Skip to main content

बिल्ला आणि नाग..!!

लेखक गवि यांनी शुक्रवार, 12/11/2010 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
............................. आत्ताचे जवळ जवळ सगळे सिनेमे खूप सेन्सिबल असतात..मजा नाही येत.. कुठे गेले ते माझे लाडके सिनेमे..?? ज्यामधले नायक आणि खलनायक खूप नियम आणि पथ्यं पाळतात.. १) हीरो किंवा हिरोईन... टेप,सी.डी. किंवा लपून काढलेले फोटो असा जो काही कलियुगातील सर्व दुष्टतेविरुद्ध पुरावा असेल तो क्रूरकर्मा खलनायकांच्या मधोमध उभे राहून उंच करून दाखवतात आणि "ललकारतात" की "तेरे दिन भर गए है राका!! (किंवा प्रलयनाथ.. किंवा ठकराल..!!)..मैंने तेरी सारी बातें इस टेप में रिकॉर्ड कर ली है.. अब इस सबूत के जरिये में तुझे फांसी के तख्ते तक पहुन्चाके रहूँगा..में अभी ये टेप पुलीस के हवाले करने जा रहा हूँ..!!" २) राखी टाईप कोणीतरी आई मरता मरता आपल्या भावी "मेन हीरो" मुलाला एकदम लास्ट्च्या क्षणी एक माहिती सांगते.. ज्या लोकांनी तिला मारले आणि एकूण त्यांचं खानदान "तबाह" करण्यासाठी जे जे वाईट करता येईल ते केलं..(उदा. वडिलांचा खून..बहिणीवर बलात्कार..अर्थातच बहिणीची consequent आत्महत्या..आईला विष चारणे..वगैरे) त्या लोकांची नावं आहेत बिल्ला आणि नाग.. ढँग... !!! आता बस बोंबलत शोधत कोण बिल्ला आणि नाग आहेत त्यांना..आडनाव आणि साधारण पत्ता तरी सांगितला असतां आयशीनं तर ..?? म्हणजे बुवा कुर्ला वेस्ट, कोपरखैरणे, रबाळे... असा निदान एरिया तरी सांगायचा.. पण नाही.. शोध मेल्या.. ३) नुकताच बलात्कार झालेली तरुणी (हिरोइन नव्हे बरं का.. हीरोची बहीण..) .. हिला क्रूरकर्मा शक्ति कपूर ने जिवंत सोडलं आहे आणि तो बिचारा कर्तव्य करून निघून चालला आहे.... पण तिथल्यातिथे ती त्याला ऐकवतेय की में तेरा ये काला चेहरा समाज के सामने लाकर रहूंगी.. किंवा तेरी शराफत का पर्दाफाश करूंगी..!!" मग तो परत फिरतो.. मरते बिचारी...!! नाहीतरी निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकाच्या मनातून तिला मारायचंच असतं काहीतरी करून.. ४) लहान मुलगा.. "मास्टर बंटी" छाप..अत्यंत इनोसंट.. पण अत्यंत अडचणीचे आणि मुद्द्याचे प्रश्न विचारतो.. उदा..मम्मी मम्मी.. क्या येही मेरे पापा है? किंवा.. मम्मी मम्मी ... पापा हमारे साथ क्यूँ नही रहते ..?? किंवा.. पापा पापा.. क्या हम आंटी को मेरी मम्मी बना सकते हैं ?? (हा फायद्याचा प्रश्न आहे बापाच्या दृष्टीने..) ५) खलनायक हा अत्यंत कष्टपूर्वक जास्तीत जास्त वाईट गोष्टी एकाच वेळी करत असतो. मुळात तो दारू पीत आणि दोन उन्हाळी कपडे घातलेल्या बायकांकडून मालिश करून घेत आणि शक्य झाल्यास कैबरे बघत बसलेला असतो.. मग त्याचे भयंकर साथीदार येतात..