Skip to main content

न झालेला पुरुषांचा कट्टा- औरंगाबाद.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 26/12/2014 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन नुसत्या पुरुषांचा कट्टा करायचे ठरले होते. सर्वांनी जवळ जवळ पंचवीस डिसेंबरच्या कट्ट्याला होकार कळवला होता. पुरुष म्हणजे या भुतलावर अवतरलेला पहिला सजीव. काही अदिमानव पुण्याहुन, काही ठाणे, आणि काही मुंबैवरुन येणार होते. जगप्रसिद्ध बीबीका मकब-याला ठीक अकरा वाजता यायचं आमचं सर्वांचं ठरलं होतं. पुण्याहुन धन्या, सुड, वल्ली, प्रशांत, बॅटमन, आणि इस्पिक एक्का. ठाण्यातून मुवि, डॉ.सुबोध खरे, किसन शिंदे, आणि गवि, मुंबैतुन आणि दुबैवरुन थेट कुंदन येणार होता. सध्या मुंबैत आलो तर येतोच बोलला. जेपी आणि टवाळ कार्टा यांना मिपावर मिपा मिपा खेळायला मिळणार होतं म्हणुन ते येणार नव्हते. दिवसातून निरर्थक शंभर प्रतिसाद टाकल्याशिवाय त्यांना झोप येत नाही, अशी सुचना मिपाकरांची म्हणुन त्यांना आग्रह केला नाही. मी आणि काही वाचक मिपाकरांबरोबर कट्ट्याच्या तयारीला लागलो. अखेर तो दिवस उजाडला. सनईचे सूर मोबाईल रिंगटोन मधुन उमटायला लागले. पुणेकर सर्व धन्याच्या गाडीतून येणार होते. पेट्रोलचा खर्च धन्याच करणार होता. वल्ली आणि मंडळी त्यामुळे जास्त खुश होती. माझ्या गावापासून औरंगाबाद चाळीस किलोमिटर अंतरावर होतं मी सकाळीच नाश्ता करुन माझ्या दोन मुलांसोबत निघालो होतो. औरंगाबादच्या काही महिला मिपाकरांना कट्ट्याबद्दल कळलं होतं त्या म्हणाल्या आम्ही तुमच्यासाठी इडली चटणी पाठवतो पण पुरुषांचा कट्टा असल्यामुळे कोणत्याही इतर सदस्याचा मरतांना एक थेंब पाण्याचा जरी आवश्यक असला तरी तो घ्यायचा नाही अशी शपथ करंगळी चावता चावता घेतली होती त्याची आठवण सर्वांना होतीच मी मला कितीही इडल्या आवडत असल्या तरी तो प्रस्ताव जड अंतकरणाने नाकारला. आम्ही सर्व पुरुष पहिल्यांदाच भेटत असलो तरी मिपावर खरडी, व्य.नि. वाट्सपवर आमची तशी सर्वांची ओळख होतीच. आम्ही जसं काही एका गावातले बालपणीचे मित्र भेटत आहोत असे वातावरण तयार झाले होते. बीबीका मकब-याजवळ मी सर्वांची बाहेर वाट पाहात होतो. मिपाकर अगदी वेळेचे पक्के याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. अगदी बरोबर अकरा वाजता सर्व मिपाकर पोहचले. डॉ.खरे त्यांची दोन मुलं, माझी दोन मुलं, वल्लीची दोन मुलं, ब्याटमनची तीन, धन्याचे चार पहिल्या बायकोचे दोन आणि नंतरचीचे दोन, शेजारचा म्हणुन अजुन एक मुलगा त्यांच्याबरोबर दिसत होता. मिपाकर खरे कुटुंबवत्सल याची खात्री किसन सारखे वहिनीला फ़ोन करुन आत्ताच पोहोचलो, काही काळजी करु नको सांगत होता. वहिनीने दिलेला गाजर का हलवा, डॉ. ख-यांनी रेडीमेड घेतलेली पेष्ट्री, गविंनी आणलेली रेड वाईन. इस्पिक एक्का यांनी डुबुक वड्याची आणलेली भाजी. कुंद्याच्या