✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • पाककृती
  • भटकंती

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

प
पिंपातला उंदीर यांनी
Fri, 02/06/2015 - 16:04  ·  लेख
लेख
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ? सगळे मार्क्स , अडम्स, टोल्स्टोय ." भारतासारख्या वैविध्यपूर्ण तेने नटलेल्या खंडप्राय देशात आपण बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम ' जसा च्या तसा कॉपी पेस्ट करतो आणि कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचे संदर्भ वापरतो यावर झालेली हि खास नेमाडीय कोटि .साहित्य संमेलनावर त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा धुरळा उडाला . काहीही असो नेमाडे कायम बातम्यात असतात हे खर . ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात कायम मराठी लेखकांवर अन्याय होतो अशी ओरड चालू असताना नेमाडे याना हा पुरस्कार घोषित झाल्याने आपण खुश होण्यास हरकत नाही . आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय पांडुरंग सांगवीकर याचे आधुनिक version असणारया एका चाहत्याचा नेमाड्यांना मानाचा मुजरा .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
25657 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

वरचा प्रतिसाद जरा चुकलाच. ती

सव्यसाची
Sun, 02/08/2015 - 13:57 नवीन
वरचा प्रतिसाद जरा चुकलाच. ती लिंक टाकायची होती पण चुकून quote केले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची

बाकि नेमाडे यान्चा पण 'लेखक

पिंपातला उंदीर
Sun, 02/08/2015 - 14:46 नवीन
बाकि नेमाडे यान्चा पण 'लेखक राव ' झाला आहेच
  • Log in or register to post comments

पांडुरंग सांगवीकर उवाच : तर

ईंद्रनिल
Sun, 02/08/2015 - 15:16 नवीन
पांडुरंग सांगवीकर उवाच : तर भाऊ हे ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे काय अस तुम्ही विचाराल,तर ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे तत्कालिन सरकार कुणातरी वयस्कर लेखकाला एक बाहुली किंवा शाल आणि नारळ देऊन आता निवृत्त व्हा किंवा निजधामाला जा असा अप्रत्यक्ष आदेश देत असे त्याला ज्ञानपिठ पुरस्कार म्हणत असत.पण सरकार आणि लेखक म्हनजे काय तर चार एकमेकांना पाण्यात पहानारे दोन पक्षातील लोक एकत्र येऊन जनतेच्या भल्याचा देखावा करुन आपापले खिसे भरत अशा लोकांची टोळी आणि उदाहरणार्थ आमचीच टोळी कशी चांगली यावरुन भांडणाऱ्या लोकांना कार्यकर्ते म्हणत तसेच मराठी लेखक म्हणजे इतर भाषांतील अडगळितले साहित्य वाचुन स्वतःच्या नावावर खपवणारे लोक,हे लेखक लोक स्वतःच्या मुलांना ईंग्रजी भाषेतील शिक्षण देऊन परदेशी पैसा कमवायला पठवत आणि मराठी भाषा संपत चालल्याची हाकाटीही करत असा एक प्रवाद उदाहरणार्थ त्याकाळी होता. त्या काळातील लोकांचे दुटप्पी वर्तन येथेच थांबत न्हवते त्या काळात नाचगाणे करणाऱ्या लोकांना फ़ार मान मिळत असे.हे नाच गाणे करणाऱ्या मुली किंगफ़िशर कॅलेंडर वर नग्न अवस्थेतील फ़ोटो छापवुन घेत,जाहिर कार्यक्रमात जननेद्रियांवर विनोद ऐकुन घेत आणि स्वतः करत पण त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे अर्ध अनावृत्त स्तन छापल्यावर स्त्रियांकडे वाईट दृष्टिने पहाता म्हणुन आरडाओरडा देखिल करत कारन पैसा नामक कागदी वस्तु बुडाली असे त्यांना वाटे.किंगफ़िशर कॅलेंडर म्हणजे काय तर भिंतिवर टांगायचा एक बारा पानी कागद,त्यावर मुलींचे फ़ोटो छापवुन घेण्याचा शौक तत्कालिन उद्योजकाला होता आणि त्या शौकात तो कर्जबाजारी झाला असे समजते.चित्रपट नामक गोष्टीत हे जे जे करत आणि दाखवत त्याच्या बरोबर उलट कृत्य हे प्रत्यक्ष जिवनात करत,असे लोक म्हणजे सिनेस्टार आणि याबद्दल लोक त्यांना डोक्यावर घेत.आपण करतोय ते भारतीय नावाच्या संस्कृतीत आधीपासुनच होते असे ते सांगत यासाठी ते खजुराहोचे पुरावे देत,उदाहरणार्थ आता खजुराहो म्हणजे काय तर नुकत्याच केलेल्या उत्खननातुन खजुराहो म्हणजे बियर नावाचे द्रव्य असलेली बाटली असे निष्पन्न झालेले आहे. त्या काळात ’धर्मनिरपेक्ष"या शब्दावरुन खुप वादविवाद झाला होता असे कागदपत्रांवरुन समजते.धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे शोधन्यासाठी आम्ही आणखी दस्तावेज चाळले असता असा निष्कर्ष निघाला आहे की त्या काळातील लोक काळा,गोरा,पिवळा,असा शारीरिक भेद तर करतच पण कुणाचा देव मोठा आणि कुणाचा धर्म भारी यावरुन एकमेकांचे गळे कापत,या लोकांशिवाय जी जमात होती ती जमात म्हणजे "धर्मनिरपेक्ष".या जमातीचे लोक शाळेच्या दाखल्यावर "धर्मनिरपेक्ष"असे न लिहता स्वतःची जात लिहत किंवा स्वतःच्या घरातील पोराबाळिंचे विवाह स्वजातीतच लावत पण जाहिर चर्चांमधुन धर्मनिरपेक्षतेवर तावातावाने बोलत.याशिवाय विचारवंत नावाची देखिल जमात होती.उदाहरणार्थ बहुसंख्य लोक जे मत व्यक्त करत असत त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना विचारवंत म्हणत.असे लोक कायम क्रिया न करता फ़क्त प्रतिक्रिया देत असत.याबद्दल त्यांना मोठा मान मिळे.विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष जमात यांनी त्या काळात मोठ्ठा गोंधळ उडवुन दिलेला होता असे समजते.
  • Log in or register to post comments