मीटिंग होते.. मीटींगची सुरुवात एखाद्या गद्दाराला गोळी घालून होते.. मग एकूण मिनिट्स ऑफ़ मीटिंग वरून आपल्याला कळतं की त्यांचा सरहद्पार कडून ड्रग्स, हत्यारं आणि जाली नोटा आणण्याचा व्यवसाय असतो.. नुसते चार पैसे कमावायाचे असा क्षुद्र उद्देश न ठेवता सामाजिक बांधिलकीतून हे ड्रग्स तरुण पिढीला स्वस्तात उपलब्ध करून देणं..मग तरूण पिढी तबाह झाल्यावर आणि "जाली" नोटांमुळे देश "खोखला" झाल्यावर "हथियारां" च्या वापरानं त्याच्यावर "राज" करणं अशा महत्वाकांक्षी योजना ते राबवत असतात.. आन्त्रप्रिनरशिप म्हणतात ती हीच ना..? खलपुरुषांची एक अत्यंत मोहक सवय म्हणजे आपली सर्व कुटील कारस्थानं दारु पीत पीत आपापसात डिस्कस करणं..वाह.. पुत्र : पापा आपकी रोनेकी एक्टिंग को तो दाद देनी पड़ेगी.. पिता : हाँ बेटा..यह सब मैंने ही किया..मैंनेही चमेली को राजा के पास भेजा.. मैनेही राजा के दूध में नशे की दवाई मिलाई..और वो फोटोग्राफ्स भी मैंने ही छुपकर ली थी.. पुत्र : वा पापा.. दो प्रेमियों के बीच शक और नफ़रत का जहर भरने का आप का आयडिया कमाल का है.. पिता : अब किरण राजा के मुँह पे थूकेगी भी नही..वो तुझे मिल जायेगी..और उसके साथ उसके बाप का पैसा भी.. इसे कहते है एक तीर में दो पंछी..उसके बाप के साथ मेरा पुराना हिसाब भी चुकता हो जायेगा..मैंने जब किरन की माँ का खून किया था तब उसीने मेरे खिलाफ गवाही दी थी.. झालं.. दारामागून लपून ऐकणाय्रा व्यक्तीच्या हातून ग्लास खाली पडलाच पाहिजे.. आणि कोणी टेपरेकोर्डर घेऊन आलंच असेल तर पुरावा ही "दर्ज" झाला.. हाच खलपुरूष लास्ट्च्या मारामारीआधी कित्ती जमवाजमव करतो.. मुळात हीरोला अंगावर ओरखडाही पङता काच खळ्ळकन फोडून आत एंट्री मिळावी म्हणून खर्च करून एक काच बसवून घेतो हलकीशी ठिसूळशी.. मग तो हिरोच्या आईला, (जिवंत असल्यास) बहिणीला,हीरोनं लग्न केलं असल्यास त्याच्या बायकोला आणि नसल्यास प्रेयसीला शिवाय (झालं असल्यास) मुलालाही असतील तिथून गोळा करून आणतो.. हिरोला बाप कधीही नसतो.. त्यामुळे तेव्हढं एक काम कमी होतं.. मग हां खलपुरूष बिल्ला सगळ्यांना खांबाना बांधतो.. योग्य वेळेला पेश करण्यासाठी..!! जुन्या मिल मधे असंख्य ड्रम्स गडगडवून प्रचंड चोपाचोपी झाल्यावर जेव्हा हीरोच्या हातात बंदूक येते.. तेव्हा "बाजी" उलटवण्यासाठी ही अरेंजमेंट आधीच करून ठेवलेली असते.. प्लानिंग अहेड इज द इसेन्स.. "ज़रा एक नजर अपने पीछे डालो..और चुपचाप हथियार फेंक दो.." पलटली ना बाजी?? मग कर्तबगार व्हिलन हीरोला ही त्याच लायनीत बांधून त्याच्या आयटेमला (हीरोईनला) आयटेम सॉंग वर सर्वांसमोर नाचवतो सुद्धा.. शेवटी कुत्रा, कबूतर, हत्ती किंवा जोनी लिव्हर वगैरे येऊन सगळ्यांची सुटका करेपर्यंत नाच चालू राहतो.. ...........
लेखनविषय:

वाचने 25307
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by फारएन्ड

>>बाकी एकदा ते लॉकेट चे चेक करूच तुमचा नंबर नंतर. ते आधी नाना ननि तिथ निशाण घेवून उभारलेत. त्यांच लॉकेट चेक करायची वेळ आहे ही. करण-अर्जून चांगला रंगला आहे. त्यात तुम्ही मध्ये धरम-वीर कार्यक्रम ठेवू नका. एकावेळी एक कुस्ती नीट बघू यात. वाईस फुटाण तोंडात टाकून त्या कुस्तीची निकाल लागू पर्यंत मजा बघा दोघबी. मग तुमाला बी आखाड्यात सोडणार हायच आमी!

काय पण जमाना होता तो .. क्लास शिनुमाचा . . काय पन नट / नट्या . . काय ते फायटींग .. काय तो डॅन्स. . क्वलीटी होती त्या जमाण्यात .. नायतर आजकाल स्वदेस, तारे जमीन पर , ३ इडीयट असले फालतु पिक्चर काडतात राव. नो फायटिंग ?? आमचा आवडता पिक्चुर : पाप को जलाकर राख कर दुंगा

In reply to by सुक्या

खरं आहे. असे चित्रपट आता बनणे नाही.;) काय ती नावं, काय ते कपडे. आजकालचे हिरो, हिरवीनी उगीच घाम गाळून फिगरा टिकवताना दिसतात. अमिताभचे नाव विजय एवढेच मी ऐकले आहे. अंधळ्या नाहीतर आजारी माँ कितीतरी असायच्या. आजकालच्या मॉडर्न माँमध्ये काही अर्थ नाही राहिला.

दुसरा पंच्याण्णव टक्के भाग आवडला. हिरोहिरविनींनी गाणी म्हणून झाल्यावर व्हिलनच्या डेनमध्ये घुसून सगळ्यांनी यडपटपणाचे उद्योग करणे अशा सिनेमांच्या आठवणींशी बहुतेकांना एकरूप होता येतं. पण आधीचं पाच टक्क्याचं 'कुठे गेले ते माझे लाडके सिनेमे..??' हे तत्वचिंतन ओढून ताणून आणल्यासारखं वाटलं. आपण आपल्या सिने-संस्कृतीतून भंपकपणा हरवतोय असं म्हणणं ठीक आहे, पण त्याची जागा घ्यायला दुसरं काहीच नाही असं म्हणणं बरोबर वाटत नाही. ते खरं असतं तर एव्हाना दबंगपणा वगैरे गोष्टी संपून गेल्या असत्या कारण प्रत्येक पिढीतले गगनविहारी, फारएन्ड हेच म्हणत आलेले आहेत. कदाचित काही वर्षांपूर्वी व्हिलनांनी मसाज करून घेत, दारू पीत जगावर ताबा मिळवण्याच्या गमजा करायला सुरूवात केली असेल तेव्हासुद्धा त्यांच्या वेळच्या गगनविहारी, फारएन्ड नी 'आमच्या काळी व्हिलन सूटबूट घालून प्राणप्रमाणे मंगेतर असायचे व कायम मंगेतर रहायचे, ते आता आपण हरवत चाललो आहोत' अशी बोंब मारली असेल. (हे माझ्याच एका प्रतिसादाचं विडंबन आहे, तेव्हा मीच स्वतःला ते व्यक्तिगत घेऊ नये, विचारांचं विडंबन आहे असं सांगतो)

In reply to by राजेश घासकडवी

प्रतिसादाचा पहिला पंच्याण्णव टक्के भाग आवडला. पटला असेहि म्हणता येईल. >>(हे माझ्याच एका प्रतिसादाचं विडंबन आहे, तेव्हा मीच स्वतःला ते व्यक्तिगत घेऊ नये, विचारांचं विडंबन आहे असं सांगतो) शेवटचा ५ टक्के भागासाठी शब्द, आणि स्मायली दोन्हीही नाहीत.

