Skip to main content

न झालेला पुरुषांचा कट्टा- औरंगाबाद.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 26/12/2014 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन नुसत्या पुरुषांचा कट्टा करायचे ठरले होते. सर्वांनी जवळ जवळ पंचवीस डिसेंबरच्या कट्ट्याला होकार कळवला होता. पुरुष म्हणजे या भुतलावर अवतरलेला पहिला सजीव. काही अदिमानव पुण्याहुन, काही ठाणे, आणि काही मुंबैवरुन येणार होते. जगप्रसिद्ध बीबीका मकब-याला ठीक अकरा वाजता यायचं आमचं सर्वांचं ठरलं होतं. पुण्याहुन धन्या, सुड, वल्ली, प्रशांत, बॅटमन, आणि इस्पिक एक्का. ठाण्यातून मुवि, डॉ.सुबोध खरे, किसन शिंदे, आणि गवि, मुंबैतुन आणि दुबैवरुन थेट कुंदन येणार होता. सध्या मुंबैत आलो तर येतोच बोलला. जेपी आणि टवाळ कार्टा यांना मिपावर मिपा मिपा खेळायला मिळणार होतं म्हणुन ते येणार नव्हते. दिवसातून निरर्थक शंभर प्रतिसाद टाकल्याशिवाय त्यांना झोप येत नाही, अशी सुचना मिपाकरांची म्हणुन त्यांना आग्रह केला नाही. मी आणि काही वाचक मिपाकरांबरोबर कट्ट्याच्या तयारीला लागलो. अखेर तो दिवस उजाडला. सनईचे सूर मोबाईल रिंगटोन मधुन उमटायला लागले. पुणेकर सर्व धन्याच्या गाडीतून येणार होते. पेट्रोलचा खर्च धन्याच करणार होता. वल्ली आणि मंडळी त्यामुळे जास्त खुश होती. माझ्या गावापासून औरंगाबाद चाळीस किलोमिटर अंतरावर होतं मी सकाळीच नाश्ता करुन माझ्या दोन मुलांसोबत निघालो होतो. औरंगाबादच्या काही महिला मिपाकरांना कट्ट्याबद्दल कळलं होतं त्या म्हणाल्या आम्ही तुमच्यासाठी इडली चटणी पाठवतो पण पुरुषांचा कट्टा असल्यामुळे कोणत्याही इतर सदस्याचा मरतांना एक थेंब पाण्याचा जरी आवश्यक असला तरी तो घ्यायचा नाही अशी शपथ करंगळी चावता चावता घेतली होती त्याची आठवण सर्वांना होतीच मी मला कितीही इडल्या आवडत असल्या तरी तो प्रस्ताव जड अंतकरणाने नाकारला. आम्ही सर्व पुरुष पहिल्यांदाच भेटत असलो तरी मिपावर खरडी, व्य.नि. वाट्सपवर आमची तशी सर्वांची ओळख होतीच. आम्ही जसं काही एका गावातले बालपणीचे मित्र भेटत आहोत असे वातावरण तयार झाले होते. बीबीका मकब-याजवळ मी सर्वांची बाहेर वाट पाहात होतो. मिपाकर अगदी वेळेचे पक्के याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. अगदी बरोबर अकरा वाजता सर्व मिपाकर पोहचले. डॉ.खरे त्यांची दोन मुलं, माझी दोन मुलं, वल्लीची दोन मुलं, ब्याटमनची तीन, धन्याचे चार पहिल्या बायकोचे दोन आणि नंतरचीचे दोन, शेजारचा म्हणुन अजुन एक मुलगा त्यांच्याबरोबर दिसत होता. मिपाकर खरे कुटुंबवत्सल याची खात्री किसन सारखे वहिनीला फ़ोन करुन आत्ताच पोहोचलो, काही काळजी करु नको सांगत होता. वहिनीने दिलेला गाजर का हलवा, डॉ. ख-यांनी रेडीमेड घेतलेली पेष्ट्री, गविंनी आणलेली रेड वाईन. इस्पिक एक्का यांनी डुबुक वड्याची आणलेली भाजी. कुंद्याच्या