितानताई वर्हाडी बोल्लीशी दिसली मज. मधेच मज न समजपी संस्कृत सारकि दिसपी एक भाषा आली. कोल्लापुरीतल्या गाळयां चेर एक बरी चर्चा जाली. चित्पवानी आयकून मज आता तिचा अब्यास करावासा दिसोवया लागला. इतक्या सगळ्या भाषा सगळी बोलत असतना लोकांनी त्यांची बरीss मतांसुद्दा लिहल्ली बघितली मी मध्ये मध्ये. अशा तरेन् मातृभाषा दिवस मिपाचेर बराss करून संपन्न म्हणतात तो जाला!

In reply to by पिशी अबोली

वर्हाडी नाय गं... लातराकडची मराठवाडी बोल्लाल्ते.कळ्ना झालंय? आंय? सगळ्या गप्पा वाचताना लई मजा येउलालीय.:)

In reply to by मितान

सध्या मिपावर श्री उद्धव गावंडे अन श्री सोन्याबापु हे दोघे वर्‍हाडी शैलीमध्ये लिहितात. लेखनविषय मनापासून आवडतो. लेख व प्रतिसाद आवडले. या धाग्यासाठी पिशी अबोली यांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by पिशी अबोली

मजय ह्या भटी भाशेर काम कराचें हाय. आमच्यां घरीं सगळी बोलतांत .मजच सारकी बोलावया जमेना.

इरसाल , आरोही आनि विशाखा पाटील यास्नी तर पहलेच सान्गी देल शे कि आहिराणी जरी आम्नी माय बोलत व्हती , तरी बी आमले सम्जत व्हती. आम्ही सम्दाजन जरी मराठी मा शिकेल शेतस , तरी बी आम्ले आहिराणी आम्नि मायनी भासा लागस ! ! मना जोडे एक आहिराणी गीता व्हती.मंजे श्लोकेस्ना अर्थ आहिराणी भासामा देल व्हता. अर्जुन नी जवय समुर आपलाच सगास्ले मारामारीनुकरता उभा देखा , तवय तो रथमां बठी राह्यना ,तवय क्रुस्ना त्याले म्हनस " तु कसाले चिन्ता करस , ह्या बठ्ठास्ले अस लागाव शे " मी गेल्या पंधरा वर्षापासुन पहातोय कि मराठी माणुस समोरच्याला 'भय्या' समजुन नेहमी हिन्दीतुनच बोलण्याला सुरवात करतो. परवा MTNL च्या कार्यालयात गेलो होतो समोरच्या काकु अगदी पुर्ण महाराष्ट्रीयन साडी नेसलेल्या असुन मराठी बोलणार्‍या दिसत होत्या, तरीही त्यांनी हिन्दीतुन मला सांगावयास सुरवात केली. एक वाक्य झाल्यावर मी त्यांना टोकले " तुम्ही मराठी चांगले बोलू शकता ना ? मग मराठीतच बोला ना ! मला हिन्दी समजत नाही असं नाही, पण तुम्ही हिन्दीतुन कां सुरवात करतां? " काकू म्हणाल्या , " नाही , काही लोकांना मराठी समजत नाही ना " . मी काकूंना सांगितले , " नेहमी मराठीतुन बोलण्यास सुरवात करावी, समोरचा अगदीच बावळटासारखे समजत नसल्याचा आव आणू लागला , तरच तुमचं हिन्दी सुरु करा." नाही म्हटलं तरी काकू थोड्या वरमल्या आणि जाता जाता मी सुद्धा काकूंना शेवटी सुनावलेच," आपणच मराठी वापरणे कमी केले , तर मराठी भाषा टिकेल कशी ? " इरसाल्,आरोही आनी विशाखा यास्ले व्यनि धाडाले शे , कसा धाडू ? आहिराणी भासाना बारामा . लिखी धाडी ज्यात.

नेहमीचाच एक अनुभव, सरकारी कामानिमित मुंबई वरून फोन येतात, मराठी माणसाचा आवाज ऐकला (कधी कधीच ऐकायला मिळतो), मी मराठीच उत्तर देतो, तरी ही तिथून न कळणाऱ्या हिंदीत उत्तर येते. अशी चीड येते.... xxxxx कधी कधी तर म्हणावे लागते, साहेब मला मराठी कळते, जरा मराठीतच बोला कि... कधी कधी तर हद होते, दिल्लीत येणारा मराठी माणूस, मी मराठीत बोलतो तरी ही तो हिंदी किंवा मोडक्या-तोडक्या आंग्ल भाषेत. विचित्र वाटते. खास करून मुंबईकरांची सवय. (अर्थातच महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी इत्यादी).

In reply to by विवेकपटाईत

मी मराठीच उत्तर देतो, तरी ही तिथून न कळणाऱ्या हिंदीत उत्तर येते. अशी चीड येते.... xxxxx कधी कधी तर म्हणावे लागते, साहेब मला मराठी कळते, जरा मराठीतच बोला कि... कधी कधी तर हद होते, दिल्लीत येणारा मराठी माणूस, मी मराठीत बोलतो तरी ही तो हिंदी किंवा मोडक्या-तोडक्या आंग्ल भाषेत. विचित्र वाटते. खास करून मुंबईकरांची सवय ही लागण आता पुण्यातही दिसायला लागलीय. :(

अलिकडेच नेमांडेंवरून उठलेले मतभेद आठवले. कॉलेजमध्ये असताना माझ्या वर्गात श्रीमंत मुलांचा एक वेगळा गृप होता. त्यात एक मराठमोळ्या आडणावाचा मुलगा होता पण त्याने कधीच मराठीतून कुणाशीच संवाद नाही केला. त्यावेळेला मला ते खूप विचित्र वाटायचं. याच्या अगदी उलट काही वर्षांपूर्वी मनोगतवर एका आईचा लेख वाचला होता. अमेरिकास्थित आईने हट्टाने मुलाला आपली मातृभाषा शिकवली होती. या निमित्ताने टाईम्स मध्ये लेख लिहिणार्‍या एका स्तंभ लेखकाचं ट्वीट आणि टाईम्स चा अग्रलेख बोलका आहे. शहरातल्या नवश्रीमंत वर्गाची मातृभाषा आता इंग्रजीच आहे आणि बहुविध प्रांतातली मुलं एकाच शाळेत असल्याने मध्यम वर्गीय नवपिढीची व्यवहाराची भाषा हिंदी होतेय असे जाणवते. भाषेच्या भिंती पडतायत. भाषेची अस्मिता कमी होतेय ते एका अर्थाने चांगलं आहे. पण मातृभाषा/बोलीभाषा शहरातून तरी हळूहळू कमजोर होत चालली आहे असे मला वाटते. :(

आता व्हय म्हणावं का व्हैक? आसं निस्त श्या म्हणायचा अवकाश श्या द्यून रिक्कामी!! सु####!! आन ही पिशी. पिरमावरन सुरु झाली आन मातृभासेवर घसारली. लोकं बी बगा? मुडदा बश्शीवला त्यांचा. लागली काड्कुड कराया. त्ये काय म्हनत्यात त्ये "कराया गेली पर तिची तंगडी झाली वर" तस्ला मामला!! बग्गाया गेलं तर येकाचाबी ही माजी भासा असा सूर दिसत न्हाय. उटल्याती आपली वारुळ फुट्टवं तश्शी. म्होरल्या टायमाला पिशे जरा सळ्ळ सांग. म्हनावं आयन ज्या भासत दुध पाजलं त्या भासेत बोला गपगुमान. ह्ये आस वर त्वांड करुन घुबडावानी घूं घुं नगा करु. ये पिश्शे!! आग हाय का न्हाय ध्यान तुज म्या काय बोलते त्याकडं. त्या झिपर्‍या आवर लगालगा आनी ये हिकडं.