बाकरवड्या असा सर्व खाण्याचा लवाजमा आम्ही एकदा बीबीका मकब-यात प्रवेश करुन तिथे एका आंब्याच्या झाडाखाली सोडला. बीबी का मकबरा पाहुन झाल्यावर आम्ही सर्व गोल रिंगन करुन बसलो. कुंद्या म्हणाला मला मामाचं पत्र हरवलं हा खेळ खेळायचा. मग आम्ही खुप वेळ तोच खेळ खेळलो मजा आली. खुप हसलो, जुन्या आठवणींनी गळ्यात गळे टाकून रडलो. मग वल्ली आणि बॆटमन यांनी 'काला कव्वा काट खायेगा' या गाण्यावर धमाल डान्स केला. आय शप्पथ आम्ही सर्वजन लय हसलो. मुलंही त्यांच्याबरोबर नाचायला लागली. इस्पिक एक्का यांनी 'सावरियाने कैसा जादू डाला रे' हे सुरेख गाणं म्हटलं, डॉ. खरे यांनी अय जिंदगी गले लगाले हे गाणं म्हटलं, इतका सुरेख माहोल झाला की विचारु नका. मला कोणी काहीच म्हणायचा आग्रह करत नव्हते तरी मी एक बळजबरी जुनीच कविता त्यांना म्हणुन दाखवली सर्वांनी कौतुक केलं. मिपाकर कशा कशाला वाईट म्हणत नाही, त्याची प्रचिती आली. मग आम्ही आमच्या शाळेतल्या मैत्रीणी जे खेळ खेळायच्या त्या ठीक्करपाणी, चमफुल, सागरगोटे, हे खेळ खेळलो. आई गं. हसुन हसुन पुरेवाट झाली. बॅटमन म्हणाला अरे तुम्ही खुप पारंपरिक होत आहात आधुनिक खेळ खेळा. कोण तरी अश्लिल अश्लिल म्हणुन ओरडलं. समजलं नै ते कोण बोललं म्हणुन पण सर्वांनी त्या कमेंट्सकडे दुर्लक्ष केलं. वल्लीने मग मला वेरुळ का आवड्तं, तेथील दर्पण सुंद-यावर चक्क वीस मिनिटं घेतली. धन्या माझ्या कानात हळुच म्हणाला मी वल्लीच्या अशा नादामुळे हल्ली कुठे जात नाही. मग आम्ही सर्वांनी न आलेल्या सदस्यांच्या लेखनावर चर्चा केली. गणपाच्या पाककृती हल्ली येत नै असं कोण तरी म्हणालं. गणपा हल्ली 'जागतिकीकरणात मराठी संकेतस्थळं टीकतील काय आणि त्यांची भावी वाटचाल' यावर अभ्यास करतोय हे मी त्या सर्वांना सांगितलं. मग सर्वांनी एकेक पेग वाईन घेतलं. डुबुक वड्या, पेष्ट्री यावर ताव मारला. संक्षीची आठवण सर्वांना झाली. सर्वांनी काही क्षण मौन पाळलं. सर्वांना बोलायचं होतं पण कोणीच काही बोललं नाही. खुप गप्पा झाल्या. माझ्या प्रा.डॉ. या नावावरुन त्यांना मी साठीचा वाटलो मी खुप हसलो. सर्व मिपाकर सच्चे वाटले. सच्चे असल्याचे सर्वांकडे तहसीलची प्रमाणपत्र होतीच. कोणावर टीका नाही, टोमणे नाही, प्रतिसादात दिसतं ते भांडन दिसलं नाही. पुरुषांचीच हीच खरी खासियत झालं गेलं विसरुन जाणे. शेवटी पुरुष मंडळी रॉक्स. कोणी तरी नुसते पुरुष पुरुष आपण सर्व सुखी राहीलो असतो का असा चर्चा विषय घेतला. पण खुप वेळ झालेला होता. चार वाजत आले होते, आम्ही सर्वांनी एक गृप फ़ोटो घेतला. गप्पा खुप रंगल्या होत्या, निरोपाची वेळ आली होती. आम्ही सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. आणि मी जड अंतकरणाने सर्वाचा निरोप घेतला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14470
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

दिवसभर हिरव्या नोटावाल्यांकडे मजूरीला गेलो असल्यामुळे प्रतिसाद देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व. कट्टयाला धमाल मजा आली. यावेळी वेरुळ, अजिंठा, भुलेश्वर, पाटेश्वर किंवा पाताळेश्वर असलं काही कट्टयाचं ठिकाण नसल्याने मी तर जाम खुशीत होतो. नाचण्यासाठी मी "जवा नविन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला" हे गाणं सुचवलं होतं मात्र आमच्या सज्जन अशा मा. संपादक किसनरावजी शिंदे-पाटील यांनी नाक मुरडल्याने शेवटी "काला कव्वा काट खायेगा" या गाण्यावर नाचलो. नाचताना मी एकदम बेहोष झालो होतो. माझ्या डोळ्यासमोर अनेक पिवळी शुन्य दिसत होती. जेव्हा गाणे संपले तेव्हा मी त्या शुन्यातून भानावर आलो. गप्पा टप्पांमध्ये चौराकाकांनी दगडाच्या मूर्तींना फिनिशींग कसे येते याबद्दल रोचक माहिती दिली. डॉ. खर्यांनी "मी विक्रांतवर होतो तेव्हा" अशी बहारदार नाट्यछटा सादर केली. त्यानंतर सर्वांनी आमचे कविवर्य मित्र दिवाकर लोटे यांच्या वास्तवदर्शी आणि प्रत्ययकारी कवितांबद्दल "त्यांना सुचतं कसं एव्हढं" असा काथ्याकुट केला. तसेच टवाळजी कार्टा यांच्या रुपाने त्यांना शिष्य लाभल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर मी सार्‍यांना मला जीवनकल्याण नावाच्या मिपा आयडीचा आलेला फोन, त्या आयडीने माझ्या "हेल्थ, वेल्थ आणि हॅप्पीनेस" याबद्दल व्यक्त केलेल्या काळजीबद्दल तसंच मला कट्टयाला न भेटता मला "इनडीव्हीज्युअली" भेटून माझ्या आयुष्यातील प्रसंगांतून मला मार्ग दाखवण्याची तयारी केल्याने मी कसा भारावून गेलो होतो ते सांगितले. एकंदरीत कट्टा छान झाला. :)

In reply to by सतिश गावडे

कट्टयाला धमाल मजा आली. यावेळी वेरुळ, अजिंठा, भुलेश्वर, पाटेश्वर किंवा पाताळेश्वर असलं काही कट्टयाचं ठिकाण नसल्याने मी तर जाम खुशीत होतो. अगागा....गो बाय ! कविवर्य दिवाकर लोटे...... मराठी कवितेला एक खास द्ळण वळण, चळण, गळण देणारे तेच ते काय .... ?

In reply to by टवाळ कार्टा

मस्त हाच फोटो क्लास आला. मीच काढलेला. वाट्सपवर सेंड नका करु म्हटलं होतं. पब्लिक ऐकतच नै. -दिलीप बिरुटे

२४ची रात्र.... मी आपला गाढ झोपेत किंवा गुंगीत.काहीतरी कानाशी वाजायला लागले.सहजच सवयीने कान टवकारले, ऐकतो तर काय आमच्या मोबाइलची रिंग वाजत होती. भल्या पहाटे ९ वाजता कुणाचा फोन? म्हणून बघीतले तर किसन शिंदे. ते म्हणाले," स्काय-पी वर ये." संपादकांच्या आज्ञेला नाही कसे म्हणणार? इतक्या सकाळी नवरा कसा काय उठला? हे बायकोने तिच्या नजरेतून बघीतले.आम्हाला त्या नजरेतले भाव समजले. मी एका वाक्यात उत्तर दिले,"मुक्त विहारि, हाजीर हो. असा फतवा मिपा संपादकांनी, काढला आहे." बायकोने एक कटाक्ष फेकला. मी दुसरा कटाक्ष टाकला आणि अजून एक कटाक्ष युद्ध खेळायच्या आत चहा करायला घेतला.लगेच बायकोने सुर्याकडे नजर फिरवली. चहा घेवून थोडा नॉर्मलला यायचा प्रयत्न केला.आज-काल सकाळी चहा नकोसा वाटतो. संपादकांच्या फोनने थोडी धडकी भरली होती.स्काय-पी वर गेलो तर , किसन शिंद्यांनी लगेच गवि आणि बिरुटे सरांना पण बोलावले.आता ह्या त्रिसदस्यांपुढे आम्ही काय बोलणार? म्हणून मुग गिळायचे ठरवले. मग समजले की, आम्हाला बिरुटे सरांनी आयोजीत केलेल्या कट्ट्याचे हार्दिक निमंत्रण आहे. सगाने आधीच सरांच्या आदराथित्याची जाहीरात केलीच होती.असा मनापासूनचा आग्रह आम्हाला तरी मोडवत नाही.मदार्‍यांना तर अस्वलांचा सहवास हवाच असतो. म्हणजे जातीवंत बियर प्रेमींना बियर हवीच असते. मी लगेच हो म्हटले.माझ्या होकाराने त्या सगळ्यांना बरे वाटले. आम्ही आपले कर्माची फळे भोगायला म्हणून गेलो होतो, तर इथे डायरेक्ट अर्कच मिळाला. असो, दुसर्‍या दिवशी म्हणजे पहाटे-पहाटे निघायचे असल्याने, टका आणि जेपी आणि मंडळींबरोबर जास्त गप्पा-टप्पा न मारता, रात्री जरा लवकर म्हणजे २ वाजताच झोपलो. मध्यरात्री ७ वाजता उठलो.माझ्या दर्शनाने बहूदा सुर्यदेवाला आनंद झाला असावा, त्याने तो आनंद व्यक्त करायच्या आत निघणे भाग होते.म्हणून लगेच ८-९च्या सुमारास मुलुंडला पोहोचलो. डॉ.खरे तयाच होते.मग त्यांच्या गाडीतूनच आम्ही गवि आणि किसन शिंद्यांना बरोबर घेवून निघालो. काहीतरी गाडी बद्दल चर्चा सुरु होती. पुढे ती चर्चा गाडी, त्याची चाके, चक्रधर स्वामी, स्वामींचे किस्से, पुर्वीचे ऋषी आणि त्यांचे उपवास आणि मग नुकताच चित्रगुप्तांनी सुचवलेल्या "फलाहार ध्यान धारणा" ह्या विषयावर येवून थांबली.त्यावेळी गाडी नुकतीच पुण्यात प्रवेश करत होती.आता पुण्यात आलोच आहोत तर चिंचवड-आकुर्डी-कोथरूड-हडपसर आणि सदाशिव पेठ असा मार्ग आखू या का? ह्या प्रश्र्नाला कुणीच उत्तर दिले नाही. त्या मौनाचा अर्थ लक्षांत घेवून, पुढचे पुणे कट्ट्याचे प्लॅनिंग आपले आपणच करायचे असा निश्र्चय केला.मी पण मौन व्रत धारण केले. माझ्या मौनाचा अर्थ त्यांनी वेगळा लावला आणि दुपारच्या जेवणात त्यांनी मला औषध दिले. काही तरी जालीम औषध असावे....बहूदा त्या बाणाने दिलेले असावे, कारण एक तांब्याचा पैसा पण पेल्याच्या तळाला होता.पुढचे मला काही आठवत नाही. त्या संभाजी-नगर कट्ट्यातले डीटेल्स मला आत्ता कळत आहेत. कारण नंतर जाग आली त्यावेळी मला समजले की अरेच्चा मी तर इथेच बायको जवळच आहे. हळूच कानोसा घेतला तर मनापासून जाणीव झाली की अरे, आपण तर ह्या निपावर रोजच कट्टा करतो. आभासी जग जरी असले तरी आम्हाला हेच जग प्रिय.इथे आमचे रोजच कट्टे आणि रोजच खाणे-पिणे.रोजचीच चेष्टा-मस्करी आणि थोडीशी रुसवी-फुगवी. जाता जाता आमच्या बाबांनी विडंबन केलेल्या कवितेचे एक कडवे ऐकवण्याचा मोह आवरत नाही... मिपा असावे कुटुंबा सारखे नकोच नसत्या कलागती तिथे असावेत लेख अप्रतिम नकोत पेटत्या वाती.

