✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देवस्थाने आणि भटजी....

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 01/23/2015 - 01:15  ·  लेख
लेख
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव. आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत. आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.) आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते. लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्‍यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्‍यांसाठी टांकसाळ?" असो, पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली. भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर." मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही." गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे." जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती. एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला. गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्‍यात गेलो. जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली. दक्षिणा विचारली. भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?" मी,"हो." भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील." योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे. डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
44950 वाचन

💬 प्रतिसाद (204)

प्रतिक्रिया

गुहागर एसटी स्टँडकडुन

के.पी.
Sat, 01/24/2015 - 21:07 नवीन
गुहागर एसटी स्टँडकडुन दुर्गादेवीच्या देवळाकडे येताना मधे एक शाळा लागते त्याच्या जवळचं मंदिर का?
होय तिथे २ मंदिरे आहेत. त्यातील शाळेला लागून मंदिर आहे ते उफराटा गणपती मंदिर आहे. आणि तिथुन जर्रास्स पुढे व्याघ्रांबरी देवीचे मंदिर आहे.
व्याघ्रांबरी देवीच्या खांबाचा फोटो असेल तर टाकाल का?
माफ करा,सध्यातरी माझ्याकडे फोटो नाहिये. तिकडे जाण झाल तर नक्की क्लिक करुन टाकेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या प्रतिसादावर आपल्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 11:33 नवीन
=)) आमच्या प्रतिसादावर आपल्या धाग्याची झैरात करायला बंदी आहे =)) तस्मात दंड म्हणुन अजुन चार कोकणातले धागे टाकायची शिक्षा कोर्ट तुम्हाला देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

भरपुर मंदिरात जाणं झालयं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 09:45 नवीन
भरपुर मंदिरात जाणं झालयं आजपर्यंत पण एवढं शांत आणि समाधानी फक्त दुर्गाव्याडेश्वरीच्या, कोल्हापुरच्या अंबाबाईच्या आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिरातचं वाटतं.
  • Log in or register to post comments

आम्च्या गुर्जींचा धंदा

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 10:44 नवीन
आम्च्या गुर्जींचा धंदा बशीवणार तुम्ही सग्ळे
  • Log in or register to post comments

बिंधास्त र्‍हावा.....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 10:51 नवीन
तसे काही होणार नाही...... माणसांना देवाची गरज जास्त आहे आणि मग त्या बरोबर येणार्‍या रुढी आणि परंपरेची देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

८०० प्रतिसाद पुरले नाहित काय

अनुप ढेरे
Fri, 01/23/2015 - 10:57 नवीन
८०० प्रतिसाद पुरले नाहित काय मुवि?
  • Log in or register to post comments

तसे नाही हो....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 11:33 नवीन
मना मध्ये अज्जुन बर्‍याच शंका आहेत आणि खेळी-मेळीच्या वातावरणात शंका-निरसन, फक्त मिपावरच होते असा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

तुळजा भवानी मंदिर

सविता००१
Fri, 01/23/2015 - 11:14 नवीन
हा एक उच्च कारभार आहे. बोलायलाच नको. त्या भवानीला डोळे भरून पहाण्यासाठीच तिकडे जायचं. फार फार सुरेख आहे ती. मागे मी देवीला नेसवण्यासाठी चांगली उत्तम साडी इकडून (मुंबई) घेऊन गेले होते. तर तिथला पुजारी म्हणाला की देवीला कशाला एवढी भारी साडी? माझ्या मुलीच या महिन्यात लग्न आहे तर तिच्यासाठी मी ही ठेवतो. (विचारलं नाही.. सांगितलं) आणि मी बाहेरून एक साधीशी साडी आणतो म्हणे. आईशप्पत असलं भांडण झालं होतं तेव्हा माझ्या नवर्‍याचं आणि त्याचं की बास. तरीपण त्याला आपण चुकतोय असं वाटतच नव्हतं. पण यात फायदा एवढा मस्त झाला की नवर्‍याने चढवलेला एकूण आवाज ऐकुन तिथल्याच इतर पुजार्‍यांनी मध्यस्ती करून आम्हाला मस्त पूजाही करू दिली. आणि आमचीच साडी आमच्यासमोरच त्या देवीला नेसवली. नाहीतर तुळजापूर हे देवस्थान म्हणून भिक्कारच आहे.
  • Log in or register to post comments

तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 11:23 नवीन
तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे काय होणार ते तुम्हाला समजत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

टका....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 11:30 नवीन
योग्य बोललास....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इथे पुढे काय होणार

सविता००१
Fri, 01/23/2015 - 11:48 नवीन
ते नव्हतं लक्षात घेतलं. कारण माहित असलं तरीही इतकं समोरासमोर कुणी सांगत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे. आपण समोर नसताना हे चालतच हे माहिती आहेच. त्या पुजार्‍याने सरळ विचारलं त्याची चीड आली. निदान आम्हाला. आम्ही त्याच्या मुलीच्या लग्नाचा आहेर म्हणून नव्हती नेली हो साडी. ती तशीही त्या लोकांनी लाटलीच असती नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

उत्तम साड्या हव्या असतील तर...

