✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ?

श
शाहिर यांनी
Mon, 09/19/2011 - 23:56  ·  लेख
लेख
दर १२ मैला वर भाषा बदलते असा म्हणतात ..प्रत्येक कट्ट्याची स्वताची अशी स्वतंत्र भाषा असते ..काळा नुसार ती बदलत जाते .. गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रत्येक गावात , कट्ट्या वर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते .. उदा : पुण्यामध्ये आयटम , मुंबई मध्ये छावी ..सोलापूरकडे खडा , आणि हुच्चभ्रू मध्ये बेब या प्रमाणेच म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल ..)बहुतेक शब्द कोल्हापूरहून ) मुली सुद्धा पंटर , छावा ..बैल ..मजनू असे शब्द वापरतात ..आपल्या कॉलेज मधले , कट्ट्यावरचे, मी. पा. कट्ट्यावर अजून काही शब्द माहित असेल तर सांगावे.. जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे.. तर काय म्हणता तुम्ही ??
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52869 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

रोहिणीवगैरेत नाव नोंदवून पहा,

Nile
Tue, 09/20/2011 - 00:08 नवीन
रोहिणीवगैरेत नाव नोंदवून पहा, मदत होईल. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

स्क्रीनशॉट

इंटरनेटस्नेही
Tue, 09/20/2011 - 00:08 नवीन
स्क्रीनशॉट काढुन योग्य व्य्क्ती कडे पाठवला आहे.
  • Log in or register to post comments

मि पा कट्याच्या--- वर --- मी

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/20/2011 - 00:49 नवीन
मि पा कट्याच्या--- वर --- मी काय बोलणार बापुडा?नवोदित अजाण ;-) तरी पण तुम्हाला जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे.. असे म्हणता तर टाकतोच :tongue: स्वारी,टंकतोच काही अता--- (कातिल)--डाव ;-) ,फटाका,एटेम-बाँब,हापटबार :bigsmile: गोळी आयटम, खवा :-p , ब्रेडबटर ;-) , भरलं वांगं :-D, लॉलीपॉप ,कवळी-काकडी.....अशी काही (ऐकलेली)नावं पटा-पट अठवली... अजुन सुचली---तर टंकुच...सध्या पुरे नाही का? ;-)
  • Log in or register to post comments

बेण बारा गावच चा पानी पिलेला दिसतय

शाहिर
Tue, 09/20/2011 - 00:57 नवीन
लईच झाक्क बगा ... आब्यासु दिसत जनु.. हवा हवासा खवा Image removed. ब्रेडबटर वाइच फारीन चा वाटला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आब्यासु दिसत जनु..

खटपट्या
गुरुवार, 01/22/2015 - 06:12 नवीन
आब्यासु दिसत जनु..
तुम्ही गुरुजींचे साहीत्य वाचले नाहीत का? बाकी धाग्याच्या विषयाला धरून "निसर्ग सौंदर्य" असा शब्द आम्ही वापरायचो ते आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

छान चाललंय एकंदरीत !!!

धन्या
Tue, 09/20/2011 - 00:59 नवीन
फक्त तो उजव्या बाजूला असलेला ज्ञानोबा तुकोबांचा फोटो मात्र काढून टाकायला हवा.
  • Log in or register to post comments

छे छे, शक्यच नाही! .... ते

अनामिक
Tue, 09/20/2011 - 01:03 नवीन
छे छे, शक्यच नाही! .... ते फोटोच तर मिपाच्या भरभराटीला कारणीभूत आहेत - एका म्हातारा उवाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

म्हणूनच तर...

धन्या
Tue, 09/20/2011 - 01:09 नवीन
ते फोटोच तर मिपाच्या भरभराटीला कारणीभूत आहेत.
अहो भरभराट झाली आहे ते या धाग्यातून दिसतच आहे. त्यामुळे आता त्या फोटोची आवश्यकता नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

cheap

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/20/2011 - 01:00 नवीन
तार्किक आगाऊपणाचा दोष पत्करून सांगावासं वाटतं की हा धागा 'चीप' आहे. कृपया धागाकर्त्याने याची नोंद घ्यावी. इतर कोणी नोंद घेतील का नाही हे माहित नाही म्हणून धागाकर्त्यालाच हळी देत आहे.
  • Log in or register to post comments

+१

अनामिक
Tue, 09/20/2011 - 01:05 नवीन
प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी पाळावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+२.

