Skip to main content

म्हातारी ग मैना

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 01/02/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
लांब सडक केंसावरी हात फिरविला तिने विग खाली पडली. दर्पणात छवी पाहुनी जोरात ती हसली कवळी खाली पडली. उचलताना कवळी चष्मा पडला खाली दिसे केवळ अंधार. म्हातारी ग मैना कर भक्तीचा शृंगार झाला फिका संसार.
लेखनविषय:

वाचने 1786
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

म्हातार्‍या पण अजूनहि स्वःताला तरुण समजणार्‍या मैनेचं अगदि चपखल वर्णन. खुपच आवडली कविता. पण हा कोणता काव्यरस आहे??...बहूतेक थंड पाण्याचे कुंड!!!

In reply to by अदि

आरशात कंगवा करताना कविता सुचली, (वय ५४ वर्षाचे आहे, केस हळू हळू मैदान सोडतात आहे, सहज विग लावायची कल्पना आली, तेवड्यात हातून कंगवा खाली पडला. आणि कवितेची कल्पना सुचली. त्या साठी विग खाली पाडावी लागली....