Skip to main content

नक्की किती पैसे पुरेसे?

लेखक उडन खटोला यांनी मंगळवार, 30/12/2014 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो. तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे

वाचने 130660
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

mnc मध्ये executive पदावरील व्यक्ती भविष्याबद्दल ऐवढा निष्काळजी >> तसे नाही हो, पण काही अपरिहार्य कारणास्तव डिटेल्स जाहिर करता येत नाहीयेत , परन्तु एका मोठ्या विवन्चने मुळे पैसे साठवने व तत्सम इन्व्हेस्ट्मेन्ट इ. करता आले नव्हते

धागा कर्त्याच्या आय.डी.वरून जे.पी आणि मदनबाण व्यक्त केलेली रास्त वाटते आहे. असो.

हापशेंच्युरी बद्दल श्री.उडनखटोला आणी तमाम प्रतिसादकर्त्यांचा सत्कार, काहीच न देता करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

दर सोमवारी गुंतवणूक संबंधीत सल्ला असतो. जर तुम्हाला वाटत असेल तर तयाचा सल्ला घ्या.Investment specialist आहेत.

रीव्हर्स मॉर्टगेज चा एक उत्तम ऑप्शन उपलब्ध आहे. स्टेट बँकेत चौकशी करून बघा. भाड्याने न देताही गावाकडल्या घराचे उत्पन्न मिळू शकते तेही तुमची गम्गाजळी शाबूत ठेवून. त्या शिवाय काही छोटा उद्योग ( स्टेशनरीचे दुकान / स्नॅक शॉप वगैरे सारखा) केलात तर ते उत्पन्न आणि वेळ घालवायचे साधन होईल

In reply to by विजुभाऊ

रिवर्स मॉर्गेज म्हणजे समजा एखाद्याकडे मोठी स्थावर्‍ मालमत्ता आहे व खिशात पैसा नाही तर ब्यान्केकडे ते घर मॉर्गेज ठेऊन ब्यान्केकडुन नियमितपणे पेन्शन खात जगणे... माणुस मेला की घर ब्यान्केला मिळते. असला पर्याय कशाला सुचवताय ?

In reply to by hitesh

विषयी ही फार टोकाची प्रतिक्रिया आहे. अपत्यहीन दांपत्याचा किंवा असलेले अपत्य विचारत नसलेल्या (हजारो आढळतील) केसीस चा विचार करा. रिवर्स मॉर्गेज च्या बदल्यात बँक महिन्याला काही ठरावीक रक्कम देते. पती-पत्नी दोहोंच्या मृत्युनंतर वारसदार अथवा नॉमिनी बँकेचे कर्ज (सगळे ड्युज) फेडून प्रॉपर्टी मॉर्गेज मधुन मोकळी करु शकतो. जर तुम्ही राहत असलेले घर हे "अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅसेट" , काही रिटर्न देत असेल तर गैर काय? जिवंतपणी जे सक्खे विचारत नाहीत त्यांची काळजी करण्यापेक्षा स्वतःचे शेवटचे दिवस नीट जातील ह्याची काळजी घेतलेली बरी.

In reply to by vikramaditya

@ vikramaditya + १०० बाडीस अगदी अपत्य विचारत असेल तरीही त्याला खर्चात पाडण्यापेक्षा आता आपल्या स्वतःच्या घराचा "इ एम आय" परत मिळणार असेल तर त्यात काय वाईट आहे. मुलांपुढे हात पसरण्यापेक्षा सन्मानाने जगणे जास्त चांगले. जर मुलांची इच्छा असेल तर ते पैसे परत भरून बँकेकडून ते घर परत मिळवू शकतात. अन्यथा आपल्या मृत्युनंतर बँक राहिलेले पैसे आपल्या वारसाला देऊन घर ताब्यात घेऊ शकते.

In reply to by सुबोध खरे

>>> बाडीस "बाडीस" म्हणजे काय? कोठून निर्माण झाला हा शब्द?

In reply to by श्रीगुरुजी

'बाय डीफॉल्ट सहमत' ह्या शब्दाचे निर्माते बिपीन कार्यकर्त (तूर्तास येथे लिहीतांना दिसत नाहीत).