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 11:57 नवीन
नवरात्राच्या सुमारास गोव्याला जा. तिथे बर्‍याच मंदिरात साड्यांचा लिलाव होतो. मी २ वर्षांपुर्वी तिथूनच साड्या आणि पीतांबर आणले. पहिला फायदा १०-१२ हजाराची पैठणी ७-८ हजारात मिळून जाते आणि गोवा बघणे होते, हा दुसरा फायदा. तिसरा फायदा, पैसा ताईंची भेट पण होते. चौथा फायदा, ह्या साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस असतो.विशेषतः लिलावाच्या वेळेला. पाचवा फायदा, ह्या सगळ्या साड्या देवीचा प्रसाद म्हणून असल्याने, सासू जास्त बोंबलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

मुवि,

सविता००१
Fri, 01/23/2015 - 12:02 नवीन
यातलं पैसा ताईशी भेट हे सोडल्यास सगळं झालं. सासूचा बोंबलण्याचा प्रश्न आला नाही कारण त्यांनाच पहिली घेउन दिली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गोव्याला जाउन

कपिलमुनी
Fri, 01/23/2015 - 17:51 नवीन
गोव्याला जाउन साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस ??
*mosking* *JOKINGLY* 8P 8p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गोव्याला जाउन साडी खरेदीत

सूड
Fri, 01/23/2015 - 18:30 नवीन
गोव्याला जाउन साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस ??
तेच की!! ताकाला जाऊन भांडं लपवायचं !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

@ह्या सगळ्या साड्या देवीचा

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/23/2015 - 18:31 नवीन
@ह्या सगळ्या साड्या देवीचा प्रसाद म्हणून असल्याने,सासू जास्त बोंबलत नाही.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माहित असलं तरीही इतकं

टवाळ कार्टा
Sat, 01/24/2015 - 10:32 नवीन
माहित असलं तरीही इतकं समोरासमोर कुणी सांगत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे. आपण समोर नसताना हे चालतच हे माहिती आहेच
हे समजत असतानासुद्धा तुम्ही साडी दिलीत...सुशिक्षित असूनही तुम्ही असे करता तर मग अशिक्षित देवभोळे लोक याच्यावर आणखी करतात यात काहिच आश्चर्य नाही...इथेच तर घोडे पेंड खाते आणि मग देवळे पैशाचा बाजार बनतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

देवीला आलेले नारळ/साड्या

यसवायजी
Fri, 01/23/2015 - 12:10 नवीन
देवीला आलेले नारळ/साड्या वगैरे बाहेरच्या विक्रेत्यांना होलसेलमधे विकण्यात येतातच. पण बाहेर स्वतात वि़कण्यापेक्षा, आता नविन ऐड्या वापरतात. भाविकाने (पक्षी गिर्‍हायकाने) १०० ची नोट टेकवली तर प्रसादाचा नारळ! ५०० ला नारळ + हार + पेढे !! आणी ग्र्याण्ड प्रसाद म्हणून १००० च्या नोटेला या सगळ्यासहित (देविला याआधी नेसवलेली) साडी !!! ४-५ रुपयाला बाहेर विक्रेत्याला नारळ विकल्यापे़क्षा हे परवडतेच्च.
  • Log in or register to post comments

जेपी यांच्या प्रतिसादाच्या

आदूबाळ
Fri, 01/23/2015 - 12:23 नवीन
जेपी यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

क्लिंटन
Fri, 01/23/2015 - 12:58 नवीन
लेख आवडला.एकेकाळी या विषयावरील लेखांमध्ये मी अगदी हिरीरीने भाग घेत असे. सध्या दिल्ली विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत फेसबुकवर आआपला झोडपण्यात व्यस्त आहे.त्यामुळे इस्पिक एक्का साहेबांच्या आणि माझ्या जिव्हाळ्याच्या चर्चेतही पाहिजे तितका भाग घेता आलेला नाही.मुवि काकांचा धागा असल्यामुळे १० फेब्रुवारीनंतरही हा धागा प्रतिसाद घेत राहिलच.त्यामुळे डिटेल्ड प्रतिसाद त्यावेळी :) तूर्तास लेख आवडला ही पोच. (आआप जिंकल्यास फेसबुकवरील दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा सर्वात प्रबळ दावेदार) क्लिंटन
  • Log in or register to post comments

