✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ?

श
शाहिर यांनी
Mon, 09/19/2011 - 23:56  ·  लेख
लेख
दर १२ मैला वर भाषा बदलते असा म्हणतात ..प्रत्येक कट्ट्याची स्वताची अशी स्वतंत्र भाषा असते ..काळा नुसार ती बदलत जाते .. गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रत्येक गावात , कट्ट्या वर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते .. उदा : पुण्यामध्ये आयटम , मुंबई मध्ये छावी ..सोलापूरकडे खडा , आणि हुच्चभ्रू मध्ये बेब या प्रमाणेच म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल ..)बहुतेक शब्द कोल्हापूरहून ) मुली सुद्धा पंटर , छावा ..बैल ..मजनू असे शब्द वापरतात ..आपल्या कॉलेज मधले , कट्ट्यावरचे, मी. पा. कट्ट्यावर अजून काही शब्द माहित असेल तर सांगावे.. जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे.. तर काय म्हणता तुम्ही ??
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52869 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

धाग्या मधे गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड..

शाहिर
Tue, 09/20/2011 - 12:08 नवीन
गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रतिशब्द सांगा असे म्हणाले आहे .. त्या मु ळे लग्न नंतर कोन काय म्हनतो याचा भोचक पणा आम्ही करणार नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

कॉलेज कट्ट्यावर बसुन पक्षी/पक्षीण निरिक्षण होतं त्यासाठीच

शाहिर
Tue, 09/20/2011 - 01:58 नवीन
धाग्याचा उद्देश कॉलेज कट्ट्यावर बसुन पक्षी/पक्षीण निरिक्षण होतं त्यासाठीच आहे ..नवरा बाय्को चा विचार केला नाहिय .. हलका धागा आहे ..हलकाच घ्यावा
  • Log in or register to post comments

बाकीच्यांनी हलका घेतला तर ठीक

रेवती
Tue, 09/20/2011 - 02:00 नवीन
बाकीच्यांनी हलका घेतला तर ठीक आहे हो. नाहीतर........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

धाग्याला मो...ठ्ठ्या

पाषाणभेद
Tue, 09/20/2011 - 02:00 नवीन
धाग्याला मो...ठ्ठ्या मो...ठ्ठ्या लोकांचे पाय लागलेले असल्याने तुम्ही धागाग्रस्त होणार नाही ही ग्वाही. बिल्डींग, मैना, पाडाची कैरी, पाखरू, कबूतर, ढिंगच्याक, वेबपेज, साईट, वेबसाईट (स्टॅटीक साईट, डायनॅमीक साईट हे उपप्रकार) हिरोईन आदी काही शब्द आहेत. (साईड हिरोईन हा प्रकार जास्त लवकर प्रसन्न होतो.)
  • Log in or register to post comments

कवी मनाचे पाभे...

शाहिर
Tue, 09/20/2011 - 11:36 नवीन
कवी प्रेयसी ला विविध नावांनी हाक मारतो.. विशेषण देतो ... तिच्या सौंदर्याला वेग वेगळ्या उपमा देतो ... तसेच कॉलेजची पोरे करतात .. त्या वरुन तथाकथित सं स्कृती र क्षकांनी केवढा गोंधळ घातलेला आहे .. पिंजरा चित्रपटा मधे सांगिअतल आहे .. कृष्ण गोपि चि लीला संस्क्रुत मधे लिहिला कि काव्य आणि ग्रमीण मध्ये लिहिला कि अश्लिल , द्यार्थी लावनी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

वेबपेज, साईट, वेबसाईट,स्टॅटीक

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/20/2011 - 08:39 नवीन
वेबपेज, साईट, वेबसाईट,स्टॅटीक साईट, डायनॅमीक साईट---तव दिव्य प्रतिभेने ;-) आंम्ही अडवे जाहलो... इत्यर्थे = खपलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

आयटम??

प्रभाकर पेठकर
Tue, 09/20/2011 - 02:00 नवीन
हिन्दी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून 'आयटम साँग' 'आयटम गर्ल' वगैरे शब्दांनी ज्ञानात भर घातली आहे. त्या ज्ञानाच्या आधारे, स्वतःच्या प्रेयसीला अथवा कुणाही सभ्य घरातील मुलीला अशी संबोधने वापरणे असभ्यपणाचे लक्षण आहे असे वाटते. पुढील यादी तर विचारातही घेतलेली नाही. मागासलेले म्हणा, बुरसटलेले म्ह्णा, वय झाले म्हणा, काहीही म्हणा. संस्कारच असे झाले आहेत की शाब्दीक स्वैराचारसुद्धा मनाला पटत नाही.
  • Log in or register to post comments

कुणाही सभ्य घरातील मुलीला अशी

रेवती
Tue, 09/20/2011 - 02:51 नवीन
कुणाही सभ्य घरातील मुलीला अशी संबोधने वापरणे असभ्यपणाचे लक्षण आहे असे वाटते सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१ अगदी असेच म्हणायचे आहे.

श्यामल
Tue, 09/20/2011 - 16:17 नवीन
+१ अगदी असेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+२

जाई.
Tue, 09/20/2011 - 20:58 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्यामल

निसरडं

तिमा
Tue, 09/20/2011 - 19:51 नवीन
कधी नव्हे तेवढं निसरडं वाटताय आज मिपावर! कुठेही पाय ठेवला तरी घाण लागेल असं वाटताय. मुलींना असली नावं ठेवणार्‍या महाभागांच्या बहिणींना असं कोणी म्हटलेलं चालेल का, हे आधी त्यांना विचारायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

माझा नवरा मला "अगं एऽऽऽ ऐकलस

यकु
Tue, 09/20/2011 - 02:52 नवीन
माझा नवरा मला "अगं एऽऽऽ ऐकलस का?" यावर मी "बोला गडे!" असे म्हणते. किंवा मी नवर्‍याला "अवं धनीऽऽ" अशी हाक मारते त्यावर नवरा "गंऽऽऽ साजणी" असा प्रतिसाद देतो.
हांग्ग आस्सं!!! रेवती आज्जीचं भारी कामय बुवा! कट्ट्यावर बसण्याचे दिवस केव्हाच संपले. त्यामुळं नो कॉमेंट! पण कधीही फारशा भेटीगाठी न होताही निरागस प्रेम दाखवणार्‍या चार-दोन मैत्रिणी आहेत त्यांना "अगं राणू.. " किंवा "डिअर.." फार्फार तर "ए भवाने" किंवा "अंबाबाई" म्हटलेलं पुरतं.. त्या पण आम्हाला लाडात असतील तर " हे बघ सोन्या..." आणि ताप / (व) लेल्या असतील तर "ए डुकरा" वगैरे बोल्तात ब्वा कधी कधी.. आमच्या गावात दोस्तमंडळीत "इंजन" आणि "मशीन" तसेच "टिकूर" हे शब्द नेहमी ऐकण्यात येतात. बाकी असले शब्द दर कोसावर नाही, तर कॉलनीगणिक बदलत असतील ... मुसुंनी जे "लॉकर रूम टॉक" सांगितलेलं आहे त्याच्या अस्सल मराठी आवृत्तीतले शब्द या धाग्यावर टाकण्यासारखे नाहीत.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा : लॉकर रूम परिभाषा

मुक्तसुनीत
Tue, 09/20/2011 - 02:08 नवीन
काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाच्या संबोधनांना काय म्हणतात याबद्दल थोडे विवेचन केले होते http://www.misalpav.com/node/18851#comment-331719. प्रस्तुत धाग्यावर याचा अर्थ असा की , एखाद्या व्यक्तीला "वस्तुरूप" म्हणून निर्देश करणे अयोग्य आहे. "लॉकर रूम परिभाषेत" हे होते का ? होय. मिसळपाव लॉकररूम आहे का ? नाही. असो.
  • Log in or register to post comments

"गंडासी"

चित्रगुप्त
Tue, 09/20/2011 - 02:08 नवीन
पंजाबकडे "गंडासी" म्हणतात, असं ऐकून आहे. ....उदा: पॅण्दी साड्डी गंडासी किथ्थे गई.... सड्डे नाल आण्वाली थी....इ.इ.
  • Log in or register to post comments

.

नगरीनिरंजन
Tue, 09/20/2011 - 07:16 नवीन
.
  • Log in or register to post comments

थिल्लर

मराठी_माणूस
Tue, 09/20/2011 - 09:21 नवीन
वर एका प्रतीसादात धाग्याला "चीप" म्हटले आहे त्या प्रतीसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments

प्रेक्षणिय स्थळं

ऋषिकेश
Tue, 09/20/2011 - 09:24 नवीन
"रस्त्यावरची चाल्ती-बोलती प्रेक्षणिय स्थळं"
  • Log in or register to post comments

प्रश्नातच उत्तर आहे का?

चेतन सुभाष गुगळे
Tue, 09/20/2011 - 09:56 नवीन
मी तर अनुक्रमणिकेत हे असं वाचलं. तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ? शाहिर प्रश्नातच उत्तर दिलं गेलंय की काय? असो. गंमतीचा भाग सोडून देऊ. मुद्दा असा की, माझं मिसळपाव वर तीन वर्षे जुनं खातं असलं तरी गेल्या तीन एक महिन्यातच मी पुन्हा खर्‍या अर्थाने सक्रिय झालो. माझे खर्‍या नावाने वावरणे, गंभीर लेखन करणे, प्रतिसाद आणि प्रतिसादांना प्रत्युत्तर यांची एक प्रमाण पद्धती, सदस्यांच्या टोपणनावाऐवजी खर्‍या नावाचा उल्लेख यामुळे मी अनेकांना कंटाळवाणा वाटु लागलो होतो. "तुम्ही मिपावरची मौजमजा घालविता आहात. इथल्या पिकनिक टाईप कल्चर ला ऑफिस टाईप कल्चर बनविण्याचा तुमचा बेत सोडून द्या" अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या. आता "पिकनिक टाईप" कल्चर चा अतिरेक झाला की अशा कल्चरचे समर्थक देखील वैतागतात हे या धाग्यावरच्या बहुतांश प्रतिक्रियांवरून दिसून येईल. सबब हा धागा उडविण्याची कुणीही मागणी करू नये. उलट हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे आणि ते थांबविण्याची गरज असल्याची आठवण करून देत राहील.
  • Log in or register to post comments

>>मुद्दा असा की, माझं मिसळपाव

अर्धवट
Tue, 09/20/2011 - 11:05 नवीन
>>मुद्दा असा की, माझं मिसळपाव वर तीन वर्षे जुनं खातं असलं तरी गेल्या तीन एक महिन्यातच मी पुन्हा खर्‍या अर्थाने सक्रिय झालो. माझे खर्‍या नावाने वावरणे, गंभीर लेखन करणे, प्रतिसाद आणि प्रतिसादांना प्रत्युत्तर यांची एक प्रमाण पद्धती, सदस्यांच्या टोपणनावाऐवजी खर्‍या नावाचा उल्लेख यामुळे मी अनेकांना कंटाळवाणा वाटु लागलो होतो. "तुम्ही मिपावरची मौजमजा घालविता आहात. इथल्या पिकनिक टाईप कल्चर ला ऑफिस टाईप कल्चर बनविण्याचा तुमचा बेत सोडून द्या" अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या. आता "पिकनिक टाईप" कल्चर चा अतिरेक झाला की अशा कल्चरचे समर्थक देखील वैतागतात हे या धाग्यावरच्या बहुतांश प्रतिक्रियांवरून दिसून येईल. सबब हा धागा उडविण्याची कुणीही मागणी करू नये. उलट हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे आणि ते थांबविण्याची गरज असल्याची आठवण करून देत राहील. :) आपल्या तेजस्वी लेखणी/टंकणीने मिसळपावचे स्वरूप आमुलाग्र बदलणार्‍या प्रेषीतासमान भासणार्‍या चेसुगु यांची प्रचंड कोंडी होत आहे असे निरिक्षण नोंदवतो.. शुभेच्छा. अवांतर - या मतप्रदर्शनात वैयक्तीक टीका नाही... कारण तुम्हाला मी तुमच्या लेखन/प्रतिक्रीयांमधूनच ओळखतो वैयक्तीक ओळख नाही तुम्हाला याआधी कुणी सांगीतले आहे की नाही माहित नाही, पण मी सांगतो.. राग नसावा... यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ..

स्पा
Tue, 09/20/2011 - 11:05 नवीन
यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस... =)) =)) =)) या प्रतिक्रियेला pratisad of the year देण्याची विनंती समस्त पिडीत मिपाकारांकडून करण्यात येत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

तोडलस मित्रा ..

शाहिर
Tue, 09/20/2011 - 12:23 नवीन
यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस... एका वाक्यात जग जिंकलस !! (कोल्हापूर च्या कट्ट्यावर कोणि भारी का ही केले कि असे म्हण्तात ...) नाहितर पुन्हा " ऑफिस कल्चार वाल्याना हा थिल्लर पणा वाटायचा ....किस कढत बसाय् चे ..किस * मराठी "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

थिल्लरपणाचा अतिरेक ?

शाहिर
Tue, 09/20/2011 - 11:51 नवीन
प्रतेकाची व्याख्या वेगळ्या असतात..तुम्हाला हलके घेन्याची सवय नाहि ..प्रत्येकाची वृती वेगळी असते .. तुम्हाला हा अतिरेक वाटला असेल पण अनेक प्रतिसादा व्रुन असे दिसते कि ही कॉलेज कट्ट्या वरची प्रचलीत भाषा आहे.. तुम्हाला आम्ही पुर्वी हलके घ्या असे सांगितले आहे..इतर धाग्यांवर..आता ही सांगतो .. प्रस्तुत धागा कोनाही स्त्री पुरुष किंवा नात्यांवर नसून तो भाषिक सौंदर्यावर आहे ... कॉलेज च्या भाषेचा लहेजा जाणुन घेण्याचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

जागे व्हा

चेतन सुभाष गुगळे
Tue, 09/20/2011 - 22:33 नवीन
<< प्रतेकाची व्याख्या वेगळ्या असतात..तुम्हाला हलके घेन्याची सवय नाहि >> किती जणांना असते? कारण तसे असेल तर अनेक जण खोडसाळ प्रतिसाद (केवळ मलाच नव्हे, इतर सदस्यांना देखील) दिल्यावर "जरा हलके घेणे" अशी सूचना पुन्हापुन्हा का देत असतात? << तुम्हाला हा अतिरेक वाटला असेल पण अनेक प्रतिसादा व्रुन असे दिसते कि ही कॉलेज कट्ट्या वरची प्रचलीत भाषा आहे..>> मी स्वत: कुस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात जाऊन तीन वर्षे शिक्षण घेऊन विद्युत अभियांत्रिकीची पदविका मिळविली आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाची संगणक व्यवस्थापन पदविकाही मिळविली. मी किंवा माझ्या सहाध्यायींनी अशी भाषा कधीच वापरली नाही. म्हणजे आम्ही कधीच महाविद्यालयीन विद्यार्थी नव्हतो असे तुम्ही म्हणाल काय? कोणी अशी भाषा वापरत ही असेल म्हणून सरसकट सगळ्यांना बदनाम करू नका. कुस्रो महाविद्यालयात तर गैरवर्तन करणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत टपालाद्वारे पत्र पाठवून बोलावून घेत, दंड भरायला लावत. याउप्परही असेच वर्तन चालु राहिले तर विद्यार्थ्याला काढून टाकत असत. आणि प्रतिसादावरून तरी तुम्ही काय बोध घेतलात? हे पाहा - http://www.misalpav.com/node/19195#comment-340310 http://www.misalpav.com/node/19195#comment-340311 http://www.misalpav.com/node/19195#comment-340316 http://www.misalpav.com/node/19195#comment-340317 http://www.misalpav.com/node/19195#comment-340321 http://www.misalpav.com/node/19195#comment-340326 http://www.misalpav.com/node/19195#comment-340335 http://www.misalpav.com/node/19195#comment-340401 http://www.misalpav.com/node/19195#comment-340322 http://www.misalpav.com/node/19195#comment-340324 http://www.misalpav.com/node/19195#comment-340352 http://www.misalpav.com/node/19195#comment-340363 http://www.misalpav.com/node/19195#comment-340562 http://www.misalpav.com/node/19195#comment-340653 http://www.misalpav.com/node/19195#comment-340629 http://www.misalpav.com/node/19195#comment-340395 इतके सारे प्रतिसाद तुमच्या विरोधात आहेत. मी तर फारच संयत शब्दात तुम्हाला वस्तुस्थिती समजवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही वर माझ्याशीच वाद घालत बसला आहात. << कॉलेज च्या भाषेचा लहेजा जाणुन घेण्याचा प्रयत्न आहे. >> तुम्हाला खरंच कुठल्या महाविद्यालयात अशी भाषा आढळत असेल तर वडिलकीच्या नात्याने त्याचा निषेध करा. त्यांना प्रोत्साहन देऊ नका. झोपेचं सोंग घेऊ नका. जागे व्हा आणि आपली चूक कबूल करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

तुम्हाला आशय कळाला नाहीये

शाहिर
Tue, 09/20/2011 - 22:52 नवीन
>>तुमच्या कॉलेज मधे तुमचे सहाध्यायी वापरत नसतील ... माझ्या बॅच चे काहिजण पदविके साठी वाडिया मधेच होते ते या भाषेशी परिचीत आहेत.. >>त्यांना प्रोत्साहन देऊ नका. मि कोणत्याही प्रकारे या भाषेचे समर्थन केले नाही ..तुम्ही धागा पुन्हा एकदा नीट वाचा >>आणि प्रतिसादावरून तरी तुम्ही काय बोध घेतलात चर्चा म्हणजे दोन्ही बाजुनी प्रतिसाद येनारच कि ...मला तेहि वाचायला आवडते ..अनेक प्रतिसाद ( ज्येष्ठ मि पा करांचे) आले अहेत ज्यानि पाठंबा दिला आहे ..सर्व इथे प्रतिसाद टाकणार नाही कारण यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस... ही सवय मला नाही... >>. जागे व्हा आणि आपली चूक कबूल करा. ज्यानी धागा समजुन प्रतिसाद दिला आणि नक्कि चुक दाखवलि तिथे चुक कबूल केलि आहे.. उ दा. रेवती ना न पटलेला शब्द , गवि सांगितलेली शब्द रचने बद्दल्ची टीका .. चुका कबूल कराय्चा मोठे पणा आमच्या कडे आहे ( आपण कधी दाखवला असेल तर दुवा द्यावा , पुढच्या वेळी तसे वागु).. गुगळे , नाण्याची दुसरी बाजु पहात चला.. आणि जगामधील सर्व अक्कल स्वता ला असल्याच्या थाटात " हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे " असे निवाडे देण थांबवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

ही घ्या तुमची चूक लगेच दाखवून देतो

चेतन सुभाष गुगळे
Tue, 09/20/2011 - 23:33 नवीन
<< शाहिर.... -------------------------------------------------------------- मै करु तो साला कॅरेक्टर ढीला है !! >> इथेच मोठी चूक आहे. स्वत:ला शाहिर म्हणविता आणि मग आयटेम सॉंग कशाला लिहीताय? लोकांची शाहिराकडून पोवाड्याची अपेक्षा असते. आयटेम सॉंग वाले वेगळे असतात. << आणि जगामधील सर्व अक्कल स्वता ला असल्याच्या थाटात " हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे " असे निवाडे देण थांबवा >> मुख्य म्हणजे तुमच्या या धाग्याला मी एकट्यानेच थिल्लर म्हंटलेले नाहीये. हे तुम्ही विसरताय. पुन्हा त्याच्या समर्थनार्थ लिंक दिली तरी "यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस.."" हे उष्ट वाक्य पुन्हा पुन्हा तुम्ही चिटकवणार. का असे निवाडे द्यायचा अधिकार फक्त तुमचाच आहे की काय? माझ्या धाग्यांवर आणि प्रतिसादांवर तुम्ही जे निवाडे दिले आहेत ते कुठल्या अधिकाराने ते कळविलेत तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

टोपण नावे सोडा, मुद्द्याला धरा

शाहिर
Tue, 09/20/2011 - 23:46 नवीन
शाहिर नावाचा आणि स्वक्षरीचा काहिही संबंध नाहिये ..बाद् रायण संबंध जोडु नका. ते नाव मि का घेतले हेही तुम्हास माहित नाहिये.. तुम्ही धग्या बद्दल प्रतिक्रिया लिहा..नाव किंवा स्वाक्षरी बद्दल नको ही विनंती . >>मुख्य म्हणजे तुमच्या या धाग्याला मी एकट्यानेच थिल्लर म्हंटलेले नाहीये. हे तुम्ही विसरताय.. अहो चर्चा म्हणाली कि दोन्ही बाजु येनारच कि .. तुम्हाला तेच सांगतोय .. या धाग्या मधल्या काही शब्दांवर आक्षेप घेतला त्या बद्दल मि लगेच चुक कबुल केलि आहे .. पण थिल्लर ना म्हणनारे सुद्धा कित्येक जण आहेत त्या बद्द्दल काय म्हनायचे आहे ?? आणि प्रतिक्रिया आणि निवाडे यात फरक अस्तो.. एका पुस्तकात हे ४ मुद्दे चुकिचे आहेत, जे मल पटले नाही..म्ह णु न मझ्या मते हे पुस्तक वाईट आहे ही झाली प्रतिक्रिया.. हे पुस्तक भंपक आहे ..कोणि वचु नका ,, हा झाला निवाडा. तुम्ही मात्र तुमच्या अडचणीच्या मुद्द्यांना सोयीस्कर बगल देत आहत बाकी तुम्ही आणि रजनिकांत कधी चुकल नसाल्च ..त्या मुळ कबूल करण्याअचा आ णि दुवा देण्याचा प्रश्न्च येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

परस्पर विरोधी विधानांनी भरलेला प्रतिसाद

चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/21/2011 - 09:21 नवीन
तुमच्या या ताज्या विधानात अनेक परस्परविरोधी विधाने आहेत. << टोपण नावे सोडा, मुद्द्याला धरा > << शाहिर नावाचा आणि स्वक्षरीचा काहिही संबंध नाहिये ..बाद् रायण संबंध जोडु नका. ते नाव मि का घेतले हेही तुम्हास माहित नाहिये.. >> << बाकी तुम्ही आणि रजनिकांत कधी चुकल नसाल्च ..त्या मुळ कबूल करण्याअचा आ णि दुवा देण्याचा प्रश्न्च येत नाही >> मी टोपणनावांविषयी काही लिहायचे नाही, मुद्यालाच धरून लिहायचे आणि तुम्ही मात्र रजनीकांत शी माझा बादरायण संबंध जोडायचा. हे मोठे अजब तर्कशास्त्र आहे. शाहिर नाव तुम्ही का घेतले हे मला नाहीय हे खरेच पण स्वाक्षरी का घेतलीय हे हा धागा वाचणार्‍या सगळ्यांनाच ठाऊक आहे. या धाग्यावर अनेकांनी टीका केली तेव्हा अशी भाषा इतरांनीही यापूर्वी वापरली आहेच आपण वापरली तर आपल्याला का नावे ठेवली जातात हा उद्वेग व्यक्त करण्यासाठीच ही स्वाक्षरी तुम्ही धागा सुरू केल्यावर नव्याने घेतलेली आहे. तेव्हा स्वाक्षरी संबंधाने केलेले विधान मुद्दा सोडून होत नाही. तसेच टोपण नाव म्हणजे तुमचे खरे नाव नव्हे की जे तुमच्या इच्छेशिवाय ठेवण्यात आलेले असते. टोपणनाव हे तुम्ही स्वत:ला घेतलेले असते. तेव्हा त्याचा अनादर होईल अशी कृती तुमच्याकडून अपेक्षित नसते. << एका पुस्तकात हे ४ मुद्दे चुकिचे आहेत, जे मल पटले नाही..म्ह णु न मझ्या मते हे पुस्तक वाईट आहे ही झाली प्रतिक्रिया.. हे पुस्तक भंपक आहे ..कोणि वचु नका ,, हा झाला निवाडा. >> या विधानात तुम्हीच पुन्हा मुद्दा सोडला आहे. कारण <<तुम्ही धग्या बद्दल प्रतिक्रिया लिहा..नाव किंवा स्वाक्षरी बद्दल नको ही विनंती .>> ही तुमचीच विनंती तुम्ही स्वत:च धुडकावून लावत माझ्या दुसर्‍या धाग्याचा इथे संदर्भ देत आहात. असो आता तुम्ही तो विषय काढलाच आहे तर त्या संदर्भात अधिक माहिती देऊन मी तुमच्या शंकांचेही निरसन करतो. माझ्या ह्या http://www.misalpav.com/node/18848 धाग्यावर तुम्ही http://www.misalpav.com/node/18848#comment-331498 या प्रतिसादाद्वारे "का ?? हे समिक्षा करताना सांगायला हवे ..उगीच मल वाटले भंपक म्हणून भंपक असे नको ..." अशी सूचना केली होती. तुमच्या सूचनेचा मान ठेवत मी पुन्हा http://www.misalpav.com/node/18848#comment-332648 या प्रतिसादाद्वारे पुस्तकाची सविस्तर समीक्षा केली होती. त्यानंतर तुम्ही देखील पुन्हा प्रतिसाद http://www.misalpav.com/node/18848#comment-332652 देऊन "तुम्ही तुमचा द्रूष्टीकोन सांगितलात .. मिपाकरांना अपेक्षित अस लेली समिक्षा लिहिलित ..धन्यवाद !तुमच्या स्वतंत्र विचारांचे स्वागत (माझ्या कडुन).... पुढील ले़खनासाठी शुभेच्छा " अशा विधानांद्वारे त्यावर समाधान व्यक्त केले होते. तुमच्या <<चुका कबूल कराय्चा मोठे पणा आमच्या कडे आहे ( आपण कधी दाखवला असेल तर दुवा द्यावा , पुढच्या वेळी तसे वागु)..>> या विधानाचे मी पुरेसे स्पष्ट, सविस्तर आणि पुराव्या सह समाधान केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

छे....मजा किरकीरा झाला..

पक पक पक
Sun, 04/26/2015 - 18:48 नवीन
छे....मजा किरकीरा झाला.. :crazy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अर्धशतकाबद्दल शुभेच्छा

स्पा
Tue, 09/20/2011 - 10:12 नवीन
Image removed. धाग्याबद्दल no comments !!! मिसळपाव आपल कुटुंब आहे, अस मानल तर त्यात आपण कस बोलाव (पक्षी : लिहाव) हे ज्याच त्याने ठरवावं.
  • Log in or register to post comments

स्पा ...

शाहिर
Tue, 09/20/2011 - 12:03 नवीन
आता तु जिलेबीचेच प्रतिसाद घालतो आहेस .. आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट बघत आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

शाहीर लेका , तूला जिलब्या भेट

स्पा
Tue, 09/20/2011 - 12:08 नवीन
शाहीर लेका , तूला जिलब्या भेट द्याव्या लागतील असे वाटले नव्हते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

हाही एक चांगला पर्याय आहे

मी_ओंकार
Tue, 09/20/2011 - 12:35 नवीन
जिलबी हाही एक चांगला पर्याय आहे. - ओंकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

नुसताच जिलबी पेक्षा

शाहिर
Tue, 09/20/2011 - 14:59 नवीन
जलेबी बाई ठेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार

आम्ही

निनाद
Tue, 09/20/2011 - 10:15 नवीन
आम्ही गंगू म्हणतो! फार लाड आला तर गंगे म्हणतो.
  • Log in or register to post comments

ते दिवसातील वेळेपरत्वे

वपाडाव
Tue, 09/20/2011 - 11:07 नवीन
ते दिवसातील वेळेपरत्वे बदलते.... मुड कधी होइल हे काही सांगता येत नाही ना..... पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र..... जशी वेळ तश्या सुचना.... आमच्याकडे फंटी / बेल्डी हा शब्द प्रचलित आहे....(आठो पहेर)
  • Log in or register to post comments

मालगाडी आणि विडिओ कोच

सुनील
Tue, 09/20/2011 - 12:04 नवीन
आम्ही कॉलेजात असताना लेडीज स्पेशल गाडीला मालगाडी म्हणत असू. तसेच, लोकलचा अर्धा लेडीज आणि अर्धा पुरुष ड्ब्ब्याला (ज्यात मध्ये एक जाळी असे), विडीओ-कोच म्हणत असू. हल्ली असे डबे (आणि हा शब्दही) आहे किंवा नाही याची कल्पना नाही!
  • Log in or register to post comments

आम्ही काय म्हणायचो ते इथे

शैलेन्द्र
Wed, 09/21/2011 - 11:40 नवीन
आम्ही काय म्हणायचो ते इथे सांगता येत नाही पण बर्‍याच मुंबैकरांना माहित असणार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आम्ही काय म्हणायचो ते इथे

स्पा
Wed, 09/21/2011 - 11:43 नवीन
आम्ही काय म्हणायचो ते इथे सांगता येत नाही पण बर्‍याच मुंबैकरांना माहित असणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मै करु तो साला कॅरेक्टर ढीला है !!

चिंतामणी
Tue, 09/20/2011 - 12:08 नवीन
आपली सिग्नेचर बघीतल्यावर जास्त लिहायची जरूरी नाही हे समजले. लगे रहो.
  • Log in or register to post comments

धाग्यात "चीप" काही वाटलं

गवि
Tue, 09/20/2011 - 12:49 नवीन
धाग्यात "चीप" काही वाटलं नाही. फक्त प्रश्नरचना चुकली आहे. केवळ "आयटेम"ला प्रतिशब्द एवढाच लेखकाचा उद्देश आहे. पण "तुमच्या आयटेमला" अशी शब्दयोजना केल्याने जिला स्वतःची म्हणतो तिलाच कंडा, माल वगैरे कसं म्हणायचं असा एक पॅरेडॉक्स उभा राहिला. बाकी शब्द वापरात आहेतच.. फक्त ते दुसर्‍या कोणाच्यातरी गर्लफ्रेंडबाबतीत / अशाच एखाद्या आकर्षक पोरीविषयी वापरले जातात. वापरले गेल्यावर ते बर्‍याचदा अपमानास्पद वाटतात. (एखादीच्या बाबतीत अजिबात वापरले जात नाहीत तिला काय वाटत असेल सांगणं कठीण आहे.) शब्दांची रेंज अत्यंत अपमानास्पद, कस्पटासमान, ते खरोखरच सौंदर्यवाचक अशी बरीच मोठी आहे. त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे त्याचा वापर केला तर तितकेसे खटकू नये. रापचिक असा उल्लेख केल्यावर कोणी मुलगी मनातून दु:खी, उदास, शॉक्ड होत असेल का याविषयी शंका आहे. सुखावत असेल का .. माहीत नाही.. पण असू शकेल. कोण बोलतेय यावर सर्व अवलंबून आहे. फक्त तिच्या तोंडावर ढळढळीतपणे किंवा अनोळखी पोराने म्हटलं तर मात्र तो अनुभव अत्यंत अप्रिय असणार हे नक्की. हे झाले चर्वितचर्वण. बाकी यासाठी अजून काही शब्द. प्लँट (छोटे रोप अशा अर्थाने).. लाईन पेस्ट्री काजूकतली बर्फी घ्या.. मूळ स्वभावानुसार खाण्याचंच यायला लागलं सारखं.. पुन्हा स्त्रीला खाद्यपदार्थ समजता असा आक्षेप येण्यापूर्वी आवरतो. प्रश्नः स्त्रीची वस्तूशी (प्रसंगी उपभोग्य वस्तूशी) तुलना करणार्‍याला हीन समजले जाते. पण तुलना ही कशाशीही केली तरी ती आक्षेपार्ह होऊ शकते. तुझे डोळे हरिणासारखे आहेत. - स्त्रीला जनावर समजता. तुझा आवाज मधासारखा गोड आहे.- खाद्यपदार्थाशी तुलना. चेहरा चंद्रासारखा आहे - निर्जीव वस्तूशी तुलना. त्यामुळे कशाला आक्षेपार्ह म्हणावे हे वापरलेला शब्द आणि त्यातला टोन ऐकूनच ठरवावे लागेल.
  • Log in or register to post comments

