खुप दिवसांपासुन नुसत्या पुरुषांचा कट्टा करायचे ठरले होते. सर्वांनी जवळ जवळ पंचवीस डिसेंबरच्या कट्ट्याला होकार कळवला होता. पुरुष म्हणजे या भुतलावर अवतरलेला पहिला सजीव. काही अदिमानव पुण्याहुन, काही ठाणे, आणि काही मुंबैवरुन येणार होते. जगप्रसिद्ध बीबीका मकब-याला ठीक अकरा वाजता यायचं आमचं सर्वांचं ठरलं होतं. पुण्याहुन धन्या, सुड, वल्ली, प्रशांत, बॅटमन, आणि इस्पिक एक्का. ठाण्यातून मुवि, डॉ.सुबोध खरे, किसन शिंदे, आणि गवि, मुंबैतुन आणि दुबैवरुन थेट कुंदन येणार होता. सध्या मुंबैत आलो तर येतोच बोलला. जेपी आणि टवाळ कार्टा यांना मिपावर मिपा मिपा खेळायला मिळणार होतं म्हणुन ते येणार नव्हते. दिवसातून निरर्थक शंभर प्रतिसाद टाकल्याशिवाय त्यांना झोप येत नाही, अशी सुचना मिपाकरांची म्हणुन त्यांना आग्रह केला नाही. मी आणि काही वाचक मिपाकरांबरोबर कट्ट्याच्या तयारीला लागलो.
अखेर तो दिवस उजाडला. सनईचे सूर मोबाईल रिंगटोन मधुन उमटायला लागले. पुणेकर सर्व धन्याच्या गाडीतून येणार होते. पेट्रोलचा खर्च धन्याच करणार होता. वल्ली आणि मंडळी त्यामुळे जास्त खुश होती. माझ्या गावापासून औरंगाबाद चाळीस किलोमिटर अंतरावर होतं मी सकाळीच नाश्ता करुन माझ्या दोन मुलांसोबत निघालो होतो. औरंगाबादच्या काही महिला मिपाकरांना कट्ट्याबद्दल कळलं होतं त्या म्हणाल्या आम्ही तुमच्यासाठी इडली चटणी पाठवतो पण पुरुषांचा कट्टा असल्यामुळे कोणत्याही इतर सदस्याचा मरतांना एक थेंब पाण्याचा जरी आवश्यक असला तरी तो घ्यायचा नाही अशी शपथ करंगळी चावता चावता घेतली होती त्याची आठवण सर्वांना होतीच मी मला कितीही इडल्या आवडत असल्या तरी तो प्रस्ताव जड अंतकरणाने नाकारला. आम्ही सर्व पुरुष पहिल्यांदाच भेटत असलो तरी मिपावर खरडी, व्य.नि. वाट्सपवर आमची तशी सर्वांची ओळख होतीच. आम्ही जसं काही एका गावातले बालपणीचे मित्र भेटत आहोत असे वातावरण तयार झाले होते.
बीबीका मकब-याजवळ मी सर्वांची बाहेर वाट पाहात होतो. मिपाकर अगदी वेळेचे पक्के याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. अगदी बरोबर अकरा वाजता सर्व मिपाकर पोहचले. डॉ.खरे त्यांची दोन मुलं, माझी दोन मुलं, वल्लीची दोन मुलं, ब्याटमनची तीन, धन्याचे चार पहिल्या बायकोचे दोन आणि नंतरचीचे दोन, शेजारचा म्हणुन अजुन एक मुलगा त्यांच्याबरोबर दिसत होता. मिपाकर खरे कुटुंबवत्सल याची खात्री किसन सारखे वहिनीला फ़ोन करुन आत्ताच पोहोचलो, काही काळजी करु नको सांगत होता. वहिनीने दिलेला गाजर का हलवा, डॉ. ख-यांनी रेडीमेड घेतलेली पेष्ट्री, गविंनी आणलेली रेड वाईन. इस्पिक एक्का यांनी डुबुक वड्याची आणलेली भाजी. कुंद्याच्या बाकरवड्या असा सर्व खाण्याचा लवाजमा आम्ही एकदा बीबीका मकब-यात प्रवेश करुन तिथे एका आंब्याच्या झाडाखाली सोडला.
बीबी का मकबरा पाहुन झाल्यावर आम्ही सर्व गोल रिंगन करुन बसलो. कुंद्या म्हणाला मला मामाचं पत्र हरवलं हा खेळ खेळायचा. मग आम्ही खुप वेळ तोच खेळ खेळलो मजा आली. खुप हसलो, जुन्या आठवणींनी गळ्यात गळे टाकून रडलो. मग वल्ली आणि बॆटमन यांनी 'काला कव्वा काट खायेगा' या गाण्यावर धमाल डान्स केला. आय शप्पथ आम्ही सर्वजन लय हसलो. मुलंही त्यांच्याबरोबर नाचायला लागली. इस्पिक एक्का यांनी 'सावरियाने कैसा जादू डाला रे' हे सुरेख गाणं म्हटलं, डॉ. खरे यांनी अय जिंदगी गले लगाले हे गाणं म्हटलं, इतका सुरेख माहोल झाला की विचारु नका. मला कोणी काहीच म्हणायचा आग्रह करत नव्हते तरी मी एक बळजबरी जुनीच कविता त्यांना म्हणुन दाखवली सर्वांनी कौतुक केलं. मिपाकर कशा कशाला वाईट म्हणत नाही, त्याची प्रचिती आली. मग आम्ही आमच्या शाळेतल्या मैत्रीणी जे खेळ खेळायच्या त्या ठीक्करपाणी, चमफुल, सागरगोटे, हे खेळ खेळलो. आई गं. हसुन हसुन पुरेवाट झाली. बॅटमन म्हणाला अरे तुम्ही खुप पारंपरिक होत आहात आधुनिक खेळ खेळा. कोण तरी अश्लिल अश्लिल म्हणुन ओरडलं. समजलं नै ते कोण बोललं म्हणुन पण सर्वांनी त्या कमेंट्सकडे दुर्लक्ष केलं.
वल्लीने मग मला वेरुळ का आवड्तं, तेथील दर्पण सुंद-यावर चक्क वीस मिनिटं घेतली. धन्या माझ्या कानात हळुच म्हणाला मी वल्लीच्या अशा नादामुळे हल्ली कुठे जात नाही. मग आम्ही सर्वांनी न आलेल्या सदस्यांच्या लेखनावर चर्चा केली. गणपाच्या पाककृती हल्ली येत नै असं कोण तरी म्हणालं. गणपा हल्ली 'जागतिकीकरणात मराठी संकेतस्थळं टीकतील काय आणि त्यांची भावी वाटचाल' यावर अभ्यास करतोय हे मी त्या सर्वांना सांगितलं. मग सर्वांनी एकेक पेग वाईन घेतलं. डुबुक वड्या, पेष्ट्री यावर ताव मारला. संक्षीची आठवण सर्वांना झाली. सर्वांनी काही क्षण मौन पाळलं. सर्वांना बोलायचं होतं पण कोणीच काही बोललं नाही. खुप गप्पा झाल्या. माझ्या प्रा.डॉ. या नावावरुन त्यांना मी साठीचा वाटलो मी खुप हसलो. सर्व मिपाकर सच्चे वाटले. सच्चे असल्याचे सर्वांकडे तहसीलची प्रमाणपत्र होतीच. कोणावर टीका नाही, टोमणे नाही, प्रतिसादात दिसतं ते भांडन दिसलं नाही. पुरुषांचीच हीच खरी खासियत झालं गेलं विसरुन जाणे. शेवटी पुरुष मंडळी रॉक्स. कोणी तरी नुसते पुरुष पुरुष आपण सर्व सुखी राहीलो असतो का असा चर्चा विषय घेतला. पण खुप वेळ झालेला होता.
चार वाजत आले होते, आम्ही सर्वांनी एक गृप फ़ोटो घेतला. गप्पा खुप रंगल्या होत्या, निरोपाची वेळ आली होती. आम्ही सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. आणि मी जड अंतकरणाने सर्वाचा निरोप घेतला.
वाचने
14470
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवसभर हिरव्या नोटावाल्यांकडे
कविवर्य मित्र दिवाकर लोटे
In reply to दिवसभर हिरव्या नोटावाल्यांकडे by सतिश गावडे
कविवर्य मित्र दिवाकर लोटेहे काय म्हणे?वत्सा, अभ्यास वाढव !!
In reply to कविवर्य मित्र दिवाकर लोटे by यसवायजी
पब्लिकसिटी बे.
In reply to वत्सा, अभ्यास वाढव !! by सूड
मेलो ....हसून
In reply to दिवसभर हिरव्या नोटावाल्यांकडे by सतिश गावडे
हा कट्ट्याचा आणखी एक फोटो..
(No subject)
In reply to हा कट्ट्याचा आणखी एक फोटो.. by टवाळ कार्टा
:)
In reply to हा कट्ट्याचा आणखी एक फोटो.. by टवाळ कार्टा
डान्सिंग फ्लोअरचा फोटो मस्त
In reply to हा कट्ट्याचा आणखी एक फोटो.. by टवाळ कार्टा
काय हे...आपले ठरले होते ना, की प्रतिसाद मोठे लिहायचे म्हणून...
मला आणि जेपीला जाणून-बुजून न
In reply to काय हे...आपले ठरले होते ना, की प्रतिसाद मोठे लिहायचे म्हणून... by मुक्त विहारि
अरे असे काही नाही....
In reply to मला आणि जेपीला जाणून-बुजून न by टवाळ कार्टा
मुविंचे मनोगत छान.
वॉव. सो क्युट
बोलावले असते तर आलो असतो न सगळ्या अनहिता....
In reply to वॉव. सो क्युट by त्रिवेणी
क्युट?
In reply to वॉव. सो क्युट by त्रिवेणी
@इस्पिकचा एक्का- आता डुबुक
In reply to वॉव. सो क्युट by त्रिवेणी
@इस्पिकचा एक्का- आता डुबुक वड्यांची रेसीपी आलीच पाहिजे.आभासी दुनिया नावाच्या रेस्तरॉमधून खास प्राडाँच्या आग्रहाखातर आणली होती. शेफला विचारले तर तो म्हण्ला की "ती रेसिपी त्याचे शिक्रेट अस्ल्याने तो सांग्णार नाही". आता ती पळवून आणायची कामगिरी गुप्तहेरकथाविषारद श्रीयुत स्पार्टाकस यांच्याकडे दिली आहे :) ;)@डुबुक वड्यांची रेसीपी >> मला
In reply to @इस्पिकचा एक्का- आता डुबुक by डॉ सुहास म्हात्रे
बुवा.. चायनीज कमी खात जा हो..
In reply to @डुबुक वड्यांची रेसीपी >> मला by अत्रुप्त आत्मा