अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा...
खुप दिवसांपासुन अनाहीतांनी कट्टा करायचे ठरवले होते, सगळ्यांच्या वेळा जुळवुन २१ डीसेंबरला ठरले. अनाहीता म्हणजे झाशीच्या राण्या काही अनाहीता म्हणजे त्रिवेणी, मितान आणि मिता पुण्याहुन येणार होत्या अन मी ही जरा लांबुनच येणार होते बाकीच्या मुंबईतल्याच होत्या. घोडबंदर रोडवरच्या आर मॉलमध्यल्या व्हिलेज सोल ऑफ इंडिया मध्ये १२.३० वाजता प्रवेश मिळत असल्याने सर्वांनी दुपारी १२ वाजता मॉल मधे जमुन एकत्रच प्रवेश करायचे ठरले. सानिका स्वप्निल , सविता, स्नेहांकीता, अजया, मितान, त्रिवेणी, मिता, हेमा, उमा, सुर, कस्तुरी, स्वप्नांची राणी आणि मी अशा सर्व जणी तयारीला लागलो.
अखेर कट्ट्याचा दिवस उजाडला, पुणे झाशीच्या अनाहीता सकाळी ७.३० वाजता पुण्याहुन निघाल्या मी ही लांबच राहत असल्याने लवकर निघाले. आणि एकेक करुन १२.३० पर्यंत आर मॉल मधे जमलो. पहिल्यांदाच भेटत असलो तरीही अनाहीता अनोळखी वाटत नाहीत हेच खरं, एकेकींना सर्वांनी लांबुनच ओळखले आणि इतकं छान वातावरण निर्माण झालं की लहानपणापासुन एकत्रच राहीलोत असंच वाटु लागलं. सुर तिच्या दोन छोट्या गोड बाहुल्यांना घेउन आली होती. उमा , हेमा, आणि कस्तुरी यांना थोडा वेळ लागणार होता म्हणुन बाकी सर्वांनी एकत्रच प्रवेश केला. "विलेज" ची थीम मस्त होती , अजयाने आधीच टेबल बुक करुन ठेवलं होतं पाहीलं तर ती जेल ची थीम होती आम्हाला सर्वांना बराक मधे ठेवण्यात आले होते. मग पुन्हा ओळख परेड झाली, सानिका स्वप्निल आणि स्वप्नांची राणी यांनी सर्वांसाठी चॉकलेट्स आणली होती तर त्रिवेणीने सर्वांसाठी खास खानदेशी मसाला आणला होता. सर्वांनी उठुन पेटपुजा करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी पाणीपुरी राउंड झाला, मग सर्व थोडं थोडं करुन सर्व पदार्थ चाखायला सुरुवात केली. त्यावेळात कस्तुरी, उमा यांनी प्रवेश केला. पाणीपुरी, रगडा पॅटीस, वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या, १०-१२ प्रकारचे सॅलेडस् , पापड, दाल बाटी चुरमा, पाव भाजी, डोसे, गरमागरम जिलेबी, गुलाब जामुन, खीर, बिर्यानी, पनीरची भाजी, पालक, छोले, आंबट गोड कढी, वालपापडीची भाजी, चायनीज असे विविध पदार्थांची चव चाखल्यावर आम्ही डान्स फ्लोअरवर गेलो.
डान्सफ्लोअरवर आधी संगीत खुर्ची ला सुरुवात झाली, तिथे ही अनाहीता रॉक्स, त्रिवेणी अन मिता ह्यांनी भाग घेतला होता आणि बाकीची आलेली मंडळी असा गेम सुरु झाला आणि आपल्या त्रिवेणीने अनाहीतांच्या जीत चा झंडा गाडला. लव यु त्रिवेणी.. त्यानंतर मिक्स डान्स ला सुरुवात झाली .तितक्यात हेमा तिच्या मुलाला घेउन आली. थोडा वेळ बराक मधे गेली तोवर आम्ही डान्स फ्लोअर वर थिरकायला सुरुवात केली होती. सर्वात आधी फनी संता बंता डान्स झाला आणि अनाहीतांनी नाचायला सुरुवात केली , धम्माल धम्माल केली नुसती , नंतर राजस्थानी डान्स सुरु झाला आणि अनाहीता हेमा ने तर कमालच केली , अतिशय सुंदर राजस्थानी डान्स केला, अश्या गिरक्या घेत होती की हेमा राजस्थान मधेच जन्माला आलीये का अशी शंका आली मला, आजुबाजुची दुसरी मंडळी ही कौतुकाने पाहु लागली. दुसर्या बर्याच मंडळींनीही राजस्थानी नाचात भाग घेतला, नंतर गरबा सुरु झाला तिथेही आपल्या अनाहीता पुढे, मग डी. जे. डान्स, त्यात ही अनाहीता रॉक्स, हेमा ने तर "रायता फैला दिया यार" काय नाचलीये, अगदी प्रोफेशनल सारखी, तिचे हावभाव आणि तिचा नाच अगदी एखादा रीयॅलीटी शो पाहतोय असं वाटत होतं.
त्यादरम्यान थोडा वेळ सविता, स्नेहांकीता, मितान, सुर बक अप करत होत्या, थोडा वेळ त्या सुर च्या पिल्लु शी खेळल्या नंतर बराक मधे परत गेल्या कारण सर्व अनाहीतांचे सामान तिथेच होते म्हणुन तिथे कुणाला तरी बसणे आवश्यक होते. मग त्यांनी छान गप्पांचा फड जमवला. ऑफीस, काउन्स्लिंग , ध्यानधारणा आरोग्य, मिपाकर्स, अनाहीता अशा विषयावर न थकता गपा रंगल्या. नाचता नाचता ३ कधी वाचले हे कळलंच नाही, ३.३० वाजता विलेज बंद होणार असल्याने पुन्हा खादाडीसाठी पळालो. नंतर आईसक्रीम खाल्लं थोड्या वेळाने चहा घेतला. पुन्हा गप्पा टप्पा, बर्याच अनाहीतांना पाहुन त्यांना मोठी मुलं आहेत हे वाटत नव्हतं, मलाही कॉम्प्लीमेंटस् मिळाल्या की माझ्या पदयात्रेच्या धाग्यावरुन मी वयाने मोठी असेन असं सर्वांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात तसं नाहीये. थोड्या गप्पा झाल्या. सर्व अनाहीता खुपच साध्या आणि दिलाच्या सच्च्या वाटल्या , कुठेही अॅटिट्युड हा प्रकार जाणवला नाही , कुठेही आत एक आणि बाहेर एक असं जाणवलं नाही, कुठेही कुणाची बरोबरी , हिणवणे हा प्रकार जाणवला नाही आणि हीच तर खरी अनाहीतांची खासियत आहे, अनाहीता बरोबर मनाच्या सौंदर्य हुडकुन काढतात, बाहेरच्या थाटाकडे अनाहीताला काहीच ओढ नाही. शेवटी काय तर अनाहीता रॉक्स !!!!!!!!!!!!!!!!!!!
शेवटी ग्रुप फोटोजचा कार्यक्रम झाला, ३.३० वाजले आणि आम्ही 'विलेज' च्या बाहेर पडलो तरीही मॉल मध्येच होतो, सर्व जणी इथे तिथे विखुरल्या, जड मनाने सर्वांचा निरोप घेतला आणि परतलो.
याद्या
17465
प्रतिक्रिया
117
मिसळपाव
आलेच थो ड्या वेळात. मग
मस्त व्रुत्तांत...
पाणीपुरी, रगडा पॅटीस,
कविता..
घोडबंदर रोडवरच्या आर
ते ना soul आहे, भारताचा
In reply to घोडबंदर रोडवरच्या आर by कॅप्टन जॅक स्पॅरो
रॉकिंग कट्टा!!! डान्स बिन्स
बाय्दवे
In reply to रॉकिंग कट्टा!!! डान्स बिन्स by प्रीत-मोहर
सुटीच्या दिवशी आरामखुर्चीत
+1
In reply to सुटीच्या दिवशी आरामखुर्चीत by कंजूस
कविता... छान लिहिलंय गं.
अरे वा....
लय भरि. वाचून लय मजा आली
वा... छान ! इथे मी सहकुटुंब
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyzमस्त कट्टा आणि त्याचे वर्णन !
मस्त...
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
(No subject)
In reply to (No subject) by सतिश गावडे
(No subject)
In reply to (No subject) by यसवायजी
ए पोरींनो,हास्यक्लबची मेंब्रं
In reply to (No subject) by सूड
तुम्हाला समज्लेच नै...ते सगळे
In reply to ए पोरींनो,हास्यक्लबची मेंब्रं by अजया
तुम्हाला समज्लेच नै
In reply to तुम्हाला समज्लेच नै...ते सगळे by टवाळ कार्टा
जौदेरे...नाहीतरी अनाहिता
In reply to तुम्हाला समज्लेच नै by सतिश गावडे
जसं सोल नाही समजलं तसं रॉक्स
In reply to जौदेरे...नाहीतरी अनाहिता by टवाळ कार्टा
आम्हाला सर्कस पाहायला मिळाली
In reply to तुम्हाला समज्लेच नै by सतिश गावडे
(No subject)
In reply to आम्हाला सर्कस पाहायला मिळाली by अजया
>>> ए पोरींनो
In reply to ए पोरींनो,हास्यक्लबची मेंब्रं by अजया
जौद्याहो...कोणीच नाही बोलत तर
In reply to >>> ए पोरींनो by प्यारे१
काय पण विनोद केलाय.मस्त!
In reply to जौद्याहो...कोणीच नाही बोलत तर by टवाळ कार्टा
जरा थोडा आराम करा...खा प्या..
In reply to काय पण विनोद केलाय.मस्त! by अजया
तेच म्हणणार होते तुला,जा आता
In reply to जरा थोडा आराम करा...खा प्या.. by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to तेच म्हणणार होते तुला,जा आता by अजया
लगा सिक्सर!!!
In reply to तेच म्हणणार होते तुला,जा आता by अजया
हे बघाhttp://www.misalpav.com
In reply to तेच म्हणणार होते तुला,जा आता by अजया
बाकी म्हैला कितीही तोंडघाशी
In reply to हे बघाhttp://www.misalpav.com by टवाळ कार्टा
हेच सांगतोय आम्ही तर तुम्ही
In reply to हे बघाhttp://www.misalpav.com by टवाळ कार्टा
कविता मस्त वर्णन गं..एकूणच
छानच झालाय की कट्टा.
धन्यवाद
है शाब्बास!
या नुस्त्या हवेतल्या गप्पा..
In reply to है शाब्बास! by पैसा
अरे पण
In reply to या नुस्त्या हवेतल्या गप्पा.. by टवाळ कार्टा
तो लाख अपेक्षा सांगेल ग, पण
In reply to अरे पण by पैसा
शोधता येत नै बोला की सरळ
In reply to तो लाख अपेक्षा सांगेल ग, पण by प्रीत-मोहर
वरचा प्रतिसाद उत्तर हाय रे
In reply to शोधता येत नै बोला की सरळ by टवाळ कार्टा
त्या अपेक्षा सास्वांसाठी आहेत
In reply to वरचा प्रतिसाद उत्तर हाय रे by प्रीत-मोहर
रिजेक्टेड!!!! असले फालतु
In reply to त्या अपेक्षा सास्वांसाठी आहेत by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to रिजेक्टेड!!!! असले फालतु by प्रीत-मोहर
एकुलती एक मुलगी असली पाहिजे..
In reply to अरे पण by पैसा
स्वता:कडे काहीच नाही का???
In reply to एकुलती एक मुलगी असली पाहिजे.. by टवाळ कार्टा
हाय की माज्याकडं...झाकली मुठ
In reply to स्वता:कडे काहीच नाही का??? by कविता१९७८
काय बाई ही मानसिकता
In reply to हाय की माज्याकडं...झाकली मुठ by टवाळ कार्टा
ह्येला पाजीटिव आटिटूड
In reply to काय बाई ही मानसिकता by कविता१९७८
झाकल्या मुठीने काहेएच होत
In reply to ह्येला पाजीटिव आटिटूड by टवाळ कार्टा
असं कसं असं कसं?
In reply to झाकल्या मुठीने काहेएच होत by प्रीत-मोहर
(No subject)
In reply to असं कसं असं कसं? by प्यारे१
सुरेख कट्टा!! (मवाळ कार्टा)
"मवाळ कार्टा"
In reply to सुरेख कट्टा!! (मवाळ कार्टा) by सूड
मस्त वृत्तांत लिहिला आहेस
मस्त....
मस्त वृत्तांत
अनाहितांना रोजच्या धावपळीच्या
In reply to मस्त वृत्तांत by हुकुमीएक्का
आरं तिज्या
In reply to मस्त वृत्तांत by हुकुमीएक्का
आरे व्वा... डन्स बिन्स..लै
अहो घाबरताय का एवढे तुम्हाला
In reply to आरे व्वा... डन्स बिन्स..लै by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्त बुवा, सगळ्याजणी
In reply to अहो घाबरताय का एवढे तुम्हाला by कविता१९७८
@अहो घाबरताय का एवढे तुम्हाला
In reply to अत्रुप्त बुवा, सगळ्याजणी by मितान
पाणीपुरी, रगडा पॅटीस,
(No subject)
In reply to पाणीपुरी, रगडा पॅटीस, by विवेकपटाईत
हो का?
In reply to पाणीपुरी, रगडा पॅटीस, by विवेकपटाईत
चुलीत कशानं म्हणे... चांगल्या
In reply to पाणीपुरी, रगडा पॅटीस, by विवेकपटाईत
एक जुनी कथा आहे. थोडक्यात
In reply to चुलीत कशानं म्हणे... चांगल्या by मितान
छान!
धमाल कट्टा - दणदणित झालेला
असला कसला कट्टा?
बाकी फोटो नाहीत म्हणजे कट्टा
In reply to असला कसला कट्टा? by एस
येतील येतील,
In reply to बाकी फोटो नाहीत म्हणजे कट्टा by खटपट्या
आता पुन्याला कट्टा झाला
In reply to येतील येतील, by सस्नेह
कसला आलाय शिंचा पुणे कट्टा?
In reply to आता पुन्याला कट्टा झाला by खटपट्या
ब्रोब्रे !!!
In reply to कसला आलाय शिंचा पुणे कट्टा? by एस
कट्टा कालच झालाय , कट्ट्याला
In reply to आता पुन्याला कट्टा झाला by खटपट्या
(No subject)
छान...!!
डान्सफ्लोअरवर आधी संगीत
तेच की!!
In reply to डान्सफ्लोअरवर आधी संगीत by मिहिर
एक (कु)शंका
अनाहिताचे कट्टे दणदणीतच होतात
खूपच छान लिहिलंय कविता ...