अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
वाचने
150353
प्रतिक्रिया
452
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी पैसे घेताना कुठल्या
In reply to पैसे देतानाचे लाईव्ह by श्रीगुरुजी
भाजपा नि कॉंग्रेस ह्या एकाच
आता तर भाजप वाल्यांचे
निवडणुकीच्या आधीच
In reply to आता तर भाजप वाल्यांचे by पिंपातला उंदीर
आप ने हे दाखवुन दिले आहे की
In reply to निवडणुकीच्या आधीच by श्रीगुरुजी
गणेश साहेब, वोडाफोन चे ३००
In reply to आप ने हे दाखवुन दिले आहे की by गणेशा
>>> आप ने हे दाखवुन दिले आहे
In reply to आप ने हे दाखवुन दिले आहे की by गणेशा
सीसीटीव्ही असावेत ना. पण
In reply to >>> आप ने हे दाखवुन दिले आहे by श्रीगुरुजी
बीजेपी - भारतीय जुमलेबाज
In reply to निवडणुकीच्या आधीच by श्रीगुरुजी
आप विजेची बिल कमी करेल असे
ही 'जॉबलेस ग्रोथ' आहे का
In reply to आप विजेची बिल कमी करेल असे by प्रतापराव
बाकी संगणक आल्याने
इथे बरेच जन असे म्हणत आहेत कि
आता पुर्न रिसल इस्टेट मध्ये
In reply to इथे बरेच जन असे म्हणत आहेत कि by प्रतापराव
अणु करार , परकीय गुंतवणूक
U-Turn बद्दल तर बोलूच नका.
In reply to अणु करार , परकीय गुंतवणूक by पिंपातला उंदीर
इथे पण टाका ती लिस्ट . कस
In reply to U-Turn बद्दल तर बोलूच नका. by नांदेडीअन
लोकसभेत मी भाजपला मत दिले
बरोबर .
In reply to लोकसभेत मी भाजपला मत दिले by प्रतापराव
४९ दिवसात झालेली कामे.
आआपला मिळणार भरघोस पाठिंबा
ग्रेटथिंकर चला तुम्हि एकदाचे बरे झालात
In reply to आआपला मिळणार भरघोस पाठिंबा by ग्रेटथिंकर
आपचा उदय होणे हि काळाची गरज
+ १
In reply to आपचा उदय होणे हि काळाची गरज by प्रतापराव
आप आल्यामुळे इतर पक्षांना एक
हे बघा यान्चे उमेद्वार
ग्रेटथिंकर चला तुम्हि एकदाचे बरे झालात
ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री
फुलचंद स्पेशल, रिमझीम ज्यादा
In reply to ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
ही तुझ्या 'ह्यां'ची पसंती
In reply to फुलचंद स्पेशल, रिमझीम ज्यादा by ग्रेटथिंकर
भगवी चड्डी आणि पांढरी टोपी
In reply to ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
आप
सगळ्या exit poll नुसार आप
आगाउपणा असेल.( मी यातील तज्ञ
In reply to सगळ्या exit poll नुसार आप by पिंपातला उंदीर
हे आकडे ३ वाजेपर्यंत झालेल्या
सगळे exit pole खोटे आहेत
लवकरच गुर्जी unreal times
In reply to सगळे exit pole खोटे आहेत by ग्रेटथिंकर
+१
In reply to लवकरच गुर्जी unreal times by पिंपातला उंदीर
माझी कोणतीही लिंक खोटी नसते.
In reply to लवकरच गुर्जी unreal times by पिंपातला उंदीर
माझी कोणतीही लिंक खोटी नसते.
In reply to माझी कोणतीही लिंक खोटी नसते. by श्रीगुरुजी
अरे नान्या, जरा १०
In reply to सगळे exit pole खोटे आहेत by ग्रेटथिंकर
मोदी -कितने आदमी थे ?
मतदानोत्तर चाचणीचे विविध
बाकी गुर्जी मजा कशी येईल
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
जरा विचार करा. लगेच लक्षात
In reply to बाकी गुर्जी मजा कशी येईल by पिंपातला उंदीर
आल लक्षात . See you in
In reply to जरा विचार करा. लगेच लक्षात by श्रीगुरुजी
भाजपचा पुरता सुपडासाफ होताना
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार :)
In reply to भाजपचा पुरता सुपडासाफ होताना by ग्रेटथिंकर
बरं झालं आआपला स्पष्ट बहुमत
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
बाकी कॉंग्रेस मुक्त नारा
जर चाचण्यां नुसार निकाल
त्याना एका धर्मगुरू (इमाम
In reply to जर चाचण्यां नुसार निकाल by प्रतापराव
केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार :)
आता हा कोणत्या आय डी
In reply to केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार :) by होबासराव
मुषक महाराज
माझा एकच आय डी आहे . आणि
In reply to मुषक महाराज by होबासराव
मस्त चर्चा...
होबासक्या करणे
भाजपा नि कॉंग्रेस हे धर्मावर
आज काही वाहिन्यांवर बातमी
कागदी मतदानपत्रांचे दुध के जले...
In reply to आज काही वाहिन्यांवर बातमी by श्रीगुरुजी
असे उदाहरण आहे.. पण एक
In reply to आज काही वाहिन्यांवर बातमी by श्रीगुरुजी
असं होत नसतं...चुकीची माहिती टाकू नका.
In reply to असे उदाहरण आहे.. पण एक by गणेशा
हो.. पण तपासणारे .. सारीच
In reply to असं होत नसतं...चुकीची माहिती टाकू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कै च्या कै
In reply to हो.. पण तपासणारे .. सारीच by गणेशा
पुन्हा निट वाचले..
In reply to कै च्या कै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्च...कसं करता येऊ शकतं .
In reply to पुन्हा निट वाचले.. by गणेशा
मतदान मोजनी पुर्वी असे
In reply to च्च...कसं करता येऊ शकतं . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो आता पुरेना थापेबाजी.
In reply to पुन्हा निट वाचले.. by गणेशा
चार मशिन्स फक्त भाजपलाच
In reply to अहो आता पुरेना थापेबाजी. by श्रीगुरुजी