Nile
Tue, 09/20/2011 - 23:00 नवीन
धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचून एक मिपाकर असल्याची शरम वाटली. माझ्या सारख्या सुशील अन सुस्वभावी लोकांना असे धागे मिपावर यायला अगदी नकोसे करतात. हां, आता शिव्या देण्याविषयी धागा असता तर गोष्ट वेगळी होती किंवा परंपरेला अनुसरून फोटो तरी टाकायचेत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

बर!!

शाहिर
Tue, 09/20/2011 - 23:02 नवीन
नोंद घेतली अहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सदस्य म्हणून

प्रियाली
Tue, 09/20/2011 - 01:09 नवीन
सदस्य म्हणून मी नोंद घेतली आहे. धागाकर्ते आपली चूक उमजून स्वतःहून हा धागा अप्रकाशित करतील अशी आशा बाळगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खर ते लिहिला आहे ..

शाहिर
Tue, 09/20/2011 - 01:15 नवीन
खोट काय आहे ते सांगा ? आणि खोट वाटत असेल तर कोणत्याही कॉलेज मधल्या मुला ला विचरा.. गंमत म्हणुन धागा काढला आहे. .. जॉन आणि सलमान च्या शरिरावर्च्या कॉमेंटस हुच्च भ्रु ..आणि बाकी चीप ... हलके घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणत्याही कॉलेज मधल्या मुला

रेवती
Tue, 09/20/2011 - 01:25 नवीन
कोणत्याही कॉलेज मधल्या मुला ला विचरा त्यात काय विचारायचय? आम्ही असे कोणत्याही कॉलेजच्या मुलांना विचारायला जाणार नाही. म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल हे शब्द वेगवेगळ्या विषयातले असून त्यांचा एकमेकांशी संबंध असेल असे वाटत नाही. बघणार्‍याच्या नजरेचा, बुद्धीचा फरक काय तो असू शकतो. एखाद्याला आवडणारी मुलगी हत्यार वाटते म्हणजे तो नक्कीच अंडरवर्ल्डशी संबंधित असावा. कंडा हा शब्द काय आहे माहित नाही. कंड सुटणे म्हणजे खाज सुटणे एवढे माहीत आहे. असले शब्द आवडणार्‍या व्यक्तिविषयी वापरावेत हे पटत नाही. सबब धागा पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

मान्य

शाहिर
Tue, 09/20/2011 - 01:29 नवीन
तुम्ही उल्लेखलेला शब्द मझ्य कदुन चुकिचा टाकल गेला आहे ..अर्थ माहित नव्ता ..बाकि गम्मत आणि क ट्ट्यावरची भा षा एवधेच स्वरूप होते ...धागा संपादि त कसा कराव अजुन शिकलो नहि ..नंतर )शिल्लक राहिल्यास ) संपादित करेन धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शाहिर, गल्लत होते आहे तुमची.

सोत्रि
Tue, 09/20/2011 - 10:01 नवीन
शाहिर, गल्लत होते आहे तुमची. जॉन, समलान च्या शरिराबद्दल कोणाला काय वाटते हे विचारणारे धागे प्रकाशित झाले नाहित अजुन. प्रतिसादात आलेल्या कमेंट मधे उल्लेख आला असेल तर तो वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी येतो. इथे तुम्ही ज्या विषयावर धागा काढला आहे तो उथळ आहे असे माझे मत. (गुर्ज़ींच्या मताचा आदर राखुन ;)). आयटम हा शब्द खटकला. आम्ही 'आयटम' हा शब्द उथळ दिसणार्‍या/असणार्‍या मुलींबद्दल वापरायचो, त्यामुळे "तुमच्या आयटमला" हे आम्हाला लागु होत नाही सबब मुळ प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. मिपावर अभिव्यक्त व्हायला प्रोत्साहन तर सर्वांनाच आहे. मोकळेपणा आणि परखड्पणा हा मिपाचा श्वास आहे असे मला वाटते म्हणुन मी मिपावर रमतो. तरीही काहीतरी भाषेचा आणि विषयाचा विधीनिषेध बाळगावा असे मला वाटते, बाकीच्यांबद्दल मला माहिती नाही. - (आयटम शब्द खटकलेला) सोकाजी स्वगत: सोक्या, नव-लेखकांच्या हिरमोड होइल असा प्रतिसाद आहे का हा की त्यांना अजुन भरीव लिहायला प्रोत्साहन मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

