भंगार परिक्षणाचे परिक्षण
लेखनप्रकार
हे असले काही खरडण्याची आमची सोय व्हावी म्हणून मिपा व्यवस्थापनाला अशी जाहीर विनंती करण्यात येत आहे की 'वाचलेले भिकार काही' नावाचे सदर सुरू करावे. मागणी समाप्त.
आता उंदरीला ५० पिल्ले झाली, त्यातली ४ भुंकली, १० रेकली आणि २० खोकली तर त्याला गाढव बिचारे काय करणार? आणि चुकून दिलीच मांजरीने अंडी तर काय आता सुपरमॅनचं देऊळ बांधू की डिंकाचे लाडू करू?
नाही जमत... कितीही प्रयत्न केला तरी 'पाहावे मनाचे' ह्या सायटीवरील 'लोकमान्य' सिनेमाच्या परिक्षणाइतके असंबद्ध, भिकार आणि गचाळ लिहिणे नाही जमत.
कणेकरांनी जी यच्चयावत साहित्यनिर्मीती केली त्यातलं 'भांग पिऊन लिहिता काय?' हे एक वाक्य माझीया मनावर कायमचे कोरले गेले आहे. ते असे कोरले जाण्यात ह्या असल्या परिक्षणांचा फार्फार मोठा हात आहे.
खरं म्हणजे हे त्या चित्रपटाचे परिक्षण न राहता ते लिहिणार्या स्त्रीचे / स्त्री-पार्टीचे आणि सायटीचे परिक्षण झाले आहे. एखाद्या माणसाने न आवडलेल्या गोष्टीचे वर्णन करताना किती खालची पातळी गाठावी ह्याचे उत्तम उदाहरण हे परिक्षण आहे.
सिनेमाच्या कथा/पटकथेची चर्चा, कलाकारांचे अभिनय, तांत्रिक बाजूंचा विचार, इत्यादि कशाचाही पत्ता परिक्षणात लागू द्यायचा नाही असे ठरवून हा गटारकाला कालवलेला दिसतोय.
'काम न करणे ही एक कला आहे आणि करतो म्हणून न करणे ही त्याहून मोठी कला आहे' असा जो काही वाक्प्रचार आहे तो आता 'परिक्षण लिहिणे ही एक कला आहे आणि परिक्षण लिहितो म्हणून सिनेमाविषयी काहीच न लिहिणे ही अजून एक मोठी कला आहे' असा करायला हरकत नसावी. संपूर्ण परिक्षण २-३ वेळा वाचूनही सिनेमाबद्दल काही म्हणजे काही कळले नाही.
एक मात्र कळले की परिक्षण लिहिणार्या स्त्रीचा / स्त्री-पार्टीचा भाऊ अत्यंत चलाख असून त्याने आपल्या कार्ट्याचे बोचके आत्येच्या गळ्यात बांधून त्यांना थेट्रात घेऊन गेला. त्यात तो, म्हणजे भाऊ नव्हे भाचा, झोपलाच तर त्याला उचलण्याची जबाबदारी आत्येवर असल्याने आत्या अंगा पिंडाने मजबूत असून सिंधू कसली सिंधूदूर्ग छापाची असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परंतू 'कधीकधी दिसतोपण माल' असे सुबोध भावेंचे वर्णन करून ह्या स्त्रीने / स्त्रीपार्टीने स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल बराच गोंधळ घालून ठेवला आहे.
जागोजागी उडणारे थुंकीचे गलिच्छ वर्णन, विनाकारण भाच्याची काढलेली जात (ब्राह्मणच), सुबोध भावेंसारख्या कलाकाराचा अकारण एकेरी उल्लेख, विष्णूशास्त्रींच्या घराची सुरेखा पुणेकरच्या बैठकीशी केलेली तुलना, पिसाळलेल्या कुत्र्याशी केलेली सिनेमातल्या टिळकांच्या पत्नीची तुलना असे एका पेक्षा एक गचाळ निचांक हे परिक्षण गाठत जाते.
जितकी ज्याच्या बुद्धीची झेप तितकेच त्याला झेपणार आणि जितकी ज्याची लायकी तितकेच तो लिहिणार.
त्यामुळे, शेणात पाय पडला तर मुंग्यांना मेरूपर्वत गिळायची खाज का यावी? आणि फुटलेच मंगळाला चंद्र पाच तरी गळकी तोटी गळायची थोडीच थांबणार?
तुमचं नाव वाचून डुआयडी आहात
तुमचं नाव वाचून डुआयडी आहात अशी शंका होती, आता अंमळ अंदाज आला.
डुआयडी म्हणजे नक्की काय...
डुआयडी म्हणजे नक्की काय....आणि "रच्याकने" हा शब्द पण कळला नाहीये आज पर्यंत. माहिती दिल्यास उपकार होतील.
ड्युआयडी म्हणजे राम और शाम,
ड्युआयडी म्हणजे राम और शाम, सीता और गीता, चालबाज इत्यादी इत्यादी.
फक्त फरक इतकाच की हे जुळे एकमेकासारखे अजिबात दिसत नाहीत!
आयडेंटीकल ट्वीन्स नसून फॅटर्नल ट्वीन्स असतात ;)
रच्याकने - रस्त्याच्या कडेने - बाय द वे!
हल्ली फार वापरात नसलेले,
हल्ली फार वापरात नसलेले, बशिवला टेंपोत, पंख लागणे, चपला देणे, माताय, तदमाताय, श्रेयअव्हेर, पाशवी शक्ती, डायरी देणे, दातांची ट्रीटमेंट असणे हे वाक्प्रचार पण अभ्यासत चला. कुठे गरज पडेल सांगता येत नाही.
दातांची ट्रीटमेंट असणे
दातांची ट्रीटमेंट असणेई का हय? हे लवीण आहे माझ्यासाठी...
हा हल्लीचा वाक्प्रचार्..
हा हल्लीचा वाक्प्रचार्...एखाद्या ठिकाणी/कट्ट्याला/सदस्याला न भेटण्यासाठी निमित्त सांगणे!! दातांची ट्रीटमेंट साऊंड्स सो जेन्युइन यु नो!! ;)
हल्ली ते चपला घालुन निघा
हल्ली ते चपला घालुन निघा किंवा बा*** नसतं काय इथं? पुर्वी मी मेंबर नव्हतो तेव्हा वाचायला मिळायचं बरचं काय काय!!
'चपला घालुन निघा' वालेच चपला
'चपला घालुन निघा' वालेच चपला घालून निघून गेले ;)
आणि "बाझ**" त्यांचे काय झाले?
आणि "बाझ**" त्यांचे काय झाले? बरेच जब्राट लेख लिहिले आहेत त्यांनी
त्याचंच बाऊडलरायझेशन "बसवला
त्याचंच बाऊडलरायझेशन "बसवला टेंपोत" असं झालं.
भावना दुखावण्याच्या लायकीचे
भावना दुखावण्याच्या लायकीचे परिक्षण नाही ते.
मी डुआयडी वगैरे नाही. इथे
मी डुआयडी वगैरे नाही. इथे प्रतिक्रियांपुरता आयडी काढलेला आहे.
खरंच भंगार आहे परिक्षण...जर अ
खरंच भंगार आहे परिक्षण...जर अॅडीने लिहिले नसते तर वाचलेही नसते! 'लोकमान्य' फार बरा असेल असे वाटत नाही, पण हे परिक्षण फारच गचाळ वाटले! अॅडीशी सहमत!
आपल्याला तोंड दिलं आहे म्हणजे
आपल्याला तोंड दिलं आहे म्हणजे काहीही भुंकण्याचा हक्क आहे हे जसं राजकारण्यांना आणि काही पत्रकारांना वाटतं, तसं इंटरनेटवर लिखाणाचं माध्यम हाती आलं की गरळ ओकण्याचा हक्क आहे असं या लोकांना वाटतं. इतकी किंमत द्यायची लायकी आहे का त्या आयडीची आणि परिक्षणाची की?
माफ करा, पण हे वाचून 'The pot
माफ करा, पण हे वाचून 'The pot calling the kettle black' या म्हणीची आठवण झाली.
नाही, म्हणजे ते परिक्षण असेल वाईट, पण, उंदीर, मांजर, गाढव, शेणात पाय वगैरे शेलकी विशेषणे वापरणे, त्या बाईंच्या लिंगाविषयी शंका उपस्थित करणे हे कशाचे लक्षण?
आता 'भंगार परिक्षणाच्या परिक्षणाचे परिक्षण' आले नाही म्हणजे मिळवली!
+१११११११११११११११११
अगदी असेच म्हणतो. टुकार प्रसंगांची अगदी नेमकी मापे काढली आहेत परीक्षणात. लोकमान्य शेट्टी तर अगदी परफेक्ट्ट वर्णन आहे.
+१११
टुकार प्रसंगांची अगदी नेमकी मापे काढली आहेत परीक्षणात. लोकमान्य शेट्टी तर अगदी परफेक्ट्ट वर्णन आहे.+१११ अगदी सहमत! खरंतर महाराष्ट्राच्याच नाही तर देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या लोकमान्यांसारख्या तर्कशुद्ध व विचारप्रिय थोर नेत्यावर इतक्या हलक्या दर्जाचा चित्रपट - सॉरी भडक मनोरंजनपट - काढल्याबद्दल निर्माते-दिग्दर्शकांचाच निषेध केला पाहिजे. त्या चित्रपटात इतक्या महत्त्वाच्या नेत्याच्या गुवाणगुणांपेक्षा भडक नी आक्रस्तळे संगीत, भयंकर भडक रंगभुषा नी टिळकांसारख्या विवेकी नेत्याचा पार सिंघम केल्याबद्दल चित्रपट काढणार्यावर ताशेरे ओढायचे सोडून इथे तर शुट द मेसेंजर चालू आहे.
परवाच चित्रपट पाहिल्या
परवाच चित्रपट पाहिल्या असल्यामुळे प्रचंड सहमत.
चित्रपट पाहताना रोहित शेटटीने "सिंघम ३" मराठीत बनवला की काय असे सारखे वाटत होते. :(
ऋषिकेश, मला वाटतं
ऋषिकेश, मला वाटतं धागाकर्त्याने इथे चित्रपटाबद्दल सांगितले नसून परीक्षणाबद्दल लिहिले आहे. चित्रपट कदाचित त्यांनाही आवडेल, न आवडेल.
हा लेख येण्याआधी ते परीक्षण
हा लेख येण्याआधी ते परीक्षण मी वाचले होते. तेव्हा माझी प्रतिक्रियापण त्या परिक्षणाबद्दल "अत्यंत गचाळ" अशीच होती.
मी यापूर्वीच
मी यापूर्वीच सदर परीक्षणाचा (?) व ते प्रकाशित करणार्या साईट्चा देखील निषेध केला आहे. मिपावर आणि त्या साईट वर देखील !
"पहावे मनाचे" ची लिन्क देईल
"पहावे मनाचे" ची लिन्क देईल का कोणी ?
धन्यवाद. वाचले ते परीक्षण.
धन्यवाद. वाचले ते परीक्षण. आपण त्या परीक्षणावर धागा काढून विनाकारण त्याचं महत्व वाढवतोय असं वाटलं. जौदे...
एखाद्या माणसाने न आवडलेल्या
एखाद्या माणसाने न आवडलेल्या गोष्टीचे वर्णन करताना किती खालची पातळी गाठावी ह्याचे उत्तम उदाहरण हे परिक्षण आहे.Practice what you preach हा सुविचार आठवला. थोडक्यात लोकां सांगे...! ;)
ते परीक्षण फारस चांगल
ते परीक्षण फारस चांगल नाही हे मान्य . पण वरील परीक्षणाच परीक्षण त्याहुन पण भंगार आहे . बाकी परीक्षण लोकमान्य या ओम राउत याच्या कलाकृतीचे आहे टिळक या व्यक्तीचे नाही हे लोकाना कळेल तो सुदिन . बाकी चालू द्या
सिनेमा अजून बघितला नाहीये
पण तिथलं परीक्षण वाचलं.
टिळकांची पत्नी? तिची महती काय वर्णावी! टिळकांसारख्या सनातनी गृहस्थानं कधी स्वप्नातही पत्नीला बुकं दाखवण्याचा विचार केला नसेल.
खांबांवर तेच ते - सिमिट्रिकल स्पिरिट लॅम्प उजळलेले.इ. लिखाणावरून लेखक्/लेखिका यांना इतिहासाची काडीची माहिती नाही हे लक्षात आलं. काही दिवसांपूर्वी एका संस्थळावर "आगरकरांना स्त्रीशिक्षणाबद्दल आणि इतर सामाजिक कार्याबद्दल श्रेय द्यायची गरज नाही" अशी मुक्ताफळे एका लेखात का मुलाखतीत पाहिली होती. हे लिखाण त्याच प्रकारच्या लेखकांनी केलेलं दिसतं आहे. चित्रपट आवडला नाही तर त्याबद्दल कसे लिहावे याचे उदाहरण बघायचे असेल तर याच चित्रपटाचे परीक्षण मिपावर बहुधा आशु जोग यानी लिहिले आहे ते त्यांनी वाचावे. हा चित्रपट काही लोकांना आवडला नसला तरी मर्यादित प्रमाणात बर्याच जणांना आवडला आहे आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाबद्दल तर सर्वांनीच कौतुक केलेले वाचले आहे. त्यांनी बालगंधर्वांचीही भूमिका केली होती यावरून त्यांचा अभिनयाचा आवाका लक्षात यावा. मात्र या पहावे मनाचे वरच्या परीक्षणात त्याबद्दल प्रच्छन्न शब्दात हिणकस शेरेबाजी केली आहे. तिथले परीक्षण मला कोणत्याही अँगलने विनोदी वाटले नाही. विनोदी परीक्षण फारएण्ड किंवा मृत्युन्जय कसे लिहितात याचा त्या लेखक्/लेखिकेने अभ्यास करावा असे सुचवेन. आदिजोशींना पुन्हा लिहिते केल्याबद्दल मात्र त्या मंडळींचे आभार मानलेच पाहिजेत! काहीजणांना आदिची भाषा आवडली नाही. पण जसे उत्तर तसेच प्रत्युत्तर येते. इत्यलम.
अवांतर
इ. लिखाणावरून लेखक्/लेखिका यांना इतिहासाची काडीची माहिती नाही हे लक्षात आलं.बाकी परिक्षण आवडले न आवडले हा एक मुद्दा झाला, त्यावर चर्चा चालु आहेच. मला या प्रतिक्रीयेनंतर एक अवांतर म्हणा, समांतर म्हणा अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. टिळकांच्या पत्नींचे शिक्षण किती होते किंवा त्यांचे शिक्षण झाले होते काय? याबद्दल इतिहासात काही वस्तुनिष्ठ नोंदी आहेत काय?
टिळकांच्या पत्नींचे शिक्षण
टिळकांच्या पत्नींचे शिक्षण किती होते किंवा त्यांचे शिक्षण झाले होते काय? याबद्दल इतिहासात काही वस्तुनिष्ठ नोंदी आहेत काय?नक्कीच, हे जाणून घ्यायला आवडेलच! - (विद्यार्थी) सोकाजी
समीक्षक
ज्यांना चित्रपट काढायला जमतो ते दिग्दर्शक होतात आणि ज्यांना जमत नाही आणि ' कोल्ह्याला द्राक्षं आंबट ' अशी ज्यांची हालत असते ते समीक्षक होतात. खालिद मोहम्मद नाही, टाईम्समध्ये प्रत्येकाची मापं काढायचा, पण प्रत्यक्षात त्याने ' सिलसिले ' नावाचा भंगारपटच काढला. तसंच हे आहे. चित्रपट काढायला, अगदी वाईट चित्रपट काढायलाही मेहनत लागते. समीक्षा लिहायला नाही लागत. वाईट समीक्षा लिहायला तर अजिबात नाही लागत!
असहमती
प्रस्तुत एक परिक्षण न आवडल्याने (मला जरी ते भयंकर आवडले असले तरी तुमच्या मताचाही आदर आहे), एकुणच सार्या समीक्षकांबद्दलच्या व्यक्त केलेल्या घाऊक मतावर असहमती दर्शवतो.
चांगले दर्जेदार समीक्षण/परिक्षण ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसावी हे सध्या बहुतांश वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणार्या परिक्षणांवरून सहज म्हणता यावे.
एखाद्या कलाकृतीवर चांगली "टिका" (टिका म्हणजे वाईट अर्थानेच नव्हे चिकित्सा या अर्थाने) करण्यासाठी मुळ कलाकृतीचा व त्यातील अनेक बाबींचा व्यवस्थित अभ्यास असावा लागतो. प्रसंगी समीक्षा/परिक्षणे ही स्वतःच एक उत्तम कलाकृती म्हणवण्याइतकी छानही असु शकतात हे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो.
त्या पद्धतीचं समीक्षण असेल तर
त्या पद्धतीचं समीक्षण असेल तर प्रश्नच नाही. कमलाकर नाडकर्णी, नीला उपाध्ये यांची परीक्षणं अप्रतिम असायची. त्यातून अभ्यास दिसायचा. या समीक्षणातून फक्त कुचेष्टा दिसते, चेष्टा पण नाही.
कुचेष्टा करण्याचीच लायकी असेल
कुचेष्टा करण्याचीच लायकी असेल तर कुचेष्टाच होणार. त्यात वाईट काय वाटुन घ्यायचय?
असहमत . असे कुठल्याही
असहमत . असे कुठल्याही व्यवसायाचे एखाद दुसर्या उदाहरणावरून सरसकटि करण केल्या जाऊ नये असे वाटते . उदाहरणार्थ शिक्षकांबद्दल एक म्हण आहे . Those who can, do; those who can't, teach. यातला विनोदाचा भाग वगळला तर खूप लोक या म्हणीचा वापर शिक्षकांना तुच्छ लेखण्यासाठी करतात . अस सरसकटि करण करण्याची वृत्ती बरयाच वेळा दिसते . आज मराठी , हिंदी , इंग्रजी मध्ये समीक्षण करणारी नवीन पिढी पुढ येत आहे आणि बहुतेकांना दिग्दर्शन करण्यात फारसा रस नाही समीक्षकांच एक महत्व आहे आणि ते कायम राहावं अस वाटत .
मी स्वतः शिक्षणक्षेत्रात
मी स्वतः शिक्षणक्षेत्रात असल्यामुळे हे बरेच वेळा ऐकलेले आहे. असं तुच्छ लेखणा-या लोकांना बहुधा विद्यार्थ्यांनी नाकारलेलं असतं. ;)
नविन संकेस्थळाची जाहिरात होत
नविन संकेस्थळाची जाहिरात होत असताना इतके टुकार परिक्षण त्या संकेतस्थळावर प्रदर्शित व्हावे, हे एका प्रकारे त्या संकेत स्थळाच्या बहरण्याला धोका निर्माण करणारे आहे. वाद ओढावुन / निर्माण करुन प्रसिद्धी मिळवणे हा देखील हेतू असु शकतो. बाकी आदिचा उद्वेग समजु शकतो,परंतु थोड्या संयमित भाषेची अपेक्षा नक्कीच होती.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेपहावे मनाचे सायटी वरचे
पहावे मनाचे सायटी वरचे परीक्षण पूर्ण पणे पटले आहे. टीका करताना गुळमुळीत ( आणि नेमस्त ) भुमिका घ्यावी असे का? चांगली जहाल टीका ( टिळकांना पण आवडली असती ) करुन बहार उडवून द्यावी.
सिनेमा फाल्तूच ( हाच शब्द योग्य आहे ) आहे आणि तद्दन प्रचारकी आहे. दिक्दर्शकाला सिनेमाची समज नाहीये हे दिसुन येते आणि खोलात विचार करुन कष्ट करायची तयारी नाही हे पण दिसुन येते.
थोडक्यात सुमार दिग्दर्शकाचा फाल्तू सिनेमा.
त्या निमित्ताने आदि जोशी
त्या निमित्ताने आदि जोशी मिपावर लिहिते झाले
चित्रपट कसाही असला तरी
चित्रपट कसाही असला तरी परीक्षण लिहिण्याची पद्धत खटकली. तसेच चित्रपटात नक्की काय वाईट आहे , तेही नीटसे समजले नाही. सुरेखा पुणेकरशी कोणते साध्यर्म त्याचे आकलन झाले नाही. मुद्दे विस्कळित आहेत. किंबहुना, मुद्दे आहेत का, हेच समजत नाही.
थोड्या तरी दर्जेदार भाषेत असते तर वाचवले गेले असते, इतकेच नमूद करते.
बाकी संस्थळ चांगले दिसते.
आता एवढा लेख लिहीलात म्हणून
आता एवढा लेख लिहीलात म्हणून खास जाऊन वाचलं.. भिकारच आहे परीक्षण, वादच नाही.. धड हसुही येईना आणि काही नीट कळेना की नक्की म्हणायचय काय.. टाळ्या काढु वाटलं..
तुम्ही कशाला वेळ घालवताय एवढा.. अनुल्लेखानी मारायचं झालं...
पिराशी बाडिस.भिकार परीक्षण!
पिराशी बाडिस.भिकार परीक्षण!
अाता इथे त्याची मापं काढली गेल्यावर रडू नये.आपण चित्रपट परीक्षणात तेच केलंय हे आठवावे हे बरें!!
तरी मी
तरी मी सांगत होतो त्या सुबोधला! बाबा रे, या संजय राऊतचे संस्कार असलेल्या ओम राऊतच्या सिनेमात काम करु नकोस. असल्या लोकांनी फक्त सामना मधे लेख लिहावेत, टिळक त्यांना झेपणार नाहीत! पण ऐकलं नाही आमचं!
मग जे व्हायचे तेच झाले.
असा संवाद नुकताच एकाच्या तोंडी ऐकला. पण सिनेमा पाहिला नव्हता म्हणून संदर्भ लागला नाही. आता उलगडा झाला. पैसे वाचवल्याबद्दल थांकु हाँ अॅडी!!!
तुमचा सुबोध तरी काय करणार
तुमचा सुबोध तरी काय करणार तिमा. पोटासाठी माणसाला काय काय तडजोडी कराव्या लागतात.
भा.कु आणि संजय भाऊ आहेत ना.
भा.कु आणि संजय भाऊ आहेत ना. नाहीतर हे भाकु खासदार कसे झाले असते शिवसेनेचे.
आणि शिवसेनेची परंपराच आहे काकाकडुन संस्कार करुन घ्यायची
सहमत आहे... टीका करताना जहाल
सहमत आहे... टीका करताना जहाल भाषा, मग टिकेवर टिकास्त्र सौम्य भाषेत शोभले नसते ;-)
पुन्हा लिहिते झालास, बरे वाटले :) :)
तुम्ही लेख लिहीलात म्हणून
तुम्ही लेख लिहीलात म्हणून जाऊन वाचून आलो. चित्रपट खटकलाय ना त्या स्त्री/स्त्रीपार्टीला, ठीकाय!! अरे पण नक्की काय खटकलंय? पिसाळलेलं कुत्रं काय सुरेखा पुणेकर नाचायला येत्ये असं वाटणं काय!!
पाहावे मनाचे बदलून लिहावे मनाचे करा म्हणाव नाव !!
चित्रपट खटकू शकतो, मान्य !! पण नक्की काय खटकलं हे जर लिहीता येत नसेल तर घरी चाळण आहे का बघावी, त्यात बेताचं पाणी घ्यावं आणि जमलं तर जीव द्यावा.
अन्यथा आपल्याला चान चान समीक्षण लिहीता येतं अशा आविर्भावात नुसती गरळ ओकू नये.
नाय नाय ते आयडी
परीक्षणाचे परीक्षण वाचून नाय नाय ते आयडी मिपावर आपली पायधूळ झाडून गेले असे निरीक्षण जाता जाता नोंदवते.
परिक्षण नव्हे हो; परीक्षण.
परिक्षण नव्हे हो; परीक्षण. बाकी चालू द्या. त्यांचेही व तुमचेही.
द्या टाळी!
बाकी परीक्षण लोकमान्य या ओम राउत याच्या कलाकृतीचे आहे टिळक या व्यक्तीचे नाही हे लोकाना कळेल तो सुदिन+१०० - (सुदिन येण्याची वाट पाहणारा) सोकाजी
मला नाही वाटत की इथे कुणालाही
मला नाही वाटत की इथे कुणालाही ती लोकमान्य टिळकांवरची टीका वाटलेली आहे. लोक तेवढे शहाणे नक्कीच आहेत. पण तो तथाकथीत लेख (त्याला परीक्षण वगैरे म्हणून मी 'परीक्षण' या शब्दाचा अवमान करणार नाही) केवळ आणि निव्वळ टकरायचा, फालतुपणा करायचा म्हणून , रादर टीआरपी साठी केलेला एक प्रयोग वाटला मला. (ते म्हणतात ना बदनाम हुये तो क्या...) तसं काही तरी.
एखाद्या चित्रपटावर, तो कितीही रद्दड असला तरीही टीका करण्याची एक संयत शैली असते. इथे तीचा पूर्णपणे अभाव दिसतोय. केवळ चार लोक बोलतात त्यापेक्षा उरफाटे, उलटे काहीतरी लिहून टीआरपी खेचायचा प्रकार वाटतोय मला तो, अगदी जाणीवपूर्वक केलेला. तेव्हा अशांना इग्नोरास्त्राने मारणेच योग्य.
बाकी टीपी चालू द्या :)
+१
हेच लिहायला आले होते. प्रत्यक्ष चित्रपटामधे अनेक त्रुटी आहेत हे बर्याच जणांनी म्हटले आहे, पण तिथले लिखाण सवंग आणि पूर्वग्रहदूषित वाटले. लिखाणात पूर्वग्रह टिळकांबद्दलही दिसला आणि लेखक/लेखिका यांना सिनेमाला काहीही करून झोडपायचे आहे. त्यासाठी आपला 'ब्राह्मण भाचा' 'पिसाळलेले कुत्रे' वगैरे अनावश्यक फाल्तु उल्लेखांची काही गरज नव्हती.
मला वाटते, आदिजोशीच्या या लेखामुळे त्या सायटीला बर्याच हिट्स मिळाल्या असाव्यात. म्हणजे नकळत त्यांची झैरात झाल्याबद्दल ते लोक खूषच असतील!!
>>मला वाटते, आदिजोशीच्या या
>>मला वाटते, आदिजोशीच्या या लेखामुळे त्या सायटीला बर्याच हिट्स मिळाल्या असाव्यात. म्हणजे नकळत त्यांची झैरात झाल्याबद्दल ते लोक खूषच असतील!!अगदी!!
तरीही टीका करण्याची एक संयत
तरीही टीका करण्याची एक संयत शैली असतेती व्यक्तीसापेक्ष असू शकत नाही का? - (संयत) सोकाजी
कालच हा परीक्षणाचा नमुना बघुन
कालच हा परीक्षणाचा नमुना बघुन वाचुन काढला होता. अतिशय रद्दी परीक्षण आहे यात काही वाद नाही.
बाईंना नक्की वाईटच लिहायचे होते की कणेकरी स्टाइलने लिहायला गेल्या आणि हा घोळ झाला कुणास ठाउक. पण अंतिम निकाल खुपच भयाण आहे. एकतर खुप रटाळ आहे, कुठेही विनोदी वाटत नाही, असंबंद्ध लिहिले आहे, अवांतर अति जास्त आहे, टीका करताना काही ठिकाणी पातळी सोडलेली आहे. "टिळकांची पत्नी? तिची महती काय वर्णावी! टिळकांसारख्या सनातनी गृहस्थानं कधी स्वप्नातही पत्नीला बुकं दाखवण्याचा विचार केला नसेल." "---- तुरुंगात गेले, तेव्हा ही माउली भन्साळीच्या सिनेमातल्या पारोची आजी असल्यासारखी वाड्यातून तीरासारखी धावत की हो आली! तश्शीच वाड्याच्या उंबर्यात पिसाळलेलं कुत्रं बांधलेलं असल्यासारखी चौकटीला ओठंगली. " ही आणि असली वाक्ये खटकली.
थोडक्यात परीक्षण रद्दन टाकाऊ आणि भंगार रटाळ आहे.
श्री आदिजोशी यांनी मिपावर काही उल्लेखनीय चित्रपट परीक्षणे लिहिली आहेत त्यामुळे इतक्या भंगार परीक्षणावरची त्यांची उद्विग्नता समजु शकते.
तरीही खालील पर्सनल कमेंट्स टाळता येण्याजोग्या होत्या आणी टाळायलाच हव्या होत्या (असे मानुन चालतो की परीक्षक केवळ विनोदी लिहिण्याचा प्रयतन करत होती (जो जोरदार फसला) आणि तिला कुठलाही इतर खोडसाळपणा करायचा नव्हता):
एक मात्र कळले की परिक्षण लिहिणार्या स्त्रीचा / स्त्री-पार्टीचा भाऊ अत्यंत चलाख असून त्याने आपल्या कार्ट्याचे बोचके आत्येच्या गळ्यात बांधून त्यांना थेट्रात घेऊन गेला. त्यात तो, म्हणजे भाऊ नव्हे भाचा, झोपलाच तर त्याला उचलण्याची जबाबदारी आत्येवर असल्याने आत्या अंगा पिंडाने मजबूत असून सिंधू कसली सिंधूदूर्ग छापाची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू 'कधीकधी दिसतोपण माल' असे सुबोध भावेंचे वर्णन करून ह्या स्त्रीने / स्त्रीपार्टीने स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल बराच गोंधळ घालून ठेवला आहे.
मुळात, आत्या, भाऊ, भाचा यांचा
मुळात, आत्या, भाऊ, भाचा यांचा चित्रपटाशी संबंध काय आणि त्या परीक्षणात का आल्या, तेच समजले नाही. *blush*
पाहावे मनाचे लेख(परीक्षण)
मला तरी त्यात काही खटकले नाही. लेखात चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची टर उडवली आहे, त्याचा अर्थ असा होत नाही कि खुद्द टिळकांवर टिका/खिल्ली ऊडवली आहे. असो. :)