In reply to by मुक्त विहारि

मला आणि जेपीला जाणून-बुजून न बोलावले गेले असे एक निरिक्षण नोंदवतो

In reply to by टवाळ कार्टा

तुमच्या शिवाय खफ कोण सांभाळणार? उलट तुमचा खफवर मनसोक्त वावर असल्याने बर्‍याच जणांना ह्या कट्ट्याचा सुगावा पण लागला नाही आणि आम्हाला बिंधास्त कट्टा करता आला.

मुविंचे मनोगत छान. हे बीबी का मकबरा प्रकरण काय आहे याचा जालीय शोध घेतला. एका कंजूषमोगलाने हा बांधला हे वाचून फारच बरे वाटले. एकदा तिकडे भेट देऊन कट्ट्यावर तारांकित पान खाण्याचे नक्की केले आहे. मकबरा पाहून 'ताजमहाल'ची कल्पना करू कारण आग्रा हमकु बहुत दूर आहे.

मस्त मस्त कट्टा. ग्रुप फोटोतील सगळ्यांची ओळख करून द्या न. @इस्पिकचा एक्का- आता डुबुक वड्यांची रेसीपी आलीच पाहिजे. जाता जाता सौम्य निषेध-आम्हाला नाही बोलावले कट्ट्याला. बोलावले असते तर आलो असतो न सगळ्या अनहिता.

In reply to by त्रिवेणी

तुम्ही जर मस्करी करत असाल तर, अनाहिता ग्रुप जर वेगळे कट्टे करत असेल तर पुरुषांनी पण वेगळे कट्टे करायला हवेत, असा फतवा काढण्याचा मानस असावा. आणि तुम्ही जर सिरियसली प्रश्र्न विचारत असाल तर, हा एक विषय काथ्याकुटात आहे... http://www.misalpav.com/node/29818

In reply to by त्रिवेणी

@इस्पिकचा एक्का- आता डुबुक वड्यांची रेसीपी आलीच पाहिजे. आभासी दुनिया नावाच्या रेस्तरॉमधून खास प्राडाँच्या आग्रहाखातर आणली होती. शेफला विचारले तर तो म्हण्ला की "ती रेसिपी त्याचे शिक्रेट अस्ल्याने तो सांग्णार नाही". आता ती पळवून आणायची कामगिरी गुप्तहेरकथाविषारद श्रीयुत स्पार्टाकस यांच्याकडे दिली आहे :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@डुबुक वड्यांची रेसीपी >> मला हे नाव नेहमी बेडुक वड्यांची =))))) रेशिपी असं ऐकू येतं! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा.. चायनीज कमी खात जा हो.. ;) )बादवे, त्या international लग्नात मेनुमध्ये होता काय हा बेडूक-वडा ?)