उथळ मुलिंना

शाहिर
Tue, 09/20/2011 - 12:00 नवीन
आम्ही 'आयटम' हा शब्द उथळ दिसणार्‍या/असणार्‍या मुलींबद्दल वापरायचा.. मान्य ... तुमच्या आयटम ला शब्द खटकला आहे बर्याच जणांना ... मि पा वर शब्द रचना बरेच काळजी पूर्वक करावी लागते ...नवीन आहे .. पुढच्या वेळेस काळजी घेइन .. अवांतर: ऐसा शबाब देख के साकिया को कौन सी शराब याद आती है ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अवांतर: ऐसा शबाब देख के

सोत्रि
Tue, 09/20/2011 - 15:56 नवीन
अवांतर: ऐसा शबाब देख के साकिया को कौन सी शराब याद आती है ?
ऑफ कोर्स "अनारीटा" - (शराब आणी शबाब दोन्ही आवडणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

असहमत

राजेश घासकडवी
Tue, 09/20/2011 - 05:49 नवीन
तार्किक आगाऊपणाचा दोष पत्करून सांगावासं वाटतं की हा धागा 'चीप' आहे.
पाशवी शक्तींचा रोष ओढवण्याचा धोका पत्करून सांगावसं वाटतं की मला हा धागा चीप वाटला नाही. धागाप्रवर्तकाने स्त्री व पुरुष दोघांनाही सारखंच वस्तुकरण करण्याची किमान समानता पाळली आहे. पोरं देखण्या पोरींना काय म्हणतात किंवा पोरी देखण्या पोरांना काय म्हणतात हा अभ्यास करण्याजोगा विषय आहे. शिव्यांचा अभ्यास होऊ शकतो, तसंच काहीसं. मी म्हणेन की मिपावरील स्त्रीवर्गाने देखील सामील व्हावं. नाहीतर केवळ पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रदर्शन होणं हे कारण पुढे करून बहिष्कार टाकला तर ती सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद

शाहिर
Tue, 09/20/2011 - 08:02 नवीन
मला एक्झॅटली काय म्हणायचा होता ते तुम्ही समजुन घेतला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

@--- धागाप्रवर्तकाने स्त्री व

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/20/2011 - 08:33 नवीन
@--- धागाप्रवर्तकाने स्त्री व पुरुष दोघांनाही सारखंच वस्तुकरण करण्याची किमान समानता पाळली आहे. पोरं देखण्या पोरींना काय म्हणतात किंवा पोरी देखण्या पोरांना काय म्हणतात हा अभ्यास करण्याजोगा विषय आहे. शिव्यांचा अभ्यास होऊ शकतो, तसंच काहीसं.--- घासुगुर्जी धन्यवाद... आमले रातच्याला वाटलं हुतं की बाई/मानुस इषयक या नेचरल ब्युटीफुल धाग्याला तांबड फुटायच्या आत समादी मिळत्तीक काय की? :-) पन धाग्याला अजुन भहर फुट्ला ते बगुन वाईच थंड्गार वाटलं बगा :-)... हा आजचा दिस झ्याक जानार.. :cool: तुमाला बी हेप्पी मॉर्निंग :-) लव्हली लव्हली मॉर्निंग लव्हली केम अगेन........... :love: आता रोज सकाळी हा धागा उघडुन बघेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

मदनबाण
Tue, 09/20/2011 - 11:12 नवीन
सहमत... ( घासुगुर्जीशीं सहमत असण्याचा माझा हा पहिलाच योग असावा... ;) ) तशी पाखरांची बरेच नावे असतात आणि पाखरांना पेट नेम ने हाक मारलेले आवडते देखील... ;) पण मी काही पाखरांचे प्रकार द्यावे म्हणतो ! ;) सोज्वळ पाखरु :--- हे पाखरु फार नशिबवान पारद्याच्या नशिबातच असते ! सात्विक स्वभाव आणि सुगरणपणा हा अश्या पाखरांचा अंगीभूत गुणधर्म असतो ! ;) सध्याच्या काळात या पाखरांची अत्यंत दुर्लभ प्राजाती म्हणुन नोंद केलेली आढळते. ! ;) लबाड पाखरु / वस्ताद पाखरु :--- अशी पाखरं १ नंबरची चंट असतात, आपल्याला भाव मिळतो हे या पाखरांना व्यवस्थीत ठावुक असते, बरेच पारधी अश्या पाखरांनी आपल्या जाळ्यात अडकावे या प्रतिक्षेत असतात... पण ही पाखरं जाळ्यात न-अडकता दाणा-पाणी टिपुन उडुन जातात व पारध्यांना वाकुल्या दाखवण्यात पटाईत असतात. एखाद दुसर्‍या पारद्यालाच असे पाखरु गावते. ;) मालदार पाखरु :--- सौंदर्याने टच्च भरलेले हे पाखरु फार फार प्रयत्नांनी दिसते किंवा गवसते,समस्त पारधी मंडळी अश्या पाखरांनी आपल्या जाळ्यात अडकावे म्हणुन प्रयत्नशील असतात आणि त्याच्या अडकण्याचे स्वप्न पहातात. ! ;) बर्‍याच वेळा असे पाखरु आर्थीक बाबतीत हुशार असल्याने एखाद्या काळ्या कोळश्याच्या घरात बागडताना दिसते, कारण काळ्या कोळश्याच्या गळ्यात पचास तोला लटकत असते ना ! ;) लंगुर के मुंह में अंगुर ही म्हण बहुधा अश्या उदा. मुळेच उदयास आली असावी असा मला दाट संशय आहे. ! ;) विक्षिप्त किंवा वाय झेड पाखरु :--- खरे तर या प्रकाराला पाखरु म्हणणे म्हणजे इतर समस्त पाखरांचा घोर अपमान आहे,इतर पाखरे या नमून्याला "बया" किंवा "वैताग" अश्या नावाने हाक मारतात आणि त्यांच्या पासुन ४ हात लांब राहतात... हुशार पारधी अश्या नमून्याला पाहताच आपली लावलेली जाळी काढुन घेतात ! सुंभ जळला तरी पिळ जात नाही ही म्हण अश्या नमून्यांना तंतोतंत लागू पडते.शक्योतो अश्या नमून्यांना कोणी सुजाण पारधी काडीचाही भाव देत नाही,तरी सुद्धा ज्या प्रमाणे युवराजांचे जोडे उचलणारे असतातच त्याच प्रमाणे काही पारधी अश्या नमून्यांचे पदर धरुन असतात ! ;) बाकी पाखरांना बरीच नावे आहेत... ती नंतर कधी तरी सांगीन... सुहासराव... बझ वरील हा प्रतिसाद तुम्हाला आठवलाच असेल नव्हे ! ;) ( गाजरेश पुंगीवाजवी) ;) घासु गुर्जी हलकेच घेतील ही अपेक्षा करुन त्त्यांच्या नावाचे इडंबन केरण्याचे चेष्टा केली आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पाखरांचे वर्गीकरण

शाहिर
Tue, 09/20/2011 - 11:35 नवीन
पाखरांचे वर्गीकरण करु राह्यले भौ तुमी ... आवाडला हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मै करु तो साला कॅरेक्टर ढीला है !!