बाकरवड्या असा सर्व खाण्याचा लवाजमा आम्ही एकदा बीबीका मकब-यात प्रवेश करुन तिथे एका आंब्याच्या झाडाखाली सोडला. बीबी का मकबरा पाहुन झाल्यावर आम्ही सर्व गोल रिंगन करुन बसलो. कुंद्या म्हणाला मला मामाचं पत्र हरवलं हा खेळ खेळायचा. मग आम्ही खुप वेळ तोच खेळ खेळलो मजा आली. खुप हसलो, जुन्या आठवणींनी गळ्यात गळे टाकून रडलो. मग वल्ली आणि बॆटमन यांनी 'काला कव्वा काट खायेगा' या गाण्यावर धमाल डान्स केला. आय शप्पथ आम्ही सर्वजन लय हसलो. मुलंही त्यांच्याबरोबर नाचायला लागली. इस्पिक एक्का यांनी 'सावरियाने कैसा जादू डाला रे' हे सुरेख गाणं म्हटलं, डॉ. खरे यांनी अय जिंदगी गले लगाले हे गाणं म्हटलं, इतका सुरेख माहोल झाला की विचारु नका. मला कोणी काहीच म्हणायचा आग्रह करत नव्हते तरी मी एक बळजबरी जुनीच कविता त्यांना म्हणुन दाखवली सर्वांनी कौतुक केलं. मिपाकर कशा कशाला वाईट म्हणत नाही, त्याची प्रचिती आली. मग आम्ही आमच्या शाळेतल्या मैत्रीणी जे खेळ खेळायच्या त्या ठीक्करपाणी, चमफुल, सागरगोटे, हे खेळ खेळलो. आई गं. हसुन हसुन पुरेवाट झाली. बॅटमन म्हणाला अरे तुम्ही खुप पारंपरिक होत आहात आधुनिक खेळ खेळा. कोण तरी अश्लिल अश्लिल म्हणुन ओरडलं. समजलं नै ते कोण बोललं म्हणुन पण सर्वांनी त्या कमेंट्सकडे दुर्लक्ष केलं. वल्लीने मग मला वेरुळ का आवड्तं, तेथील दर्पण सुंद-यावर चक्क वीस मिनिटं घेतली. धन्या माझ्या कानात हळुच म्हणाला मी वल्लीच्या अशा नादामुळे हल्ली कुठे जात नाही. मग आम्ही सर्वांनी न आलेल्या सदस्यांच्या लेखनावर चर्चा केली. गणपाच्या पाककृती हल्ली येत नै असं कोण तरी म्हणालं. गणपा हल्ली 'जागतिकीकरणात मराठी संकेतस्थळं टीकतील काय आणि त्यांची भावी वाटचाल' यावर अभ्यास करतोय हे मी त्या सर्वांना सांगितलं. मग सर्वांनी एकेक पेग वाईन घेतलं. डुबुक वड्या, पेष्ट्री यावर ताव मारला. संक्षीची आठवण सर्वांना झाली. सर्वांनी काही क्षण मौन पाळलं. सर्वांना बोलायचं होतं पण कोणीच काही बोललं नाही. खुप गप्पा झाल्या. माझ्या प्रा.डॉ. या नावावरुन त्यांना मी साठीचा वाटलो मी खुप हसलो. सर्व मिपाकर सच्चे वाटले. सच्चे असल्याचे सर्वांकडे तहसीलची प्रमाणपत्र होतीच. कोणावर टीका नाही, टोमणे नाही, प्रतिसादात दिसतं ते भांडन दिसलं नाही. पुरुषांचीच हीच खरी खासियत झालं गेलं विसरुन जाणे. शेवटी पुरुष मंडळी रॉक्स. कोणी तरी नुसते पुरुष पुरुष आपण सर्व सुखी राहीलो असतो का असा चर्चा विषय घेतला. पण खुप वेळ झालेला होता. चार वाजत आले होते, आम्ही सर्वांनी एक गृप फ़ोटो घेतला. गप्पा खुप रंगल्या होत्या, निरोपाची वेळ आली होती. आम्ही सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. आणि मी जड अंतकरणाने सर्वाचा निरोप घेतला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14470
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

अनाहिता कट्ट्याचा फायदा... सर लिहिते झाले....

जेपी आणि टवाळ कार्टा यांना मिपावर मिपा मिपा खेळायला मिळणार होतं म्हणुन ते येणार नव्हते.
चायला मला कोणी बोलावलेच नाही...मी कोणाला नको असेन तर सरळ सांगावे...तसाही मी कोणापाठी भुणभुण करत नाही मला बोलवा मला बोलवा (अपवाद मुवि :) )
दिवसातून निरर्थक शंभर प्रतिसाद टाकल्याशिवाय त्यांना झोप येत नाही, अशी सुचना मिपाकरांची म्हणुन त्यांना आग्रह केला नाही.
हे असे आमच्या विषयी गैरसमज पसरवणारे मिपाकर कोण??? इथे कमीत कमी २०० चा आकडा हवा होता ;)

In reply to by पिलीयन रायडर

बाय द वे, हे 'व्याकराणा' काय असतं. ;) अहो, माझं लेखन कसं झालं त्यावर दाद द्या राव आणि तीही खुल्या मनाने. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाळराणा म्हणतात.. तसं व्याकराणा... आणि लेखनावर काय बोलायचं.. जे झालंच नाही त्यावर काय प्रतिक्रिया देणार... ;)

In reply to by पिलीयन रायडर

व्याकराणा हा बहुतेक बीघडलेले शिकरण खाल्ल्यानंतरची प्रतिक्रीयावाचक उद्गार असेल

In reply to by पिलीयन रायडर

न झालेला पुरूषांचा कट्टा हे अगदी बरोबर वाक्यांश आहे. आपल्याला "न झालेल्या पुरूषांचा " असले काही म्हणयचे होते की काय ?

पुरुष लोक्स नुसत्या खयाली कट्ट्यांवर समाधानी असतात तर ! *smile*

In reply to by सस्नेह

टाकु का फोटो. पण आमचं पुरुषांचं ठरलं होतं. आंतरजालावरील महिला आपल्या फोटोकडे टक लावून पाहात राहतील म्हणुन आम्ही फोटो नै टाकले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटोंमधे 'विनोद' असल्यास 'टकाटका' नक्की बघतील अशी माहिती काही ठिकाणाहून कळलेली आहे. :p

In reply to by पिशी अबोली

अशी गॉसिप करत बसण्यापेक्षा डायरेक्ट मलाच विचारायचे ना...सँपल फोटो आत्ताच इथे डकवला असता (चित्रगुप्तांनीच माझ्या धाग्यावर लावलेला पण काही जणांना नाही आवडत...असो) फोटो दाखवल्यावर मात्र ... श्शी बाई बाई बाई...कपडे तरी व्यवस्थित घालायचे "तिने" असे म्हणायचे नाही ;) ...याउप्पर्सुध्धा बर्याच प्रकारे सिध्ध करता येते पण तुर्तास थांबतो

In reply to by विनोद१८

विनोद१८ मी म्हणालो होतो ना तुमच्याच देखणेपणाचीच चर्चा होईल म्हणुन. आपण सर्वच स्मार्ट आहोत पण चर्चा कोणाची होईल त्याची शंका होती तुमचंच नाव पोहोचलं. चला, कोणाला तरी टक लागणारच होती. तरी तुम्ही गालाला लावलेलं तीट सर्वांना दाखवलं होतं. फोटो टाकू नका प्लीज तुमचा. -दिलीप बिरुटे

In reply to by विनोद१८

पण तुम्ही तर विनोद१८ आहात ना? आम्ही पूर्वीच्या १७ पैकी एका विनोदाबद्दल बोल्तोय... ;)

धमाल कट्टा झालेला दिस्तोय!!!कुटुंबवत्सल वल्ली,धन्या,बॅटमॅन आणि त्यांची तीन का पाच का सहा मुलं आणि त्यांच्या बायको क्र १,२ आदि सहित ग्रुप फोटो पाहायला आवडला असता ^_~ मामाचं पत्र खेळलात,कित्ती क्युट! काला कव्वाच्या डॅन्सचा व्हिडो असेल तर टाका ना प्लीज प्लीज =))

In reply to by अजया

पुरुष कट्ट्याच्या कोणत्याच गोष्टी लीक नै करायच्या. शपथा घेतल्यात आम्ही आणि दिल्या. व्हिडो. तुम्हाला फ्रेंडली वाट्सपवर टाकण्यात येईल.कोणाला फॉरवर्ड करु नका प्लीज. -दिलीप बिरुटे

In reply to by अजया

कुटुंबवत्सल वल्ली,धन्या,बॅटमॅन आणि त्यांची तीन का पाच का सहा मुलं आणि त्यांच्या बायको क्र १,२ आदि सहित ग्रुप फोटो पाहायला आवडला असता
अशी चेष्टा जर म्हैलांबद्दल पुरुषाने केली असती तर आत्तापर्यंत प्रतिसादाला पंख, खवला मुंग्या आणि आयडीला कुत्रे लागले असते. मजेतही हे असलं काही किमान तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. असो.

In reply to by बॅटमॅन

फारच बुवा अपेक्षा!पण हे वर लिहिलेले आहे.आम्ही फक्त फोटो मागतोय.तेव्हा पंख खवला मुंगी कुत्रा NA इथे!! वरचं वाचुन प्रतिसाद लिहायचा ना बॅटमॅना.तुझ्याकडुन किमान ही अपेक्षा नव्हती ^_~

एकंदरीत कट्टा खूप छान झाला. धन्या अ‍ॅक्चुअली यायला तयार नव्हता मात्र त्याला आपण वेरूळला जाणार नसून बीबी का मकबर्‍याला जाणार आहोत असे सांगून पटवले. अआ गुरुजी मात्र लग्न लावण्यात मग्न असल्याने येऊ शकले नाहीत. बीबीका मकबरा पाहताना सर्वच जण आपापल्या बीब्ब्या घरीच ठेवून आल्याने सर्वांना मनमोकळेपणे आजूबाजूचे सौंदर्य न्याहाळता आले. बिरुटे सरांचे कवितावाचन तर अतिशय सुरेख झाले. कुंदयाबरोबरच्या त्यांच्या जुन्या आठवणी ऐकणे हा तर खरोखरच सोहळा होता. रावसाहेबांच्या आठवणीने तर ठायी ठायी त्यांचे डोळे पाणावत होते.

In reply to by प्रचेतस

सालं, बुवाला फोन करायचा विसरलो. आणि मी आग्रह केला असता तर बुवा नक्की आले असते. आणि अजून एक प्यारेग्राफ वाढला असता माझ्या लेखनाचा. कुंद्याच्या दिवाळीचे फराळाचा किस्सा भारीच. वहिनी ग्रेटच आहेत. सालं लिहायचं राहीलं. तुम्ही भर घाला बाकीच्या वृत्तांताचा. बीब्ब्या =)) मेलो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही विसरलात पण मी मात्र आठवणीने बुवांना फोन केला होता. पण आधीच्या कमिटमेन्ट्स मुळे ते येऊ शकले नाहीत.

In reply to by प्रचेतस

बीबीका मकबरा पाहताना सर्वच जण आपापल्या बीब्ब्या घरीच ठेवून झाल्याने मोकळेपणे आजूबाजूचे सौंदर्य न्याहाळता आले.
तुमचीवाली निवांत भुलेश्वरात बसली असेल आरसा बघत ! कशाला येतीय वॉच ठेवायला ? *biggrin*

माझ्या प्रा.डॉ. या नावावरुन त्यांना मी साठीचा वाटलो मी खुप हसलो. बघा बघा अजूनही लोक तुम्हाला कमी वयाचे समजतात. ८० वयाच्या इसमाला साठीचा समजणे ही कमालच म्हणाय्ची. प्रा डॉ साहेब तुमच्या या कायमस्वरुपी यौवनाचे रहस्य काय हो?

In reply to by विजुभाऊ

विजु भौ, माझा तुमच्यावर राग आहे. नुसते जुने लेख उचकुन काढत असता. कट्ट्याला या म्हटलं तर वहिनीच्या धाकामुळे कट्ट्याला आला नाहीत. :( >>> प्रा डॉ साहेब तुमच्या या कायमस्वरुपी यौवनाचे रहस्य काय हो? च्यायला, व्य.नि. करुन विचारायचं ना. महिलांनी वाचलं तर. ऑईली चेहरा असल्यामुळे मुलतानी मातीचा लेप लावतो झोपतांना. कॉलेजला निघतांना सकाळी विको टर्मरी आनि संध्याकाळी फेअर अ‍ॅन्ड लव्हली. ;) मरतो मी आज. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by अजया

कॉलेजला निघतांना सकाळी विको टर्मरी आनि संध्याकाळी फेअर अ‍ॅन्ड लव्हली बाब्बो खर्रं ( अय्या खर्रं या चालीवर वाचावे. ) शी बॉ... आमच्या कडे अजूनह्ही ते हर्बळ म्हणून बेसनाचं पीठच लावतात. परवा एकदा मी बेसनाचे पीठ लावले होते तोंडाला तर आमचा धाकटा म्हणाला बाबा इतका मोठ्ठा बट्टाटावडा कोण खाणार म्हणुन. आत्ता काय बोलायचं बुवा. हल्लीच्या पोराना काही ताळतम्त्रच राहीला नाहिय्ये. त्यानी सोडला ठीक्केय. पण मामंजीनीसुद्धा त्यावर तोंडाला रुमाला लावून खीक खेक खीक असे उद्गार काढावेत. असतो एखाद्याचा चेहेरा तेलकट पण म्हणून एवढं......

चांगला वृतांत एखादा कॉमन फोटो टाकला असता तरी चाललं असतं, असं वाटलं. अनाहिता व्यतिरिक्त इतर विषयांवर जोमदार इंटरेस्ट दाखवु वगैरे अशी काही चर्चा झाली का ? - (खयाली पुलाव पकवायला) चिलीम ओढुदे (ह घ्यालच..)

In reply to by पिलीयन रायडर

अनाहिताबद्दल एक शब्दही बोलायचं नाही असं आमचं ठरलं आहे. काय करायचं ते करु देत, आणि माझ्या लेखनावर कोणी महिलांनी हल्ला केला तर आपण पुरुषांनी एकत्र येऊन त्याचा समाचार घ्यायचा नाही, हे सुद्धा आमचं ठरलं आहे. -दिलीप बिरुटे

असाच एक कट्टा आम्ही आमच्या डोंबोलीला करणार आहोत फेब्रुआरीत आमचे 'कट्टाबहाद्दर मुवि' आल्यावर, सध्या नावनोंदणी चालु आहे. इच्छुकांनी आपली नावे व्यनी करुन कळवावीत.

दोन बीब्या असूनही परत बीबीका मकबर्याला जायला धन्या तयार झाला या उदाहरणातच पुरुष कट्टयाचे यश लपलेले आहे. =))

सॉलिडच - न झालेला पुरुषांचा कट्टा. धमाल वृत्तांत :)

गवि, बिरूटे सर यांनी दहादा फोन करून बोलावले पण घरी शिकरण पुरीचा बेत असल्याने जाऊ शकलो नाही. पुर्‍या लाटायच्या डुयटीवर होतो. बाकी कट्याचा व्हीडीओ पाहून खुप मजा वाटली. वल्लीचे वेरूळ पुराण अतीसुंदर ...गवींनी शुट केला का हा व्हिडीओ? जास्त कोठे कॅमेर्‍यात दिसले नाहीत. सुरुवातीला तो औरंगजेबासारखा दिसणार कोण आहे हो? मध्ये आठवणींनी तुम्ही गळे काढले त्यावेळी मला ही व्हिडीओ धुसर दिसू लागला होता. बॅटमनभाऊंची काला कौआ गाण्यावरील नाचाची सिग्नेचर स्टेप एकदम मस्त. सिग्नेचर असल्याशिवाय अशा स्टेप्स जन्माला येत नाहीत. एक चांगला कट्टा मिस केला याची चुट्पूट लागली पण आलो असतो तर बिबीच्या मकबर्‍याच्या बाजूला अजून एक मकबरा झाला असता... कोणावर टीका नाही, टोमणे नाही, प्रतिसादात दिसतं ते भांडन दिसलं नाही. पुरुषांचीच हीच खरी खासियत झालं गेलं विसरुन जाणे. शेवटी पुरुष मंडळी रॉक्स. कोणी तरी नुसते पुरुष पुरुष आपण सर्व सुखी राहीलो असतो का असा चर्चा विषय घेतला. हेच या कट्ट्याचे यश आहे....पुढच्यावेळी नक्की येणार...बोलावले नाही तरी पण येणार..

In reply to by योगी९००

>>>> पुर्‍या लाटायच्या डुयटीवर होतो. हम्म, याच कारणामुळे आम्ही कट्टा ठेवला होता. किती दिवस मेलं ते रांधा वाढा आणि खरखटी काढा करायचं. आपण एक व्यक्ती आहोत आणि मेलं आपल्यालाही भावना आहेत, समाजात एक स्थान आहे. आता पु-या नै आणि ते धुनं नै. एक स्वयंपाकाला बै, एक भांड्याला, कपडे इस्त्री करायची नै. मेलं आपणच किती पैसे वाचवायचे. सालं यांची महिन्याला खरेदी. अमुक खर्च धमुक खर्च. म्हणुन त्या रुटीन कटकटीपासून निवांतपणा मिळावा म्हणुन तर कट्टा केला ना आपण. पुढच्या वेळी पहिल्याच फोनला येस्स येतोय हे उत्तर हवंय हं. सांगुन ठेवतो. >>>> मध्ये आठवणींनी तुम्ही गळे काढले त्यावेळी मला ही व्हिडीओ धुसर दिसू लागला होता. खरंय.. आमचे डोळ्यांना सारखं धुसर धुसर दिसत होतं. लग्नाच्या वेळेसचा कोणीतरी विषय काढला. सर्व सोहळे झाल्यानंतर आई वडीलांना नमस्कार केला आणि सांगितलं इतक्या दिवस मी तुमचा होतो आता हिचा होणार आहे, तेव्हा सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. बॅटमन आणि किसन यांनी गरबात खेळल्या जाणा-या छकडीच्या खुप चांगल्या स्टेप्स घेतल्या. खुप क्यालरीज जळाल्या त्यांच्या. अजून एकेक पेग अस्ता तर आवरणं कठीण गेलं असतं त्यांना. >>>> एक चांगला कट्टा मिस केला याची चुट्पूट लागली पण आलो असतो तर बिबीच्या मकबर्‍याच्या बाजूला अजून एक मकबरा झाला असता... क्लास. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढच्या वेळी पहिल्याच फोनला येस्स येतोय हे उत्तर हवंय हं. सांगुन ठेवतो. नक्कीच... आभारी आहे. एक्का आणि डॉ. खरेसाहेबांचे गाणे ही मस्तच. खरे साहेबांच्या गाण्यामुळे परत व्हिडीओ रक्ताळलेला आणि धुसर दिसू लागला पण कोणीतरी लेन्सवर थोडी रेड वाईन सांडली होती. लेन्स रुमालाने पुसल्यानंतर नंतर व्यवस्थित झाला. बाकी तुम्ही केलेले कविता वाचन नीट ऐकायला/बघायला नाही मिळाले. कॅमेरा सारखा थरथरत होता. कोणीतरी मागे शिव्या घातल्यासारखे बडबडत पण होते. गवीच ना हो व्हिडीओ शुट करत होते? त्यांचा हात नक्की कशामुळे थरथरत होता?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बॅटमन आणि किसन यांनी गरबात खेळल्या जाणा-या छकडीच्या खुप चांगल्या स्टेप्स घेतल्या. खुप क्यालरीज जळाल्या त्यांच्या. अजून एकेक पेग अस्ता तर आवरणं कठीण गेलं असतं त्यांना. अहो काय आहे हे???? गरीब सज्जन पोरं बिचारी. कॅय चाललंय कॅय?

मी तिथे आमच्या सुक्ष्मरुपाने हजर होतो. प्रॉ.डॉ. यांनी फक्त अर्धसत्य लिहीलय. खर काय घडल ते काहि काळाने येऊन सांगेन.सगळ्यांचे फोटु पन टाकेन.

अतिशय सुरेख वृत्तांत!! विशेष म्हणजे नाचताना सगळे स्थळकाळाचं भान ठेवून नाचत होते, त्यामुळे रायतंच काय अगदी कटाची आमटी पण फैललीबिलली नाही. :)

धम्माल केलीत! वृत्तांतही मस्त लिहिलाय सर, अगदी तिथे प्रत्यक्ष असल्यासारखंच वाटलं. अवांतरः स.गा. साठी इतके पुरुष एकत्र जमतात. बघ, तुला अजुन एक सासरा शोधून द्यायला काही अवघड नाही आम्हाला! Lol पैसाजारबुवा,

In reply to by सूड

नाय नाय पिवळ्या रंगाचा आजकाल धसका घेतला आहे मी. आम्ही जरा पिवळं केलं की डायरेक धाग्यालाच पंख लागतात हा अणभव आहे. त्या मुळे गरजुंनी पिवळा चष्मा लाउन वाचावे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्ही जरा पिवळं केलं की डायरेक धाग्यालाच पंख लागतात हा अणभव आहे.
आणि प्रिय व्यक्तीसोबत केलेल्या सहभोजनाच्या निमित्ताने पिवळं केलं तर आयडी शुन्यवासी स्वारी स्वर्गवासी होतो. :D

In reply to by काळा पहाड

उजवीकडे उभा आहे त्याच्या डावीकडे पहिला बसलेला माणूस म्हणजे एस्पिकचा एक्का काका वाटत आहेत....तेच आहेत का? :)

लईच खवून बारी झाली पघा........

खी... खी... खी... लै मज्जा आलती. व्रुत्तांत वाचून कट्ट्याच्या आठव्णी जाग्या झाल्या