In reply to by शिल्पा ब

तुमचा प्रश्न १०० टक्के समजला नाही, १० टक्के जरी समजला असता तरी मी उत्तर देण्याचा ९९ टक्के विचार केला असता.

अहो..तुम्ही फारच सीरियसली घेताय.तत्वचिंतन वगैरे कसलं आलंय हो यात? पिव्वर भंकस आहे ही. आणि त्या त्या पिढीतले गगनविहारी,फ़ारएंड..? अरे बापरे.मी काही समीक्षक वगैरे नाही हो. तुमचं शेवटचं वाक्य (विडंबन related) डोक्यावरुन गेलंय.सॉरी. मी यापूर्वी मिपा अगदी कमी वाचलंय आणि त्यामुळे पूर्वी इथे घडलेल्या गोष्टींचा कसलाच संदर्भ माझ्या पोस्ट्मधे नाही. Thanks a lot for comment..

In reply to by गवि

जाउ देत तुम्ही मनावर नका घेऊ. गुर्जींनी सध्या सगळ्या नॉस्टॅल्जिक गोष्टींविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्यातले विडंबन कुठले आणि सत्य कुठले ते बर्‍याच लोकांना कळत नाही. (मला तरी कुठे कळाले आहे). पण मला तरी वाटते हा वार तुमच्यावर नव्हता. हो ना गुर्जी?

In reply to by मृत्युन्जय

नॉस्टॅल्जिक गोष्टींविषयी आघाडी वगैरे नाही. (माझा जुनं घर वरचा प्रतिसाद वाचा) जुनं ते सोनं हे चूक म्हणत नाही. पण सगळ सोनं जाऊन आता फक्त दगड उरले आहेत हे मला सरसकट पटत नाही इतकंच. बाकी या लेखात त्याच्या बरोब्बर विरुद्ध 'जुना यडपटपणा आता नाही राहिला' असं मांडलेलं असल्यामुळे मी 'नाही बरं का, यडपटपणा अजून जिवंत आहे' असं म्हणण्यासाठी विडंबन वापरलं, इतकंच. गविंनी तो प्रतिसाद मनावर घेऊ नये. लेख छानच झाला आहे.

कांती शाहचा गुंडा पाहीला की नाही तुम्ही? संपुर्ण चित्रपटात लोकं एअरपोर्ट वर एखाद्या मॉल मधे फिरावं इतक्या सहजपणे फिरतात... आजही मित्रांच्या कोंडाळ्यात बसुन सुरापान करताना हा चित्रपट लावला जातो आणी हसून हसून मुरकुंडी वळते... कुठेशी वाचलं होत की गुंडा हा जालावर सर्वात जास्त चर्चिला जाणारा चित्रपट आहे... :-) हा एक नमुना.... http://www.youtube.com/watch?v=czt_Eroo_bs

फुल्टू खेचाखेची बर्र का गगनविहारी! ;) रंगविहारी

चिरफाड, लक्तरे इ.इ. धागा वर काढत आहे.

हे रत्न सुटले होते , आज सपडले :)

असले टिपिकल सिनेमे लहानपणी दूरदर्शनवर शनीवारी रात्री लागायचे. ते आठवून हसू आले. त्याहीपेक्षा तुम्ही जे लिहीलेत ना गवि तसले टिपिकल प्रसंग आठवून खूप हसू आले. खूप छान लिहीलय. हे रत्न दाखवल्याबद्दल कपिलमुनी तुमचेही आभार. लेख जुना दिसतोय पण तुमच्या अभिप्रायामुळे धागा वर आला.