वपाडाव
Tue, 09/20/2011 - 11:42 नवीन
आपली स्वाक्षरी आवडल्या गेली आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

खरच ''मदनबाण'' आहात... नाव

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/20/2011 - 18:40 नवीन
खरच ''मदनबाण'' आहात... नाव अगदी सार्थ केलत हो... :-) आपल्या निरिक्षणास आमची शंभर टक्के दाद... @सोज्वळ पाखरु :-....या पाखरांची अत्यंत दुर्लभ प्राजाती म्हणुन नोंद केलेली आढळते!---काय मनातलं बोल्लात राव ;-) @लबाड पाखरु / वस्ताद पाखरु:-ही पाखरं जाळ्यात न-अडकता दाणा-पाणी टिपुन उडुन जातात व पारध्यांना वाकुल्या दाखवण्यात पटाईत असतात... :-D @मालदार पाखरु:-बर्‍याच वेळा असे पाखरु आर्थीक बाबतीत हुशार असल्याने एखाद्या काळ्या कोळश्याच्या घरात बागडताना :-D दिसते,कारण काळ्या कोळश्याच्या गळ्यात पचास तोला लटकत असते ना!... जेब्बात..अतीशय परफेक्ट निरिक्षण..लंगुर के मु मे..सारखी सत्याच्या अधिक जवळ ;-) जाणारी १ म्हण मला माहितीये...पण ती इथे देत नाही,तुंम्हास व्यनीत कळवतो ;-) @विक्षिप्त किंवा वाय झेड पाखरु:-खरे तर या प्रकाराला पाखरु म्हणणे म्हणजे इतर समस्त पाखरांचा घोर अपमान आहे,इतर पाखरे या नमून्याला "बया" किंवा "वैताग" अश्या नावाने हाक मारतात आणि त्यांच्या पासुन ४ हात लांब राहतात...अगदी बरोब्बर..योग्य मुल्यमापन..इतर स-मस्त पाखरांचा अपमान होऊ नये,म्हनुनशान आपुन ह्यास्नी यकच नाव द्येउ शकतो-उलटया पिसाची कोंबडी :विकट हास्याची स्माइली :
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धागा चीप आहे हे मान्य पण आता

मृत्युन्जय
Tue, 09/20/2011 - 09:59 नवीन
धागा चीप आहे हे मान्य पण आता कोणी चीप पणा बघणार्‍याच्या नजरेत (पक्षी: वाचणार्‍याच्या मनात) असतो असा युक्तिवाद कोणी केला तर काय करणार? असेही मिपावरच्या कित्येक धाग्यांवरचा चावटपणा आणि शिवराळ लडींचा नजरांणा बघता केवळ भाषेवरौन कुठल्याही धाग्यावर आक्षेप घेता येइल असे वाटत नाही. असो. धागा चीप असुनही त्याबद्दल काय अ‍ॅक्शन घ्यावी हे सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्याचं पुढे काय होणार

रेवती
Tue, 09/20/2011 - 01:08 नवीन
या धाग्याचं पुढे काय होणार याची कल्पना करू शकते.
  • Log in or register to post comments

माझं वय वाढलय की लोकांची रुची

शुचि
Tue, 09/20/2011 - 01:09 नवीन
माझं वय वाढलय की लोकांची रुची बदलली आहे कळत नाही. पहीलच असावं जास्त करून. :( पण आताशा कंटाळा येतो.
  • Log in or register to post comments

वय वाढलं हो शुचिआज्जी! किती

अनामिक
Tue, 09/20/2011 - 01:20 नवीन
वय वाढलं हो शुचिआज्जी! किती दिवस सोळाच्या राहणार तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

खरय

शुचि
Tue, 09/20/2011 - 01:24 नवीन
खरय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

नुसतं खरय असं नाही म्हणायचं

रेवती
Tue, 09/20/2011 - 01:27 नवीन
नुसतं खरय असं नाही म्हणायचं शुचितै! "खरय गं बाई!" म्हणण्याने तुम्ही खर्‍याखुर्‍या वय वाढलेल्या वाटू शकता (म्हातार्‍या म्हटलेले नाही याची नोंद घ्यावी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अगं इथे टेक्सास मध्ये पाऊस

शुचि
Tue, 09/20/2011 - 01:32 नवीन
अगं इथे टेक्सास मध्ये पाऊस पडतो आहे इतक्या दुष्काळात खरं तर मी आनंदी असायला हवं पण का कोण जाणे मनावर मळभ दाटलं आहे. देवळात जाऊन यायचं आहे (पितृपक्षाचं करायला) पण कोणी मैत्रिण घेऊन जायला तयारच होत नाहीये : ( .... टॅक्सी चा खर्च नकोय कारण लांब आहे $८० होतील. त्यामुळे एकंदर वैताग आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अच्छा...