बाबौ !!

खटपट्या
Sun, 02/08/2015 - 22:58 नवीन
बाबौ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईंद्रनिल

भन्नाट. तुम्हि लिहिले आहे का?

पिंपातला उंदीर
Sun, 02/08/2015 - 15:21 नवीन
भन्नाट. तुम्हि लिहिले आहे का?
  • Log in or register to post comments

प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला

ईंद्रनिल
Sun, 02/08/2015 - 16:16 नवीन
प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला असल्यास उत्तर "नाही" असे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

.....ही जी मंडळी आहेत या

जयंत कुलकर्णी
Sun, 02/08/2015 - 15:25 नवीन
.....ही जी मंडळी आहेत या सगळ्यांनी त्या काळात फ्रँझ काफ्काच्या दाट छायेखाली लेखन केले आहे. यात अजून एक लेखकाचे नाव जोडायचे असल्यास श्याम मनोहर आफळे....पण फ्रँझ काफ्काने माणसाच्या मनातील वैचारिक आंदोलनावर चांगले व सवीस्तर भाष्य करत कादंबर्‍या लिहिल्या तर या लोकांनी त्याच्या विचारांची भ्रष्ट नक्कल करत, जमतील तेवढ्या दगडावर पाय ठेवत, वैचारिक कोलांट्याउड्या मारत लेखन केले. बहुदा काफ्काच्या मेटामॉरफॉसिस मधील सेंटीपिडच्या अनेक तंगड्या यांनी उचलल्या असतील. जेवढ्या तंगड्या जास्त तेवढे जास्त दगड उपयोगात आणता येतात..... "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." जो माणूस असे लिहू शकतो त्याबद्दल एवढे लिहिणेही वेळेचा अपव्यय आहे पण...... Unfortunately this Gentlemans writing is not worth the honour...if he is gentleman in true sense...पण जसं मेल्यावर दुष्मनी संपुष्टात येते तसे ज्ञानपीठ मिळाल्यावर अभिनंदनही करावेच लागेल....... अर्थात हे माझे मत आहे.........
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/08/2015 - 15:37 नवीन
:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

काफ्का म्हणताच

अत्रन्गि पाउस
Sun, 02/08/2015 - 17:48 नवीन
अस्तरदार, शब्दे, घोंगे , अभया थोपटे ....सुरेश ..बोगस call असे पुल सॉरी क्लाउन चे लेखन आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

खरेक्ट. प्रस्तुत लेखातले प्रा

आदूबाळ
Sun, 02/08/2015 - 22:13 नवीन
खरेक्ट. प्रस्तुत लेखातले प्रा. शब्दे हेच असावेत असा मला संशय होता. आज खात्री पटली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

@ पिंपातला उंदिर

ईंद्रनिल
Sun, 02/08/2015 - 16:18 नवीन
@ पिंपातला उंदिर प्रश्न मला असल्यास उत्तर "हो"आहे. प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला असल्यास उत्तर "नाही" असे आहे.
  • Log in or register to post comments

