Skip to main content

अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा...

अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा...

Published on 25/12/2014 - 10:28 प्रकाशित मुखपृष्ठ
खुप दिवसांपासुन अनाहीतांनी कट्टा करायचे ठरवले होते, सगळ्यांच्या वेळा जुळवुन २१ डीसेंबरला ठरले. अनाहीता म्हणजे झाशीच्या राण्या काही अनाहीता म्हणजे त्रिवेणी, मितान आणि मिता पुण्याहुन येणार होत्या अन मी ही जरा लांबुनच येणार होते बाकीच्या मुंबईतल्याच होत्या. घोडबंदर रोडवरच्या आर मॉलमध्यल्या व्हिलेज सोल ऑफ इंडिया मध्ये १२.३० वाजता प्रवेश मिळत असल्याने सर्वांनी दुपारी १२ वाजता मॉल मधे जमुन एकत्रच प्रवेश करायचे ठरले. सानिका स्वप्निल , सविता, स्नेहांकीता, अजया, मितान, त्रिवेणी, मिता, हेमा, उमा, सुर, कस्तुरी, स्वप्नांची राणी आणि मी अशा सर्व जणी तयारीला लागलो. अखेर कट्ट्याचा दिवस उजाडला, पुणे झाशीच्या अनाहीता सकाळी ७.३० वाजता पुण्याहुन निघाल्या मी ही लांबच राहत असल्याने लवकर निघाले. आणि एकेक करुन १२.३० पर्यंत आर मॉल मधे जमलो. पहिल्यांदाच भेटत असलो तरीही अनाहीता अनोळखी वाटत नाहीत हेच खरं, एकेकींना सर्वांनी लांबुनच ओळखले आणि इतकं छान वातावरण निर्माण झालं की लहानपणापासुन एकत्रच राहीलोत असंच वाटु लागलं. सुर तिच्या दोन छोट्या गोड बाहुल्यांना घेउन आली होती. उमा , हेमा, आणि कस्तुरी यांना थोडा वेळ लागणार होता म्हणुन बाकी सर्वांनी एकत्रच प्रवेश केला. "विलेज" ची थीम मस्त होती , अजयाने आधीच टेबल बुक करुन ठेवलं होतं पाहीलं तर ती जेल ची थीम होती आम्हाला सर्वांना बराक मधे ठेवण्यात आले होते. मग पुन्हा ओळख परेड झाली, सानिका स्वप्निल आणि स्वप्नांची राणी यांनी सर्वांसाठी चॉकलेट्स आणली होती तर त्रिवेणीने सर्वांसाठी खास खानदेशी मसाला आणला होता. सर्वांनी उठुन पेटपुजा करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी पाणीपुरी राउंड झाला, मग सर्व थोडं थोडं करुन सर्व पदार्थ चाखायला सुरुवात केली. त्यावेळात कस्तुरी, उमा यांनी प्रवेश केला. पाणीपुरी, रगडा पॅटीस, वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या, १०-१२ प्रकारचे सॅलेडस् , पापड, दाल बाटी चुरमा, पाव भाजी, डोसे, गरमागरम जिलेबी, गुलाब जामुन, खीर, बिर्यानी, पनीरची भाजी, पालक, छोले, आंबट गोड कढी, वालपापडीची भाजी, चायनीज असे विविध पदार्थांची चव चाखल्यावर आम्ही डान्स फ्लोअरवर गेलो. डान्सफ्लोअरवर आधी संगीत खुर्ची ला सुरुवात झाली, तिथे ही अनाहीता रॉक्स, त्रिवेणी अन मिता ह्यांनी भाग घेतला होता आणि बाकीची आलेली मंडळी असा गेम सुरु झाला आणि आपल्या त्रिवेणीने अनाहीतांच्या जीत चा झंडा गाडला. लव यु त्रिवेणी.. त्यानंतर मिक्स डान्स ला सुरुवात झाली .तितक्यात हेमा तिच्या मुलाला घेउन आली. थोडा वेळ बराक मधे गेली तोवर आम्ही डान्स फ्लोअर वर थिरकायला सुरुवात केली होती. सर्वात आधी फनी संता बंता डान्स झाला आणि अनाहीतांनी नाचायला सुरुवात केली , धम्माल धम्माल केली नुसती , नंतर राजस्थानी डान्स सुरु झाला आणि अनाहीता हेमा ने तर कमालच केली , अतिशय सुंदर राजस्थानी डान्स केला, अश्या गिरक्या घेत होती की हेमा राजस्थान मधेच जन्माला आलीये का अशी शंका आली मला, आजुबाजुची दुसरी मंडळी ही कौतुकाने पाहु लागली. दुसर्‍या बर्‍याच मंडळींनीही राजस्थानी नाचात भाग घेतला, नंतर गरबा सुरु झाला तिथेही आपल्या अनाहीता पुढे, मग डी. जे. डान्स, त्यात ही अनाहीता रॉक्स, हेमा ने तर "रायता फैला दिया यार" काय नाचलीये, अगदी प्रोफेशनल सारखी, तिचे हावभाव आणि तिचा नाच अगदी एखादा रीयॅलीटी शो पाहतोय असं वाटत होतं. त्यादरम्यान थोडा वेळ सविता, स्नेहांकीता, मितान, सुर बक अप करत होत्या, थोडा वेळ त्या सुर च्या पिल्लु शी खेळल्या नंतर बराक मधे परत गेल्या कारण सर्व अनाहीतांचे सामान तिथेच होते म्हणुन तिथे कुणाला तरी बसणे आवश्यक होते. मग त्यांनी छान गप्पांचा फड जमवला. ऑफीस, काउन्स्लिंग , ध्यानधारणा आरोग्य, मिपाकर्स, अनाहीता अशा विषयावर न थकता गपा रंगल्या. नाचता नाचता ३ कधी वाचले हे कळलंच नाही, ३.३० वाजता विलेज बंद होणार असल्याने पुन्हा खादाडीसाठी पळालो. नंतर आईसक्रीम खाल्लं थोड्या वेळाने चहा घेतला. पुन्हा गप्पा टप्पा, बर्‍याच अनाहीतांना पाहुन त्यांना मोठी मुलं आहेत हे वाटत नव्हतं, मलाही कॉम्प्लीमेंटस् मिळाल्या की माझ्या पदयात्रेच्या धाग्यावरुन मी वयाने मोठी असेन असं सर्वांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात तसं नाहीये. थोड्या गप्पा झाल्या. सर्व अनाहीता खुपच साध्या आणि दिलाच्या सच्च्या वाटल्या , कुठेही अ‍ॅटिट्युड हा प्रकार जाणवला नाही , कुठेही आत एक आणि बाहेर एक असं जाणवलं नाही, कुठेही कुणाची बरोबरी , हिणवणे हा प्रकार जाणवला नाही आणि हीच तर खरी अनाहीतांची खासियत आहे, अनाहीता बरोबर मनाच्या सौंदर्य हुडकुन काढतात, बाहेरच्या थाटाकडे अनाहीताला काहीच ओढ नाही. शेवटी काय तर अनाहीता रॉक्स !!!!!!!!!!!!!!!!!!! शेवटी ग्रुप फोटोजचा कार्यक्रम झाला, ३.३० वाजले आणि आम्ही 'विलेज' च्या बाहेर पडलो तरीही मॉल मध्येच होतो, सर्व जणी इथे तिथे विखुरल्या, जड मनाने सर्वांचा निरोप घेतला आणि परतलो.
लेखनप्रकार

याद्या 17465
प्रतिक्रिया 117

आवडला... "सर्व अनाहीता खुपच साध्या आणि दिलाच्या सच्च्या वाटल्या , कुठेही अ‍ॅटिट्युड हा प्रकार जाणवला नाही , कुठेही आत एक आणि बाहेर एक असं जाणवलं नाही, कुठेही कुणाची बरोबरी , हिणवणे हा प्रकार जाणवला नाही आणि हीच तर खरी अनाहीतांची खासियत आहे, अनाहीता बरोबर मनाच्या सौंदर्य हुडकुन काढतात, बाहेरच्या थाटाकडे अनाहीताला काहीच ओढ नाही. शेवटी काय तर अनाहीता रॉक्स !!!!!!!!!!!!!!!!!!!" हे वाक्य आवडले....

पाणीपुरी, रगडा पॅटीस, वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या, १०-१२ प्रकारचे सॅलेडस् , पापड, दाल बाटी चुरमा, पाव भाजी, डोसे, गरमागरम जिलेबी, गुलाब जामुन, खीर, बिर्यानी, पनीरची भाजी, पालक, छोले, आंबट गोड कढी, वालपापडीची भाजी, चायनीज,चॉकलेट्स अरे अरे किती हे अत्याचार तोंडाला पाणी सुटून सुटून आता कोरडे पडले.

वृत्तांत बोले तो--- झक्कास. खरच खूप मज्जा आली. कित्ती जणींना पहिल्यांदा भेटतोय असं जाणवलं सुद्धा नाही. धन्स गं मैतरणींनो... :)

रॉकिंग कट्टा!!! डान्स बिन्स केलात राव तुम्ही!!!!. whatsapp वर अप्डेट्स वाचताना प्रत्यक्ष तिथेच असल्यासारख वाटल. फक्त हेमी चा डान्स मिसला राव!! हेमे अजुन एक कट्टा करुयात ग.

कविता... छान लिहिलंय गं. अनाहिता कट्टा म्हणजे माझ्यासाठी कम्फर्ट झोन ठरला. खरंतर एकाच आठवड्यानंतर पुणे कट्टा आहे तरीही त्रिवेणी, मितान, मीता यांनी आवर्जून, तेही सगळ्यात आधी, ठाणे कट्ट्याला हजेरी लावली याचं मला खूप खूप कौतुक वाटलं. स्नेहांकीताताई तर ठाणे कट्ट्यासाठी आदल्या दिवसापासून आल्या होत्या. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, उत्साह, आनंद याचा खळाळता झरा आहेत या अनाहिता. त्रिवेणी, जिंकलस जिंकलस जिंकलस! अगं काय तुझा फिटनेस, काय उत्साह, कसली स्मार्ट आहेस तू! हेमी, गं माझी गोडुली! हेमीचा नाच तर डोळ्याचं पारणं फेडणारा होताच (एकदम माधुरी स्टैल) पण त्याहीपेक्षा मला आवडला हेमीचा चेहरा... लहान, निरागस पण तरीही खट्याळ मुलीचे भाव दिसतात तिच्या चेहऱ्यावर... तस्शीच आहे ती. सानिका, अजया, सविता, स्वरा, कस्तुरी, कविता, सूर … मला खरंच वाटत नाहीये की, मी तुम्हाला प्रत्यक्ष असं पहिल्यांदा भेटले. जणूकाही आपण लहानपणी एकत्र भातुकली खेळलोय अशा भेटलात तुम्ही मला. वेळ कमी पडला, त्यामुळे गप्पा आवरत्या घ्याव्या लागल्या. विलेज वाल्यांनी लावलेली गाणी कमी पडली (ती कितीही लावली असती तरी कमीच पडली असती) त्यामुळे नाचणं अंमळ कमीच झालं. खाणं उठून जावून घ्यावं लागत होतं, ते विलेज वाल्यांनी आम्हाला बसल्या जागी आणून वाढलं असतं तर आम्ही मौल्यवान, अति महत्वाचं गॉसिप नसतं का केलं? (म्हणजे अजून जास्त गॉसिप नसतं का केलं?) नाचणं, हसणं, गप्पा... सगळं सगळं कम्मीच पडलं!

वा... छान ! इथे मी सहकुटुंब जाउन आलो आहे. :) ज्या ठिकाणी हा आरमॉल आहे तिथे फार पूर्वी टाटा कंपनीचे ट्रक्स / बस आणि इतर व्हेइकल यांचा मेंटेनन्स करण्याचा मोठा प्लांट होता... या मॉल समोर लॉकिम कंपनी आहे {म्हणजे ती आता बंद झाली आहे म्हणा} हा भाग विकसीत झाला ते आयुक्त टी.चंद्रशेखर यांच्या प्रयत्नांमुळेच. ज्या हायवे नी तुम्ही या मॉल आला असाला तो हायवे एकेकाळी इतका अरुंद होता की २ ट्रक मोठ्या मुश्कीलीने जात असत... :) बादवे ... फोटो कुठे आहेत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

मस्त कट्टा आणि त्याचे वर्णन ! लैच धमाल केलीत की ! आणि त्यादिवशी डाएट विसरून हादडण्यात आले हे स्पष्ट आहे ! फोटो नाहीत... टाकलेच तर एक इनोच्या बाटलीचाही टाकावा :)

कट्टा मस्त झाला ना!मज्जा मज्जा केलीत.छानच वृत्तांत कविता.

In reply to by टवाळ कार्टा

तुम्हाला समज्लेच नै
हेच म्हणतो. अजयातै, आम्ही टवाळ कार्टयाच्या मवाळ प्रतिसादाला हसत होतो.

In reply to by सतिश गावडे

आम्हाला सर्कस पाहायला मिळाली ना,मग जौ दे ^_~ टका,तुला घेत नाहीत कंपुत? रडु नको,विनोदाने घे!आपण त्यांचं घर उन्हात बांधु हां :)

In reply to by अजया

जरा थोडा आराम करा...खा प्या...मग नवीन सुध्धा सुचेल काही...या वयात असे एकच गोष्ट घेउन त्याबद्दलच बोलत बसणे होत असेल तुमचे :P

In reply to by टवाळ कार्टा

तेच म्हणणार होते तुला,जा आता घरी,सगळीकडे मुलगी बघा हो करत हिंडण्यापेक्षा बरं की नाही.आम्हाला बराय हा विरंगुळा या वयात!

In reply to by अजया

हे बघा http://www.misalpav.com/comment/643864#comment-643864 त्यामुळे मुविंनी लिहिलेले माझ्या बाबतीत तरी खरे झाल्यासारखे वाटतेय http://www.misalpav.com/comment/643764#comment-643764

In reply to by टवाळ कार्टा

बाकी म्हैला कितीही तोंडघाशी पडल्या तरी हार मान्य करत नाहीत त्यामुळे आता मीच कंटाळलोय...बसा तुम्हीच अनाहिता अनाहिता खेळत

In reply to by टवाळ कार्टा

हेच सांगतोय आम्ही तर तुम्ही झाकली मुठ आहे माझ्याजवळ म्हणुन बोलायलात. मग कश्या देणार कुणी तुम्हाला मुली?

कट्टाच ईतका मस्त झाला त्यामुळे वर्णनही त्याप्रमाणेच झालय.

धम्माल केलीत! वृत्तांतही मस्त लिहिलाय कविता, अगदी तिथे प्रत्यक्ष असल्यासारखंच वाटलं. अवांतरः ट.का. साठी इतक्या अनाहिता एकत्र जमतात. बघ, तुला एक सासू शोधून द्यायला काही अवघड नाही आम्हाला! =))

In reply to by टवाळ कार्टा

वरचा प्रतिसाद उत्तर हाय रे बाळा. तुज्या अपेक्षा बोलल्यावरच तुला रिजेक्षन मारतेत पोरी. सुधर की आतातरी. :P

In reply to by पैसा

एकुलती एक मुलगी असली पाहिजे...स्वताचा ३ बेडरूमचा फ्लॅट मुंबैमधे (उपनगर नाही)...घरकामांसाठी नोकर असलेच पाहिजेत...कमीत कमी २ चारचाक्या आणि घरजावई करून घ्यायची तयारी असली पाहिजे... हे सगळे असेल तर विचार करून कळवेन ;)

मस्त वृत्तांत लिहिला आहेस कविता.फार आवडला.या कट्टयाला बर्याच नविन अनाहिता भेटल्या.मजा आली तुम्हा सर्वाना भेटुन.लोवे योऊ अनाहिताज!

चांगला वृतांत एखादा कॉमन फोटो टाकला असता तरी चाललं असतं, असं वाटलं. अनाहिता बरोबर मुख्य बोर्डावरही सर्वच विषय जोमदारपणे लिहू वगैरे अशी काही चर्चा झाली का ? -दिलीप बिरुटे

वा! मस्त वॄत्तांत. कटट्याच्या वॄत्तांतावरूनच कट्टा किती रॉकिंग झाला असेल याची कल्पना येतेय. खादाडी, डान्स, आईसक्रीम तसेच वेगवेगळ्या विषयावरील चर्चा या सर्वच गोष्टींनी कट्टा परिपूर्ण झाला. अनाहितांना रोजच्या धावपळीच्या जीवनातून असा मनमोकळा वेळ मिळणे फार कठीण असते. त्यामूळे या कट्ट्याचे महत्व वेगळेच आहे. आतापर्यंत झालेल्या किंवा माझ्या तरी वाचनात आलेल्या सर्व मिपाकरांच्या सर्व कट्ट्यांपैकी हा कट्टा सगळ्यात रॉकिंग झालाय हे मात्र मानावेच लागेल.

In reply to by हुकुमीएक्का

अनाहितांना रोजच्या धावपळीच्या जीवनातून असा मनमोकळा वेळ मिळणे फार कठीण असते. त्यामूळे या कट्ट्याचे महत्व वेगळेच आहे.
+१००. तुम्हाला हे भावलं म्हणून तुमचं पण कौतुक . अगदी खरंय तुमचं म्हणणं . गप्पा आमच्या चालतात च , आणि होत च राहतात . मनातल्या गोष्टी पण रोज च वेगवेगळ्या माध्यमांतून एकमेकींसमोर बोलतो पण ते सगळं विसरून नाच , गाणी , खेळ , चविष्ट आणि मुख्य म्हणजे आयतं जेवण यात रमून जाणं नेहेमीच होत नाही. पूर्वीच्या काळी ते हळदीकुंकू वगैरे ठेवायचे बायकांना बाहेर पडायला मिळावं म्हणून तसं आता या नेहेमीपेक्षा वेगळ्या सहलींची गरज वाटायला लागली आहे. प्रत्येकजण बाहेर पडते पण आवडत्या आणि जिवाभावाच्या मैत्रिणींबरोबर विरंगुळा मिळायला असा एखादा दिवस यावा लागतो कशा न कशा निमिताने . झकास झाला की कट्टा !! पुण्याचा पण आता जोरदार होऊन जाऊ द्या …. फोटो खूप छान आलेत , बच्चा कंपनी पण एक नंबर …. कविता लेख आणि टायटल खूप छान … खरंच अनाहिता रॉक्स !!

http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif आरे व्वा... डन्स बिन्स..लै धुव्वा क्येलेला दिस्तोय! http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif खायचे जेव्हढे पदार्थ लिहिले आहेत ,ते सगळ्याजणींमधे (मिळून.. ;) ) किती दा खाल्ले गेले . . . . . . . . . . .. . . . होsssssssssssss??? =)) ================ आता पळा........ http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-1044.gif

In reply to by कविता१९७८

अत्रुप्त बुवा, सगळ्याजणी सगळावेळ काही न काही खातच होतो आम्ही. शेवटी विलेजवाले भाऊ म्हणाले," आता संssssपलं! आता उद्याssss !!! " =))

In reply to by मितान

@अहो घाबरताय का एवढे तुम्हाला नाही हो कुणी खाणार>>> मला कसे खाल? =)) मी तर आत्मा आहे! :P @आता संssssपलं! आता उद्याssss !!! " >>> =)) खा दाड अनाहिता! =))

पाणीपुरी, रगडा पॅटीस, वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या, १०-१२ प्रकारचे सॅलेडस् , पापड, दाल बाटी चुरमा, पाव भाजी, डोसे, गरमागरम जिलेबी, गुलाब जामुन, खीर, बिर्यानी, पनीरची भाजी, पालक, छोले, आंबट गोड कढी, वालपापडीची भाजी, ... बायकांचे जेवण चुलीत का असते, ते आत्ता समजले.

In reply to by विवेकपटाईत

चुलीत कशानं म्हणे... चांगल्या ताट वाट्या चमचे, झालंच तर पा पु साठी वेगळ्या ताटल्या वगेरे घेऊन त्यात जेवलो आम्ही. पण विवेकदादा, तुमच्यात बायका चुलीत जेवतात ???? :(

In reply to by मितान

एक जुनी कथा आहे. थोडक्यात पहिले चुलीवर अन्न शिजविले जायचे. एक बायको नवर्याला कामावर जाण्या आधी फक्त त्याच्या करता जेवण तैयार करून द्यायची. नवरा विचारायचा कि तू काय खाणार. तिचे उत्तर राहयचे माझे जेवण गेले चुलीत. नवर्याला शंका आली, एक दिवस तो कामावरून लवकर आला. पाहतो तर काय बायको ने स्वत:साठी स्वादिष्ट जेवण बनविले होते. .... .त्या नंतर ही म्हण रूढ झाली.

अनाहिता ठाणे कट्टा वृत्तांत सविस्तर वाचला. खादाडीचे वर्णन वाचुन संपेपर्यंत घशाला कोरड पडली. :( आम्ही काही पदार्थ खाल्ले किंवा आम्ही फलाहार! केला असे लिहिणे तुम्हाला सोप्पे आणि वाचायला आम्हाला सोप्पे गेले नसते का? :) धन्यवाद! ह्या खादाडीचे फोटो न टाकल्यापध्दल! :)

अनाहिता हे नाजूक नाव शोभत नाही अशा कट्ट्याला. धत्ताडतत्ताडखादाडभर्ताड वगैरे घ्या. बाकी फोटो नाहीत म्हणजे कट्टा झालेला नाही. खयाली पुलाव असणार नक्की. शंभर टक्के! ;-)

In reply to by खटपट्या

पुणे कट्टा? नसणार झालेला. फोटोबिटो काही टाकत नाहीत. कट्टा आणि पाककृती - दोहोंमध्ये नुसतेच वर्णन म्हणजे कल्पनाशक्तीला दिलेला ताण असणार याची खात्री बाळगावी! ;-)

कट्ट्याच्या व्रुत्तांत मस्त लिहीला आहे. खादाडीचे वर्णन ही छान शब्दात लिहीले आहे.

डान्सफ्लोअरवर आधी संगीत खुर्ची ला सुरुवात झाली, तिथे ही अनाहीता रॉक्स, त्रिवेणी अन मिता ह्यांनी भाग घेतला होता
दोन मिनिटं 'अनाहीता रॉक्स' असा कोणता आयडी आहे का असा विचार करत होतो!

कट्टा नक्की झालाय कां ? कसलेच फोटो नाहीत म्हणजे शंकेला बिल्लास आहे.

अनाहिताचे कट्टे दणदणीतच होतात.. अगदी दोघी तिघी भेटल्या तरी... इथे तर चक्क मुंबई पुणे संगम सुद्धा झालाय!! मी सगळेच कट्टे मिसतेय त्यामुळे होलसेल मध्ये इनो बाळगण्यात येत आहे.. कविता... खुप छान लिहिलं आहेस!!!

खूपच छान लिहिलंय कविता ... आणि अनाहीता रॉक्स नेहमीच !!! खूप मज्जा.. खूप धम्माल .... सिरेस्ली मिस करतेय सख्यांनो...