Skip to main content

वावर

लेखक ऊध्दव गावंडे यांनी गुरुवार, 05/02/2015 15:53 या दिवशी प्रकाशित केले.

जीवं रमला
गमला
ऊभ्या पीकातं
रंगला
बोंड फुललं
खुललं
हासूहोटातं
उललं
तुरं सजली
धजली
भळं पाहूनं
लाजली
मनं भरलं
भुललं
हुळ्ळा खायाले
झुरलं
असं साजरं
वावरं
कोनी लावो ना
नजरं
शब्दार्थः
बोंडःकपाशी चे बोंड
भळः ज्वारी ची ताटं
हुळूळा ः हूरडा
वावर ः शेत

लेखनविषय:

वाचने 2468
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

कविता आवडली..
स्वभाषेचे शब्द मनाला जास्त जवळिक साधुन जातात.. शब्दार्थ कितीही शप्ष्ट असुद्या .. न कळणारे शब्द मन मनाला भुरळ घालतात.

लिहित रहा.. वाचत आहे


भळं सोडून बाकी शब्द कळले होते, त्याचा अर्थ वाचल्यावर आणखीनच आवडली.


जबरदस्त
मिपावर कवितांचा मळा जुन्या काळातल्यासारखा फुलायला लागला जणू!


उद्धव भो! मह्या सारख्या घरापासून लै लंबा जाऊन काम करनार्याले पुरं वावर धुर्या न बसुन पहाचा आनंद देल्या बद्दल लै आभारी हाव लेक!! रड़ोता गळ्या तुम्ही!! आपुन मनानं डायरेक्ट उमरोती ले पोचलो न बाप्पा!!


सोन्याबापु धन्यवाद ...
तुम्ही तं बाप्पा असं पेचा त टाकलं की काई सुचून नाई रायलं.
आभार काहाले बाप्पा.
बाकी तूम्ही अन आपल्या दोस्ताईचे मनापासुन धन्यवाद !