Skip to main content

कोण जिंकणार दिल्ली?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 29/01/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

वाचने 150353
प्रतिक्रिया 452

प्रतिक्रिया

वॉट्सअ‍ॅपवर फिरत आलेला विनोद - दिल्लीतील सभेनंतर मोदी जमावला उद्देशून विचारतात, "किसे वोट करेंगे?" जमाव एकसुरात म्हणतो, "आपको"

In reply to by नांदेडीअन

*lol* *LOL*

केजरीवालांना कोण कोण पाठिंबा देत आहेत? मला वाटते की मला न आवडणार्‍या लोकांचे 'हूज हू' अशी ही यादी असेल. १. असदुद्दिन ओवेसी (एम.आय.एम) २. ममता बॅनर्जी ३. डावे पक्ष ४. मार्कंडेय काटजू इतरही आहेतच.पण सगळ्या लिंका शोधायला आता वेळ नाही आणि उत्साह त्याहूनही नाही. तरीही आणखी एका लिंकेशिवाय हा प्रतिसाद पूर्ण होऊच शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरसंबंधीचा पाकिस्तानातील मंत्री बरजीस ताहिर म्हणतो की भारताने आम आदमी पक्षाचे म्हणणे ऐकावे आणि काश्मीरात सार्वमत घ्यावे. बाकी कोणीही काहीही म्हटले तरी असल्या पक्षाला पाठिंबा देऊन मी माझ्याच देशाच्या इंटरेस्टविरूध्द काहीही करूच शकणार नाही. दिल्ली निवडणुकांचा निकाल काहीही लागला तरी आम आदमी पक्ष या बोगस प्रकाराविरूध्दचा माझा लढा चालूच राहिल.

In reply to by क्लिंटन

>>> या लीस्टमध्ये आता जामा मशिदीच्या सय्यद अहमद बुखारीचाही समावेश झाला आहे. वा! आआपच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेलाय. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या बरोबर ७ दिवस आधी वि.प्र.सिंग बुखारीला भेटायला गेले होते. त्यांच्या भेटीनंतर लगेचच बुखारीने एक पत्रक काढून देशभरातील मुस्लिमांना जनता दलाला मत देण्याचे आवाहन केले होते. आताही अगदी तसंच घडतंय. आआपचे संजय सिंग बुखारीला गुपचूप भेटून आल्याचं सांगितलं जातंय. नंतर लगेचच बुखारीचा आआपच्या बाजूने फतवा आलाय. वि.प्र.सिंगही केजरीवालांसारखेच नाटकी आणि प्रामाणिकपणाचा व स्वच्छतेचा बुरखा पांघरलेले होते. केजरीवाल त्याच मार्गाने चाललेले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बुखारीने आआपला पाठिंबा दिलाय याची पोटदुखी कशाला? बीजेपीलाही उपद्रवी डेरा सच्चावाल्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

In reply to by क्लिंटन

गुरुजि आणि क्लिंटन तुम्हि इतके मुद्देसुद सगळ एक्सप्लेन केलय. त्या आप कडे काहि अजेंडा तरी आहे का ? ते फक्त फुकट वाटण्याच्या गोष्टि करतायत. खेजरीवाल पे़क्षा काँग्रेस परवडेल दिल्ली कराना...

In reply to by होबासराव

खेजरीवाल पे़क्षा काँग्रेस परवडेल दिल्ली कराना...
याच चर्चेत मी लिहिले पण आहे की शीला दिक्षित यांच्या सरकारने दिल्लीसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या.आजही अजय माकन हे चांगले मुख्यमंत्री बनू शकतील हेच माझे मत आहे-- किरण बेदींपेक्षाही.मी केंद्रात भाजपला समर्थन देत असलो म्हणून राज्यातही भाजपलाच समर्थन द्यायला हवे असे नक्कीच नाही. विशेषतः १९९३ ते १९९८ या काळात दिल्लीत भाजपच्या मदनलाल खुराणा आणि साहिबसिंग वर्मा यांनी फारसे काही केले नसताना आणि दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये भाजपचा कारभार उत्तम आहे असे कोणी म्हणू शकेल असे वाटत नाही अशी परिस्थिती असताना.मी दिल्लीत मतदार नाही म्हणून या गोष्टीचा तितका विचार केलेला नाही पण कदाचित मी दिल्लीत मतदान करू शकत असतो तर मी भाजपलाच मत दिले असते का या प्रश्नाचे उत्तर १००% हो असे नक्कीच देऊ शकत नाही. पण आम आदमी पक्षाचा मात्र अगदी कडाडून विरोधच आहे :)

In reply to by क्लिंटन

काँग्रेसचा वोट शेअर वाढण्याचा फटका आपला बसेल त्यामुळेच इथले भाजपेयी काँग्रेसचीही तळी उचलत आहेत :ROFL:

3.00 pm I Appeal all Muslims to support AAP candidates & help in forming a secular Govt in Delhi. - Imam Bukhari 4:00 pm We condemn and reject support of Shahi Imam. We don't support the ideology of Imam Bukhari. He had invited Pakistan Prime Minister Nawaz Sharif and not Indian Prime Minister Narendra Modi for his son's anointment. - Aam Aadmi Party On the other hand, you would have seen BJP seeking support of Baba Ram Rahim, Maulana Kalbe Jawwad and Sonia Gandhi meeting Imam Bukhari. (in the past) This is the difference ! Proud to be an AAPtard !

In reply to by सव्यसाची

भाजपानेच डिल केलेली होती म्हणे बुखारीसोबत. पण आपने यॉर्कर बॉलवर सिक्सर लगावला. खरे खोटे कुणास ठावूक.

In reply to by नांदेडीअन

आप ला मतदान करा आणि धर्मनिरपेक्ष सरकार बनवा असे आवाहन केले गेले. भाजप यामध्ये कुठे मध्ये येतो हे कळले नाही.

