लोकमान्य टिळक : जाज्वल्य राष्ट्रवादी विचारांनी एका संपूर्ण पिढीला भारून टाकणारे, स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला प्रव्रुत्त करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व. महाराष्ट्राने ज्यांच्यावर निस्सिम प्रेम केलं, नव्हे ज्यांची अक्षरशः भक्ती केली अशा महानायकाचा जीवनपट येणं अतीशय स्वागतार्ह आहे.
चित्रपट उलगडत जातो तो मकरंद (चिन्मय मांडलेकर) या पत्रकाराच्या नजरेतून. लोकमान्यांच्या सापडलेल्या एका दुर्मिळ ध्वनीफीतीच्या प्रक्षेपण समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला मकरंद त्यांचे विचार ऐकून अंतर्मुख होतो. "तरुणांनी स्वतःची प्रगती अवश्य करावी. पण त्याबरोबरच स्वतःच्या कौशल्याचा, विद्येचा जास्तीत जास्त उपयोग देशासाठी कसा होईल, याचा सदैव विचार करावा." हे शब्द मनात रुंजी घालू लागतात. काळाच्या ओघात, लोकमान्यांचे विचार कुठेतरी विस्मृतीत गेल्याची जाणीव त्याला अस्वस्थ करते. होणार्या सासर्याकडून मुलाला अमेरिकेत नोकरी मिळाल्याचे प्रचंड कौतुक सतत ऐकून, ही जाणीव अजूनच तीव्र होते. लोकमान्यांसारख्यांनी रक्ताचं पाणी करून स्वराज्य तर मिळवलं, पण त्यांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्मान करण्यात आपली पिढी अपयशी ठरते आहे, या भावनेने तो पोखरला जाऊ लागतो. लोकमान्य टिळक समजावेत, आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत, या उद्देशाने तो टिळकांचे चरित्र वाचायला घेतो,आणी लोकमान्यांचा जीवनपट आपल्यासमोर उलगडत जातो.
एखाद्या ऐतिहासिक नायकाच्या चरित्राची वर्त्मानाशी सांगड घालून लिहिलेली कथा, हा काही नवीन प्रयोग नाही. "रंग दे बसंती", " मुन्नाभाई", पासून ते "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" पर्यंत अशी कथानकं आपण पाहिलेलीच आहेत. या चित्रपटाचं वेगळेपण असं, की पत्रकाराचे कथानक फक्त संदर्भापुरते वापरले आहे. चित्रपटाचा मुख्य झोत हा लोकमान्यांवरच आहे. टिळकांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून सुरू होऊन ही कथा, न्यू इंग्लीश स्कूलची स्थापना, त्याचे व्यापारिकरण होत असल्याचे पाहून त्यातून निराळे होणे, केसरी वृत्तपत्राची स्थापना, पुढे कर्जात बुडालेले "केसरी" संपूर्ण विकत घेऊन यशस्वीपणे चालवणे, सख्खा मित्र असलेल्या आगरकरांबरोबर झालेले वैचारिक मतभेद व त्यातून निर्माण झालेला दुरावा, इथपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, रँड वधाच्या खटल्यानंतर भोगावा लागलेला तुरुंगवास, परखड व आक्रमक अग्रलेखांद्वारे देशभर चेतवलेली राष्ट्रभावना, मंडालेचा तुरुंगवास, तिथे लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाची रचना, अशी पुढे सरकत जाते, व परतल्यावर "पुनश्च हरी ओम" करण्याचा संकल्प करतात तिथे येऊन थांबते.
गणित, सहित्य, पत्रकारिता, तत्वज्ञान, अशा विविध विषयांपर प्रभुत्व असलेल्या टिळकांचे चरित्र कथानकात उत्तम गुंफण्यात आले आहे. त्याला अतीशय उत्तम निर्मीतीमूल्य, पार्श्वसंगीत, व कलादिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे चित्रपट मनोरंजन करण्यात देखील कुठेच कमी पडत नाही. रँडचा वध, गीतारहस्याची निर्मीती, हे प्रसंग तर अतीशय उत्तम जमून आले आहेत. पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करत असलेल्या ओम राऊत यांनी अत्यंत सफाईदार काम केले आहे.
या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे सुबोध भावेचा अभिनय. मिळालेल्या भूमिकेचे याने अक्षरशः सोने केले आहे. यापुढे कित्येक काळापर्यंत लोकमान्यांचा उल्लेख झाला, की सुबोधच डोळ्यासमोर यावा, इतकी त्यानी ही भूमीका जिवंत केली आहे. साधारण एक दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सुबोध अतीशय आत्मीयतेनी लोकमान्यांविषयी बोलला होता, आणी त्यांच्यावर चित्रपट व्हावा हे स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखवले होते. त्यानंतर तो ही भूमीका करणार असल्याचे समजले तेव्हा तो यावर अपार मेहनत घेऊन अविस्मरणीय भूमिका साकारणार यात शंकाच नव्हती. अपेक्षेपेक्षाही उत्तम लोकमान्य त्याने उभे केले आहेत. संवादफेक, देहबोली वगैरेमधे त्याने घेतेलेली मेहनत दिसून आली आहे. समीर विद्वांसने साकारलेले आगरकर पण लक्षात राहण्याजोगे. चिन्मय मांडलेकर व प्रिया बापट यांना विशेष वाव नसला तरी त्यांनी पण भूमिका उत्तम निभावल्या आहेत.
टिळकांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचा राष्ट्रीय स्तरावर जनमानसावर असलेला प्रचंड प्रभाव, स्वातंत्र्यवीर सावरकर, बापट इत्यादींवर असलेला त्यांच्या विचारांचा पगडा, वगैरेबद्दल थोडं अधिक दाखवलं असतं तर चित्रपट अजूनच प्रभावी झाला असता असं वाटत राहतं.
पण स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या, राष्ट्राचे दैवत असलेल्या या उत्तुंग महानायकाचा सुंदर जीवनपट आवर्जून पहावा असाच. लोकमान्यांच्या चरित्राला पडद्यावर उजाळा दिल्याबद्दल निर्मात - दिग्दर्शकांचे शतशः आभार.
वाचने
25001
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
@नरकेंचा प्रतिवाद करायला
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
>>> @श्रीगुरुजी,नरके कोणत्या
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
घसे फाडून आक्रमकपणे मांडलेली
In reply to परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला by पिशी अबोली
कंट्रोल
In reply to घसे फाडून आक्रमकपणे मांडलेली by ग्रेटथिंकर
+१
In reply to कंट्रोल by पैसा
ये विशिष्ट विशिष्ट क्या है,
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
>>> >>> शिवईतिहासावर अशाच एका
In reply to >>> निष्पक्षपातीपणा दाखवायचा by श्रीगुरुजी
हाहा, जेवढे ज्ञान आहे
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
आमच्या नानाला काय बोलायच नाय.
In reply to हाहा, जेवढे ज्ञान आहे by बॅटमॅन
सध्या ओबीसी आरक्षणा वरून
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
यात इंग्रजी आर्काइव्ह्ज् ची लिंंक आहे का?
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
ए मुलांनो जरा थांबा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||हे अस पाहिजे
In reply to ए मुलांनो जरा थांबा ! by मदनबाण
हे भारीये
In reply to हे अस पाहिजे by जेपी
@आमच्या 'ह्यांच नाव घेते..
In reply to हे अस पाहिजे by जेपी
हे खरे तर असे हवे आहे...
In reply to @आमच्या 'ह्यांच नाव घेते.. by अत्रुप्त आत्मा
अस्स चालेल का ?
In reply to हे खरे तर असे हवे आहे... by विशाल कुलकर्णी
=)) =)) ठ्ठो!!!!!
In reply to हे अस पाहिजे by जेपी
(No subject)
In reply to हे अस पाहिजे by जेपी
स्वल्प दुरुस्ती
In reply to ए मुलांनो जरा थांबा ! by मदनबाण
नशीब नाव
In reply to स्वल्प दुरुस्ती by नाखु
ते
In reply to नशीब नाव by आदूबाळ
नक्की द्या मला मानाचं पान
In reply to ते by नाखु
ज्जे ब्बात..
In reply to नक्की द्या मला मानाचं पान by आदूबाळ
काय अब्यास, काय अब्यास. _/\_
In reply to नक्की द्या मला मानाचं पान by आदूबाळ
@कुणी घाबरट कुणी भित्रट कुणी
In reply to नक्की द्या मला मानाचं पान by आदूबाळ
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
मदनबाण, जेपी, नादखुळा,
मी पाहिला..मला आवडला. काही
बापरे!
आला अजून एक नेहमीचा विषय आला.
In reply to बापरे! by भाते
टिळकांसारख्या नाव प्रसिद्ध
सुंदर चित्रपट. अजून प्रभावी होऊ शकला असता याबाबत सहमत. सुबोध भावेचा अभिनय केवळ अप्रतिम !...कायम आहे !+१
In reply to टिळकांसारख्या नाव प्रसिद्ध by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे
चित्रपटाविषयी काही निरिक्षणे
अगदी असेच म्हणतो. कैक शाळकरी
In reply to चित्रपटाविषयी काही निरिक्षणे by क्लिंटन