इथे झोडा की

कपिलमुनी
Fri, 01/23/2015 - 17:52 नवीन
फेसबुकवर आआपला झोडपण्यात व्यस्त आहे
आम्ही पण झाडू हाती घेउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

असाच अनुभव अजमेर शरीफ ला आलाय

दादा पेंगट
Fri, 01/23/2015 - 14:12 नवीन
अजमेरला ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींना भेटावसं वाटलं म्हणून गेलो. तिथे तुम्ही प्रांगणात शिरलात की लगेच एक पोरगा तुम्हाला ओढत कोणा एका मौलवी/खादिमापाशी बसवतो. पैसे उकळतो, तुमच्यासाठी दुवा मागतो. हा पैसा गोरगरीबांच्या जेवणासाठी वापरतो असे म्हणतात, खरे खोटे अल्ला जाणे. अमुकच रुपडे द्या असा आग्रह नसतो ही जमेची बाजू. पण तुम्ही जास्त पैसे द्यावेत असा प्रयत्न ते करतात. प्रत्यक्ष दर्ग्यात चादर घेऊन ४-५ खादिम कबरीपाशी उभे असतात. दोघे-तिघे मोरपीसांचा झाडू घेऊन उभे असतात. तुमच्या डोक्यावर चादर टाकली की टाका १०-२०रुपये. झाडू मारला की टाका १०-२० रुपये. एका चादरीखाली गेलात तरी दुसरा चादरवाला तुम्हाला आपल्यापाशी खेचत असतो. माझ्या मनात सूफी संतांविषयी आणि चिश्ती सिलसिल्याबद्दल फार आदर आहे. ह्या गोळा केलेल्या पैशाचा योग्य विनियोग होत असेल तर ह्या प्रकाराला फार विरोध नाही. पण हे खादिमांच्या घशात जात असेल तर ह्यांनींसुद्धा सूफी संतांच्या शिकवणीला तिलांजली दिली आणि हिंदू तीर्थक्षेत्रांचा 'गुण घेतला' असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

असाच अनुभव फतेहपूर सीक्रीला

पैसा
Fri, 01/23/2015 - 16:00 नवीन
असाच नुभव फतेहपूर सीक्रीला आला होता. रस्त्यातच २ पोरे गाडीला लोंबकळली. टॅक्सीड्रायव्हर पण घाबरून गप होता. ते दोघे आम्ही गाईड आहोत म्हणाले. मग ते सांगतील तिथे ती काय चादर वगैरे विकत घ्यायलाच पाहिजे. पैसे टाका म्हटले की टाका. इतर किल्ला वगैरे काही न दाखवता परत रस्त्यावर आणून सोडले. तो टेक्सीड्रायव्हर नंतर सांगायला लागला की हे सगळे गुंड लोक आहेत. मी जर त्याना टाळून गाडी पुढे नेली असती तर पुढच्या फेरीला मला मारले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट

अगदी असाच अनुभव मला पण

सुबोध खरे
Fri, 01/23/2015 - 19:11 नवीन
अगदी असाच अनुभव मला पण फतेहपूर सीक्रीला आला होता. पहिल्यांदा कार( भाड्याची) पार्किंगसाठी १०० रुपये. तेवढ्यात मी काही सरकारी गाड्या बर्याच पुढे जाऊन पार्क करीत असलेल्या पाहिल्या. आमची गाडी मी माझे लष्कराचे ओळखपत्र दाखविल्यावर पुढे जाऊ दिली त्याना फुकट पार्किंग होते . मग मी माझे लष्कराचे ओळखपत्र दाखविल्यावर पार्किंग वाला म्हणाला पैसे देऊ नका . आता पर्यंत कारच्या खिडकीला लटकलेली पोरं( गाईड आहेत सांगणारी) जरा बिचकली. मी त्यांना सांगितले मला गाईड नकोच. फारच गयावया केल्यावर मी एकाला विचारले तुमचे किती पैसे? त्यावर त्यांचे आपापसात ठरले आणि एक पोरगं तयार झालं ते म्हणालं कि तुम्ही काय द्याल ते. आम्ही आत गेलो तेथे तो पोरगा म्हणाला इथ चादर विकत घ्या. एक झिरझिरीत चादर ३०० रुपये म्हणाला मी त्याला म्हणालो मला चादर घ्यायचीच नाही. फार आग्रह चालला होता. पण मी ठाम होतो. असे सर्व ठिकाणी चालले होते. प्रत्येक इमारतीचा मासळी बाजार पाहून उद्विग्न व्हायला होते. शेवटी वैतागून मी परत कार मध्ये आलो. परत येताना त्या पोराला ५० रुपये देऊ केले तर तो माजाने म्हणाला. मी तुमचे पार्किंगचे पैसे वाचवले मी आवाज चढवून म्हणालो कि मी लष्करात आहे म्हणून पैसे वाचले आहेत तुला हवे असतील तर ५० रुपये घे नाही तर चालू लाग. तो म्हणाला मग हे तरी कशाला देता. मी शांतपणे ड्रायव्हर ला सांगितले गाडी चालू कर आणि निघून आलो. सगळाच चावटपणा आणि हरामखोरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

१७

प्रसाद गोडबोले
Wed, 01/28/2015 - 14:12 नवीन
१७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१२+३+२?

सूड
Wed, 01/28/2015 - 14:21 नवीन
१२+३+२?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खरं तर १८

प्रसाद गोडबोले
Wed, 01/28/2015 - 15:31 नवीन
१८ = १२+३+२+१ ! हा एक बेनीफिट ऑफ डाऊट म्हणुन मी सोडुन दिला होता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@१२+३+२+१ ! >> __/\__

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/28/2015 - 15:53 नवीन
@१२+३+२+१ ! >> =)) __/\__ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हे १७...१८ काय आहे?

टवाळ कार्टा
Sat, 01/31/2015 - 11:55 नवीन
हे १७...१८ काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हे काय प्रकरण आहे? १७ काय?

मृत्युन्जय
Wed, 01/28/2015 - 14:55 नवीन
हे काय प्रकरण आहे? १७ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आम्हाला आमची दैवते पावेनात

कंजूस
Fri, 01/23/2015 - 16:04 नवीन
आम्हाला आमची दैवते पावेनात आणि ते पीर पावतील ही आशा ठेवायची
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो...

स्वामी संकेतानंद
Fri, 01/23/2015 - 16:15 नवीन
कोणी कसली आशा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नै? मी माझ्या आश्रमात तर कसलीही आशा ठेवून येऊ नका असे स्पष्ट सांगतो. आशा ठेवून येतच आहात तर आपल्या जबाबदारीवर येणे, निराश झाल्यास आश्रम जबाबदार नाही हे आधीच बजावून देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

स्वामीजी

पैसा
Fri, 01/23/2015 - 16:19 नवीन
तुमचा देव कोन्चा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

आमचा देव कर्म! कर्म करा,

स्वामी संकेतानंद
Fri, 01/23/2015 - 16:23 नवीन
आमचा देव कर्म! कर्म करा, खड्ड्यात जाणार असाल तर जाणे काय चुकते हो? शिखर गाठणार असाल तर गाठणे काय चुकते हो? चिल मारा, चिलम मारा.. न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हत्तेरे की!

पैसा
Fri, 01/23/2015 - 16:29 नवीन
लोकांना खड्ड्यात जावा म्हणून सरळ सांगा की!! =)) कर्म बिर्म कशाला ते मधे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

खड्ड्यात जावा?

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 16:40 नवीन
खड्ड्यात जावा? मग उरलेल्या जावेला आनंद होईल. किंवा खड्ड्यात सी, हेचटीएमेल, इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 16:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ह्या

केदार-मिसळपाव
Fri, 01/23/2015 - 20:39 नवीन
असल्या पांचट प्रतिसादासाठी तुला अनुमोदन.. फार फार विचार खुप खुप लवकर करावा लागतो त्यासाठी. जावा ह्या शब्दाचा अनेकांगी वापर जमला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 20:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

अहो ताई!

स्वामी संकेतानंद
Fri, 01/23/2015 - 19:06 नवीन
असं थेट खड्ड्यात जा सांगू लागलो तर आमचे आश्रम कसे चालणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चालतील चालतील!

पैसा
Fri, 01/23/2015 - 21:12 नवीन
काही स्वामी लोक लोकांना लाथा घालतात आणि लोक त्यातच खुश असतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

सहमत !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/28/2015 - 22:55 नवीन
आता तुम्हीच सांगताय तर आशाला तुमच्या आश्रमात येताना बरोबर आणणे धोक्याचे आहे हे पटले आहे ! :) ;) +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

पीर पावायला गेलो नव्हतो वो,

दादा पेंगट
Fri, 01/23/2015 - 18:57 नवीन
पीर पावायला गेलो नव्हतो वो, त्याला भेटायला गेलो होतो.. च्यायला, पहिल्या वाक्यातच तसा स्पष्ट उल्लेख असूनही कळत नाही लोकांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

१००

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 17:46 नवीन
दैवी शेंचुरी.
  • Log in or register to post comments

तेंडुलकर पावला !!

दादा पेंगट
Fri, 01/23/2015 - 19:00 नवीन
तेंडुलकर पावला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आता (इथे आणि क्रिकेटमध्ये पण)

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 23:00 नवीन
आता (इथे आणि क्रिकेटमध्ये पण) शेंचुरीत काय एक्साईटमेंट राहीली नाही राव. कालची कोकरं पण करून जातात शेंचुर्‍या.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नवीन पानावरचे नवीन प्रतिसाद

कंजूस
Fri, 01/23/2015 - 19:09 नवीन
नवीन पानावरचे नवीन प्रतिसाद गायब न होता दिसताहेत.
  • Log in or register to post comments

देवळात फार वेळा जात नाही.

श्रीगुरुजी
Fri, 01/23/2015 - 23:00 नवीन
देवळात फार वेळा जात नाही. दरवर्षी नियमाने गोंदवले येथील श्रीमहाराजांचे समाधी मंदीर व नंतर श्रीरामाच्या मंदीरात दर्शनाला जातो. दोन्ही मंदीरात खूप शांत व समाधानी वाटते.
  • Log in or register to post comments

डेरवणचा अनुभव

क्लिंटन
Fri, 01/23/2015 - 23:01 नवीन
कोकणातल्या डेरवण या ठिकाणी मागच्या आठवड्यात जाणे झाले.हा अनुभव या चर्चेत इतरांनी लिहिलेल्या अनुभवांपेक्षा वेगळा आहे तरीही लिहितो.आमची शाळेत असतानाही त्या ठिकाणी सहल गेली होती.त्या गोष्टीला खूप वर्षे झाल्यामुळे तिथे बघितलेल्या काही गोष्टी लक्षात नव्हत्या. त्या तिथे गेल्यावर परत समजल्या. एक तर तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटनांवरील पुतळ्यांबरोबरच कुणा वालावलकर महाराजांची समाधीही आहे. सर्वप्रथम बाहेरच एक बोर्ड लावला आहे.त्यावर कुठले कुठले नियम लिहिले आहेत.त्यातील महत्वाचा नियम म्हणजे स्त्रियांना वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच समाधीच्या तिथे प्रवेश दिला जाईल!! म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही.असो त्यावर आणखी लिहितोच.दुसरे म्हणजे नियमांमध्ये शांतता राखा, गडबड गोंधळ करू नका इत्यादी सूचना होत्याच.सगळ्यात मजा होती शेवटच्या सुचनेत--"हे नियम मान्य नसल्यास इथे यायची तसदी घेऊ नये". म्हणजे हा प्रकार पुणेरी पाट्यांच्या तोंडात मारेल असा झाला.अर्थातच सगळ्या सुचना आम्ही आत जायच्या आत वाचल्या नाहीत आणि शेवटच्या सुचनेचीच थोडी टवाळी केली. ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा तिथे जायच्या रस्त्यावर बसलेल्या एका जाडसर स्त्रीने हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे सांगितले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो. आमची शाळेची सहल गेली होती त्यावेळी त्या समाधीच्या तिथे बघितले ते आठवले.तिथे एक ८-१० वर्षे वयाच्या मुलाला गळ्यात वीणा घालून "श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ" असे विविध सुरांमध्ये म्हणायला उभे केले होते.तिथे त्या कामासाठी चार मुले ठेवली आहेत म्हणे आणि चोवीस तास हा जप सतत चालू असतो असे आम्हाला तिथे सांगितले होते ते आठवले.८-१० वर्षे वयाच्या मुलांकडून दररोज सरासरी सहा तास हे काम करून घेणे हा प्रकार मला तरी अजिबात हजम झालेला नव्हता.आणि मला असे काहीतरी करायला न लागता शाळेत जायला मिळते म्हणून किती सुदैवी आहे हे त्यावेळी समजले. (वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या नसाव्यात अशी अपेक्षा.पण तिथे बघितलेली सत्य परिस्थिती लिहिली आहे).
  • Log in or register to post comments

भावना दुखावल्या तर कशाला

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 23:12 नवीन
भावना दुखावल्या तर कशाला घाबरता.. आप-भक्तांच्या भावना दुखावल्या तर घाबरत नाही मग इथे कशाला घाबरायचं? चूक आहे आणि चूक वाटलं तर किमान इथे तरी नक्की मांडले पाहिजे.. उगा नसत्या हळव्या अस्मितांच्या भितीने ढिश्क्लेमर कशाला द्यायचे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा