Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गंगाधर मुटे on Fri, 01/30/2015 - 10:41
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!

जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!

कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!

                                  - गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------

Submitted by संदीप डांगे on Wed, 02/11/2015 - 18:56

Permalink

कवीच्या शब्दस्वातंत्र्याबद्दल

कवीच्या शब्दस्वातंत्र्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही. जो शब्द ज्या कारणासाठी आणि ज्या भावनेने वापरला आहे ते योग्यच आहे. माझ्या मते त्या कारणाचा पाठपुरावा न करता कवीने घोळघोळ उत्तर देऊन 'आपल्या ते अपेक्षित नव्हते, मला तसे म्हणायचे नव्हते' वैगेरे छाप पलायन करू नये. कवी पेक्षा इतर सदस्यांनी योग्यप्रकारे त्या शब्दाची पाठराखण केली आहे जे अतिशय स्तुत्य आहे. माझा आक्षेप कवीच्या स्पष्टीकरणावर होता. त्यांनी ठामच राहायला हवे आपल्या कल्पनेवर आणि शब्दांच्या निवडीवर. कुणाचा आक्षेप आला म्हणून गुळमुळीत उत्तरे देऊन टाळू नये. बाकी माझे काही चुकले असल्यास दुरुस्त करावे…
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 02/11/2015 - 18:59

Permalink

तरी अजून मुंटे साहेबांनी

तरी अजून मुंटे साहेबांनी आपल्या स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे या वाक्याबद्दल आपले मत स्पष्ट केले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 02/11/2015 - 19:07

In reply to तरी अजून मुंटे साहेबांनी by संदीप डांगे

Permalink

द्ये ना सोडून भौ

काह्याला तरास करून घ्याचां !
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 02/11/2015 - 20:54

In reply to द्ये ना सोडून भौ by कपिलमुनी

Permalink

असं कसं असं कसं

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 02/11/2015 - 22:41

Permalink

कायच्या काय !

कायच्या काय ! बायल्या हा शब्द कवितेत वापरला आहे त्याच अर्थाने कितीतरी काळापासून वापरला जातोय ! मुख्य म्हणजे काही हुच्च शहरी लोक सोडून शहरांत आणि सर्व खेड्यांत तो त्याच अर्थाने (सत्य परिस्थितीचे नाम अथवा भित्र्या वागणूकीचे विशेषण या अर्थाने) आजही वापरला जातोय... आणि त्यांना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. ही कविता खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याला उद्देशून असल्याने त्याला चिडवून त्याच्या अंगात विरश्रीचा संचार घडवून आणण्यासाठी अश्या खोचक आणि काहिश्या मानहानीकारक शब्दाची योजना हे केवळ कवीने घेतलेली सूट नसून कवितेची मूलभूत गरज होती. असे असताना त्या शब्दावर इतका गदारोळ आश्चर्यकारक वाटला !!!
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 02/18/2015 - 18:16

In reply to कायच्या काय ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+१ अगदी अगदी.

+१ अगदी अगदी. कविता सुचल्यावर आता त्यांनी १० लोकांना दाखवली, त्या लोकांनी हो सगळे आहे ठिक म्हतल्यावर त्यांनी इथे टाकली. तरीपण खुसपट निघालेच. अजून पब्लिक करतील तर लोकांच्या भावना दुखावून त्यांच्या घरावर मोर्चेपण निघतील असं वाटंतय. ;) (जिथे तिथे सामाजिक सेंसॉरशिपचा वैताग आलेला)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 14142 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com