In reply to by नांदेडीअन

तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. माझ्या प्रतिसादातील पहिले वाक्य हे एका बातमी वरून आले आहे. जमले तर इंग्रजी माध्यमांमध्ये ही बातमी आपण पाहू शकता. मी काही माझ्या मनचे करून नाही सांगितले. 'खरे खोटे कुणास ठाऊक' असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा नेमके कोण खरे बोलतोय याचा उलगडा न झाल्याने म्हणालो. तुम्ही जे भाजप बद्दल म्हणालात त्याची मला कुठलीही बातमी सापडली नाही. कमीत कमी 'अधिकृत स्रोत' वगैरे च्या नावाखाली ज्या बातम्या येतात त्यामध्येही सापडले नाही. मला अपेक्षा होती कि तुम्ही म्हणाल कि आताच बातमी आलीय किंवा टीवी वर पहा वगैरे. पण 'खरे खोटे कुणास ठाऊक' असे का म्हणता आहात ते काही कळले नाही. जर तुमच्याकडे कुठली लिंक असेल तर मला द्या जी सांगते कि भाजपने डील केले आहे. खरे खोटे नंतर कळेलच.

In reply to by सव्यसाची

अहो, इतका मोठा पोपट झाल्यावर बुखारींकडून दुसरे कोणते स्टेटमेंट अपेक्षित होते तुम्हाला ? ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन आप आणि बुखारीबद्दल बोलत होते, त्यावरून निदान मला तरी असेच वाटते की जनतेमध्ये एक चुकीचा संदेश पसरवण्यासाठी बुखारीला असे वक्तव्य करण्यासाठी भाजपानेच सांगितले असावे. अर्थात हे माझे मत आहे, कोणत्याही न्यूज चॅनलवर वगैरे आलेले नाही. भाजपावर इतका विश्वास तर आहेच मला !

In reply to by नांदेडीअन

ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन आप आणि बुखारीबद्दल बोलत होते, त्यावरून निदान मला तरी असेच वाटते की जनतेमध्ये एक चुकीचा संदेश पसरवण्यासाठी बुखारीला असे वक्तव्य करण्यासाठी भाजपानेच सांगितले असावे.
अरुण जेटली यांनी, माझ्या माहितीप्रमाणे, पहिल्यांदा उत्तर दिले. पण त्यात फक्त हाच मुद्दा नव्हता. आता काही वेळानी सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. कॉंग्रेस ने पण दिली आहे. भाजपने बुखारींना सांगितले आणि बुखारींनी ते ऐकले हे आश्चर्यजनक आहे. बाकी आपली मते बनवण्याचा आपल्याला अधिकार आहेच. असो.

In reply to by नांदेडीअन

अहो हे मराठी संकेतस्थळ आहे. गरजेपुरते इंग्लिश वापरायला काहीच आक्षेप नसावा पण सगळा प्रतिसादच इंग्लिशमध्ये? आणि तो पण स्वत:चा असेल असे वाटत नाही.भाषा जरा फेसबुकी वाटत आहे. आणि वरही असाच कुठलाकुठला फॉरवर्ड झालेला फोटो डकविला आहात. असो. आआपने बुखारींचा पाठिंबा नाकारला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरीही काही मुद्दे उपस्थित होतातच. १. मुळात बुखारींना आआपला पाठिंबा द्यावासा वाटला.म्हणजे बुखारी ज्या तत्वांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी आआपमध्ये काहीतरी 'आशेचा किरण' नक्कीच दिसला. २. डिसेंबर २०१३ च्या निवडणुकांपूर्वी हेच केजरीवाल तस्लीमा नसरीन यांना ठार मारणार्‍याला बक्षिस द्यायला तयार असलेल्या मौलाना तौकिर रझा खान याला का बरे भेटले असावेत? की आपलं 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट' म्हणून काहीही खपून जातं?

In reply to by क्लिंटन

(परत एकदा) सुदैवाने देवाने स्वतःचे मत स्वतः बनवण्याएव्हढी सुबुद्धी दिली आहे. मीच लिहिलेले आहे हे. :) २००४ मध्ये बुखारींनी भाजपाला सपोर्ट दिला होता तेव्हा तेसुद्धा काही लोकांसारखे ‘स्वयंघोषित’ देशभक्त असतील ना ? ;) बरोबर आहे, पब्लिक मेमरी नक्कीच शॉर्ट असेल.

In reply to by नांदेडीअन

२००४ मध्ये बुखारींनी फतवा वगैरे जारी केला नव्हता.पूर्वी मलाही तसे वाटत होते.पण २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी जुने संदर्भ बघितले तेव्हा द हिंदूमधील हा दुवा मिळाला. त्यात बुखारीने फतवा जारी केल्याचे नाकारले आहे आणि भाजपमधील मतपरिवर्तनाचे स्वागत केले आहे. हे मतपरिवर्तन म्हणजे २००२ च्या काळात तोगाडिया स्टाईल प्रवृत्ती बेफाम दौडत होत्या त्यांना वाजपेयींनी विरोध करायचा प्रयत्न केला (त्यात यश कितपत आले ही गोष्ट वेगळी) हे असावे हा माझा तर्क. आणि त्या कारणासाठी वाजपेयींना मी पण नक्कीच श्रेय देतो. पण याव्यतिरिक्त जर का भाजपने आणखी काही करायचा प्रयत्न केला असेल तर त्याला माझा नक्कीच विरोध आहे. एकूणच काय तर तुम्ही 'आपटर्ड' असल्याचे स्वतःच मान्य केले आहे.सर्व आपटर्डची जी लक्षणे आहेत ती तुमच्यात अगदी १००% आहेत.एकतर सर्वात १००% योग्य कुठलाही पक्ष मिळणे शक्य नाही.२००४ मध्ये भाजपचा पराभव झाला, बुखारीने भाजपाविषयी काही चांगले बोलले हे सगळे मान्य.पण भाजप जे एकूण पॅकेज देणार होते त्यात बुखारीमुळे एक डाग नक्कीच लागला पण इतर चांगल्या गोष्टी (वाजपेयींचे नेतृत्व, १९९९-२००४ या काळात अर्थव्यवस्था चांगली सांभाळणे इत्यादी) होत्या त्याचे महत्व कमी होत नाही. तुमच्या आम आदमी पक्षाचे नक्की काय पॅकेज आहे हे विचारल्यानंतर एकतर आम्ही तेवढे स्वच्छ आणि बाकी सगळे जग भ्रष्ट, प्रश्न विचारणारा अंबानी-अडानीचा एजंट किंवा भाजपच्या पेरोलवरचा इत्यादी इत्यादी बकवासच पुढे येते. म्हणजे तुमचे पॅकेज नक्की काय याचा तुम्ही पत्ता १००% कधीच लागू देणार नाही आणि तुमच्या शब्दावर सगळ्या जगाने विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करणार.जे काही थोडे थोडके पॅकेज समोर दिसते त्यात त्या सबसिड्या आणि आयुष्यात पूर्ण न करता येण्यासारखी आश्वासने!!अशा वेळी इतर काहीच नसेल तर बुखारीचा पाठिंबा हा डाग नक्कीच मोठा दिसतो. कदाचित तो तितका मोठा नसेलही. पण तो मोठा दिसतो याचे कारण आआप समर्थकांचा आक्रस्ताळेपणा. तेव्हा परत एकदा-- १. तुमचे नक्की पॅकेज काय? २. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात असा तुमचा दावा असेल तर ते कृतीतून सिध्द करायची जबाबदारी तुमचीच. ३. आणि तुम्हाला प्रश्न विचारले तर इतरांकडे बोट दाखवून--त्यांच्यावरही डाग आहेत असे म्हणता त्याला काहीच अर्थ नाही. डाग सगळ्यांवर आहेत.पण प्रत्येक पक्ष नक्की काय देत आहे त्या प्रमाणात डाग किती लहान/मोठे आहेत हे सगळ्यांनाच दिसते.तुम्ही मात्र तुमच्यावरील डाग इतरांनी दाखविले की तुम्ही नक्की काय देऊ शकत आहात हे अंबानी-अडाणींना मध्ये न आणता दाखविलेत तर इतर पक्षांप्रमाणे तुमचाही विचार करता यायला काहीच हरकत नाही.पण तसे करताना आअप समर्थक कधीच दिसत नाहीत. असो. रामदास स्वामींनी जी अनेक लोकांची लक्षणे लिहिली आहेत त्याप्रमाणे मला पण आपटर्ड लक्षणे नक्कीच लिहिता येतील :)

In reply to by क्लिंटन

अहो केजरीवाल आहेतच तितके सरळ... मी तर काही आप वाल्यांना हे म्हणताना ऐकलय की केजरीवाल सत्तेत आले की ते तारक मेहताचा चष्मा सुद्धा सुलटा करणार आहेत. :)

In reply to by क्लिंटन

आप वाल्यांना प्रश्न विचारायचे नसतात कारण उत्तरा ऐवजी फक्त आक्रस्ताळे पणा मिळतो. कारण आरोप करणार्‍यांना )विशेषतः 'आप' ला) तो सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. उद. गडकरी वि. खुजलीवाल

In reply to by क्लिंटन

हे आशुतोष वगैरे मंडळींनी केजरीसाहेबांचा परत पोपट करण्याचा चंग बांधलाय का न कळे. सपोर्ट नाकारला म्हणजे? मागे काँग्रेसचा सपोर्ट नाकारला तसाच कि काय... :( केजरीसाहेब गुजरातचं मुल्यमापन करायला गेले असताना दिल्लीस्थीत भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेणारे हेच महाभाग होते. केजरीसाहेबांना अडचणीत आणायची एकही संधी हे साहेब सोडत नाहि.

In reply to by अर्धवटराव

>>> केजरीसाहेब गुजरातचं मुल्यमापन करायला गेले असताना दिल्लीस्थीत भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेणारे हेच महाभाग होते. केजरीसाहेबांना अडचणीत आणायची एकही संधी हे साहेब सोडत नाहि. हेच केजरीवाल गुजरातचे तथाकथित मूल्यमापन करण्याच्या दौर्‍यावर असताना कोणालाही न कळविता, कोणतीही पूर्वसूचना न देता, पूर्ववेळ न ठरविता अचानक गांधीनगरला मोदींच्या निवासस्थानी गेले आणि मला लगेच मोदींना भेटून त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे माझी त्यांच्याशी लगेच भेट घालून द्या असा हट्ट धरून बसले. पूर्ववेळ घेतल्याशिवाय मोदींना असे भेटता येणार नाही व तुम्ही पूर्ववेळ घेऊन मग भेटा असे सचिवांनी सांगताच लगेच, 'मोदी मला घाबरले' अशी आत्मप्रौढी यांनीच मिरवायला सुरूवात केली होती.

In reply to by श्रीगुरुजी

अमित शाह अजूनही तडीपार आहेत का हो ? टोमणा नाही मारत आहे . खर खर विचारत आहे . गुगलून बघितल पण कळत नाहीये नीट .

In reply to by पिंपातला उंदीर

माहिती नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केल्याचे वाचले होते.

In reply to by नांदेडीअन

>>> This is the difference ! Proud to be an AAPtard ! यालाच 'तू मारल्यासारखे कर', 'मी रडल्यासारखे करतो' प्रवृत्ती म्हणतात. बुखारी गेलाबाजार उगाच कोणालाही पाठिंबा देत नाही. १९८९ ला वि.प्र.सिंगांना दिलेल्या पाठिंब्याचे गुपित वि.प्र.सिंगांनी मुफ्ती मोहमंद सईदला गृहमंत्री केल्यावर लक्षात आले होते. संजय सिंह बुखारीला गुपचूप भेटून आल्याचे दुपारी काही वाहिन्यांवर सांगत होते. बुखारीने पाठिंबा जाहीर करायचा आणि नंतर प्रकरण तापणार असे दिसताच आआपने घाईघाईने 'आम्हाला नको बाबा तुमचा पाठिंबा' म्हणून 'होलिअर दॅन दाऊ' असा आव आणून आपण किती निधर्मी आहोत असा भास निर्माण करायचा. दरम्यानच्या काळात बुखारीकडून मुस्लिमांनी कोणाला मत द्यायचे याविषयी योग्य तो संदेश गेलेला असतो आणि इकडे हे तावातावाने पाठिंबा नाकारून दोन्ही दगडांवर पाय ठेवणार आणि तिसरीकडे आपटार्ड हा भाजपचाच डाव आहे असा प्रचार सुरू करणार. वा! आवडलं आपल्याला हे टेक्निक. बादवे, डिसेंबर २०१३ मध्येही केजरीवालांनी अशाच एका मौलवीचा आशिर्वाद घेतला होता हे आठवत असेलच.

In reply to by श्रीगुरुजी

@श्रीगुरुजी- डेरा सच्च्या च्या राम रहीम ( messenger of god वाला) ने ही बीजेपी ला पाठिंबा जाहीर केलाय की.. आणि बीजेपी ने तो नाकारलाही नाहीये.

In reply to by पिंपातला उंदीर

हरियाणा निवडणुकीच्यावेळी देखील त्यांनी उघड पाठिंबा दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

मुसलमान मते किती भाजप ला मिळातात हे भाजप ला पण माहिती आहे आणि आप ला पण. त्यासाठी आदल्या दिवशी आवर्जुन पाठिंबा मागण्यासाठी कोणी आपकडुन जाईल असे वाटत नाही. जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ? कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते. बाकी आप बद्दल येथे लिहिले आहे.. म्हणजे मी आपटर्ड (नविन शब्द माहिती झाला मला) असे समजु नये. मला एकाच बाजुने (आणि विशेष करुन राजकारणात) विचार करुन आपलेच मत कसे बरोबर आणि इतर कसे चुक असे आवडत नाही. आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच.. असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले. भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते. हा या धाग्यावरील शेवटचा रिप्लाय.. अवांतर : आवडते ४ राजकारणी १. शरद पवार २. बाळाअसाहेब ठाकरे ३. अटलबिहारी वाजपेयी ४ अरविंद केजरीवाल. येथे देण्याचे कारण श्री गुरजी याचे मागील दोन्ही धागे खुप एकांगी आणि फक्त भाजपच कसे बरोबर काही ही होउद्या तिकडे असे असल्याने वाईट वाटते. चुक ती चुक आणि पुढच्याकडे इतक्या तुच्छ नजरेने पाहणे योग्य नाही असे मला वाटते. असो. जसा भाजप तसेच समर्थक

In reply to by गणेशा

>>> मुसलमान मते किती भाजप ला मिळातात हे भाजप ला पण माहिती आहे आणि आप ला पण. त्यासाठी आदल्या दिवशी आवर्जुन पाठिंबा मागण्यासाठी कोणी आपकडुन जाईल असे वाटत नाही. सर्व मुस्लिमांची मते आआपलाच मिळत/मिळणार असल्याने आआपला बुखारीच्या पाठिंब्याची गरजच नाही असा तुमचा गैरसमज दिसतोय. मुस्लिमांच्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. त्यात काँग्रेस आहे, आआप आहे, डावे पक्ष आहेत, बसप आहे, सप आहे, संजद आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे ... व अत्यल्प प्रमाणात भाजपसुद्धा आहे. भाजपला मुस्लिमांच्या एकूण मतांपैकी ५-६ टक्के मते नक्कीच मिळतात. ती मते पक्षाला फारशी मिळत नसून उमेदवाराच्या व्यक्तिगत संबंधांमुळे मिळतात. उर्वरीत अंदाजे ९५ टक्के मतांपैकी काँग्रेसचा वाटा किमान ३०-४० टक्के मतांचा असतो. उरलेली अंदाजे ६० टक्के मते इतर निधर्मांध पक्षात विभागली जातात. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ८ पैकी ४ आमदार मुस्लिम मतदार बहुसंख्य आलेल्या मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी दिल्लीतल्या एकूण मुस्लिम मतांपैकी आआपचा वाटा २५-३० टक्के मते असेल. उर्वरीत मुस्लिम मते काँग्रेस, बसप, डावे पक्ष, संजद, राष्ट्रवादी इ. निधर्मांध पक्षात विभागली जातील. आआपने बुखारीचा पाठिंबा आवर्जून मागण्याचे हेच ते कारण. आआपच्या अलका लांबा २-३ दिवसांपूर्वी बुखारीच्या भावाला भेटून आल्या आणि लगेचच बुखारीने फतवा काढला हा काय योगायोग होता का? जी मुस्लिम मते काँग्रेस, बसप, डावे पक्ष इ. पक्षांना जातील ती 'आप'ल्याकडे वळविण्यासाठीच हा सारा खटाटोप होता. पण हा फतवा बॅकफायर होईल हे लक्षात येताच घाईघाईत बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको अशी संभावित भूमिका आआपने घेतली. तोपर्यंत मुस्लिम मतदारापर्यंत योग्य तो आदेश पोहोचलेला होता. >>> जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ? वर सविस्तर उत्तर दिले आहे. यातली ९० टक्क्यांहून अधिक मते जरी भाजपला मिळत नसली तरी आआआप हा या मतांचा सोल कस्टोडिअन नाही. त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. यातला बहुसंख्य वाटा आपल्याच पदरात यावा यासाठी ही सारी नौटंकी. गुपचूप पाठिंबा मागणे आणि नंतर जाहीररित्या पाठिंबा नाकारणे ही नौटंकी केजरीवालांच्या नाटकी स्वभावाला साजेशीच आहे. >>> कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते. आआपवाले तेच करत असतात. काल वर्तमानपत्रात भाजपने दिलेल्या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आणि आआपची जाहिरात म्हणजे उल्लंघन नाही हा आआपचा दावा आहे. या उदाहरणावरून हे लक्षात येईल. >>> आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच.. आआपचे राजकारण स्वच्छ नाही. संशयास्पद देणग्यांवरून हे स्पष्ट आहे. >>> असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले. किरण बेदी अनेक दिवसांपासून भाजपत यायच्या तयारीत होत्या. निवडणुकीत किरण बेदींचा दिल्लीत फायदा होईल असे वाटले म्हणून त्यांचा अधिकृत प्रवेश झाला. >>> भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते. अखिल ब्रह्मांडात आम्हीच तेवढे स्वच्छ, नीतिमान, पारदर्शक आणि इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अनीतिमान, छुपे व्यवहार करणारे या आआपच्या अहंकाराबद्दल आपले काय मत आहे? >>> असो. जसा भाजप तसेच समर्थक असो. जसा आआप तसेच समर्थक.

In reply to by श्रीगुरुजी

@गुर्जी - डेरा सच्चा सौ च काय हो . त्याच्यावर तर खुनासारखे आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत . उत्तर टाळत जाऊ नका हो असे .

In reply to by पिंपातला उंदीर

मग तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याचा फतवा काढलेल्या मौलाना ताकिर रझाच्या पाठिंब्याचं काय? एमआयएम च्या ओवेसीच्या पाठिंब्याचं काय? आणि दिल्लीत ३००० शिखांच्या हत्येतले प्रमुख आरोपी असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्याचं काय? ते बोला ना आधी.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस , भाजप , आप सगळेच एकाच थाळीचे चट्टे बट्टे . सब घोडे बारा टक्के . काय म्हणता ? *lol* *LOL*

In reply to by पिंपातला उंदीर

इतके उतावीळ होउ नका. जरा संयम ठेवा. लगेच निष्कर्ष काढून मोकळे होऊ नका. केजरीवालांसारखे जजमेंटल होऊ नका. मोदींना भेटायला गेल्यावर त्यांना पूर्ववेळ ठरवून या असे सांगितल्यावर लगेच 'मोदी मला घाबरले' असा सोयिस्कर निष्कर्ष काढून ते मोकळे झाले होते. हा तुमाचा एक ओळीचा प्रतिसाद १३:१५ चा आहे. माझा प्रतिसादही १३:१५ आहे हे लक्षात आलं असेलच.

In reply to by पिंपातला उंदीर

हे मी आधी पण एका प्रतिसादात लिहिले होते. आआप हा पक्ष वर्तणुकीच्या बाबतीत भारतातल्या इतर कोणत्याही पक्षासारखाच आहे. परंतु आपटार्डना हे पटत नव्हते. आआपचे वेगळेपण फारसे नाही. फरक एवढाच आहे की आआप नेते अत्यंत अहंमन्य असून फक्त आपणच अखिल ब्रह्मांडातले एकमेव स्वच्छ, प्रामाणिक व पारदर्शी आहोत व इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अप्रामाणिक आणि अपारदर्शी आहेत या भ्रमात आहेत. कमालीचा नाटकीपणा हे आआपचे दुसरे वेगळेपण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

Party with difference बद्दल काय मत आहे तुमच ? दुसर्यांच्या पक्षावर लई टीका करून झाली . जरा आता आपल्या पक्षावर बोला की

In reply to by पिंपातला उंदीर

>>> Party with difference बद्दल काय मत आहे तुमच ? दुसर्यांच्या पक्षावर लई टीका करून झाली . जरा आता आपल्या पक्षावर बोला की कोणत्या मुद्द्यावर बोलू ते सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

हेच भाजप मधले भ्रष्टाचारी नेते , दिल्ली महानगर पालिकेतला भाजप चा भ्रष्टाचार , सीमेवर वर मारले गेलेले अनेक भारतीय जवान , (तरी नवाझ शरीफ यांच्या आईला साडी पाठवणे ), चीन ला अटकाव करण्यात आलेलं अपयश , फ़दवणिस यांचे खेडेकर सोबत स्टेज शेयर करण , विविध पक्षातून आलेले बिभीषण , काळा पैसा बाबत मारलेली थाप , स्वतःच्या राज्यातून तडीपार असणारा गुन्हेगारी प्रवृतीचा राष्ट्रीय अध्यक्ष , ई हूश . अजून लई आहे . तूर्त या मुद्द्यांची उत्तर द्या . मग अजून मुद्दे सांगतो

In reply to by पिंपातला उंदीर

यातल्या बहुतेक गोष्टींचा दिल्ली विधानसभा निवडणुकीशी दुरूनही संबंध नाही. या सर्व मुद्द्यांवर लोकसभा निवडणुकीच्या काळात व नंतरही महाराष्ट विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक धाग्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे. पुन्हा पुन्हा तेच टंकायची माझी इच्छा नाही. अर्थात तुम्ही काहीही सोयिस्कर निष्कर्ष काढायला मोकळे आहात.

In reply to by श्रीगुरुजी

सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता दरवेळेस गुरुजी. भाजपचे दिल्लीतील महत्वाचे नेते . अपाध्याय साहबे, यांबद्दल केजरीवल यांनी पुरावा दाखवला. २४ तासात राजनिती सोडणार म्हणाले होते ते अजुन सोडलेली नाही. केजरीवाल यांनी दाखवुन दिले की, मिटर जे वाटप झाले आहेत आणि ज्यात फॉल्टी मिटर जास्त आहेत ते सप्लाय करणारी कंपाणी उपाध्याय यांची होती. आणि उपाध्याय म्हणाले की ती मेडीया कंपणी आहे तर पुर्ण टॅक्स रेकॉर्ड च काढुन दाखवले .. आत हे ही निवडनुकीला लागु नाहीये का ?

In reply to by गणेशा

>>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे नेते . अपाध्याय साहबे, यांबद्दल केजरीवल यांनी पुरावा दाखवला. २४ तासात राजनिती सोडणार म्हणाले होते ते अजुन सोडलेली नाही. केजरीवाल काय गुप्तचर खात्यात आहेत का ते न्यायालयात न्यायाधीश आहेत? ते वाटेल त्या गोष्टी पुरावा म्हणून दाखवतील. त्याला काय महत्त्व? आपल्या पुराव्याबद्दल इतकी खात्री असेल तर ते उपाध्यायविरुद्ध खटला का दाखल करत नाहीत? आआपकडे शांतिभूषण, प्रशांतभूषण इ. नामवंत वकील आहेत. खटला दाखल करायला काय अडचण आहे? बिनबुडाचे आरोप करणे हे केजरीवालांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. याआधी गडकरी आणि इतर काही नेत्यांविरूद्ध बिनबुडाचे आरोप केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटले सुरू आहेत. मे महिन्यात केजरीवाल ६-७ दिवस सरकारी पाहुणचारही घेऊन आले होते. तुरूंगात राहीन पण जामिनावर सुटण्यासाठी कोणताही बाँड लिहून देणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे केजरीवाल ६ दिवसानंतर निमूटपणे बाँड देऊन जामिनावर बाहेर आले होते. अर्थात वाटेल त्या प्रतिज्ञा करणे आणि नंतर नि:संकोचपणे त्या बिनदिक्कत मोडणे हे सुद्धा केजरीवालांचे अजून एक व्यवच्छेदक लक्षण. काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असे जाहीर सांगून शेवटी त्यांनी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला होता. असो.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असे जाहीर सांगून शेवटी त्यांनी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला होता. राष्ट्रवादी चा पाठींबा घेणार नाही , नाही , नाही अशी त्रिवार गर्जना करणारे फेकेंद्र लुबाड्वनिस आठवले *biggrin*

In reply to by पिंपातला उंदीर

घेतलाच नव्हता. याविषयी सविस्तर चर्चा शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही या धाग्यावर झाली आहे. तिथे वाचा. बादवे, केजरीवाल हे काही फडणविसांपेक्षा वेगळे दिसत नाहीत. खरं ना?

In reply to by ग्रेटथिंकर

नानासाहेब, मघापासून बरंच काही खरडलंस. इतकावेळ मी दुर्लक्ष करत होतो. मी वर दिलेला धागा वाच. वस्तुस्थिती समजून घे. त्याच्यात तुझे स्वतःचे प्रतिसादही वाच आणि मग लिहायला लाग.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी केजरीवाल ने कोन्ग्रेस चा पाठींबा मागितला नव्हता . कोन्ग्रेस ने स्वतः दिला . फडवाणीस सरकारला ला राष्ट्रवादी ने असाच दिला . दोन्ही मध्ये गुणात्मक फरक काय ? भाजप ने राष्ट्रवादी चा पाठींबा नाकारला होता का ? त्या धाग्यावर तुमच्या कोलांट्या उड्या लई मजेशीर होत्या . नाशिक मध्ये मनसे ने राष्ट्रवादी ने पाठींबा घेतल्यावर तुम्ही लई बोट मोडली होतीत . काही तरी एक भूमिका ठेवा ना . बाकी तुम्ही तरी उघड भाजप चे समर्थक आहात . बाकी आम्ही नाही त्या गावचे असे दाखवणार्या छुप्या भक्तांकडून तर उत्तराची पण अपेक्षा नाही

In reply to by श्रीगुरुजी

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही असे सांगुण त्यांचाच पाठिंबा बीजेपीने महाराष्ट्रात घेतला हे विसरलात का श्रीगुरुजी?

In reply to by गणेशा

पुरावेच खोटे असतील तर कशी सोडणार राजनीति? आणि खरे असतील तर केजरीवाल त्यांच्यावर खटला का भरत नाहीत? खटल्यात आपण उघडे पडू म्हणूनच कचरत आहेत का? पुरावे खरे का खोटे ते न्यायालयालाच ठरवू देत ना. केजरीवाल हे ठरविणारे कोण?

In reply to by नांदेडीअन

इतक्यात आनंदी होवू नका. केजरीवालांसारखा मी पळपुटा नाही. याउलट तुम्ही आणि अजून एक जण 'आता यापुढे या धाग्यावर लिहिणार नाही' असे लिहूनसुद्धा पुन्हा परत आलेत.

In reply to by श्रीगुरुजी

अच्छा, मी परत आलो त्याचा राग आहे का ? ठीक आहे, इग्नोरास्त्र सोडतो. बोलू १० तारखेलाच आता. :) तोपर्यंत जितक्या खोट्या बातम्या शेअर करायच्यात तेव्हढ्या करा. बेस्ट ऑफ लक. ;)

In reply to by नांदेडीअन

नाही हो. राग कसला. उलट तुमचे सगळे मूद्दे खोडून टाकता आले याचा आनंदच आहे. मला फक्त तुमच्या वागण्यातील विसंगती दाखवून द्यायची होती इतकंच. >>> तोपर्यंत जितक्या खोट्या बातम्या शेअर करायच्यात तेव्हढ्या करा. तुमच्याकडच्या खोट्या बातम्या संपल्या की काय? असो. तुम्हालासुद्धा बेस्ट ऑफ लक.

In reply to by श्रीगुरुजी

शेवटचा रिप्लाय म्हंटल होते कारण स्वतातच लिखान चाल उहोते असे वाटले होते.. असो.
>>> जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ? वर सविस्तर उत्तर दिले आहे. यातली ९० टक्क्यांहून अधिक मते जरी भाजपला मिळत नसली तरी आआआप हा या मतांचा सोल कस्टोडिअन नाही. त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. यातला बहुसंख्य वाटा आपल्याच पदरात यावा यासाठी ही सारी नौटंकी. गुपचूप पाठिंबा मागणे आणि नंतर जाहीररित्या पाठिंबा नाकारणे ही नौटंकी केजरीवालांच्या नाटकी स्वभावाला साजेशीच आहे.
त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत हे आपल्यालच वाटते.. समस्त दिल्लीकरांना पुर्ण बहुमतातील सरकार हवे आहे आणि ते आप किंवा भाजपच देवु शकणार असल्याने, सामान्य जनता या दोन पक्षापैकीच एकाला वोटींग करेन.. इतर पक्षांना वयक्तीक लेवल वरील रिलेशन्शिप असणारेच वोट येथे मिळतील. म्हणुन इतर अपक्ष दिल्लीत जास्त निवडनु येणार नाहीत. म्हणुन फतवा फक कॉन्ग्रेस ला वोट करु नका म्हंटले असते तरी ती मते आप लाच पडली असती.
>>> कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते. आआपवाले तेच करत असतात. काल वर्तमानपत्रात भाजपने दिलेल्या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आणि आआपची जाहिरात म्हणजे उल्लंघन नाही हा आआपचा दावा आहे. या उदाहरणावरून हे लक्षात येईल.
हे म्हणने का सु नये, जर निवडनुकीच्या अगोदर टीव्हीवरील जाहिरातींना बंदि असेन.. प्रचार करण्यास बंदि असेन तर पेपर न्युज पण तश्याच न्युज मध्ये आले पाहिजे असे म्हणने आपणास चुकीचे का वाटते ? की अज्ञात सोर्स कडुन पैसा मिळाला म्हणुन कीती ही खर्चकरायचा का ?
>>> आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच.. आआपचे राजकारण स्वच्छ नाही. संशयास्पद देणग्यांवरून हे स्पष्ट आहे.
ज्यांना संशयास्पद देणग्या घ्यायच्या असतात ते नेट वर माहीती देणार कशाला या संशयाच्या. आणि तो चेक जर आप कडे आला असेन तर तोच चेक काय बँकेने भाजप ला दिला काय पुन्हा ? दुसरा मुद्दा ९५२ (७३ %) करोड रुपये भाजप ला अज्ञात सोर्स कडुन मिळाअले आहेत आणि ८२ % कॉन्ग्रेस ला. तर त्यांना पहिली नैतिकताच नाही आप वर आरोप करण्याची ? त्यांनी आपला शहनिशा करायला काय झाले विचारायचे पण स्वता मात्र कॅश घ्यायची असे का ? मोदींच्या एका सभेला येणारा खर्च महाराष्ट्र निवडनुकीवेळेस ही पाहिला आहे आम्ही. त्यामुळॅ पैसे कोणाकडुन आण इकसे येतात भाजप ला हे येथे सांगण्याची गरज नाही.. कदाचीत त्यामुळॅच भांडवलदारांना सवलती चालु आहेत.
>>> असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले. किरण बेदी अनेक दिवसांपासून भाजपत यायच्या तयारीत होत्या. निवडणुकीत किरण बेदींचा दिल्लीत फायदा होईल असे वाटले म्हणून त्यांचा अधिकृत प्रवेश झाला.
किरण बेदी असतील हो लाख यायला तयार पण भाजप ने त्यांना मुख्यमंत्री उमेदवार केले आहे, असे आयात उमेदवार भाजप ला का घ्यावे लागतात.. बिन्नी पण त्यातीलच एक. त्यावरुनच कळते आहे, मागिल वेळेस बिन्नीला खतपाणी कुठुन मिळत होते
>>> भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते. अखिल ब्रह्मांडात आम्हीच तेवढे स्वच्छ, नीतिमान, पारदर्शक आणि इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अनीतिमान, छुपे व्यवहार करणारे या आआपच्या अहंकाराबद्दल आपले काय मत आहे?
आम्ही तेव्हडे स्वच्छ असे आप का माणते कारण ते असे म्हणत नाही प्रत्येक राजकारणी भ्रष्ट आहे, ते म्हणतात भाजप आणि कॉन्ग्रेस अनेक भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालते.. नावे सांगायची गरज नसावी असे वाटते. आणि त्यामुळे आप स्वताला स्वच्छ समजते. भगोडा चे जेव्हडे भांदवल केले गेले त्याच अर्थ ते स्वच्छ नव्हते असे लावता येणार नाही.
>>> असो. जसा भाजप तसेच समर्थक असो. जसा आप तसेच समर्थक.
मी तुमच्या मागच्या धाग्यावर राष्ट्रवादी च्या बाजुने लिहिले होते. मी एकदा भाजप ला .. एकदा शिवसेनेला ही वोट केले आहे.. कारण ते सदश्य कसे आहेत यावरुन मी वोट करतो. मागील वेळेस ही मी भाजप लाच वोट करणार होतो . पण आमच्या चिंचवड विधानसभेत भाजप ने आयात उमेदवार राष्ट्रवादीचा घेतला आणि लोकसबेह्ला ज्या विरुद्ध मत दिले त्यांनाच मत कसे द्यायचे म्हणुन आणि ५००० रुपये धुडकावुन मी राष्ट्रवादीला वोट केले हरणार होते ते तरी. त्यामुळॅ कोणाचे समर्थक असण्यापेक्षा स्वच्छ आणि सरळ राजकारणाला माझा पाठिंबा आहे. म्हणुन दिल्लीमध्ये आप ला माझा पाठिंबा आहे. फक्त भाजपचीच पाठराखन किंवा फक्त आप विरोध (क्लिंटन सारखा मला जमत नाहि . --- जाता जाता.. दिल्लीत भाजप किंवा आप कोणी ही जिंकले तरी सक्षम विरोधी पक्ष ही यापैकी एकास होता येइल त्यामुळॅ दिल्लीची कामे होतील असे वाटते. आता पर्यंत भाजप गेल्या १६ वर्षाचा हिशेब ठेवत आहे.. पण त्याच दिल्ली महानगरपालिकेत भाजप सत्तेवर होता आणि तो हिशेब त्यांचा ही थोड्या फार प्रमाणाअत आहे.. असो तरीही शुभेच्छा . तसे ही किरण बेदी काय अणि अरविंद केजरीवाल काय दोघे ही स्वच्छ राजकारण करतील आणि दिल्ली पुढे न्हेतील फक्त मोदी प्रतिमा किरण बेदींना आता सारखे झाकोळुन टाकणार नाहीत हे पाहिले पाहिजे. आप सत्तेत येवो आणि जे लोक रस्त्यावर आंदोलन करणारे होते ते सत्तेत येवुन मुजोर सत्ताशीशांना जागा दाखवावी असे मनोमन वाटते.

In reply to by गणेशा

>>> त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत हे आपल्यालच वाटते. मग तुम्हाला काय वाटते? मुस्लिमांची १००% मते फक्त आआपलाच मिळणार अशी समजूत आहे काय तुमची? >>> समस्त दिल्लीकरांना पुर्ण बहुमतातील सरकार हवे आहे आणि ते आप किंवा भाजपच देवु शकणार असल्याने, सामान्य जनता या दोन पक्षापैकीच एकाला वोटींग करेन.. इतर पक्षांना वयक्तीक लेवल वरील रिलेशन्शिप असणारेच वोट येथे मिळतील. म्हणुन इतर अपक्ष दिल्लीत जास्त निवडनु येणार नाहीत. परत एकदा चुकीची समजूत. आआप व भाजप व्यतिरिक्त इतर अनेक पक्ष रिंगणात आहेत. बसप व काँग्रेस प्रत्येकी ७० जागा लढवित आहेत. डावे पक्ष १० जागा लढवित आहेत. प्रत्येक पक्षाचे स्वतःचे बेसिक मतदार असतात. ती मते त्या पक्षाला मिळतातच. >>> म्हणुन फतवा फक कॉन्ग्रेस ला वोट करु नका म्हंटले असते तरी ती मते आप लाच पडली असती. म्हणून तर आआपने अलका लांबांना बुखारीच्या भेटीला पाठवून फतवा जाहीर करायला लावलेला दिसतोय. >>> हे म्हणने का सु नये, जर निवडनुकीच्या अगोदर टीव्हीवरील जाहिरातींना बंदि असेन.. प्रचार करण्यास बंदि असेन तर पेपर न्युज पण तश्याच न्युज मध्ये आले पाहिजे असे म्हणने आपणास चुकीचे का वाटते ? की अज्ञात सोर्स कडुन पैसा मिळाला म्हणुन कीती ही खर्चकरायचा का ? प्रचार संपल्यावर वर्तमानपत्रात जाहिराती देण्यास कायदेशीर परवानगी आहे. जशा भाजपने जाहिराती दिल्या तशाच आआपने दिल्या आहेत. आपण केले ते योग्य आणि भाजप करतो ते चुकीचं हा आआपचा शुद्ध कांगावा आहे. बादवे, आआपचाही सर्व निधी ज्ञात स्त्रोतांकडून आलेला नाही. २ कोटी रूपयांचा मूळ स्त्रोत अजून अज्ञातच आहे. >>> दुसरा मुद्दा ९५२ (७३ करोड रुपये भाजप ला अज्ञात सोर्स कडुन मिळाअले आहेत आणि ८२ % कॉन्ग्रेस ला. तर त्यांना पहिली नैतिकताच नाही आप वर आरोप करण्याची ? आआपची तरी नैतिकता आहे का इतरांवर आरोप करण्याची? >>> आणि त्यामुळे आप स्वताला स्वच्छ समजते. भगोडा चे जेव्हडे भांदवल केले गेले त्याच अर्थ ते स्वच्छ नव्हते असे लावता येणार नाही. आआपवाले स्वतःला वाटेल ते समजतील. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ते स्वच्छ आहेत का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. अत्यंत चुकीच्या कारणावरून राजीनामा देऊन जबाबदारी झटकून ते पळून गेले ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मग तुम्हाला काय वाटते? मुस्लिमांची १००% मते फक्त आआपलाच मिळणार अशी समजूत आहे काय तुमची?
नाही, परंतु ९९ % मते भाजप ला पडणार नाहीत ही खात्री भाजपला ही होती आणि आप ला ही होती. कॉग्रेस ला यावेळेस जास्त मते पडणार नाहीत या साठी वेगळ्या विश्लेषणाची गरज नसावी.
बादवे, आआपचाही सर्व निधी ज्ञात स्त्रोतांकडून आलेला नाही. २ कोटी रूपयांचा मूळ स्त्रोत अजून अज्ञातच आहे.
अहो, ९५२ कोटी जेंव्हा अनक्नोन सोर्स कडुन आणि जास्त करुन कॅश म्हणुन घेतले गेले तेंव्हा कुठला क्रायटेरीआ (फिलटर) लावला गेला होता का भाजप कडुन . निदान आप ने चेक घेतला.. पॅन नं त्याच्याकडे आहेत. त्याही पुढे जाउन चुक होत असतील तर ते आनखिन काय करु शक्तील ते पाहणार आहेत असे ते बोलले. भाजप वाले आपण कसे ही पैसे घेतो तसेच आप पण घेतोच की कुटेह वेगळे आहेत ते असे का दाखवु इच्छित आहे ? स्वता कसे वेगळे आहेत हे सांगणारेच आज आपण वेगळे नाहे तर कोणीच नाही हा प्रयत्न खरेच भाजप साठी हाश्यास्पद वाट नाही का ? जास्त एक्प्लनेशन देत नाही, वरती एक लिंक दिली आहे त्यात हे आले आहे
आआपवाले स्वतःला वाटेल ते समजतील. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ते स्वच्छ आहेत का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. अत्यंत चुकीच्या कारणावरून राजीनामा देऊन जबाबदारी झटकून ते पळून गेले ही वस्तुस्थिती आहे.
ठि काहे त्या साठी त्यांनी माफी मागितली होती. आणि चुक केली होती कुठला गुन्हा तर केला नव्हता असा त्यांचा दावा होता. चुका कोणाअकदुन होत नाहीत ? फक्त काही राजकारणी मान्य करतात काही नाही. २००२ च्या चुका मोदींल्कडुन मान्य झाल्या नाहीतच ना. म्हणुन ती चुक नव्हती असे आपण कसे म्हणु शकता ? आणि तरीही त्या ४९ दिवसाचे योग्य भांदवल आप ने निवडनुकित केले. आणि भाजप ला ८ महिन्याचे मुल्यांकन पण देता आले नाही. असो...

In reply to by श्रीगुरुजी

बाकी मोदी याना आमंत्रण न देऊन ज्या शाही इमाम यांनी त्यांचा अपमान केला होता त्यांनी आयोजित केलेल्या डीनर ला कोण गेल होत ? ओळखा पाहू ? http://m.bhaskar.com/news/referer/521/UT-DEL-NEW-dinner-party-at-jama-m…

मस्त interview आहे केजरीवाल चा.आणि वरती जे जातीय राजकारणाबद्दल बोलले जात आहे ते तरी केजरीवाल खेळत नाही. असो.. या संभाषणात पण त्यावर पण प्रकाश टाकलेला आहे. http://www.ndtv.com/elections/video/player/the-buck-stops-here/delhi-do… तसे ही माझ्या एका ही रिप्लाय ला एकही उत्तर नाहीच आहे येथे म्हणुन जास्त टंकण्याचे कष्ट घेत नाही.

आज मतदान केल्यानंतर किरण बेदी भाजपाच्या काही समर्थकांना घेऊन कॅमेर्‍यापुढे आल्या होत्या. त्यातला एक माणूस म्हणाला, "आम्हाला आपवाल्यांनी प्रत्येकी ३०० रूपये देऊन आपला वोट टाकायला सांगितले आहे, आणि टाकले नाही तर तुमच्या झोपडपट्ट्या बॉम्ब टाकून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे." *lol* दुसरा एक माणूस कॅमेर्‍यापुढे आला, पण तो बिचारा भाजपाची टोपी काढायची विसरून गेला होता. किरण बेदींनी लगेच त्याची टोपी बाजूला काढून टाकली. *biggrin* आज तकवर Live सुरू होते हे. आत्ता दाखवत नसतील तर त्यांच्या YouTube चॅनलवर जाऊन बघा, तिथे अपलोड केले असेल कदाचित.

In reply to by नांदेडीअन

दुतोंडी लोक आहेत हो हे . प्रामाणिक वैगेरे म्हणवणारी किरण बेदी कशी या तडीपार भ्रष्ट लोकांच्या हाती लागली देव जाणे .

>>> त्यातला एक माणूस म्हणाला, "आम्हाला आपवाल्यांनी प्रत्येकी ३०० रूपये देऊन आपला वोट टाकायला सांगितले आहे, आणि टाकले नाही तर तुमच्या झोपडपट्ट्या बॉम्ब टाकून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे." चालायचंच. २ दिवसांपूर्वीचं आशुतोषांचं वक्तव्य विसरलात का? भाजपवाले पैसे, दारू आणि मांसाहारी जेवण मतदारांना वाटत असून झोपडपट्टीवाल्यांची मतदार ओळखपत्रे त्यांनी काढून घेतली आहेत व आआपला मत दिल्यास गंभीर परीणाम होतील अशीही धमकी भाजपवाल्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले होते. जे २ दिवसांपूर्वी आशुतोष म्हणत होते आता तेच भाजप म्हणत आहे. दोघात फरक तो काय?

In reply to by श्रीगुरुजी

दुसरा एक माणूस कॅमेर्‍यापुढे आला, पण तो बिचारा भाजपाची टोपी काढायची विसरून गेला होता. किरण बेदींनी लगेच त्याची टोपी बाजूला काढून टाकली. आज तकवर Live सुरू होते हे.