In reply to by vikramaditya

ब्यान्क काहीही फुकट देत नाही.. व्याज घेते. शिवाय घर मोर्गेज करायला घर किमती व खिसा मोकळा अशी स्थिती हवी. जी नक्कीच दुर्दैवी आहे. यांच्या केसमध्ये पुरेसा पैसा खिशात आहे.. शिवाय घर कोकणात म्हणजे कदाचित ब्यान्क कर्ज देइल इतके मुल्यवान नसावे. असल्या योजना शहरात चालतात. फ्लॅट , बंगलो ब्यान्क ऑक्शन करुन पैसा मिळवु शकते... ओसाडवाडीतल्या घरावर रिवर्स मॉर्गेजचे कर्ज देऊन ब्यान्क त्या घराचे करणार काय ?

In reply to by hitesh

तो ब्यांकेचा प्राब्लेम आहे असं वाटत नाही का? एक स्टेटमेंट केल्यानंतर त्यातली 'फॅलसी' जर लक्षात आली, तरीही ते ओरिजिनल स्टेटमेंट डिफेंड करीतच राहिले पाहिजे का?

In reply to by आनंदी गोपाळ

फॅलसीचा प्रश्नच नाही. खेड्यातील घराला कमर्शियल व्यालु नसल्याने ब्यान्क रिवर्स मॉर्गेज मंजुरच करणार नाही.

In reply to by hitesh

हितेस दादा, हे आपले म्ह्णणे बरोबर नाही. रीवर्स मॉर्टगेज ही सरकारी योजना असून तिचे मुख उद्दिष्ट जनकल्याण हे आहे. कर्ज मंजुरीचे सगळे निकष हे ऑब्जेक्टीव असून त्या निकषात बसणार्‍या प्रत्येकाला कर्ज मिळायलाच हवे. घर खेड्यात असावे की आणि कुठे हे निकष असू शकत नाही आणि नाही. या योजनेला अर्जदार सिनिअर सिटीझन अस्णे आवश्यक असावे. (बँकेनुसार स्किम थोडीफार बदलू शकते, पण थोडीच.)

पानाची टपरी टाका.आम्ही पण रिटायर झालो की तेच करणार. आमच्या तंबाखूचा आणि बियरचा खर्च निघाला तरी बास. आमच्या गावांत बरेच जण रिटायर नंतर हेच करतात. निदान रोजचा खर्च तरी नक्कीच सुटतो.

In reply to by मुक्त विहारि

नको . तुम्ही तिथे कट्टे भरवाल अन सारे कट्टेकरी काढा पान ,काढा १२०३०० असे म्हणत तुमची टपरी बसवतील जागच्याजागी =)) त्यापेक्षा तुम्ही इवेन्ट/कट्टा मॅनेज्मेन्ट चा बिझीनेस सुरु करा ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

अरेच्चा, ही गोष्ट आमच्या लक्षांतच आली नाही. "त्यापेक्षा तुम्ही इवेन्ट/कट्टा मॅनेज्मेन्ट चा बिझीनेस सुरु करा...." ये हो सकता है.

In reply to by मुक्त विहारि

रोजचा १००० रूपयांचा गल्ला जमवणारे पानवाले पाहीले आहेत. त्यामुळे पानटपरी चालू करण्याचा बेत अगदीच टाकाउ नाहीये. आपण उगाच व्हाईट कॉलर जॉबच्या मागे लागतो. २००० रुपय दीवसाचा गल्ला जमवणारे भाजीवाले देखील बघीतले आहेत. "भारतात कष्टाच्या कामाला प्रतिष्ठा नाही" असे माझे निरिक्षण सांगते..

In reply to by खटपट्या

असे माझे निरिक्षण सांगते... +१ आम्चे रिटायरमेंट नंतरचे प्लॅनिंग १. रद्दीवाला २. पान टपरी ३. गाड्या पुसून देणे.(दर शनिवार आणि रविवार.) साठवलेल्या पैशाला आणि त्याच्या व्याजाला अजिबात धक्का लावायचा नाही. दुपारी १२ आणि रात्री ८ ची वेळ आपली आपल्यालाच सांभाळावी लागते.