धन्या
Tue, 09/20/2011 - 01:39 नवीन
तुम्ही टेक्सासला आहात तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

+१.

नन्दादीप
Tue, 09/20/2011 - 10:23 नवीन
"आपण परदेशात रहातो" हे दाखवण्याचा एक प्रयत्न................................................. . . . . अशी कोणाची प्रतिक्रिया कशी नाही आली अजून.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अगं ए...

राजेश घासकडवी
Tue, 09/20/2011 - 01:13 नवीन
आम्ही आमच्या आयटमला 'अगं ए...' किंवा 'अजी सुनती हो मुन्ने की मम्मी' म्हणतो.
  • Log in or register to post comments

बिर्‍हाड , सामान, छावी,

आत्मशून्य
Tue, 09/20/2011 - 01:20 नवीन
बिर्‍हाड , सामान, छावी, हत्यार, त्रास, झेंगाट आणी समोरच असेल तर स्वीटी-पाय्, पॉपकीन, हनी अथवा बेब असे संबोधतो.... इतरही काही नावे आहेत पण सदरील धागा अजून चीप होण्याच्या भीतीने टंकत नाही. ;)
  • Log in or register to post comments

किती हा विरोधाभास...

शाहिर
Tue, 09/20/2011 - 02:01 नवीन
त्रास, झेंगाट आणी समोरच असेल तर स्वीटी-पाय्, पॉपकीन... अवांतर : तुम्ही खरा कधी बोलत या पैकी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

होय विरोधाभास आहेच मूळी...

आत्मशून्य
Tue, 09/20/2011 - 05:18 नवीन
परीस्थीती व लोक बघून योग्य शब्दाचा वापर करावा लागतो.. १) जस की मीत्रा समोर त्याला टाळयचं असेल तर, घे हा लागलाय "त्रास" बघ मागे निघतो मी... २) जराशा वयस्कर पण "मीत्र" गणता येइल अशा व्यक्ती समोर "झेंगाट" म्हणायचं., ३) हत्यार व सामान हे शब्द चावट भासत असल्याने शक्यतो ओपन माइंडेड व समवयस्कांसमोरच हे बोलायचं (इथं इन्क्लूड पहील्या कारणासाठी केल्या आहे) आणी उरलेल इंग्रजी ज्ञान फोनवर रात्री गप्पा मारताना पाजळायचं.... वेळेच्या मर्यादेमूळे प्रत्यक्ष भेटीमधे काहीच बोलायला फारसा वाव नसतो ;) म्हणून त्यावेळी केवळ मूक संभाषणावरच तहान भागवावी ;) अवांतर : - बाकी हे शब्द चर्चेसाठी उघड केले, प्रत्यक्ष परीस्थीतीमधे एक गोश्ट कटाक्षाने पाळायची आणी ते म्हणजे एका स्त्रि समोर दूसर्‍या स्त्रिला कधीही सभ्यतेची पातळी ओलांडली जाअल अशा शब्दाने हाक मारायची नाही, होय स्त्रियांचा अहंकार फार मोठा असतो.. जन्माच्या वैरी जरी असल्या तरी एक स्त्रि दूसर्‍या स्त्रिवीषयी कधीही अवमान कारक बोलणं खपवून घेत नाही. तेव्हां प्रेमात सारं क्षम्य असतं हे काही काळापूरतं विसरायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

एका स्त्रीसमोर दुसर्‍या

रेवती
Tue, 09/20/2011 - 07:36 नवीन
एका स्त्रीसमोर दुसर्‍या स्त्रीचा अपमान करू नयेच पण फार कौतुकही करू नये.;) ब्रेक दाबल्यामुळे बसमध्ये मागे उभी असलेली एक वर्गभगिनी चुकून माझ्या नवर्‍याच्या पाठीवर आदळता आदळता वाचली तरी तिचा हात माझ्या नवर्‍याच्या हाताला लागल्याचे पुसटसे ऐकले होते. ते मी अज्जून विसरले नाहिये. असे चुकून घडलेले प्रसंगही चालत नाहीत. आता ते झेंगाट आणि मित्र वैग्रे विसरा आणि जगदंबा, महामाया असे शब्द लवकरच येऊ घातलेत.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

वेळेच्या मर्यादेमूळे

वपाडाव
Tue, 09/20/2011 - 11:05 नवीन
वेळेच्या मर्यादेमूळे प्रत्यक्ष भेटीमधे काहीच बोलायला फारसा वाव नसतो. म्हणून त्यावेळी केवळ मूक संभाषणावरच तहान भागवावी
आपल्याला मुक म्हणायचंय की मुका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

आयला!

बाळकराम
Tue, 09/20/2011 - 01:34 नवीन
आम्हाला आमच्या आयटम बरोबर लग्न करुन आता ४ वर्षे झाली पण यातले २ सुद्धा शब्द माहित नव्हते, राव! पुण्यात राहून एवढे अज्ञान! कुठे फेडू मी ही पापं?! ;)
  • Log in or register to post comments

अच्छा! आयटम हा शब्द लग्न

रेवती
Tue, 09/20/2011 - 01:45 नवीन
अच्छा! आयटम हा शब्द लग्न झालेल्या नवरा/बायको संदर्भात आहे होय? मला वाटलं की कॉलेजच्या कट्ट्यावर बसून जेवढं पक्षी/पक्षीण निरिक्षण होतं त्यासाठी आहे. असे असल्यास मी सांगते. माझा नवरा मला "अगं एऽऽऽ ऐकलस का?" यावर मी "बोला गडे!" असे म्हणते. किंवा मी नवर्‍याला "अवं धनीऽऽ" अशी हाक मारते त्यावर नवरा "गंऽऽऽ साजणी" असा प्रतिसाद देतो. उगीच एकमेकांना हत्यार वैग्रे म्हणत नाही.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

नाही, आयटम बिनलग्नाचीच असते!

बाळकराम
Tue, 09/20/2011 - 02:17 नवीन
आमच्या आयटमला लग्नाआधी आयटम म्हणायचो, नंतर ती आपली साधी-सुधी, वरण-भात स्टाईल "बायको" झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नाही, आयटम बिनलग्नाचीच असते!

बाळकराम
Tue, 09/20/2011 - 02:20 नवीन
आमच्या आयटमला लग्नाआधी आयटम म्हणायचो, नंतर ती आपली साधी-सुधी, वरण-भात स्टाईल "बायको" झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आज्जी ...

सूड
Tue, 09/20/2011 - 08:45 नवीन
आज्जी ... :D Image removed. फोटोसौजन्य : वपाडाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे, अरे !!! थांब असे पाय

रेवती
Wed, 09/21/2011 - 00:16 नवीन
अरे, अरे !!! थांब असे पाय पकडू नकोस.;) आणते. तुला शोभेशी मुलगी आणते शोधून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय हे?

राजेश घासकडवी
Wed, 09/21/2011 - 00:21 नवीन
काय हे रेवतीकाकू, इतक्या लोकांनी इतके छान छान प्रतिशब्द सुचवले असताना नुसती साधी 'शोभेशी मुलगी'?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कारण तो बायको शोधतो आहे,

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/23/2011 - 16:59 नवीन
कारण तो बायको शोधतो आहे, आयटेम नाही. दोन्हीतला फरक तुम्हाला आम्ही का समजावून द्यायचा गुर्जी ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

धाग्या मधे गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड..

शाहिर
Tue, 09/20/2011 - 12:08 नवीन
गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रतिशब्द सांगा असे म्हणाले आहे .. त्या मु ळे लग्न नंतर कोन काय म्हनतो याचा भोचक पणा आम्ही करणार नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा