नमस्कार मंडळी,
मिपाच्या रेवती ताईंचा उत्साह दांडगा आहे हो! अहो दांडगा म्हणजे किती याचा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली. झालं असं की, चोपराजच्या मातोश्री शितल मॅडम यांनी 'मी १५ नोव्हेंबर ला भारतात परत निघाले आहे' असा निर्वाणीचा फोन केला. आम्हाला वाटलं ती जाण्या आधी एखादा मिपाकट्टा करू. रेवती ताईंनी लगेच घरून सूत्र हलवायला सुरूवात केली. या सूत्र हलवण्याच्या नादांत खरड वह्यातून जवळ जवळ सगळ्याच मिपा मंडळींना समजले की, या भूमिगत (रेवती नावाखाली)असलेल्या मिसेस चतुरंग आहेत. असो.. तर या शितल मॅडम ना मिपाच सेंड ओफ करावा म्हणून २६ ऑक्टोबर तारिख ठरली. इतक्यात शितल बाईंनी स्फोट केला की, आम्ही इतक्यात परत जाणार नाही आहोत.. झालं ! त्यामुळे लांबता लांबता हा कट्टा ८ नोव्हेंबरला करायचे यावर आम्हा तिघिंचे (बिचार्या चतुरंगना कोणीच विचारत नव्हते.) नक्की झाले. लंबूटांगलाही ही तारिख सोयीची होती... दिवाळी झाली.. आणि हा दिवस उगवला एकदाचा.
सकाळीच ८.०० वाजता आम्ही आणि शितलचे कुटुंब विल्मिंग्टन ला पोहोचलो. यावेळी एक बरं होतं ते म्हणजे काहिही विशेष करून न्यायचं नव्हतं. रेवती ताईंनी सगळी तयारी केली होती. तरिही अगदीच हात हलवत जाण्यापेक्षा काहीतरी घेऊन जावं या विचारानं शितल बाईंनी ओल्या नारळाच्या करंज्या, दिवाळीतल्या चकल्या आणि बेसनलाडू आणले होते. आणि मी सुरळीच्या वड्या करून नेल्या होत्या.

" alt="" />
चतुरंग यांच्या घरी पोचल्या पासून जी खादाडीला सुरूवात झाली ती घरातून बाहेर पडे पर्यंत चालूच होती. गेल्या गेल्या रेवती ताईंनी स्वाती ताई स्पेश्शल केलेले छोले आणि पुर्या यावर ताव मारून झाला.
मग चहा.. एकिकडे गप्पांचा फड रंगात आला होता. अमर (मिस्टर शितल), जगदीश (मिस्टर प्राजु) हेही गप्पांमध्ये हिरिरिने सामिल होते.
मंडळी, अमर आणि जगदीश हे छुपे रूस्तम आहेत बरं का! म्हणजे मिपावरची सगळी मंडळी, त्यांची लेखनशैली, त्यांना ठेवलेली टोपण नावे... हे या दोघानाही अगदी निट माहिती आहे. म्हणजे आमच्या लॉगिन खाली ही दोघं वाचन मात्र असतात.

" alt="" />
मंडळी, गप्पा हा विषय असा असतो की, खो घातल्यासारखा विषय बदलत असतो. गप्पा मुलांच्या खेळण्यावरून मग मोदकावर आल्या :)
आणि मग रेवती ताईंना मोदक शिकायचे आहेत अशी टूम निघाली. शितल ताई पुढे सरसावल्या, भराभर सारण केलं गेलं आणि उकड तयार केली गेली. मी तशी सुगरण या कॅटॅगिरीमध्ये मोडत नसल्याने मी फक्त मोदकांना आकार द्यायच्या कामात मदत केली. मोदक वळत असताना ,"प्राजु, मला माहिती नाही तुलाही इतके छान मोदक येतात ?" या रेवतीताईच्या वाक्याने अंगावर मूठभर मासच चढलं. काय पण गैरसमज असतात ना लोकांचे!!

" alt="" />

" alt="" />
चतुरंग, जगदीश, अमर आणि लंबूटांग.. सगळे गप्पा ठोकत होते. मास्टर मुकुल, मास्टर अथर्व आणि मास्टर यशराज.. त्यांचा हक्क पुरेपूर बजावत होते. अधून मधून प्रत्येक आई आपापल्या मुलावर वसकन ओरडत होती. या सगळ्यांत लंबूटांग ला वैवाहीक आयुष्यासाठी सल्ले देणं अगदी जोरदार चालू होतं. ;)
विनोद सांगणं चालूच होतं.. हसून हसून पोट दुखायची वेळ आली. आणि मग इतके हसल्यामुळे सगळ्यांना पुन्हा भूका लागल्या.
रेवतीताई , मी आणि शितल यांनी एकिकडे इडल्यांचे घाणे काढले आणि वाफाळणार्या इडल्या, अप्रतिम सांबार, चटणी, पुलाव, रायता, आणि आम्ही तिघिंनी केलेल मोदक... असा असॉर्टेड मेनू.. जबरा!! हाणलाच हाणला!
मंडळी, एरवी घसा साफ करून घ्यायला चान्स नाही मिळत. पण आज ऐती लोकं मिळाली होती, गाणं सहन करायला. काय करणार?? तात्यांनी संपादकाची जबाबदारी दिल्यामुळे माझं गाणं ऐकणं सगळ्यांना भागच होतं. नाहीतर काय माहिती शितलचा एखादा कलादालन, रेवतीची एखादी रेसिपी, चतुरंग च एखादं विडंबन उडवलं जायचं!!!! त्यामुळे सहन केलं बिचार्यांनी.
(ऐका 'रुपेरि वाळूत')
एकदा संधी मिळाल्यावर सोडणारी मी थोडीच आहे.. आणखी एक गाणं फेकलं ;)..
मी या सगळ्यांची फार आभारी आहे.
सगळ्यांची यथेच्छ जेवणं झालेलीच होती... आता वेळ होती.. अप्रतिम केकची. रेवतीने जो काही केक केला होता, त्याला केवळ अप्रतिम इतकाच शब्द लागू पडतो. या केकची कासियत अशी की, यावरची सजावट मास्टर मुकुल यांनी केली होती. नाहीतरी माझं गाणं ऐकून आंबट्-तुरट झालेली तोडं गोड करण्यासाठी केक हवाच होता. तोही हादडला...

" alt="" />
आता संध्याकाळ झाली होती. पोट भरलेलंच होतं. पण चहाची वेळ कशी चुकावी. चहाही झाला.. मुलं भांडून, पळापळी करून कंटाळली..
हूं कि चूं न करता एका जागी बसून विडियो बघत बसली आहेत मुलं, म्हणजे किती दमली असतील कल्पना करु शकता! #:S (डावीकडून यशराज, अथर्व आणि मुकुल)
आता सगळ्यांना घरचे वेध लागले. हळूहळू ६.३० च्या दरम्यान एकेक करत सगळेच बाहेर पडलो.. त्या या कट्ट्याच्या गोड्(अगदी त्या पायनापल केक सारख्या) आठवणी मनांत साठवत घरी आलो.
एक मात्र विशेष की, रेवती ताईनी.. उत्तर भारतापासून सुरूवात करून , मध्ये महारष्ट्राला घेत, दक्षिण भारतात आणून सोडलं. म्हणजे आधी छोले-पुर्या, मग उकडीचे मोदक आणी मग इडली सांबार.. :)
रेवती ताई आणि चतुरंग यांनी त्यांच्या घरी कट्ट्यासाठी आमंत्रीत केल्याबद्दल मी त्या दोघांचे मनापासून आभार मानते.
- प्राजु

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11846
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वाह .. मस्त
मस्त :)
अरे वा
खालुन
मस्त
मस्त!!!
प्राजूची
In reply to मस्त!!! by ऋषिकेश
धन्यु
In reply to प्राजूची by रेवती
लपलेलो नाही रे बाबा.
In reply to धन्यु by ऋषिकेश
लै मज्जा केली जनू....
खरच बिपिनभाऊ,
In reply to लै मज्जा केली जनू.... by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा...
In reply to खरच बिपिनभाऊ, by रेवती
व्वा,
छान
अरे..वा..
आम दुनियेत
In reply to अरे..वा.. by वाटाड्या...
:)
In reply to अरे..वा.. by वाटाड्या...
मस्त वृत्तांत!
विचार ना!
In reply to मस्त वृत्तांत! by शाल्मली
नाही गं शाल्मली..
In reply to विचार ना! by रेवती
मग असं
In reply to नाही गं शाल्मली.. by प्राजु
श्रवणीय वृत्तांत
In reply to मस्त वृत्तांत! by शाल्मली
अरेरे ..
+१
In reply to अरेरे .. by टारझन
लंबुटांग ...
In reply to अरेरे .. by टारझन
अभिनंदन्....पऽऽण...
प्राजुनं
In reply to अभिनंदन्....पऽऽण... by प्रभाकर पेठकर
सुरळीच्या
प्राजू, सुं
काय मस्त
@ यशो
In reply to काय मस्त by यशोधरा
अरे व्वा...
आता
छान म्हटले आहे की
In reply to आता by प्राजु
+१
In reply to छान म्हटले आहे की by चित्रा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
In reply to +१ by नंदन
गाणे !
प्राजूने
८ नोहेंबर मिपा कट्टा
संगीत खादाडी कट्टा!
:)
झक्कास..
कट्टेकरी सर्व मिपाकराचे अभिनंदन
कट्ट्यावर
In reply to कट्टेकरी सर्व मिपाकराचे अभिनंदन by वेताळ