बर्फी

नगरीनिरंजन
Tue, 09/20/2011 - 13:21 नवीन
बर्फी हा शब्द वपु काळ्यांनी एका कथेत वापरलेला आहे असे आठवते. पस्तिशीची स्त्री बर्फी असते असं काहीसं त्यांनी लिहीलं होतं. धाग्यात आलेले शब्द अपमानजनक आहेत की नाहीत कोण जाणे पण त्यातले बरेचसे वासनालोलुपता दाखवतात हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद गवि

शाहिर
Tue, 09/20/2011 - 14:08 नवीन
मि पा वर तुलनेने नवीन आहे , आणि लिहिण्याचा फार कमी अनुभव आहे , आपण माझ्या शब्दांमागच्या भावना समजुन घेतल्या त्य बद्दल धन्यवाद ..शब्द रचना चुकली आहे ..( अजुन धागा संपादीत कस करायचा माहीत नाही) अर्थात पुढच्या वेळेस काळजी घेइन्च.. बाकी पेस्ट्री काजूकतली बर्फी गवि , तुम्ही फारच चवीचे बॉ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कॅसेट

गणेशा
Tue, 09/20/2011 - 13:27 नवीन
कॅसेट
  • Log in or register to post comments

वाजवा....

वपाडाव
Tue, 09/20/2011 - 13:36 नवीन
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

इथे फक्त पुरुष स्त्रीला काय

कवितानागेश
Tue, 09/20/2011 - 14:03 नवीन
इथे फक्त पुरुष स्त्रीला काय म्हणतात किंवा स्त्रिया पुरुषांना काय म्हणतात याबद्दलच चर्चा सुरु आहे. बोअर होतय फार! एकदा 'कट्ट्यावर बसले की कुणीही कुणालाही काहीही म्हणू शकते! ;) उदा.: 'पाखरु' कुणालाही म्हणता येते, आणि मग त्यात चिमणीपसून शहाम्रुगापर्यंत सगळे हजेरी लावतात. :D
  • Log in or register to post comments

पुरुष स्त्रीला काय म्हणतात

मृत्युन्जय
Tue, 09/20/2011 - 14:24 नवीन
पुरुष स्त्रीला काय म्हणतात किंवा स्त्रिया पुरुषांना काय म्हणतात याबद्दलच चर्चा सुरु आहे. बोअर होतय फार! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आम्ही कॉलेजमधल्या एक्दम

मी ऋचा
Tue, 09/20/2011 - 14:05 नवीन
आम्ही कॉलेजमधल्या एक्दम चिकन्या पोरांना "कंचा" म्हणायचो :)
  • Log in or register to post comments

जेब्बात.. आता चर्चेला अर्थ

गवि
Tue, 09/20/2011 - 14:14 नवीन
जेब्बात.. :) आता चर्चेला अर्थ आला.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

धन्यवाद !! एकदुम हट के

शाहिर
Tue, 09/20/2011 - 14:16 नवीन
पोरांना काय म्हणतात ,, याला पहिला प्रतिसाद तुम्ही मन मोकळेपणाने दिलात त्य बद्दल धन्यवाद!! आता एका मैत्रीणीशी बोलल्यावर कळाले सतत मागे मागे हिंडणार्या पोरांना "डास " म्हनायच्या ..काय तर म्हणे सारखा भुण भुण करतो .. आणि एक्दुम अभ्यास्सू मुलांना चंपक ..आता हे का म्हणायचे ते नाही सांगितले .. महिला मंडळा कडुन अजुन काही खुस्खुशीत प्रतिसादाची अपेक्षा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

बावळट असून शान मारणार्‍या

मी ऋचा
Tue, 09/20/2011 - 14:39 नवीन
बावळट असून शान मारणार्‍या मुलांना मेंगो / मेंग्या म्हणायचो. का ते माहिती नाही पण भा.पो. व्हायच्या त्या शब्दाने..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा