.............................
आत्ताचे जवळ जवळ सगळे सिनेमे खूप सेन्सिबल असतात..मजा नाही येत..
कुठे गेले ते माझे लाडके सिनेमे..??
ज्यामधले नायक आणि खलनायक खूप नियम आणि पथ्यं पाळतात..
१) हीरो किंवा हिरोईन... टेप,सी.डी. किंवा लपून काढलेले फोटो असा जो काही कलियुगातील सर्व दुष्टतेविरुद्ध पुरावा असेल तो क्रूरकर्मा खलनायकांच्या मधोमध उभे राहून उंच करून दाखवतात आणि "ललकारतात" की "तेरे दिन भर गए है राका!! (किंवा प्रलयनाथ.. किंवा ठकराल..!!)..मैंने तेरी सारी बातें इस टेप में रिकॉर्ड कर ली है.. अब इस सबूत के जरिये में तुझे फांसी के तख्ते तक पहुन्चाके रहूँगा..में अभी ये टेप पुलीस के हवाले करने जा रहा हूँ..!!"
२) राखी टाईप कोणीतरी आई मरता मरता आपल्या भावी "मेन हीरो" मुलाला एकदम लास्ट्च्या क्षणी एक माहिती सांगते.. ज्या लोकांनी तिला मारले आणि एकूण त्यांचं खानदान "तबाह" करण्यासाठी जे जे वाईट करता येईल ते केलं..(उदा. वडिलांचा खून..बहिणीवर बलात्कार..अर्थातच बहिणीची consequent आत्महत्या..आईला विष चारणे..वगैरे) त्या लोकांची नावं आहेत बिल्ला आणि नाग..
ढँग... !!!
आता बस बोंबलत शोधत कोण बिल्ला आणि नाग आहेत त्यांना..आडनाव आणि साधारण पत्ता तरी सांगितला असतां आयशीनं तर ..??
म्हणजे बुवा कुर्ला वेस्ट, कोपरखैरणे, रबाळे... असा निदान एरिया तरी सांगायचा..
पण नाही.. शोध मेल्या..
३) नुकताच बलात्कार झालेली तरुणी (हिरोइन नव्हे बरं का.. हीरोची बहीण..) .. हिला क्रूरकर्मा शक्ति कपूर ने जिवंत सोडलं आहे आणि तो बिचारा कर्तव्य करून निघून चालला आहे.... पण तिथल्यातिथे ती त्याला ऐकवतेय की में तेरा ये काला चेहरा समाज के सामने लाकर रहूंगी.. किंवा तेरी शराफत का पर्दाफाश करूंगी..!!"
मग तो परत फिरतो..
मरते बिचारी...!! नाहीतरी निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकाच्या मनातून तिला मारायचंच असतं काहीतरी करून..
४) लहान मुलगा.. "मास्टर बंटी" छाप..अत्यंत इनोसंट.. पण अत्यंत अडचणीचे आणि मुद्द्याचे प्रश्न विचारतो..
उदा..मम्मी मम्मी.. क्या येही मेरे पापा है?
किंवा.. मम्मी मम्मी ... पापा हमारे साथ क्यूँ नही रहते ..??
किंवा.. पापा पापा.. क्या हम आंटी को मेरी मम्मी बना सकते हैं ?? (हा फायद्याचा प्रश्न आहे बापाच्या दृष्टीने..)
५) खलनायक हा अत्यंत कष्टपूर्वक जास्तीत जास्त वाईट गोष्टी एकाच वेळी करत असतो.
मुळात तो दारू पीत आणि दोन उन्हाळी कपडे घातलेल्या बायकांकडून मालिश करून घेत आणि शक्य झाल्यास कैबरे बघत बसलेला असतो..
मग त्याचे भयंकर साथीदार येतात..मीटिंग होते..
मीटींगची सुरुवात एखाद्या गद्दाराला गोळी घालून होते..
मग एकूण मिनिट्स ऑफ़ मीटिंग वरून आपल्याला कळतं की त्यांचा सरहद्पार कडून ड्रग्स, हत्यारं आणि जाली नोटा आणण्याचा व्यवसाय असतो..
नुसते चार पैसे कमावायाचे असा क्षुद्र उद्देश न ठेवता सामाजिक बांधिलकीतून हे ड्रग्स तरुण पिढीला स्वस्तात उपलब्ध करून देणं..मग तरूण पिढी तबाह झाल्यावर आणि "जाली" नोटांमुळे देश "खोखला" झाल्यावर "हथियारां" च्या वापरानं त्याच्यावर "राज" करणं अशा महत्वाकांक्षी योजना ते राबवत असतात..
आन्त्रप्रिनरशिप म्हणतात ती हीच ना..?
खलपुरुषांची एक अत्यंत मोहक सवय म्हणजे आपली सर्व कुटील कारस्थानं दारु पीत पीत आपापसात डिस्कस करणं..वाह..
पुत्र : पापा आपकी रोनेकी एक्टिंग को तो दाद देनी पड़ेगी..
पिता : हाँ बेटा..यह सब मैंने ही किया..मैंनेही चमेली को राजा के पास भेजा.. मैनेही राजा के दूध में नशे की दवाई मिलाई..और वो फोटोग्राफ्स भी मैंने ही छुपकर ली थी..
पुत्र : वा पापा.. दो प्रेमियों के बीच शक और नफ़रत का जहर भरने का आप का आयडिया कमाल का है..
पिता : अब किरण राजा के मुँह पे थूकेगी भी नही..वो तुझे मिल जायेगी..और उसके साथ उसके बाप का पैसा भी.. इसे कहते है एक तीर में दो पंछी..उसके बाप के साथ मेरा पुराना हिसाब भी चुकता हो जायेगा..मैंने जब किरन की माँ का खून किया था तब उसीने मेरे खिलाफ गवाही दी थी..
झालं.. दारामागून लपून ऐकणाय्रा व्यक्तीच्या हातून ग्लास खाली पडलाच पाहिजे..
आणि कोणी टेपरेकोर्डर घेऊन आलंच असेल तर पुरावा ही "दर्ज" झाला..
हाच खलपुरूष लास्ट्च्या मारामारीआधी कित्ती जमवाजमव करतो..
मुळात हीरोला अंगावर ओरखडाही पङता काच खळ्ळकन फोडून आत एंट्री मिळावी म्हणून खर्च करून एक काच बसवून घेतो हलकीशी ठिसूळशी..
मग तो हिरोच्या आईला, (जिवंत असल्यास) बहिणीला,हीरोनं लग्न केलं असल्यास त्याच्या बायकोला आणि नसल्यास प्रेयसीला शिवाय (झालं असल्यास) मुलालाही असतील तिथून गोळा करून आणतो.. हिरोला बाप कधीही नसतो.. त्यामुळे तेव्हढं एक काम कमी होतं..
मग हां खलपुरूष बिल्ला सगळ्यांना खांबाना बांधतो.. योग्य वेळेला पेश करण्यासाठी..!!
जुन्या मिल मधे असंख्य ड्रम्स गडगडवून प्रचंड चोपाचोपी झाल्यावर जेव्हा हीरोच्या हातात बंदूक येते.. तेव्हा "बाजी" उलटवण्यासाठी ही अरेंजमेंट आधीच करून ठेवलेली असते.. प्लानिंग अहेड इज द इसेन्स..
"ज़रा एक नजर अपने पीछे डालो..और चुपचाप हथियार फेंक दो.."
पलटली ना बाजी??
मग कर्तबगार व्हिलन हीरोला ही त्याच लायनीत बांधून त्याच्या आयटेमला (हीरोईनला) आयटेम सॉंग वर सर्वांसमोर नाचवतो सुद्धा..
शेवटी कुत्रा, कबूतर, हत्ती किंवा जोनी लिव्हर वगैरे येऊन सगळ्यांची सुटका करेपर्यंत नाच चालू राहतो..
...........
| लेखनविषय: |
|---|
याद्या
25281
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं....................
बारामतीकरच
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.................... by धमाल मुलगा
ह्म्म...
In reply to बारामतीकरच by श्रावण मोडक
बरा
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
अहोऽऽ
In reply to बरा by श्रावण मोडक
हाण
In reply to अहोऽऽ by धमाल मुलगा
साऽऽरं काही सापेक्ष आहे. अगदी
In reply to हाण by श्रावण मोडक
सापेक्ष
In reply to साऽऽरं काही सापेक्ष आहे. अगदी by धमाल मुलगा
धमालराव पेटलेत या धाग्यावर.
In reply to साऽऽरं काही सापेक्ष आहे. अगदी by धमाल मुलगा
:)
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
आवरा
In reply to बारामतीकरच by श्रावण मोडक
धम्या तुला पाय दिले ...
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.................... by धमाल मुलगा
जयपूर फुट लावून. स्वस्त आणि
In reply to धम्या तुला पाय दिले ... by सूड
अहो ते गगनविहारी आहेत! आपण
In reply to जयपूर फुट लावून. स्वस्त आणि by रन्गराव
आयला, ध्यानातच नाय आल की!
In reply to अहो ते गगनविहारी आहेत! आपण by स्पंदना
+१. असेच म्हणतो. लई म्हन्जे
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.................... by धमाल मुलगा
हा हा
पोलीस येण्यापूर्वी
In reply to हा हा by चिरोटा
नाही मित्रा..
खरंय देवा...
In reply to नाही मित्रा.. by गवि
हलकट!
In reply to खरंय देवा... by धमाल मुलगा
अहो हलकट म्हणण्यासारखं काय
In reply to हलकट! by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही हो, तुम्ही नाही!
In reply to अहो हलकट म्हणण्यासारखं काय by गवि
galat fehmi...hmmm.
In reply to नाही हो, तुम्ही नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते मी धम्याला हलकट म्हटलं ...
In reply to नाही हो, तुम्ही नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
दंडवत! ते आमचे फारएन्ड तुमचे
ते बिछडे भाई आहेत का
In reply to दंडवत! ते आमचे फारएन्ड तुमचे by बिपिन कार्यकर्ते
एकदम दणका उत्तर मालक....
In reply to ते बिछडे भाई आहेत का by गवि
असु द्यात ...
In reply to एकदम दणका उत्तर मालक.... by बिपिन कार्यकर्ते
जनरली..
In reply to असु द्यात ... by छोटा डॉन
असं काही नाही ... म्हणजे
In reply to जनरली.. by गवि
लाकेट किंवा दंडावरचं/पाठीवरचं
In reply to ते बिछडे भाई आहेत का by गवि
त्यापेक्षा गाणं म्हणून बघा...
In reply to ते बिछडे भाई आहेत का by गवि
kasam paida karne waale
In reply to त्यापेक्षा गाणं म्हणून बघा... by एक
फारएण्डला एकदम कांपिटीसन का?
ते कायपन असो ...
तामिळनाडु मधे
In reply to ते कायपन असो ... by छोटा डॉन
हाच्च हाच्च्च डायलॉग स्साऽर्र!
In reply to तामिळनाडु मधे by गवि
त्यातल्या आंड्वन च्या वेळी
In reply to तामिळनाडु मधे by गवि
अर्रे देवा !! देवासाठी तिकडे
In reply to त्यातल्या आंड्वन च्या वेळी by गवि
अरे गपा रेऽऽ.....
In reply to अर्रे देवा !! देवासाठी तिकडे by सूड
ऐला आम्ही तर रजनीचे शिनेमे
In reply to तामिळनाडु मधे by गवि
अरे कर्माऽऽ....
In reply to ते कायपन असो ... by छोटा डॉन
-१
In reply to अरे कर्माऽऽ.... by धमाल मुलगा
क्वोश्चन आहे!
In reply to -१ by छोटा डॉन
हे राम !!!
In reply to क्वोश्चन आहे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला
In reply to हे राम !!! by छोटा डॉन
जबरा !
एकाच वेळेस दहा जुने सिनेमे
मस्त एक्दम
ओ गगन्दा! ऑ काय विचार आहे का
एकदम छान, मजेशीर लेखन आहे. हे
तुझ्या कानात सांगते ऐक!
In reply to एकदम छान, मजेशीर लेखन आहे. हे by रेवती
अग्ग्ग्ग्ग्ग्गं..........
In reply to तुझ्या कानात सांगते ऐक! by स्पंदना
हा हा हा! मस्त! खरा वैताग आला
In reply to तुझ्या कानात सांगते ऐक! by स्पंदना
मस्तच..
गवि शोल्लेट एक्दम......
आयचा घो !!
भारी...अर्धवटराव...भारी..!
In reply to आयचा घो !! by अर्धवटराव
मर्द...
In reply to आयचा घो !! by अर्धवटराव
खलनायकापुढे नाचायला हिरविनीला
>> खलनायकापुढे नाचायला
In reply to खलनायकापुढे नाचायला हिरविनीला by मराठे
अहो ती हिरवीन तयार होइल हो पण
In reply to >> खलनायकापुढे नाचायला by नगरीनिरंजन
(विषय दिलेला नाही)
In reply to खलनायकापुढे नाचायला हिरविनीला by मराठे
ह.ह.पु.वा झाली बुवा.....
अग्गाऐइग. वाट लावलीय पार. हे
हिरॉईनशी क्वचित..हिरोच्या
In reply to अग्गाऐइग. वाट लावलीय पार. हे by मृत्युन्जय
ही ही ही...मस्त.. मला एकदम
मिथुन गोइंदा
जबरी!
जरा थांबा
In reply to जबरी! by फारएन्ड
काय पण जमाना होता तो .. क्लास
खरं आहे. असे चित्रपट आता बनणे
In reply to काय पण जमाना होता तो .. क्लास by सुक्या
भन्नाट लेख...
प्रतिसादाचा पहिला पंच्याण्णव
In reply to भन्नाट लेख... by राजेश घासकडवी
तुम्ही ही टक्केवारी कशी
In reply to प्रतिसादाचा पहिला पंच्याण्णव by गांधीवादी
तुमचा प्रश्न १०० टक्के समजला
In reply to तुम्ही ही टक्केवारी कशी by शिल्पा ब
अहो..तुम्ही फारच सीरियसली
जाउ देत तुम्ही मनावर नका घेऊ.
In reply to अहो..तुम्ही फारच सीरियसली by गवि
गैरसमज
In reply to जाउ देत तुम्ही मनावर नका घेऊ. by मृत्युन्जय
गुर्जी काय लिहीतात हे
In reply to गैरसमज by राजेश घासकडवी
गुर्जी..
In reply to गुर्जी काय लिहीतात हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
कांती शाहचा गुंडा पाहीला की
हे हे हे हे हे!!
उत्खनन.
धन्यवाद स्वप्नज......
हे रत्न
मस्तच गवि. व कपिलमुनी