लेखनप्रकार
लोकमान्य टिळक : जाज्वल्य राष्ट्रवादी विचारांनी एका संपूर्ण पिढीला भारून टाकणारे, स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला प्रव्रुत्त करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व. महाराष्ट्राने ज्यांच्यावर निस्सिम प्रेम केलं, नव्हे ज्यांची अक्षरशः भक्ती केली अशा महानायकाचा जीवनपट येणं अतीशय स्वागतार्ह आहे.
चित्रपट उलगडत जातो तो मकरंद (चिन्मय मांडलेकर) या पत्रकाराच्या नजरेतून. लोकमान्यांच्या सापडलेल्या एका दुर्मिळ ध्वनीफीतीच्या प्रक्षेपण समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला मकरंद त्यांचे विचार ऐकून अंतर्मुख होतो. "तरुणांनी स्वतःची प्रगती अवश्य करावी. पण त्याबरोबरच स्वतःच्या कौशल्याचा, विद्येचा जास्तीत जास्त उपयोग देशासाठी कसा होईल, याचा सदैव विचार करावा." हे शब्द मनात रुंजी घालू लागतात. काळाच्या ओघात, लोकमान्यांचे विचार कुठेतरी विस्मृतीत गेल्याची जाणीव त्याला अस्वस्थ करते. होणार्या सासर्याकडून मुलाला अमेरिकेत नोकरी मिळाल्याचे प्रचंड कौतुक सतत ऐकून, ही जाणीव अजूनच तीव्र होते. लोकमान्यांसारख्यांनी रक्ताचं पाणी करून स्वराज्य तर मिळवलं, पण त्यांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्मान करण्यात आपली पिढी अपयशी ठरते आहे, या भावनेने तो पोखरला जाऊ लागतो. लोकमान्य टिळक समजावेत, आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत, या उद्देशाने तो टिळकांचे चरित्र वाचायला घेतो,आणी लोकमान्यांचा जीवनपट आपल्यासमोर उलगडत जातो.
एखाद्या ऐतिहासिक नायकाच्या चरित्राची वर्त्मानाशी सांगड घालून लिहिलेली कथा, हा काही नवीन प्रयोग नाही. "रंग दे बसंती", " मुन्नाभाई", पासून ते "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" पर्यंत अशी कथानकं आपण पाहिलेलीच आहेत. या चित्रपटाचं वेगळेपण असं, की पत्रकाराचे कथानक फक्त संदर्भापुरते वापरले आहे. चित्रपटाचा मुख्य झोत हा लोकमान्यांवरच आहे. टिळकांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून सुरू होऊन ही कथा, न्यू इंग्लीश स्कूलची स्थापना, त्याचे व्यापारिकरण होत असल्याचे पाहून त्यातून निराळे होणे, केसरी वृत्तपत्राची स्थापना, पुढे कर्जात बुडालेले "केसरी" संपूर्ण विकत घेऊन यशस्वीपणे चालवणे, सख्खा मित्र असलेल्या आगरकरांबरोबर झालेले वैचारिक मतभेद व त्यातून निर्माण झालेला दुरावा, इथपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, रँड वधाच्या खटल्यानंतर भोगावा लागलेला तुरुंगवास, परखड व आक्रमक अग्रलेखांद्वारे देशभर चेतवलेली राष्ट्रभावना, मंडालेचा तुरुंगवास, तिथे लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाची रचना, अशी पुढे सरकत जाते, व परतल्यावर "पुनश्च हरी ओम" करण्याचा संकल्प करतात तिथे येऊन थांबते.
गणित, सहित्य, पत्रकारिता, तत्वज्ञान, अशा विविध विषयांपर प्रभुत्व असलेल्या टिळकांचे चरित्र कथानकात उत्तम गुंफण्यात आले आहे. त्याला अतीशय उत्तम निर्मीतीमूल्य, पार्श्वसंगीत, व कलादिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे चित्रपट मनोरंजन करण्यात देखील कुठेच कमी पडत नाही. रँडचा वध, गीतारहस्याची निर्मीती, हे प्रसंग तर अतीशय उत्तम जमून आले आहेत. पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करत असलेल्या ओम राऊत यांनी अत्यंत सफाईदार काम केले आहे.
या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे सुबोध भावेचा अभिनय. मिळालेल्या भूमिकेचे याने अक्षरशः सोने केले आहे. यापुढे कित्येक काळापर्यंत लोकमान्यांचा उल्लेख झाला, की सुबोधच डोळ्यासमोर यावा, इतकी त्यानी ही भूमीका जिवंत केली आहे. साधारण एक दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सुबोध अतीशय आत्मीयतेनी लोकमान्यांविषयी बोलला होता, आणी त्यांच्यावर चित्रपट व्हावा हे स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखवले होते. त्यानंतर तो ही भूमीका करणार असल्याचे समजले तेव्हा तो यावर अपार मेहनत घेऊन अविस्मरणीय भूमिका साकारणार यात शंकाच नव्हती. अपेक्षेपेक्षाही उत्तम लोकमान्य त्याने उभे केले आहेत. संवादफेक, देहबोली वगैरेमधे त्याने घेतेलेली मेहनत दिसून आली आहे. समीर विद्वांसने साकारलेले आगरकर पण लक्षात राहण्याजोगे. चिन्मय मांडलेकर व प्रिया बापट यांना विशेष वाव नसला तरी त्यांनी पण भूमिका उत्तम निभावल्या आहेत.
टिळकांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचा राष्ट्रीय स्तरावर जनमानसावर असलेला प्रचंड प्रभाव, स्वातंत्र्यवीर सावरकर, बापट इत्यादींवर असलेला त्यांच्या विचारांचा पगडा, वगैरेबद्दल थोडं अधिक दाखवलं असतं तर चित्रपट अजूनच प्रभावी झाला असता असं वाटत राहतं.
पण स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या, राष्ट्राचे दैवत असलेल्या या उत्तुंग महानायकाचा सुंदर जीवनपट आवर्जून पहावा असाच. लोकमान्यांच्या चरित्राला पडद्यावर उजाळा दिल्याबद्दल निर्मात - दिग्दर्शकांचे शतशः आभार.
मिसळपाव
मस्त ओळख करून दिलीत..
गेल्या शुक्रवारी पाहिला.
In reply to गेल्या शुक्रवारी पाहिला. by डॉ सुहास म्हात्रे
++११
शुभेच्छा.
निव्वळ अप्रतिम!
सध्या मराठी आणि हिंदी
In reply to सध्या मराठी आणि हिंदी by पिंपातला उंदीर
वेदोक्त प्रकरण...
In reply to वेदोक्त प्रकरण... by अर्धवटराव
या विषयावार एखादा धागा
In reply to या विषयावार एखादा धागा by सतिश गावडे
+++++११११११
In reply to या विषयावार एखादा धागा by सतिश गावडे
टाकला असता...
चित्रपटात वेदोक्त प्रकरण
In reply to चित्रपटात वेदोक्त प्रकरण by ग्रेटथिंकर
मुलांनो
In reply to मुलांनो by पैसा
पैसाक्का आमी ट्रोलिंग नाय करत
In reply to पैसाक्का आमी ट्रोलिंग नाय करत by ग्रेटथिंकर
ओक्के
In reply to पैसाक्का आमी ट्रोलिंग नाय करत by ग्रेटथिंकर
>>> त्यामागे टिळकांचा काय
In reply to >>> त्यामागे टिळकांचा काय by श्रीगुरुजी
मी शेंगा खाल्या नाहीत
In reply to मी शेंगा खाल्या नाहीत by vikramaditya
हे माई व नानासाहेब नक्की कोण
In reply to हे माई व नानासाहेब नक्की कोण by ग्रेटथिंकर
माई मोड
In reply to हे माई व नानासाहेब नक्की कोण by ग्रेटथिंकर
>>> हे माई व नानासाहेब नक्की
@ग्रेटथिंकर- माझा प्रतिसाद
अपेक्षित प्रतिसाद आले..
सुंदर ओळख
@पैसा ताइ माझा प्रतिसाद हा
In reply to @पैसा ताइ माझा प्रतिसाद हा by पिंपातला उंदीर
मान्य
आजच पाहीला , आवडला .
धन्यवाद
व्यक्ति व समाज ...
हा चित्रपट नक्कीच बघणार.
.
टुकार पिच्चर आहे. पहिल्या
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
खाटुकशी भरपूर सहमत आहे..
In reply to खाटुकशी भरपूर सहमत आहे.. by अत्रुप्त आत्मा
त्यावेळचे मटिरिअल कल्चरही
In reply to त्यावेळचे मटिरिअल कल्चरही by बॅटमॅन
आणि हो..सुबोध भावे अतिशय
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
विवेकानंद
In reply to विवेकानंद by विकास
"We took tea", खरेच?
In reply to "We took tea", खरेच? by सुनील
१९०१
In reply to विवेकानंद by विकास
धन्यवाद चूक दुरुस्त
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
सेटींग एक्स्पेक्टेशन्स राईट :)
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
+१
गणेशोत्सव टिळकांनी सुरु केला
In reply to गणेशोत्सव टिळकांनी सुरु केला by ग्रेटथिंकर
लिंक मिळेल का?
In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
नाहि
In reply to नाहि by अर्धवटराव
या वर्षीचा पहिला ठ्ठो
In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
>>> लिंक मिळेल का?
In reply to >>> लिंक मिळेल का? by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to >>> लिंक मिळेल का? by श्रीगुरुजी
+१
In reply to +१ by नाखु
नाना-माईचे नाव दिसले की
In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
वरील माहिती बरोबर आहे. १८६९
In reply to वरील माहिती बरोबर आहे. १८६९ by एस
शिवजयंती सार्वजनिक रित्या
In reply to शिवजयंती सार्वजनिक रित्या by llपुण्याचे पेशवेll
तसे म्हणा हवे तर.
In reply to वरील माहिती बरोबर आहे. १८६९ by एस
माहितीकरिता धन्यवाद स्वॅप्स!
In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
@बॅटमॅनhttp://www.youtube.com
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
जमल्यास ती हरी नरकेंची सीरीज
In reply to जमल्यास ती हरी नरकेंची सीरीज by ग्रेटथिंकर
नानासाहेब,
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
ह्याच हरी नरक्यांनी काही
In reply to ह्याच हरी नरक्यांनी काही by श्रीगुरुजी
महाराष्ट्री प्राकृतला मराठी
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
नरके हा सेमीब्रिगेडीच आहे.
In reply to नरके हा सेमीब्रिगेडीच आहे. by बॅटमॅन
नरके ब्रिगेडशी थेट संबंधित
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
ब मो पुरंदरे बर्याचदा
In reply to ब मो पुरंदरे बर्याचदा by अद्द्या
फक्त नरकेंनाच क्रिटीकली
In reply to फक्त नरकेंनाच क्रिटीकली by ग्रेटथिंकर
>>> ब मो पुरंदरेंकडे
In reply to >>> ब मो पुरंदरेंकडे by श्रीगुरुजी
इतिहासाची पदवी देणार्या
In reply to इतिहासाची पदवी देणार्या by बॅटमॅन
दिल्लीच्या नेहरू
In reply to दिल्लीच्या नेहरू by श्रीगुरुजी
दिल्लीच्या नेहरू
In reply to फक्त नरकेंनाच क्रिटीकली by ग्रेटथिंकर
ब मो पुरंदरेंकडे इतिहासाची
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
>>> नरके हे भाषातज्ञ व
In reply to >>> नरके हे भाषातज्ञ व by श्रीगुरुजी
नरकेंचा निष्पक्षपातीपणा
In reply to नरकेंचा निष्पक्षपातीपणा by ग्रेटथिंकर
>>> निष्पक्षपातीपणा दाखवायचा
In reply to >>> निष्पक्षपातीपणा दाखवायचा by श्रीगुरुजी
@श्रीगुरुजी,नरके कोणत्या
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
@नरकेंचा प्रतिवाद करायला
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
>>> @श्रीगुरुजी,नरके कोणत्या
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला
In reply to परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला by पिशी अबोली
घसे फाडून आक्रमकपणे मांडलेली
In reply to घसे फाडून आक्रमकपणे मांडलेली by ग्रेटथिंकर
कंट्रोल
In reply to कंट्रोल by पैसा
+१
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
ये विशिष्ट विशिष्ट क्या है,
In reply to >>> निष्पक्षपातीपणा दाखवायचा by श्रीगुरुजी
>>> >>> शिवईतिहासावर अशाच एका
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
हाहा, जेवढे ज्ञान आहे
In reply to हाहा, जेवढे ज्ञान आहे by बॅटमॅन
आमच्या नानाला काय बोलायच नाय.
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
सध्या ओबीसी आरक्षणा वरून
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
यात इंग्रजी आर्काइव्ह्ज् ची लिंंक आहे का?
ए मुलांनो जरा थांबा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||In reply to ए मुलांनो जरा थांबा ! by मदनबाण
हे अस पाहिजे
In reply to हे अस पाहिजे by जेपी
हे भारीये
In reply to हे अस पाहिजे by जेपी
@आमच्या 'ह्यांच नाव घेते..
In reply to @आमच्या 'ह्यांच नाव घेते.. by अत्रुप्त आत्मा
हे खरे तर असे हवे आहे...
In reply to हे खरे तर असे हवे आहे... by विशाल कुलकर्णी
अस्स चालेल का ?
In reply to हे अस पाहिजे by जेपी
=)) =)) ठ्ठो!!!!!
In reply to हे अस पाहिजे by जेपी
(No subject)
Pagination