Skip to main content

(सोबती)

लेखक स्वप्नज यांनी गुरुवार, 22/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- www.misalpav.com/node/30059 मुळ कवीयित्रीची क्षमा मागून तसेच 'तांब्या' संप्रदायाच्या मठाधिपती, महागुरु, सर्व सेवक व भक्त यांना वंदन करुन हे विडंबन सादर करत आहे. जेवणाला मिळतील सोबती खूप सोडायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी लांबूनच पाहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं कुंथावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी खाल्ला मऊ घास दैवात कुंथणे टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य नुसतं कुंथून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत कुंथणं योग्य असत समर्पण- 'तांब्या' संप्रदायातील सर्वांनाच 'त्या' गोष्टीसाठी तांब्या परवडत नाही. काही गरीब लोक 'पत्र्याचे/प्ल्यास्टिकचे' साधन वापरतात, अशा भक्तांना समर्पित.
लेखनविषय:

वाचने 1598
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अग्गागा...संप्रदाय वाढतोय =)) लगे रहो :)
'तांब्या' संप्रदायातील सर्वांनाच 'त्या' गोष्टीसाठी तांब्या परवडत नाही. काही गरीब लोक 'पत्र्याचे/प्ल्यास्टिकचे' साधन वापरतात
याला टमरेल ऐसे नाव =))

हा तांब्या संप्रदाय वाटत नाही. हा कुंथ संप्रदाय आहे. अशा सर्वांनी अडचणीत आल्यास, 'EVA Q' घ्यावे. मुद्दल कधी गळून पडले ते कळणारही नाही.

सर्वांनाच 'तांब्या' सुलभ नसतो, काही जणांच्या जिलब्या 'सुलभ' नसतात. अशा कुंथ संप्रदायाचे काव्य दिसतेय हे.