बिपीन भौ .. ते लिहीलय भारी हे परत परत सांगायला नको हो .. अरब कंट्रीज विषयी बर्याच शंका न विचारता दूर झाल्यात ...
पण ते एडिट करून फोटू काढा आधी ... आम्हाला रक्तदानाला गेलो तरी सुई पाहून भोवळ येते .. इथे मुंडीछाटाछाटीची चित्र .... अबब ...
(अंमळ हळवा)टारूबाळ
तिसरा फोटो काढुन टाकावा अशी संपादक मंडळाला विनंती.
बिपिन भाउ हवी तर फक्त लिंक द्या आणि तिथे एक बघणार्याचे मन विचलीत करणारे दृश्य अशी सुचना लिहा.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
अप्रतिम भाग!!!!!
बिपीनभौ.. तुझ्या लेखणीला जबरदस्त बहर आला आहे .. एकदम मस्त.. लेखनाची लांबी, कंटेंट, मुद्देसुदपणा आणि लालित्य सगळंच आवडलं.. लगे रहो!!! :)
शेवटच्या सत्याने हादरलो.. तरी हे सत्यच आहे हे स्वीकारायला हवे..
फक्त काहि ठिकाणी एका बैठकीत न लिहिल्याचं जाणवलं
-(वाचक) ऋषिकेश
सुरुवातीचा वादळांचा भाग एकदम मनोरंजक आहे... आणि सचित्र असल्यामुळे अगदी "आंखो देखा हाल"...
पण त्यानंतरचं सगळं लेखन सुन्न करणारे... (हिंसा पाहवत नाही म्हणून कितीतरी तेलुगू चित्रपट अर्धवट पाहून सोडून दिले आहेत... अपवाद "पोकिरी"चा... असो...)
बिपिनदा, लेख उत्तम जमला आहे हे सांगण्याची गरज नाही... पक्त तेव्हढं कापाकापीचं काही असेल तर जरा "डायल्युट" करुन लिहत जा बाबा...
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
चुलत भाऊ सौदीत गेला होता नोकरीसाठी.पासपोर्ट जमा करायला नकार देऊन दुसर्या दिवशी परत आला होता त्या प्रसंगाची आठवण झाली.लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.
(म्हणजे दृश्य आणि अदृश्य दोनी लेख आवडले.)
फोटो संपादित केल्याबद्दल माझी काही हरकत नाही. ते दृश्य असतंच भयंकर.
वर बर्याच जणांनी देहदंडाच्या शिक्षेबद्दल अमानुष वगैरे शब्द वापरले आहेत. सौदी मधले कायदे फार कडक आहेत असे लिहिले आहे. खरंच आहे. आणि मी कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाहिये त्या शिक्षांचे. पण आपण आपले संस्कृतिबद्दलचे निकष लावतो आणि आपल्याला ते अमानुष वाटते. पण त्या लोकांसाठी ही पूर्वापार चालत आलेली एक प्रथा आहे.
मी नविन असताना एका मित्राशी असंच या बाबतीत बोलत असताना अश्याच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. तो तेव्हा बरीच वर्षं तिथे राहिलेला होता. तो म्हणाला, 'इथले लोक मूळचे वाळवंटातले भटके लोक. आत्ता आत्ता कुठे या लोकांना कायम स्वरुपी वस्ती म्हणजे काय ते कळते आहे. अश्या समाजांमधे साधारणतः बळी तो कान पिळी असाच कायदा असतो. आणि या लोकांची मूळ प्रवृत्ति बंडखोर आहे. त्यांना काबूत ठेवायचे म्हणजे असे कडक कायदे आणि शिक्षा पहिजेतच. ज्या दिवशी हा वचक संपेल त्या दिवशी लोक अक्षरशः रस्त्यावर नागडे नाचतील. अराजक माजेल.' इतकी वर्षे तिथे राहिल्यावर मला पण थोडंफार ते पटतं आता.
बिपिन कार्यकर्ते
तिसरं चित्र लगोलग एडिट केल्यावर वाचायची हिम्मत नव्हती!
आज दुपारी सर्व धैर्य गोळाकरुन वाचायला बसलो. लिखाण तितकेसे भयप्रद नाहीये असे शेवटी समजले.
सौदीची ओळख चांगली करुन देताहात बिपिनभौ.
(एकूण प्रकार बघून मी आयुष्यात कधी जाईन असे वाटत नाही!)
चतुरंग
बिपीनदा!!
खोबार ची ही लेखमाला वाचायला मजा येतीये...
मुळात प्रत्येक गोष्ट आपण आपल्या इवल्याशा आयुष्यात अनुभवु शकत नाही..
पण खोबार वाचताना अगदी आखो देखा हाल वाचायला ,अनुभवायला मिळतोये...
त्याब्द्दल धन्यवाद ...
आणी २ भागा मध्ये जास्त अंतर ठेउ नका ही विनंती...
पू भा.प्र......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
ठाऊक नसलेल्या वेगळ्या चालीरीतींचे दर्शन घडवणारा हा लेख मनाला भावला.
भारतात जन्माला आलो हे किती मोठे भाग्याचे याची जाणिव काही प्रमाणात झाली.
नमाज हा शब्द फारसी आहे. आपल्याकडे बरेचसे प्रचलित असणारे बरचसे शब्द फारसी आहेत.
मुस्लिमेतरांना एकूण कशी वागणूक मिळते हे जाणून घ्यायला आवडेल.
बिपिन-भाऊ,
बुरख्याला अरबी शब्द काय ?
आणि अभिरतच्या मताशी सहमत.
भारतात जन्माला आलो हे किती मोठे भाग्याचे याची जाणिव काही प्रमाणात झाली.
नुसतंच भारतात नाही, मोठ्या शहरात,...... यादी फार लांब आहे ...
चांगलं लिहिता, हे आता मी पुन्हा-पुन्हा सांगणार नाही आहे. :-)
असेच म्हणतो. लेख आवडला. शेवटचा भाग सुन्न करणारा आहे. अर्थात, स्त्रियांनी बुरख्यातून दोन्ही डोळे उघडे ठेवण्याची गरज नाही - एकानेच काम भागेल असा फतवाही इथूनच निघाला असल्याने विशेष आश्चर्य वाटले नाही.
मुक्तसंगः अनहंवादि
चित्तचक्षुचमत्कारिक अनुभवांचे सुरेख शब्दांकन
बाहेरचे वादळ चित्रांतून पाहतो तोच मनात वादळ उभे करणारे अनुभव - वर्णन
पुढील भागाच्या प्रति़क्षेत .....
खोबार वर्णन भागागणिक रंगतदार होत चालले आहे. अजून येऊद्यात.
मेलेले मूल घेऊन अंमली पदार्थाची तस्करी हा प्रकारच भयानक. आणि भर रस्त्यात सर्वांसमोर देहांत शासन? मती कुंठीत होते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
काय रे बिपिनदा... या लेखात त्या पाकिस्तानी कुटुंबाची गोष्ट, त्या हैदराबादी मुलाची गोष्ट आणि शेवटची ती देहांत प्रायश्चित्ताची गोष्ट..! फारच भयानक.
सगळं हे एकाच भागांत का रे लिहिलंस?? सगळ्यात घृणास्पद त्या पकिस्तानी कुटुंबाची गोष्ट होती.
हे असं वाचलं की, डोकं सुन्न होतं. तुझं काय झालं असेल याची कल्पना करू शकते.
पण एक नक्की तू खूपच खंबीर आहेस.
लेख आवडला. नेहमी प्रमाणेच अतिशय प्रवाही आहे. कंटाळवाणा अजिबात नाहि झाला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कसलं डॅशिंग? मला त्या गॅदरिंगचा खरा अजेंडा कळे पर्यंत खूप उशिर झाला होता. :( आणि कळलं तेव्हा तिथून निघणं धोक्याचं ठरलं असतं. मजबूरीका नाम...
बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
झकास
:((((((((((((((((((((((((((((((((((((((((((
तुमचं खोबार
सहमत!
तिसरा फोटो
अप्रतिम भाग!!!!!
छान लिहिले
हेच म्हणतो
एकदम छान !
भन्नाट, आणि सुन्न करणारेही...
वल्ला बहोत
माझा
बापरे..
खुप छान...हा
खुप छान...हा
संपादित फोटो...
काल लेख चाळताना आधी बघितली ती चित्रं!
नेहमी प्रमाणे
बिपीनदा!! ख
लय भारी !!!
हे भारी आहे
लेख भावला
धन्यवाद...
मोठा लिहिलात हो हा भाग
भयाण पण आवडले...
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
चित्तचक्षुचमत्कारिक
रंगतदार
असेच म्हणतो
बापरे!
खतरनाक...
डॅशिंग?
पाहाताना
बिपिनभाऊ
अर्र्,भारीच मालिका दिसतेय,!