स्थळ क्र - १:- ता.श्रीवर्धन्,जि.रायगड मधील १ खेडेगाव..तेथील एक चहा/चिवड्याचं हाटेल. बाहेर २ बाकडी..आजुबाजुला येश्टीची (नायतर..विक्रम'ची...) वाट बघनारे १० /१५ लोकं.. १:- तू खडप्यात भेट.मं तूला दाखवतो! २:- काय झाला रे? १:- काय नाय रे..साल्यानी माजा माश्याचा गल पलवलान, काटि मोडलीन साल्यानं..**मारिचा साला! ३:- हा बं....भारीच उखडतो हो मेला त्याच्यावर..येखाद्दिवशी खूनबिन करशील कुनाचा!.. १:- माजा डोका नको हा फिरवू..साल्यानो तुमी त्याची बाजू घेता का...य? माजा गल संद्याकाल परेंन मिलाला नाय ना? तर रविन हो मी त्याला..याद राका! २:- आज काय म्होहाची का? ३:- ह्हा ह्हा ह्हा.... १:- एं..... हा बं..हा बं... (गचांडी धरून..) परत म्होहाची म्हनून काय बोल्लास ना,त साल्या तुजाच गेम करून टाकिन ..काय??? तोंड सांबालून बोलायचा. उगाच डोका खराब नाय करायचा सकाल सकालच्या टायमाला.. (पुढं दोगांनी येकमेकांना शिव्या दिल्या..आनी फलिकडून सकाली ९ ची, म्हस्ला शिवर्दन म्हस्ला आली...तशी १ तिच्यात बसून ग्येला .आनी २ आनी ३ त्याच्या नावानी आणखि शिव्या मोजत ताडी(सरकारमान्य क्रेंद्र क्रं:-३२) कडे गेले. ) ============================= स्थळ क्र- २:- पुण्यातील एक पेठ.. वेळः- दुपारि ४ . पक्या:- आयच्या गावात...कत्ला माल ए भाऊ अव्या:- डोळ्यात **ला का कुनी? यायला स्कूटी न् ट्येंपोतला फरक कळना झाला तुला...तिज्यायचं बॅट्री त्येच्या! पक्या:- तुच घ्ये डोळ्यात २ ठेंब टाकून..सर्कारी दवाकान्यातनं.. तुला चिक्कू-सपारचंद'वानी दिस्तोय! संद्या:- हॅ हे हॅ हॅ हॅ.. खोट्णीस आरोग्य क्येंद्र (म.ण.पा.) क्रमांक येकोनीस! पक्या:- ह्या ह्या ह्या.... संद्या? तू अज्जून जातो का रे...तितं...- सुकडीपूड खायला. अव्या:- आईईईईईईई शपत.... त्ये काय अस्तं र्ये??? संद्या:- हे....बघ हे...अज्जुन णाय व्हय म्हैत झालं तुला? अर्र त्ये सातू घवाचं गूळ टाकल्येल पीट! पान्यात णायतर दुदात खायच्ये त्ये! अव्या:- हा ल्हान पनी त्येच जास्ती खायचा..म्हनून नजर उतरली ऐन जवानीत...! ( =)) ) संद्या:- ह्या ह्या ह्या ह्या.... पाचवीत अशेपरेंतं सुकडीपूड...आनी नंतार??? ह्या ह्या ह्या ह्या!!! पक्या:- हॅ हॅ हॅ हॅ हॅ.... तेज्यायचं ह्ये संद्या हे ना....लै बारा बो*&^% ( =)) ) संद्या:- मला म्हन्तो बारा बो*&^%...आनी तू काय कमी होता का रे भाड्या? लकडी पुलाच्या खाली नदिला जायचो आम्मी.. ख्यक्डे धरायला... तवा पायलावता तुला...शिग्रेटच्या थोटकांचा धूर - भरुण हवेत सोडून द्यायचा तू त्ये!!! अ‍ॅऐचं आट्रा बो%$#*&चं! हो टिकडं! ( :D ) ====================================