In reply to by खटपट्या

हे भय्या लोकं, हाच धंदा करतात आणि चार पैसे गाठीला मारतात. मी मुलांना पण हेच सांगून ठेवलंय, नापास झालात तर अगदी उत्तम, काम करा आणि चार पैसे जोडा. जो कामाला लाजला तो संपला. कधीतरी माझ्या एका निर्लज्ज मित्राची गोष्ट सांगीन.

In reply to by मुक्त विहारि

चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत असल्यासारखा दिसतोय सध्या! जर तुम्ही तो व्यवसाय सुरु करणार असाल तर माझ्याकडे मोठे गाळणे आहे स्टीलचे! ते देते.

In reply to by रेवती

च्यावाले कुठं गाळणं वापरत असतेत का? फडकं लागतय त्यांना. मी देतो ते. :) (फुल्ल लाईफटाइम)

In reply to by मुक्त विहारि

रद्दीवाला हा एक सोल्लिड धंदा आहे. जबरी फायदा असलेला. आमचा इथे ३/४ रद्दीवाले बघितले. पैसेवाले आहेत. एकाचा १० माजली tower मध्ये व्यापारी गळा आहे. भाड्यावर दिलेला. स्वताचे दुकान वेगळे. एकाचा मसाला धंदा आहे . एकाचा गाड्या पुरवण्याचा धंदा आहे. आणि हे सगळे धंदे यांनी फक्त राद्दीवर सुरु केले आहेत. जेव्हा रद्दी १० /११ किलो असते तेव्हा हे फक्त ६/७ किलो दाखवतात. उपाय म्हणून मी त्यांना माझ्या काट्यावर वजन करायला लावतो , मी रद्दी विकतो तेव्हा ..

प्रोफाईल मध्ये दिलेली माहिती टीपी म्हणून दिली होती ,पण हा धागा मी सीरियसली काढलेला आहे . माझा प्रश्न जेन्युइन असून चर्चेतून इतरानाही मार्गदर्शन होईलच!

उडन खटोला साहेब आपले आयुर्मान जर ८० वर्षे धरले तर अजून आपले ३० वर्षे खर्च होणार हे गृहीत धरावे लागेल. औषधोपचारावर वयाच्या चाळीस वर्षापर्यंत जेवढा खर्च होतो तेवढा पुढच्या वीस वर्षात होतो तेवढाच पुढच्या दहा वर्षात होतो तेवढाच पुढच्या पाच वर्सःत होईल हे आपल्याला गृहीत धरावे लागेल. शिवाय वैद्यकीय खर्च केवळ आपल्यावर नाही तर आपल्या पत्नीसाठी सुद्धा करावा लागेल. आणी हा खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आप मेलं आणी जग बुडलं हे आपल्या पत्नीला चालणार आहे काय हे विचारून घ्यावे.( वाटेल ते झाले तरी पैसे खर्च करणार नाही असे आपण स्वतः बद्दल म्हणू शकाल परंतु असे आपल्याला आपल्या पत्नीबाबत करता येईल काय?) बरेच वरिष्ठ नागरिक एकदाच मेलो म्हणजे सुटलो असे म्हणतात परंतु आपले हाड मोडले, गुडघे धरले, पक्षाघात झाला इ तर्हेच्या तर आपण जिवंत राहता आणी परावलंबी होता याचा ते विचार करीत नाहीत. तो लक्षात आणून दिल्यावर आपली विचारसरणी भुसभुशीत पायावर आहे हे त्यांच्या लक्षात येते. आपले मांडीचे हाड मोडले तर त्याची शल्य क्रिय़ा आपल्याला करावीच लागेल. तेंव्हा शिल्लक रकमेवर आयुष्य काढता येईल हे गृहीत धरणे बरोबर नाही. माझ्या अनुभवात तीन वरिष्ठ नागरिक असे आहेत कि जे व्याजाच्या रकमेत भागत होते तेंव्हा आनंदात होते.यातील एक नागरिक - एक मोठा वैद्यकीय खर्च आला कि शिल्केतून पैसे काढावे लागले आणी हे गणित फसले. पुढे रोजचा खर्च भागेना म्हणून मुंबईतील आपली जागा विकून ७२ व्या वर्षी पुण्याला राहायला गेले आणी वर मिळालेल्या रकमेतून हा खर्चाचा मेळ बसविता आला. आपल्याकडे अशी कोणती स्थावर मालमत्ता असेल तर गोष्ट वेगळी. मुले जरी अतिशय गुणी असतील तरीही वृद्धापकाळात त्यांच्या पुढे पैश्याच्या साठी हात पसरणे हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुरुषाला अत्यंत क्लेशदायक असते. यावर अधिक काही अनावश्यक पण टाळता न येणारे खर्च आपल्याला करावे लागतील ते बर्याच वेळेस गृहीत धरलेले नसतात. यात जवळच्या नातेवाईकातील समारंभ (लग्न साखरपुडा इ) यासाठीचा जाण्यायेण्याचा आणी आहेराचा खर्च. दर वर्ष किंवा अगदीच काही नाही तरी दोन तीन वर्षातून एखादा प्रवास यात्रा याचा खर्च आणी तेथे होणारी आपल्या पत्नीची खरेदी हे आपला अर्थसंकल्प कोलमडवू शकतो. वरील गोष्टी गृहीत धरून मला आपल्याला एक सल्ला द्य्वासा वाटतो. जोवर आपले हात पाय चालते आहेत तोवर किंवा वयाच्या ६५ वर्षपर्यंत आपला रोजचा खर्च निघेल इतपत मिळकत असेल अशी नोकरी व्यवसाय ई चालू ठेवावा. म्हणजे आपली जीवन शैली दोन पायर्या खाली आणायला लागणार नाही. अन्यथा नाचणीची भाकरी आणी आंबील खाऊनहि लोक जगतातच कि.

