खुप दिवसांपासुन अनाहीतांनी कट्टा करायचे ठरवले होते, सगळ्यांच्या वेळा जुळवुन २१ डीसेंबरला ठरले. अनाहीता म्हणजे झाशीच्या राण्या काही अनाहीता म्हणजे त्रिवेणी, मितान आणि मिता पुण्याहुन येणार होत्या अन मी ही जरा लांबुनच येणार होते बाकीच्या मुंबईतल्याच होत्या. घोडबंदर रोडवरच्या आर मॉलमध्यल्या व्हिलेज सोल ऑफ इंडिया मध्ये १२.३० वाजता प्रवेश मिळत असल्याने सर्वांनी दुपारी १२ वाजता मॉल मधे जमुन एकत्रच प्रवेश करायचे ठरले. सानिका स्वप्निल , सविता, स्नेहांकीता, अजया, मितान, त्रिवेणी, मिता, हेमा, उमा, सुर, कस्तुरी, स्वप्नांची राणी आणि मी अशा सर्व जणी तयारीला लागलो.
अखेर कट्ट्याचा दिवस उजाडला, पुणे झाशीच्या अनाहीता सकाळी ७.३० वाजता पुण्याहुन निघाल्या मी ही लांबच राहत असल्याने लवकर निघाले. आणि एकेक करुन १२.३० पर्यंत आर मॉल मधे जमलो. पहिल्यांदाच भेटत असलो तरीही अनाहीता अनोळखी वाटत नाहीत हेच खरं, एकेकींना सर्वांनी लांबुनच ओळखले आणि इतकं छान वातावरण निर्माण झालं की लहानपणापासुन एकत्रच राहीलोत असंच वाटु लागलं. सुर तिच्या दोन छोट्या गोड बाहुल्यांना घेउन आली होती. उमा , हेमा, आणि कस्तुरी यांना थोडा वेळ लागणार होता म्हणुन बाकी सर्वांनी एकत्रच प्रवेश केला. "विलेज" ची थीम मस्त होती , अजयाने आधीच टेबल बुक करुन ठेवलं होतं पाहीलं तर ती जेल ची थीम होती आम्हाला सर्वांना बराक मधे ठेवण्यात आले होते. मग पुन्हा ओळख परेड झाली, सानिका स्वप्निल आणि स्वप्नांची राणी यांनी सर्वांसाठी चॉकलेट्स आणली होती तर त्रिवेणीने सर्वांसाठी खास खानदेशी मसाला आणला होता. सर्वांनी उठुन पेटपुजा करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी पाणीपुरी राउंड झाला, मग सर्व थोडं थोडं करुन सर्व पदार्थ चाखायला सुरुवात केली. त्यावेळात कस्तुरी, उमा यांनी प्रवेश केला. पाणीपुरी, रगडा पॅटीस, वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या, १०-१२ प्रकारचे सॅलेडस् , पापड, दाल बाटी चुरमा, पाव भाजी, डोसे, गरमागरम जिलेबी, गुलाब जामुन, खीर, बिर्यानी, पनीरची भाजी, पालक, छोले, आंबट गोड कढी, वालपापडीची भाजी, चायनीज असे विविध पदार्थांची चव चाखल्यावर आम्ही डान्स फ्लोअरवर गेलो.
डान्सफ्लोअरवर आधी संगीत खुर्ची ला सुरुवात झाली, तिथे ही अनाहीता रॉक्स, त्रिवेणी अन मिता ह्यांनी भाग घेतला होता आणि बाकीची आलेली मंडळी असा गेम सुरु झाला आणि आपल्या त्रिवेणीने अनाहीतांच्या जीत चा झंडा गाडला. लव यु त्रिवेणी.. त्यानंतर मिक्स डान्स ला सुरुवात झाली .तितक्यात हेमा तिच्या मुलाला घेउन आली. थोडा वेळ बराक मधे गेली तोवर आम्ही डान्स फ्लोअर वर थिरकायला सुरुवात केली होती. सर्वात आधी फनी संता बंता डान्स झाला आणि अनाहीतांनी नाचायला सुरुवात केली , धम्माल धम्माल केली नुसती , नंतर राजस्थानी डान्स सुरु झाला आणि अनाहीता हेमा ने तर कमालच केली , अतिशय सुंदर राजस्थानी डान्स केला, अश्या गिरक्या घेत होती की हेमा राजस्थान मधेच जन्माला आलीये का अशी शंका आली मला, आजुबाजुची दुसरी मंडळी ही कौतुकाने पाहु लागली. दुसर्या बर्याच मंडळींनीही राजस्थानी नाचात भाग घेतला, नंतर गरबा सुरु झाला तिथेही आपल्या अनाहीता पुढे, मग डी. जे. डान्स, त्यात ही अनाहीता रॉक्स, हेमा ने तर "रायता फैला दिया यार" काय नाचलीये, अगदी प्रोफेशनल सारखी, तिचे हावभाव आणि तिचा नाच अगदी एखादा रीयॅलीटी शो पाहतोय असं वाटत होतं.
त्यादरम्यान थोडा वेळ सविता, स्नेहांकीता, मितान, सुर बक अप करत होत्या, थोडा वेळ त्या सुर च्या पिल्लु शी खेळल्या नंतर बराक मधे परत गेल्या कारण सर्व अनाहीतांचे सामान तिथेच होते म्हणुन तिथे कुणाला तरी बसणे आवश्यक होते. मग त्यांनी छान गप्पांचा फड जमवला. ऑफीस, काउन्स्लिंग , ध्यानधारणा आरोग्य, मिपाकर्स, अनाहीता अशा विषयावर न थकता गपा रंगल्या. नाचता नाचता ३ कधी वाचले हे कळलंच नाही, ३.३० वाजता विलेज बंद होणार असल्याने पुन्हा खादाडीसाठी पळालो. नंतर आईसक्रीम खाल्लं थोड्या वेळाने चहा घेतला. पुन्हा गप्पा टप्पा, बर्याच अनाहीतांना पाहुन त्यांना मोठी मुलं आहेत हे वाटत नव्हतं, मलाही कॉम्प्लीमेंटस् मिळाल्या की माझ्या पदयात्रेच्या धाग्यावरुन मी वयाने मोठी असेन असं सर्वांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात तसं नाहीये. थोड्या गप्पा झाल्या. सर्व अनाहीता खुपच साध्या आणि दिलाच्या सच्च्या वाटल्या , कुठेही अॅटिट्युड हा प्रकार जाणवला नाही , कुठेही आत एक आणि बाहेर एक असं जाणवलं नाही, कुठेही कुणाची बरोबरी , हिणवणे हा प्रकार जाणवला नाही आणि हीच तर खरी अनाहीतांची खासियत आहे, अनाहीता बरोबर मनाच्या सौंदर्य हुडकुन काढतात, बाहेरच्या थाटाकडे अनाहीताला काहीच ओढ नाही. शेवटी काय तर अनाहीता रॉक्स !!!!!!!!!!!!!!!!!!!
शेवटी ग्रुप फोटोजचा कार्यक्रम झाला, ३.३० वाजले आणि आम्ही 'विलेज' च्या बाहेर पडलो तरीही मॉल मध्येच होतो, सर्व जणी इथे तिथे विखुरल्या, जड मनाने सर्वांचा निरोप घेतला आणि परतलो.
वाचने
17495
प्रतिक्रिया
117
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
In reply to पाणीपुरी, रगडा पॅटीस, by विवेकपटाईत
हो का?
In reply to पाणीपुरी, रगडा पॅटीस, by विवेकपटाईत
चुलीत कशानं म्हणे... चांगल्या
In reply to पाणीपुरी, रगडा पॅटीस, by विवेकपटाईत
एक जुनी कथा आहे. थोडक्यात
In reply to चुलीत कशानं म्हणे... चांगल्या by मितान
छान!
धमाल कट्टा - दणदणित झालेला
असला कसला कट्टा?
बाकी फोटो नाहीत म्हणजे कट्टा
In reply to असला कसला कट्टा? by एस
येतील येतील,
In reply to बाकी फोटो नाहीत म्हणजे कट्टा by खटपट्या
आता पुन्याला कट्टा झाला
In reply to येतील येतील, by सस्नेह
कसला आलाय शिंचा पुणे कट्टा?
In reply to आता पुन्याला कट्टा झाला by खटपट्या
ब्रोब्रे !!!
In reply to कसला आलाय शिंचा पुणे कट्टा? by एस
कट्टा कालच झालाय , कट्ट्याला
In reply to आता पुन्याला कट्टा झाला by खटपट्या
(No subject)
छान...!!
डान्सफ्लोअरवर आधी संगीत
तेच की!!
In reply to डान्सफ्लोअरवर आधी संगीत by मिहिर
एक (कु)शंका
अनाहिताचे कट्टे दणदणीतच होतात
खूपच छान लिहिलंय कविता ...
धन्यवाद वृतांत आवडल्याबद्द्ल.
बायो, तरीही अज्जिबात न दमता,
अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा.....!!
तशी आमची समजुत करुन
In reply to अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा.....!! by विनोद१८
काही काका लोक्स आनी बन्धुच्या
https://www.youtube.com/watch
In reply to काही काका लोक्स आनी बन्धुच्या by पियुशा
तू नळी बेण्ण है हिकडं ...
In reply to https://www.youtube.com/watch by टवाळ कार्टा
हम्म मिपाके प्राजी आगये
In reply to https://www.youtube.com/watch by टवाळ कार्टा
अनाहिता बरोबर मनाच्या सौंदर्य
वृत्तांत मस्त! फोटो मिसिंग.
धन्यवाद
In reply to वृत्तांत मस्त! फोटो मिसिंग. by वेल्लाभट
ह्म्म्म
ज ळ ज ळ.
नाय नाय
In reply to ज ळ ज ळ. by रेवती
अहो भौ, माझी जळजळ झाली हो,
In reply to नाय नाय by इरसाल
बायकांच्या धाग्यावर पुरुषांचा गोंधळ
"माईंचे हे" मोड ऑन
In reply to बायकांच्या धाग्यावर पुरुषांचा गोंधळ by धर्मराजमुटके
मग सोयाचंक्स भाजून खायला लावा
In reply to "माईंचे हे" मोड ऑन by डॉ सुहास म्हात्रे
और
छान गं अनहितांनो ... मस्तच !
है शाब्बास कट्टा आणि वृ.
पुढच्या कट्ट्याला 'बाहेरून
In reply to है शाब्बास कट्टा आणि वृ. by यशोधरा
ऑफिसपुढे कुच्च नहीं कर सकते.
In reply to पुढच्या कट्ट्याला 'बाहेरून by सस्नेह
अजुन े ेॆएक
मस्त...
कट्टा दणक्यात झाला ह्यात वादच
वा!