Skip to main content

मातृभाषा दिवस साजरा करू-मातृभाषेत बोलू

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 20/02/2015 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना तसा प्रेमाचाच असतो. या महिन्यात आपापली प्रेमं योग्य तिथे व्यक्त करून झालीच असतील सगळ्यांची. उद्याचा दिवस आपलं मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्याचा आहे. मिपाकरांचं भाषाप्रेम माहीत असल्यामुळे हा धागा काढत आहे. २१ फेब्रुवारी हा 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची थोडी पार्श्वभूमी अशी: फाळणीनंतर बांगलादेश 'धर्म' या एका मुद्द्यामुळे एक अख्खा देश पलीकडे असणार्‍या पाकिस्तानशी जोडला गेला होता. पण जेव्हा 'उर्दू' ही एकमेव राष्ट्रीय भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेथील बांग्ला भाषकांची भाषिक अस्मिता जागी झाली. बांग्ला भाषेलाही समान दर्जा मिळावा म्हणून आंदोलन उभे राहिले. आणि ते आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ४ विद्यार्थी आंदोलकांना गोळ्या घालून मारण्यात आले. या घटनेवरून मोठा जनक्षोभ उसळला आणि बराच काळ लढा दिल्यावर शेवटी १९५६ मधे हा दर्जा बांग्ला भाषेला देण्यात आला. पाकिस्तानपासून वेगळेपणाची बांगलादेशीय ओळख निर्माण होण्यात हा भाषिक लढा एक महत्वाचा मुद्दा मानला जातो. सन २००० साली युनेस्कोने मातृभाषेची ताकद दाखवून देणार्‍या या दिवसाची आठवण म्हणून या दिवशी 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' साजरा करायचे ठरवले. 'मातृभाषा' या शब्दालाच अनेक पदर आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या राज्यांच्या भाषिक वर्गीकरणामुळे आणि 'भाषा व बोली' यांच्या व्याख्येच्या गोंधळामुळे त्या त्या राज्याची प्रमुख भाषा ती मातृभाषा असा काहीसा गैरसमज असतो. 'मातृभाषेतील शिक्षण' म्हणजेसुद्धा राज्याच्या प्रमुख भाषेतील शिक्षण असा काहीतरी गोंधळ याबाबतीत चालू असतो. एका भाषेच्या नावात सामावल्या जाणार्‍या अनेक बोली (आणि कदाचित भाषाही) या शैक्षणिक माध्यमाच्या प्रमाणीकरणामुळे मागे पडत आहेत. प्रत्येक बोलीला तेवढीच मान्यता असावी असं कितीही वाटत असलं, तरी काही आर्थिक, सामाजिक, राजकीय अडचणींमुळे ते कदाचित शक्यही होणार नाही. पण आपली स्वतःची बोली, तिचा आपल्यास अभिमान असेल, तर आपल्यापुरती तरी टिकवणं सहज शक्य आहे. तर या मातृभाषा दिवसानिमित्त, आपण या धाग्यावर स्वतःच्या मातृभाषेत काही ना काही लिहूया. मातृभाषेची तुमची स्वतःची जी व्याख्या असेल, तिच्यात बसणार्‍या कोणत्याही बोलीत लिहिलंत तरी चालेल. शक्य असल्यास त्या बोलीचे नाव, कुठे बोलली जाते ही माहिती द्यावी. माहिती नसल्यास नुसतंच काहीतरी लिहू शकता. शक्यतो अर्थ देऊ नये. अगदीच न समजेपर्यंत, जेवढा अर्थ समजला त्यावरून आपल्या मातृभाषेत प्रतिसादकर्ता प्रतिसाद देईल. चला तर मग, मातृभाषेत बोलू.
लेखनविषय:

वाचने 11100
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

इरसाल , आरोही आनि विशाखा पाटील यास्नी तर पहलेच सान्गी देल शे कि आहिराणी जरी आम्नी माय बोलत व्हती , तरी बी आमले सम्जत व्हती. आम्ही सम्दाजन जरी मराठी मा शिकेल शेतस , तरी बी आम्ले आहिराणी आम्नि मायनी भासा लागस ! ! मना जोडे एक आहिराणी गीता व्हती.मंजे श्लोकेस्ना अर्थ आहिराणी भासामा देल व्हता. अर्जुन नी जवय समुर आपलाच सगास्ले मारामारीनुकरता उभा देखा , तवय तो रथमां बठी राह्यना ,तवय क्रुस्ना त्याले म्हनस " तु कसाले चिन्ता करस , ह्या बठ्ठास्ले अस लागाव शे " मी गेल्या पंधरा वर्षापासुन पहातोय कि मराठी माणुस समोरच्याला 'भय्या' समजुन नेहमी हिन्दीतुनच बोलण्याला सुरवात करतो. परवा MTNL च्या कार्यालयात गेलो होतो समोरच्या काकु अगदी पुर्ण महाराष्ट्रीयन साडी नेसलेल्या असुन मराठी बोलणार्‍या दिसत होत्या, तरीही त्यांनी हिन्दीतुन मला सांगावयास सुरवात केली. एक वाक्य झाल्यावर मी त्यांना टोकले " तुम्ही मराठी चांगले बोलू शकता ना ? मग मराठीतच बोला ना ! मला हिन्दी समजत नाही असं नाही, पण तुम्ही हिन्दीतुन कां सुरवात करतां? " काकू म्हणाल्या , " नाही , काही लोकांना मराठी समजत नाही ना " . मी काकूंना सांगितले , " नेहमी मराठीतुन बोलण्यास सुरवात करावी, समोरचा अगदीच बावळटासारखे समजत नसल्याचा आव आणू लागला , तरच तुमचं हिन्दी सुरु करा." नाही म्हटलं तरी काकू थोड्या वरमल्या आणि जाता जाता मी सुद्धा काकूंना शेवटी सुनावलेच," आपणच मराठी वापरणे कमी केले , तर मराठी भाषा टिकेल कशी ? " इरसाल्,आरोही आनी विशाखा यास्ले व्यनि धाडाले शे , कसा धाडू ? आहिराणी भासाना बारामा . लिखी धाडी ज्यात.

नेहमीचाच एक अनुभव, सरकारी कामानिमित मुंबई वरून फोन येतात, मराठी माणसाचा आवाज ऐकला (कधी कधीच ऐकायला मिळतो), मी मराठीच उत्तर देतो, तरी ही तिथून न कळणाऱ्या हिंदीत उत्तर येते. अशी चीड येते.... xxxxx कधी कधी तर म्हणावे लागते, साहेब मला मराठी कळते, जरा मराठीतच बोला कि... कधी कधी तर हद होते, दिल्लीत येणारा मराठी माणूस, मी मराठीत बोलतो तरी ही तो हिंदी किंवा मोडक्या-तोडक्या आंग्ल भाषेत. विचित्र वाटते. खास करून मुंबईकरांची सवय. (अर्थातच महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी इत्यादी).

In reply to by विवेकपटाईत

मी मराठीच उत्तर देतो, तरी ही तिथून न कळणाऱ्या हिंदीत उत्तर येते. अशी चीड येते.... xxxxx कधी कधी तर म्हणावे लागते, साहेब मला मराठी कळते, जरा मराठीतच बोला कि... कधी कधी तर हद होते, दिल्लीत येणारा मराठी माणूस, मी मराठीत बोलतो तरी ही तो हिंदी किंवा मोडक्या-तोडक्या आंग्ल भाषेत. विचित्र वाटते. खास करून मुंबईकरांची सवय ही लागण आता पुण्यातही दिसायला लागलीय. :(

अलिकडेच नेमांडेंवरून उठलेले मतभेद आठवले. कॉलेजमध्ये असताना माझ्या वर्गात श्रीमंत मुलांचा एक वेगळा गृप होता. त्यात एक मराठमोळ्या आडणावाचा मुलगा होता पण त्याने कधीच मराठीतून कुणाशीच संवाद नाही केला. त्यावेळेला मला ते खूप विचित्र वाटायचं. याच्या अगदी उलट काही वर्षांपूर्वी मनोगतवर एका आईचा लेख वाचला होता. अमेरिकास्थित आईने हट्टाने मुलाला आपली मातृभाषा शिकवली होती. या निमित्ताने टाईम्स मध्ये लेख लिहिणार्‍या एका स्तंभ लेखकाचं ट्वीट आणि टाईम्स चा अग्रलेख बोलका आहे. शहरातल्या नवश्रीमंत वर्गाची मातृभाषा आता इंग्रजीच आहे आणि बहुविध प्रांतातली मुलं एकाच शाळेत असल्याने मध्यम वर्गीय नवपिढीची व्यवहाराची भाषा हिंदी होतेय असे जाणवते. भाषेच्या भिंती पडतायत. भाषेची अस्मिता कमी होतेय ते एका अर्थाने चांगलं आहे. पण मातृभाषा/बोलीभाषा शहरातून तरी हळूहळू कमजोर होत चालली आहे असे मला वाटते. :(

आता व्हय म्हणावं का व्हैक? आसं निस्त श्या म्हणायचा अवकाश श्या द्यून रिक्कामी!! सु####!! आन ही पिशी. पिरमावरन सुरु झाली आन मातृभासेवर घसारली. लोकं बी बगा? मुडदा बश्शीवला त्यांचा. लागली काड्कुड कराया. त्ये काय म्हनत्यात त्ये "कराया गेली पर तिची तंगडी झाली वर" तस्ला मामला!! बग्गाया गेलं तर येकाचाबी ही माजी भासा असा सूर दिसत न्हाय. उटल्याती आपली वारुळ फुट्टवं तश्शी. म्होरल्या टायमाला पिशे जरा सळ्ळ सांग. म्हनावं आयन ज्या भासत दुध पाजलं त्या भासेत बोला गपगुमान. ह्ये आस वर त्वांड करुन घुबडावानी घूं घुं नगा करु. ये पिश्शे!! आग हाय का न्हाय ध्यान तुज म्या काय बोलते त्याकडं. त्या झिपर्‍या आवर लगालगा आनी ये हिकडं.

स्थळ क्र - १:- ता.श्रीवर्धन्,जि.रायगड मधील १ खेडेगाव..तेथील एक चहा/चिवड्याचं हाटेल. बाहेर २ बाकडी..आजुबाजुला येश्टीची (नायतर..विक्रम'ची...) वाट बघनारे १० /१५ लोकं.. १:- तू खडप्यात भेट.मं तूला दाखवतो! २:- काय झाला रे? १:- काय नाय रे..साल्यानी माजा माश्याचा गल पलवलान, काटि मोडलीन साल्यानं..**मारिचा साला! ३:- हा बं....भारीच उखडतो हो मेला त्याच्यावर..येखाद्दिवशी खूनबिन करशील कुनाचा!.. १:- माजा डोका नको हा फिरवू..साल्यानो तुमी त्याची बाजू घेता का...य? माजा गल संद्याकाल परेंन मिलाला नाय ना? तर रविन हो मी त्याला..याद राका! २:- आज काय म्होहाची का? ३:- ह्हा ह्हा ह्हा.... १:- एं..... हा बं..हा बं... (गचांडी धरून..) परत म्होहाची म्हनून काय बोल्लास ना,त साल्या तुजाच गेम करून टाकिन ..काय??? तोंड सांबालून बोलायचा. उगाच डोका खराब नाय करायचा सकाल सकालच्या टायमाला.. (पुढं दोगांनी येकमेकांना शिव्या दिल्या..आनी फलिकडून सकाली ९ ची, म्हस्ला शिवर्दन म्हस्ला आली...तशी १ तिच्यात बसून ग्येला .आनी २ आनी ३ त्याच्या नावानी आणखि शिव्या मोजत ताडी(सरकारमान्य क्रेंद्र क्रं:-३२) कडे गेले. ) ============================= स्थळ क्र- २:- पुण्यातील एक पेठ.. वेळः- दुपारि ४ . पक्या:- आयच्या गावात...कत्ला माल ए भाऊ अव्या:- डोळ्यात **ला का कुनी? यायला स्कूटी न् ट्येंपोतला फरक कळना झाला तुला...तिज्यायचं बॅट्री त्येच्या! पक्या:- तुच घ्ये डोळ्यात २ ठेंब टाकून..सर्कारी दवाकान्यातनं.. तुला चिक्कू-सपारचंद'वानी दिस्तोय! संद्या:- हॅ हे हॅ हॅ हॅ.. खोट्णीस आरोग्य क्येंद्र (म.ण.पा.) क्रमांक येकोनीस! पक्या:- ह्या ह्या ह्या.... संद्या? तू अज्जून जातो का रे...तितं...- सुकडीपूड खायला. अव्या:- आईईईईईईई शपत.... त्ये काय अस्तं र्ये??? संद्या:- हे....बघ हे...अज्जुन णाय व्हय म्हैत झालं तुला? अर्र त्ये सातू घवाचं गूळ टाकल्येल पीट! पान्यात णायतर दुदात खायच्ये त्ये! अव्या:- हा ल्हान पनी त्येच जास्ती खायचा..म्हनून नजर उतरली ऐन जवानीत...! ( =)) ) संद्या:- ह्या ह्या ह्या ह्या.... पाचवीत अशेपरेंतं सुकडीपूड...आनी नंतार??? ह्या ह्या ह्या ह्या!!! पक्या:- हॅ हॅ हॅ हॅ हॅ.... तेज्यायचं ह्ये संद्या हे ना....लै बारा बो*&^% ( =)) ) संद्या:- मला म्हन्तो बारा बो*&^%...आनी तू काय कमी होता का रे भाड्या? लकडी पुलाच्या खाली नदिला जायचो आम्मी.. ख्यक्डे धरायला... तवा पायलावता तुला...शिग्रेटच्या थोटकांचा धूर - भरुण हवेत सोडून द्यायचा तू त्ये!!! अ‍ॅऐचं आट्रा बो%$#*&चं! हो टिकडं! ( :D ) ====================================