Skip to main content

डु आयडी आणी चपला

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 28/01/2015 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज बर्‍याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले? एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्‍यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित? मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात? मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित. डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते. सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल. इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक आपलाच नम्र मृत्युं जय

वाचने 29803
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

संपादकांची काय प्रतिक्रिया आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? अजून एका तरी संपादकाचा प्रतिसाद/स्पष्टिकरण आहे का ईथे?

In reply to by पदम

नाही डू आयडी म्हणजे दुष्ट आयडी!! काही लोकांना 'द' टाईप करता येत नाही, ते 'ड' टाईप करतात. त्यावरुन हा अपभ्रंश अस्तित्त्वात आला आहे.

माहीत नव्हत म्हणुन विचारल. बाळ अजुन लहान आहे ह्या क्षेत्रात.

तुमि मजा बघुन र्हायले बाप्पा पन पब्लिकला काय कळ्ळा तर बरं व्हील ना :)

मिपाच्या धोरणानुसार काही आयडींवर वेळोवेळी शिस्तभंगाची कारवाई वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी केली जाते. बहुतेकवेळा सतत असांसदीय भाषा वापरणे, खेळीमेळीचे वातावरण बिघडवणे अशी कारणे असतात. मात्र तात्पुरती कारवाई असेल तर परत येताना त्या सदस्यांना अपमानास्पद वाटू नये म्हणून दर वेळी अशी कारवाई जाहीर केली जात नाही. या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली आहे. त्यामुळे धागा आता वाचनमात्र करत आहोत. सामंजस्याने चर्चा केल्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद! मात्र यापुढे कोणाला कसलीही शंका असल्यास सं मं आयडी किंवा नीलकांत आयडीला व्यनि करावा ही विनंती.