मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हातारी ग मैना

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लांब सडक केंसावरी हात फिरविला तिने विग खाली पडली. दर्पणात छवी पाहुनी जोरात ती हसली कवळी खाली पडली. उचलताना कवळी चष्मा पडला खाली दिसे केवळ अंधार. म्हातारी ग मैना कर भक्तीचा शृंगार झाला फिका संसार.

वाचने 1774 वाचनखूण प्रतिक्रिया 8

दिपक.कुवेत Sun, 02/01/2015 - 12:21
म्हातार्‍या पण अजूनहि स्वःताला तरुण समजणार्‍या मैनेचं अगदि चपखल वर्णन. खुपच आवडली कविता. पण हा कोणता काव्यरस आहे??...बहूतेक थंड पाण्याचे कुंड!!!

तिमा Sun, 02/01/2015 - 17:03
कविता वाचून 'परमेश्वर गोदरेज' यांची आठवण झाली.

अदि Mon, 02/02/2015 - 13:09
आपली एकच्च छोटी शंका..विग खाली पडली का पडला?? :D

In reply to by अदि

विवेकपटाईत Mon, 02/02/2015 - 19:20
आरशात कंगवा करताना कविता सुचली, (वय ५४ वर्षाचे आहे, केस हळू हळू मैदान सोडतात आहे, सहज विग लावायची कल्पना आली, तेवड्यात हातून कंगवा खाली पडला. आणि कवितेची कल्पना सुचली. त्या साठी विग खाली पाडावी लागली....