In reply to by सुबोध खरे

नुसत्या व्याजावर जगण्याची जीवनशैली माणसाला निश्र्क्रिय बनवते. नस्ती रिस्क आणि उठाठेवी (/स्ट्रेस) नसलेले काम करावे, अ‍ॅक्टीव रहावे आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी.

अतिशय उद्बोधक अन माहितीपूर्ण चर्चा सुरू आहे. धागाकर्ते व प्रतिसादकांचे आभार!

अवघड प्रश्न आहे .. कारण, फक्त जेवण्-खाण, कपडे-लत्ते अशा प्राथमिक गरजा पूर्ण करुन रहाणे अशीच तुमची निवॄत्त झाल्यानंतरच्या आयुश्याची कल्पना असेल, तर ऊत्तर मिळवणे शक्य आहे..पण मला वाटते, असेच जगत रहाणे.. फार अवघड आहे. तेव्हा जर तुम्ही याव्यतीरिक्त काय करायचे ते ठरवले असेल तर त्याचा हि हिशेब या जमा-खर्चात येणे आवश्यक आहे.. अन ते जर ठरवले नसेल, तर व्यक्तीशः मला तर तोच प्रश्न आधी सोडवला पाहिजे असे वाटते. अवांतर :मागे एकदा कुठल्याश्या म्यानेजमेंट वाल्या एका वर्कशोप मधे, त्याच्या सूत्रधाराने एक प्रश्न सर्वांना विचारला: "समजा - कुठल्याश्या अचाट नशीबाच्या पलटण्याने तुम्च्या सर्व आर्थिक गरजा भागतील अशी मिळकत तुम्च्या ऊरलेल्या आयुश्यात मिळत राहिल आणी वर पुढ्च्या पीढ्यांसाठीहि भरपूर तरतूद होईल अशी परीस्थीती जर झाली, तर तुम्हि सध्या जे काम करता आहात तेच कराल कि अजून काहि कराल ?" ऊपस्थीत एकानेहि , हेच काम कराल असे म्हण्ट्ले नाहि.. मला निव्रुतीचा विचार मनात आला कि नेह्मी हेच वाटते.. जेव्हा-केव्हा ती वेळ येईल तेव्हा आर्थिक बाजू-बरोबर, ह्या प्रश्नाचे ऊत्तरहि तयार ठेवायला हवे, अन त्यासाठी जर काहि पूर्व-तयारी करायची असेल, तर तीहि आर्थिक पूर्वतयारी ईतकीच गरजेची असेल.. असो.. आपल्याला शुभेच्छा ! -पहाटवारा

सर्व प्रतिसाद वाचले. यांत एकच मुद्दा आहे महिना सोळा हजार रु पुढे पुरणार नाहीत काहीतरी करा आणि आणखी दहा वर्षे कमवा. परंतू समजा एखाद्याने ठरवले असेल आता यापुढे काहीच हातपायडोके हलवायचे नाही तर या सोळा हजाराचे काय करायचे ते त्यांना सांगावे.

In reply to by hitesh

पण त्यांची कोकणातली शेती आहे. म्हणजे भात, उडीद आणि भाज्या ते घरीच पिकवू शकतात. तेही करायचे नसेल तर दोघांना काटकसरीने रहायला ५००० रुपये महिना लै झाले. महाराष्ट्रातले माहीत नाही. पण आमचे गोव्यातले रेशन कार्ड हल्लीच रिन्यु केले. रेशनवर काय आहे बघू तरी म्हणून गेले तर १०० रुपयात ८ किलो तांदूळ आणि २ किलो गहू सरकार कृपेने मिळाले. पूर्वी तेल साखर इ मिळत असे. आताचे माहीत नाही. कोणत्याही उपचारासाठी सरकारी रुग्णालये, तिथले डॉक्टर्स, औषधे मोफत असतात. फक्त जरा जास्त वेळ थांबावे लागते. कोणत्याही प्रकारचे तज्ञ लागले तर उपलब्ध असतात. मांजर चावल्यावर घ्यायचे इंजेक्शन खाजगी डॉक्टर्सकडे नव्हते म्हणून मला हे कळले. आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात.

In reply to by पैसा

सहमत... बर्‍याच वेळा आम्ही पण रेशनचे धान्य वापरतो. तसे ते थोडे वेळखावू काम आहे, पण ४ पैसे वाचवायचे असतील, तर वेळेचा त्याग करणे भाग आहे.

In reply to by मुक्त विहारि

आपलेच टॅक्स म्हणून भरलेले पैसे सरकार रेशनसाठी वापरते. रेशनचे धान्य आणण्यात कमीपणा काय? बरे चांगले सोनामसुरी तांदूळ ८-९ रुपये किलोने मिळत असतील तर का घेऊ नयेत?

In reply to by पैसा

रेशनचे धान्य म्हणजे टाकाऊबिकाऊ नसते. बर्‍याचदा चांगले असते. थोडे साफबिफ केले की वापरता येते. या गव्हाच्या पोळ्या छान मऊ बनतात आणि तांदळाचा भातही मोकळाढाकळा नाही झाला तरी चवीला तितकाच चांगला असतो असा अनुभव आहे. साखरही मिळते रेशनवर. योग्य, कायदेशीर मार्गाने पैसे वाचवणे आणि ते चांगल्या कार्यासाठी वापरणे - अगदी स्वत:च्या मौजमजेसाठी, हौसेसाठीही वापरणे यात काही गैर नाही.

In reply to by पैसा

@ पैसाताई आणि स्वॅप्स - वर कोणीच रेशनचे धान्य का वापरले असा प्रश्न विचारला नाहीये. तुम्हीच का एकदम डीफेन्सीव आणि जस्टीफाइंग मोड मधे जाताय.

In reply to by प्रसाद१९७१

असे तुमच्यासारखे कोणीतरी बोलेल याचा विचार मी केला होता. पण काहीजणांना रेशनचे धान्य वापरणे डाऊन मार्केट वाटते. किंवा माझ्या केसमधे रेशनवर किंवा सरकारी हॉस्पिटल्समधे बरे काही मिळत असेल हेच मला माहीत नव्हते. कमी दराचे धान्य गरीब लोकांसाठी असते ते आपल्याला बाजारभावाने घेणे परवडत असताना आपण का घ्यावे असाही काही जण विचार करू शकतात, म्हणून लिहिले आहे.

In reply to by एस

मी आणले ते रोज वापरायचे सोनामसुरी होते. बाजारात ५० रुपये किलोने मिळतात, बारीक तांदूळ. पण इडलीसाठी फार चांगले नाहीत. इडलीसाठी जरा जाड, थोडेफार फोलपट शिल्लक असलेले तांदूळ चांगले.

In reply to by पैसा

कोणत्याही उपचारासाठी सरकारी रुग्णालये, तिथले डॉक्टर्स, औषधे मोफत असतात. फक्त जरा जास्त वेळ थांबावे लागते. कोणत्याही प्रकारचे तज्ञ लागले तर उपलब्ध असतात. मांजर चावल्यावर घ्यायचे इंजेक्शन खाजगी डॉक्टर्सकडे नव्हते म्हणून मला हे कळले. आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात. माझ्या कानाचे नोव्हेंबर २०१३ ला ऑपरेशन झाले. बाहेर खर्च जवळपास ५०००० सांगीतला. मेडिकल विमाही होता. पास झाला असता की नाही या भानगडीत न पडता सरळ पालीकेच्या दवाखान्यात भरती झालो. ऑपरेशन खर्च ५०० रुपये . काही बाहेरची औषधे मीलुन ३००० खर्च झाले. दिवसातुन दोनदा चहा, दुध -ब्रेड, दोनदा गरमागरम साधे जेवण दवाखान्याकडुन. ८ दिवसाने घरी आलो. मी वयाच्या ३५ व्या वर्षी काम करायचे बंद केले ते ३१ डिसेंबर २००५ साली. गरजा अतिशय कमी. रेग्यूलर मेडिटेशन करतो.एक फ्लॅट आहे १३ लाख आजची किंमत. ज्याला कामधांदा शिकवला तो चुलतभाउ आजपर्यंत पैसे देतोय खर्चायला. ज्यादिवशी नाय देणार तेंव्हाच तेंव्हा ( एकतर परत काम कारायच नाही तर नर्मदे हर!!). वरती सर्व गृहीतके इतके वर्ष जगु यावर आधारीत आहेत. जगुच याची काय शाश्वती? मलाही भरपुर सल्ले मिळतात तेही न विचारता. पण आम्ही आपल्या निर्णयावर ठाम. जे काय समोर येईल त्याला तयार.

आता हा धागा उडनटोला यांनी तीन मातब्बर (संस्थळे)ठिकाणी उघडून मिळालेल्या सल्ल्याने काळजीपूर्वक नदी ओलांडणार आहेत. काही ठिकाणी पाचसहा वर्षाँपूर्वी झालेल्या अशाच चर्चेचे संदर्भही सभासदांनी दिले आहेत. त्यामुळे सोळा हजार रू/महीना पुरतील का? चे उत्तर आताच्या काळातील नवीन गुंतवणूक/मौजमजा वगैरे पर्यायांपुरते सिमित ठेवायला हवे असे वाटते.

बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन? प्रसाद पानसे, पुणे देशातील बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करताना स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सेंट्रल बँक आणि कॅनरा बँक या सात बँकांमध्ये इतर सर्व सरकारी बँका विलीन केल्या जाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामध्ये पुण्यात मुख्यालय असलेली महाराष्ट्र बँक (बँक ऑफ महाराष्ट्र) ही सेंट्रल बँक ऑफ इंडियात विलीन केली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवार आणि शनिवारी 'ज्ञान संगम' ही बँकिंग परिषद होत आहे. मोदी हे फक्त शनिवारी उपस्थित असतील. अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यासह सर्व राष्ट्रीय व खासगी बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आदी उच्चाधिकारी या मंथनामध्ये सहभागी होणार आहेत. बँकांच्या विलिनीकरणासाठी मोदी यांनी याबाबत राजकीय इच्छाशक्ती दाखवून पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. 'विलिनीकरण करताना बँकिंगप्रणाली (सॉफ्टवेअर) आणि प्रादेशिक विस्तार विचारात घेतले जाणार आहेत. त्यानुसार सात प्रमुख बँकांमध्ये (मेगा बँक) इतर १९ बँकांचा समावेश करण्यात येणार आहे,' अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली. या विलिनीकरणानंतर मेगा बँकेत 'बासल ३' या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आवश्यक भांडवल उपलब्ध होईल; तसेच खासगी बँकाबरोबरच या राष्ट्रीय बँकादेखील आंतरराष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करू शकतील, अशी आशा धोरणकर्त्यांना असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. किफायतशीर पर्याय बँकांना कोणतीही देशव्यापी प्रणाली विकसित करताना सॉफ्टवेअरसाठी कोट्यवधी रुपये खर्ची पाडावे लागतात. हा अनावश्यक खर्च टाळून सर्वसाधारणपणे एकाच कंपनीचे, एकाच प्रकारचे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या बँकांचे एकमेकांमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. विशिष्ट भागात एखाद्या बँकेच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या शाखा बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे समजते. विलिनीकरणाचा 'रोडमॅप'... विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या विलिनीकरणाचा 'रोडमॅप' पुढीलप्रमाणे असू शकतो. ('मेगा बँक' आणि त्यात विलीन होणाऱ्या संभाव्य बँकांची नावे या क्रमाने) सेंट्रल बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, अलाहाबाद बँक कॅनरा बँक : सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया : या बँकेच्या पाच संलग्न बँका. उदा. स्टेट बँक जयपूर अँड बिकानेर पंजाब नॅशनल बँक : विजया बँक, देना बँक बँक ऑफ बडोदा : आयडीबीआय बँक, युनायडेट कमर्शियल बँक बँक ऑफ इंडिया : ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक

In reply to by मंदार कात्रे

ही बातमी पेपरमध्येही वाचली पण या चर्चेशी त्याचा संबंध आणि ती बातमी इथे द्यायचे प्रयोजन नक्की काय हे समजले नाही.

In reply to by क्लिंटन

कदाचित यापैकी कुठल्या बँकेत धागाकर्त्याची ठेव तर नाहीना ? याची उठा"ठेव" असावी *SCRATCH* (ह्.घ्या)

माझे वय ७२ पूर्ण २०१० साली मी रिक्षासाठी रोज १०० रुपये खर्च होणार नाही असे गृहीत धरले नन्तर आठवड्यात ७०० झाला का खर्च रिक्षावर असा विचार करू लागलो आता महिन्यात ३००० झाला का खर्च असा विचार करताना घाबरत आहे कारण आता तेवढा खर्च सहज होऊ शकतो असे जाणवू लागले आहे आपले खर्चाचे अंदाज चुकले कि धडधड वाढते साठवलेले पैसे खर्च करताना विचार करावा लागतो याचे वाईट वाटते १६५०० रुपयात जगणे शक्य आहे पण यापुढे जगताना जगण्याची पातळी बदलणे भाग पडेल तुमचे शरीर ही पातळी स्वीकारेल एकवेळ पण मन ? तुमचे मन जर स्विकारणार असे वाटत असेल तर तुम्हाला हा प्रश्न का पडला हे मी समजू शकत नाही १६५०० रुपयात जगण्यासाठी सगळा दृष्टिकोन बदलणे मला गरजेचे वाटते

काय ठरले मग शेवटी? उडन खटोला यांना नक्की किती पैसे पुरेसे आहेत? कोणते तांदूळ वापरावे व कोणता खर्च टाळावा?

फार सुरेख आणि मोलाची चर्चा या निमित्तने झाली आहे. मला एक जाणवते आहे की बर्‍याच जणांना वेळेआधी निवृत्त व्हायचे आहे( त्यात मी देखील आलो! ) आणि म्हणूनच या धाग्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पण असे का ? अधिकाधिक कर्तृत्व दाखवून विजिगिषु वृत्तीने जगण्याची भारतीयांची उमेद खचत चालली आहे का ? गेल्या आठवड्यात अश्या दोन बातम्या ऐकल्या की ज्यांनी वेळेआधी निवृत्ती स्व वीस वर्षापूर्वी स्वीडन मध्ये काम करत असताना तिथले कर्माचारी मला प्रमोशन नको असे म्हणत तेव्हा मला फार आश्चर्य वाटे. मला वाटे , या लोकांकडे विजिगिषु वृत्ती नाहीच. पण खरे कारण होते , कितीही सामान्य पातळीवर काम्करणारा कामगार असला तरी त्याच्याकडे गाडी / घर आणि खाण्यापिण्याची चंगळ असे ! वरच्या पातळीवर जाऊन अधिक काम करावे अधिक पैसे मिळवावेत असे सामान्य स्वीडीश कामागाराला वाटत नसे, काही मोट्व्हेशनच नसे ! आज आम्हा भारतीयांची ही स्थिती आली आहे का ? आणि असे असेल तर भारत म्हणून ही स्थिती चिंताजनक वाटते ! व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार ! शिवाय समाजाच्या पैशाने मिळवलेली स्किल सेट्स वाया जाणार हे ही एक नुकसानच ! आपल्याला काय वाटते ?

In reply to by विटेकर

व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार ! शिवाय समाजाच्या पैशाने मिळवलेली स्किल सेट्स वाया जाणार हे ही एक नुकसानच
१००% सहमत आहे.सगळेच व्याजावर जगायचे ही 'महत्वाकांक्षा' बाळगून असतील तर त्या समाजाचे कठिण आहे.

In reply to by क्लिंटन

१००% असहमत. लोकांच्या मुलभुत जगण्याच्यी हक्कावर आघात केल्यासारखे वाटते.

In reply to by क्लिंटन

@क्लिंटन १०० % सहमत माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी एकदम निरुपयोगी होतो हे मुळातच मला अमान्य आहे. अगदी एका बँकेच्या कारकूनाबाबत सुद्धा हे सत्य आहे( आमच्या माहितीतील एका कारकुनाने केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मी हे म्हटले होते. कोणत्याही कामाला कमी लेखणे हा हेतू नाही) याच माणसाने रडारड केली अहोआम्हाला कोण विचारतो? तीच खर्डेघाशी करीत आयुष्य काढले. मी त्यांना फक्त थोडासा प्रयत्न करण्यास सांगितले. काही काळानंतर हाच माणूस मुथूट फायनान्स मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाला. मी त्याला विचारले असता तो म्हणाला बँकेत सोन्यावर कर्ज देताना आलेल्या अनुभवाचा फायदा झाला आणि येथे नोकरी मिळाली. नाहीतरी दिवसभर घरी बसून बायकोच्या डोक्याशी कटकट करण्यात काय फायदा आहे? तेवढेच चार पैसे मिळतात आणि थोडी हौस मौज करता येते. ( अर्थात हे माझ्या सांगण्याने झाले असे मी मुळीच म्हणत नाही बहुधा घरी बसण्याचा कंटाळा आल्यामुळे झाले असावे). माझ्या सारखा माणूस ज्याने बारावी नंतर दहा वर्षे शिक्षण घेतले आणि आता २१ वर्षे अनुभव जमा झाला आहे. एके दिवशी मी पूर्ण निवृत्त होणे म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा आणी अनुभवाचा अपव्यय आहे. जेंव्हा माझी आर्थिक गरज संपेल तेंव्हा मी आठ तास मानेवर खडा ठेवून काम करू नये हे ठीक आहे पण नुसतेच काहीही न करणे हा ज्ञानाचा आणी अनुभवाचा शुद्ध अपव्यय आहे. मी ते काम माझ्या सोयीनुसार चार तास विना मोबदला/ मोबाद्ल्यासहित करत राहणे आवश्यक आहे असे माझे म्हणणे आहे. ज्याने अगदी चपराशाची नोकरी केली आहे तो सुद्धा बरेच काही विधायक काम करू शकतो. वीस वर्षे नोकरी करायची आणी तीस वर्षे फुकट बसून खायचे हा शिद्ध अपव्यय आहे जो आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्राला परवडणारा नाही.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब - आमच्या सारख्या ४ ते ६ वर्ष इंजिनीरींग शिकलेल्या आणि नंतर आयटी मधे हमाली करणार्‍या माणसांबद्दल काय मत आहे. माझ्या सारख्या सरकारी कॉलेज मधल्या माणसानी तर सरकारचे चांगलेच नुकसान केले आहे. किंवा आयआयटी मधे शिकुन नंतर भिकार कादंबर्‍या पाडणार्‍या किंवा फक्त गुरे हाकणार्‍या माणसांचे काय करायचे?