नेमाडे

चिरोटा
Mon, 02/09/2015 - 01:07 नवीन
नेमाडे ह्यांचे अभिनंदन. अवांतर-भारतिय भाषांतले प्रतिथयश लेखक (पारितोषिक मिळाल्या मिळाल्या!) इण्ग्रजी लेखकांवर टिका का करतात कळत नाही.सलमान रश्दी ह्यांच्या साहित्यकृतीत विशेष गुणवत्ता नाही हे कोसलाकारांना सांगायची गरज काय? रश्दी आवडोत न आवडोत, तेही एक मोठे लेखक आहेत हे मान्य करावे लागते व पुरस्कारांनी उंची मोजायची तर त्यांचीही उंची बरीच आहे.असो.
  • Log in or register to post comments

वास्तविक

विटेकर
Mon, 02/09/2015 - 10:55 नवीन
वास्तविक नेमाडेंपेक्षा अधिक उजवे , परिणामकारक आणि वास्तवदर्शी लिहिणारे अनेक लेखक मराठीत होते , होऊन गेले... पुलंच्या लेखनाचा मराठी सारस्वतावर आणि माणसांवर जो दिर्घकालीन परिणाम झाला तसा अन्य कोणत्याच लेखकाचा झाला नाही असे माझे नम्र मत आहे. या इथेच मिपावर पुलंच्या लेखनातील कितीतरी संदर्भ सहजपणे येत असतात. आणि पुलंनी काय फक्त मध्यममार्गी गुडी गुडी लिहिले का ? आणि असे अनेक लेखक मराठीत होऊन गेले जे ज्ञानपीठाचे खरे हक्कदार होते ... गोनींदा , कुरुंदकर , दुर्गा भागवत, जयवंत दळवी ,श्री ना ...किती तरी ! ज्यामुळे माणसाच्या जगण्याच्या जाणीवा अधिक प्रगल्भ होतात, हे जग मी अधिक सुंदर करुन जाईन... असे मनापासून वाटायला लावते ते लेखन अधिक समृद्ध ! शेवटी पुरस्काराने काय होते ? लोकांच्या मनावर जो अधिराज्य गाजवतो तो खरा लेखक .. असे आमचे वैयक्तिक मत ! असो , नेमाड्यांचे (तरिसुद्धा) अभिनंदन !
  • Log in or register to post comments

१००%

सामान्य वाचक
Mon, 02/09/2015 - 11:30 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

+१०००

सविता००१
Mon, 02/09/2015 - 11:39 नवीन
फक्त कोसला साठीच अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

पूर्णपणे सहमत.

प्रचेतस
Mon, 02/09/2015 - 12:40 नवीन
पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

हा मासेस विरुद्ध क्लास

पिंपातला उंदीर
Mon, 02/09/2015 - 15:12 नवीन
हा मासेस विरुद्ध क्लास झगडा सर्वच क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात चालू असतो . सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सलमान खान विरुद्ध नसीर किंवा अमिताभ विरुद्ध इरफान . जितका कलाकार मासेस मध्ये लोकप्रिय किंवा जनाश्रय जास्त तितका क्लास वर्ग त्याची हेटाळणी करतो. पुल किंवा वपु काळे यांच्या लेखनाला जितका जनाश्रय आहे त्याच्या निम्मा पण नेमाड्याना नाही (जरी त्यांची पुस्तक बर्यापैकी खपली असली तरी ). दोन्ही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत . म्हणजे इंग्रजी साहित्याला जशी रश्दी यांची गरज आहे तशी चेतन भगत ची पण आहेच . नेमाडे याना कितीही पुरस्कार मिळाले तरी जनमानसात पुलंना जे स्थान आहे ते त्यांना कधीही मिळणार नाही . कितीही इतरांची लेखकराव म्हणून हेटाळणी केली तरी नेमाडे यांना हे माहित असेलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

हे ही खरेच आहे म्हणा.........

जयंत कुलकर्णी
Mon, 02/09/2015 - 16:33 नवीन
हे ही खरेच आहे म्हणा.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अमिताभ

फारएन्ड
Tue, 02/10/2015 - 00:03 नवीन
मुद्दा बरोबर आहे. पण अमिताभ चे उदाहरण अचूक नाही असे वाटते - कारण त्याचे स्थान क्लासेस व मासेस दोन्हीकडे त्याच्या ऐन भराच्या काळात होते. सलमान चे उदाहरण मासेस साठी व नासिर, इरफान चे क्लासेस साठी बरोबर आहे. (बाकी अमिताभ ने प्रयोग केले नाहीत वगैरेबद्दल वाद नाही, पण 'मासेस' वाला म्हणून शिक्काही कधी नव्हता त्याच्यावर. किंबहुना आर्थिक स्तर, स्त्री-पुरूष, क्लासेस-मासेस यात कोणत्याही एका डायमेन्शन मधे लोकप्रियता न बसणारे अत्यंत दुर्मिळ स्टार्स आहेत त्यात तो आहे -हीरॉइन्स मधे रेखा व माधुरी असाव्यात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

मान्य आहे फारएन्ड साहेब : )

पिंपातला उंदीर
Tue, 02/10/2015 - 09:43 नवीन
मान्य आहे फारएन्ड साहेब : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

एका मराठी माणसाला ज्ञानपीठ

बॅटमॅन
Mon, 02/09/2015 - 15:25 नवीन
एका मराठी माणसाला ज्ञानपीठ मिळाले याचा आनंद आहे. तदुपरि कोण नेमाडे? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

'कोसला' जवळपास ३०

श्रीगुरुजी
Mon, 02/09/2015 - 21:07 नवीन
'कोसला' जवळपास ३० वर्षांपूर्वी वाचली होती. वाचून फारसा इंप्रेस झालो नव्हतो. हीच कादंबरी ६-७ वर्षांपूर्वी परत वाचली. दुसर्‍यांदा वाचल्यावरही कादंबरी साधारणच वाटली. 'हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ' अजून वाचलेली नाही. त्यामुळे पास. नेमाड्यांना नक्की का ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले याची कल्पना नाही. असो. मराठी लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

कोसला

फारएन्ड
Tue, 02/10/2015 - 00:04 नवीन
कोसला आवडली होती कॉलेज मधे असताना वाचली होती तेव्हा. नंतर अनेक वर्षांनी बिढार वाचू लागलो, पण कंटाळा आल्याने सोडून दिली. आता हिंदू वाचायची उत्सुकता आहे. नेमाडेंचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

रश्दि साहेबांनी अत्यंत हीन शब्द वापरले आहेत नेमाड्यांबद्दल

अर्धवटराव
Tue, 02/10/2015 - 01:23 नवीन
आणि त्याची ना खंत ना खेद उमटले महराष्ट्रात :(
  • Log in or register to post comments

खूपच मस्त

विकास
Tue, 02/10/2015 - 01:42 नवीन
खूपच छान अग्रलेख! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जे पेराल तेच उगवणार ना !

जयंत कुलकर्णी
Tue, 02/10/2015 - 08:48 नवीन
जे पेराल तेच उगवणार ना ! नेमाड्यांनी इतर लेखकांबद्द्ल जे उद्गार काढले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी असे लिहिले तर आश्चर्य वाटायला नको..... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

नेमाड्यांनी कधि कुणाला बास्टर्ड म्हटलं ?

अर्धवटराव
Tue, 02/10/2015 - 11:21 नवीन
:( आणि म्हटलं तरी तो मराठी बाणाच आहे ( असं म्हणायची पद्धत आहे). रश्दि कुटल्या बाण्याचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि

मृत्युन्जय
Tue, 02/10/2015 - 17:05 नवीन
रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि अनुचित भाषा वापरली. त्याबद्दल त्यांचा नक्कीच निषेध. पण नेमाड्यांन उगाच नसत्या वादाला तोंड फोडायला सांगितले कोणी होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे

पिशी अबोली
Tue, 02/10/2015 - 17:08 नवीन
ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे अभिनंदन. पण ज्ञानपीठ मिळालं म्हणून वाट्टेल ती विधानं त्यांनी करावीत आणि ती लोकांनी डोक्यावर घ्यावीत हा प्रकार घडू नये. असो. मराठी अस्मितेच्या अभिमान्यांना बर्‍याच छान छान गोष्टी पहायला मिळत आहेत/ मिळतील अशी हवा आहे एकूण.. हरकत नाही, पण ते 'माज आहे मराठी असण्याचा' वगैरे गोष्टी टाळून खरोखर मराठीचं संवर्धन व्हावं असं मनापासून वाटतं..
  • Log in or register to post comments

हो ना

पैसा
Tue, 02/10/2015 - 19:52 नवीन
नेमकं काय घडलं माहित नाही, पण परवा अचानक मराठी अभिजात भाषा म्हणून स्वीकारली गेली, शिवाय हे ज्ञानपीठ पारितोषिक. निदान काही लोकांना तरी अच्छे दिन आलेले दिसतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे

विटेकर
Wed, 02/11/2015 - 08:55 नवीन
तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे लघवी केली आणि आपली उर्वरित वर्ष त्यामुळे दर्याची उंची किती वाढली, ते मोजण्यात खर्ची घातली' नम्र नेमाडेला नागवनारा नरम नुस्का ... ख़ास विन्दांचा
  • Log in or register to post comments

क्या बात है

अत्रन्गि पाउस
Wed, 02/18/2015 - 17:13 नवीन
यकदम सही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

हे असं पायजे..

हाडक्या
Wed, 02/18/2015 - 18:19 नवीन
हे असं पायजे.. ;) (बादवे, हे वाचून दादा पवारांची आठवण येणारा मी एकलाच आहे का ? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

छान चर्चा झाली या

पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 09:45 नवीन
छान चर्चा झाली या निमित्ताने . सर्वाना धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा