जीवं रमला
गमला
ऊभ्या पीकातं
रंगला
बोंड फुललं
खुललं
हासूहोटातं
उललं
तुरं सजली
धजली
भळं पाहूनं
लाजली
मनं भरलं
भुललं
हुळ्ळा खायाले
झुरलं
असं साजरं
वावरं
कोनी लावो ना
नजरं
शब्दार्थः
बोंडःकपाशी चे बोंड
भळः ज्वारी ची ताटं
हुळूळा ः हूरडा
वावर ः शेत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2442
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली..
+++१११
In reply to कविता आवडली.. by गणेशा
सुंदर!
सुंदर!!!!
कविता आवडली
जबरदस्त
धन्यवाद ! धन्यवाद मित्रांनो
उद्धव भो! मह्या सारख्या
सोन्याबापु धन्यवाद ...
वा छान !! थोडी वेगळी !!
धन्यवाद !
In reply to वा छान !! थोडी वेगळी !! by खटपट्या
उध्दवभाव, लैच भारी लिव्हला गा
धन्यवाद ! वैभवराव धन्यवाद !
In reply to उध्दवभाव, लैच भारी लिव्हला गा by वैभव जाधव