प्रेरणा- www.misalpav.com/node/30059
मुळ कवीयित्रीची क्षमा मागून तसेच 'तांब्या' संप्रदायाच्या मठाधिपती, महागुरु, सर्व सेवक व भक्त यांना वंदन करुन हे विडंबन सादर करत आहे.
जेवणाला मिळतील सोबती खूप
सोडायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी लांबूनच पाहणारे निघतात
ज्याचं त्याला लागतं कुंथावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी खाल्ला मऊ घास
दैवात कुंथणे टळत नसतं
हेच जर आहे चिरंतन सत्य
नुसतं कुंथून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत कुंथणं योग्य असत
समर्पण- 'तांब्या' संप्रदायातील सर्वांनाच 'त्या' गोष्टीसाठी तांब्या परवडत नाही. काही गरीब लोक 'पत्र्याचे/प्ल्यास्टिकचे' साधन वापरतात, अशा भक्तांना समर्पित.
वाचने
1598
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गागा...संप्रदाय वाढतोय
जय तांब्या.
In reply to अग्गागा...संप्रदाय वाढतोय by टवाळ कार्टा
मी सुध्धा तुमच्यासारखाच आहे
In reply to जय तांब्या. by स्वप्नज
कॉल्लिंग बुवा!
कुंथसंप्रदाय
.
कुंथायच्या गोष्टी आणि काव्यरस